
थोडक्यात
@thodkyaat • 105,257 subscribers
https://t.co/HnyQOHnL38 या मराठी बातम्या देणाऱ्या संकेतस्थळाचं अधिकृत ट्विटर खातं । Official twitter handle of Marathi News Website thodkyaat
Shorts
Videos

संतोष पंडितांच्या अटकेवरून पोलीस स्टेशनमध्ये मोठा राडा . . संतोष पंडित यांच्या अटकेनंतर आता पुणे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे... एका महिलेच्या तक्रारीवरून संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली... मात्र, याच कारवाईचा दाखला देत आता इतर तक्रारदारही पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले आहेत... पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात तर याच मुद्द्यावरून महिला, पुरुष आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली... तब्बल आठ तास पोलिसांनी बसवून ठेवलं, गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं, मात्र शेवटी गुन्हा दाखल केला नाही, असा तक्रारदारांचा आरोप आहे... तर दुसरीकडे कोथरूड पोलीस ठाण्यातही एका महिलेने आमदार संजय गायकवाड यांच्या शिवीगाळीमुळे आपल्याला लज्जा उत्पन्न झाल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारली, मात्र गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप आहे...त्यामुळे संतोष पंडित प्रकरणात एक न्याय आणि इतर प्रकरणात वेगळा न्याय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय...
थोडक्यात238,564 次观看 • 1 个月前

विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष चव्हाण असून तो पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला असल्याचीही माहिती आहे. राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचेही सांगितले जात आहे. गणेशप्रेमी असलेल्या संतोष चव्हाणने बापट यांच्यावर हल्ला नेमका का केला? यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हल्ल्याचं खरं कारण काय? पोलिस तपासातून काय समोर येतंय? Vidyanand Bapat, Santosh Chavan, Vidyanand Bapat Assault Case, Pune News, Kothrud News, Pune Crime News, Pune Police, Police Investigation, Assault Case Pune, Kothrud Pune, Rautwadi Pune, Ganesh Mandal Pune, Priyadarshini Ganesh Mandal, Pune Ganeshotsav, Ganeshotsav Pune, Law and Order Pune, Maharashtra News, Marathi News, Marathi Breaking News, Pune Latest News, #VidyanandBapat #SantoshChavan #PuneNews #Kothrud #PuneCrime #PunePolice #AssaultCase #PoliceInvestigation #Ganeshotsav #GaneshMandal #PuneGaneshotsav #LawAndOrder #CrimeNews
थोडक्यात106,541 次观看 • 1 个月前

कोथरूडमधील 36 एकर वडिलोपार्जित जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न! . . पुण्यातील कोथरूड परिसरातील किष्किंधा नगर येथील सुमारे 36 एकर वडिलोपार्जित जमिनीवरून वाद निर्माण झाला आहे. जमीनमालक सारिका लोणारी यांनी दर्शन चोरडिया आणि समीर मुलाणी यांच्यावर संबंधित जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. लोणारी यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित भूखंड त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता असून मालकीहक्कासंबंधीची कागदपत्रे यापूर्वीच कोथरूड पोलीस ठाण्यात सादर करण्यात आली होती. मात्र, जमिनीची कथित अनधिकृत मोजणी सुरू असताना कोथरूड पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मोजणीला विरोध करणाऱ्या त्यांच्या मेहुण्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचाही दावा लोणारी यांनी केला. त्यानंतर त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घाडगे यांची भेट घेत पोलीस संरक्षण नेमकं कोणत्या आधारावर देण्यात आलं, असा सवाल उपस्थित केला. “आम्ही भाजपचे कार्यकर्ते असूनही आमच्यासोबत असा प्रकार घडला. पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा संशय आहे,” असा आरोपही लोणारी यांनी केला आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घाडगे यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून प्रकरणाची योग्य ती दखल घेतली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे लोणारी यांनी सांगितले. या प्रकरणात चोरडिया आणि मुलाणी यांची स्वतंत्र बाजू अद्याप समोर आलेली नसल्याने आरोपांची सत्यता अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. #Kothrud #KothrudNews #PuneNews #PunePolice #LandDispute #PropertyDispute #KishkindhaNagar #SarikaLonari #DarshanChordia #SameerMulani #ArunGhadge #KothrudPolice #PuneCrime
थोडक्यात65,509 次观看 • 1 个月前

