थोडक्यात's banner
थोडक्यात's profile picture

थोडक्यात

@thodkyaat104,483 subscribers

https://t.co/HnyQOHnL38 या मराठी बातम्या देणाऱ्या संकेतस्थळाचं अधिकृत ट्विटर खातं । Official twitter handle of Marathi News Website thodkyaat

Shorts

आरटीओ इन्स्पेक्टरने असा व्हिडीओ बनवणं योग्य आहे का?

आरटीओ इन्स्पेक्टरने असा व्हिडीओ बनवणं योग्य आहे का?

134,543 views

Videos

thodkyaat's profile picture

अटकेनंतर सिया गोयलची भावनिक पोस्ट चर्चेत . . लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले गेलेल्या केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. केतनचा मृत्यू ट्रेकिंगदरम्यान अपघातीरीत्या दरीत पडल्यामुळे झाल्याचे सुरुवातीला मानले जात होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सिया गोयलने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केतनसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि चॅट्सचा समावेश होता. या पोस्टमध्ये सियाने, “तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास... आपण लग्नाच्या इतके जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्ने होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतके प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास? Rest in Peace,” असे भावनिक शब्दांत लिहिले होते. त्या वेळी अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र, पोलिस तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार केतनचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असू शकतो. केतनला जाणूनबुजून दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून त्याच दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, सियाची जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी दुःख व्यक्त करणारी ही पोस्ट आता तपासाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्याच नजरेतून पाहिली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व पुरावे, मोबाईल डेटा आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून आगामी तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #LohagadCase #SiyaGoyal #KetanAgrawal #PuneCrime #SocialMediaExposed #PimpriChinchwad #MarathiNews #CrimeUpdate

थोडक्यात

121,114 views • 19 days ago

thodkyaat's profile picture

अल्पवयीन मुलाला जबर मारहाण, थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार . . पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीत धक्कादायक प्रकार! महिलेचा छळ, विनयभंग आणि अल्पवयीन मुलाला मारहाण; पोलीस ठाण्यात दाद न मिळाल्याने थेट आयुक्तांकडे धाव! पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका पीडित महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात न्याय न मिळाल्यामुळे थेट पोलीस आयुक्तांचे दार ठोठावले आहे. महिलेच्या आरोपानुसार, गेल्या ५ वर्षांपासून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात आहे, तसेच तिचा विनयभंग करून तिच्या अल्पवयीन मुलालाही क्रूरपणे मारहाण करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतरही पोलिसांनी दखल न घेतल्याने या महिलेला थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली. पिंपरी-चिंचवडमधील या खळबळजनक प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! #PimpriChinchwad #PuneNews #Morwadi #CrimeUpdate #thodkyaat

थोडक्यात

41,292 views • 29 days ago

thodkyaat's profile picture

पुण्याच्या पौड घाटात विवस्त्र तरुणाने भररस्त्यात घातला गोंधळ! पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध पौड घाटातून एक अत्यंत अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवार १३ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका ३५ ते ४० वर्षीय विवस्त्र तरुणाने घाटात रस्त्याच्या मधोमध उभे राहून गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. या सैरभैर पळणाऱ्या तरुणानं एका कारवर चढून तिचे सनरूफही फोडले, ज्यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, ज्ञानेश्वर आखाडे आणि विशाल राऊत यांनी या तरुणाला कसे पकडले आणि पौड पोलिसांच्या ताब्यात कसे दिले, याची संपूर्ण इनसाईड स्टोरी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. A bizarre and shocking incident took place at Paud Ghat in the Mulshi taluka of Pune on Saturday morning around 11 AM. A 35 to 40-year-old naked man created absolute chaos on the busy ghat road by blocking tourist vehicles and running erratically. The situation turned worse when he climbed onto a car and smashed its premium sunroof, causing a massive traffic holiday jam. Watch this video to see how alert locals Pramod Balkawade, Dnyaneshwar Akhade, and Vishal Raut apprehended the man, clothed him, and handed him over to the Paud Police. #PunePaudGhat #MulshiNews #PaudGhatDrama #PuneTrafficJam #CarSunroofBroken #PaudPolice #MulshiTourism #BreakingNewsPune #Thodkyaat

थोडक्यात

37,788 views • 28 days ago

thodkyaat's profile picture

"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यातील दाम्पत्याला पडलं महागात वाघोली, पुणे “गाडी हळू चालवा” असे सांगणे पुण्यातील एका दांपत्याला चांगलेच महागात पडल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली आहे. भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर या घटनेत दांपत्यासोबत असलेला अवघा 3 वर्षांचा चिमुकलादेखील जखमी झाला आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A shocking incident has occurred in the Wagholi area of ​​Pune, where a couple paid a heavy price for simply asking someone to "drive slowly." Their two-wheeler was intercepted in the middle of the road, and the husband and wife were brutally assaulted. Furthermore, a mere three-year-old child accompanying the couple was also injured in this incident. A case has been registered against three individuals in connection with this matter at the Wagholi Police Station. #punecrimenews #wagholicrimenews #latestmarathicrimenews

थोडक्यात

51,434 views • 1 month ago

thodkyaat's profile picture

भोंदू मिश्रा बाबाचा नवीन व्हिडिओ समोर . . पुण्यातील खराडी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला दैवी अवतार सांगून आणि नरकाची भीती दाखवून एका उच्चशिक्षित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या भोंदू राधामोहन मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, अटकेनंतरही या बाबाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भक्त त्याची आरती करताना आणि पाय चेपताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे समाजातील अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. A shocking case of blind faith and crime has emerged from Kharadi, Pune. A self-proclaimed godman, Radhamohan Mishra, has been arrested for allegedly raping and cheating a highly educated woman by threatening her with divine wrath. Despite his arrest, a new video shows his followers performing his aarti, highlighting the deep-rooted issue of superstition. Watch this video for an in-depth analysis of the case and the law against superstition. #BhonduBaba #PuneCrime #KharadiNews #SuperstitionExposed #RadhamohanMishra

थोडक्यात

19,245 views • 19 days ago