एकाकडून ‘मोदी मोदी’च्या घोषणा, आंदोलक ओरडू लागले चोर है, चोर है! . . पुण्यातील प्रसिद्ध गुडलक चौकात संतोष पंडीत आणि विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ विविध संघटना तसेच व्यक्तींनी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनस्थळी मोठी गर्दी झाली होती, यावेळी याच गर्दीतील काही तरुणांनी ‘मोदी मोदी’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली, यावेळी आंदोलकांनी देखील ‘चोर है, चोर है’ म्हणत संबंधितांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी थोडा गोंधळ उडालेला देखील पहायला मिळाला. #GoodluckChowk #Pune #PuneNews #PuneProtest #NarendraModi #ModiModi #PoliticalProtest
थोडक्यात61,381 次观看 • 1 个月前

अटकेनंतर सिया गोयलची भावनिक पोस्ट चर्चेत . . लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले गेलेल्या केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. केतनचा मृत्यू ट्रेकिंगदरम्यान अपघातीरीत्या दरीत पडल्यामुळे झाल्याचे सुरुवातीला मानले जात होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सिया गोयलने सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केतनसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि चॅट्सचा समावेश होता. या पोस्टमध्ये सियाने, “तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास... आपण लग्नाच्या इतके जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्ने होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतके प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास? Rest in Peace,” असे भावनिक शब्दांत लिहिले होते. त्या वेळी अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र, पोलिस तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार केतनचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असू शकतो. केतनला जाणूनबुजून दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून त्याच दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, सियाची जुनी सोशल मीडिया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी दुःख व्यक्त करणारी ही पोस्ट आता तपासाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्याच नजरेतून पाहिली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व पुरावे, मोबाईल डेटा आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून आगामी तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #LohagadCase #SiyaGoyal #KetanAgrawal #PuneCrime #SocialMediaExposed #PimpriChinchwad #MarathiNews #CrimeUpdate
थोडक्यात121,453 次观看 • 3 个月前

मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणाची हत्या; आरोपीचा CCTV समोर मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. चालत्या लोकलमध्ये किरकोळ वादातून एका सेल्समनची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुंबई लोहमार्ग पोलिसांनी (GRP) या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास करत मुख्य आरोपी रोशन सुवर्णा याला कुर्ला परिसरातून शिताफीने अटक केली आहे. A shocking and brutal murder inside a moving Mumbai local train has sent chills across the city. A salesman was stabbed to death following a minor altercation during Tuesday night hours. Mumbai Railway Police (GRP) acted swiftly and arrested the prime accused, Roshan Suvarna, from the Kurla area using CCTV and technical intelligence. #MumbaiLocal #TrainMurderCase #KurlaArrest #RoshanSuvarna #MumbaiCrime #GRPAction #MumbaiNews #CrimeUpdate
थोडक्यात112,848 次观看 • 3 个月前

पुण्यात बापट विरुद्ध कुलकर्णी। Vidyananda Bapat यांच्यावर गुन्हा दाखल होणार? पुण्यातील गणेशोत्सव मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विद्यानंद बापट या पुणेकर नागरिकाने गणेशोत्सवा दरम्यान मिरवणुकांमधील साऊंड व डीजे वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर पुणेकर बापट यांच्या समर्थनार्थ उतरल्याचे दिसून आले. आता याच विद्यानंद बापट यांच्या मताशी विसंगत असल्याचे सांगत पुण्यातील दुसरे पुणेकर नागरिक धनंजय कुलकर्णी यांनी आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे सांगत व समाजामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विद्यानंद बापट यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. #PuneGaneshotsav #Ganeshotsav2026 #PuneNews #PunePolice #DJBan
थोडक्यात45,063 次观看 • 1 个月前

देवेंद्र फडणवीस यांचा निरोप समारंभ झाला? मंत्री, आमदारांनी शेवटचा निरोप दिला? . . २५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मंत्री आणि आमदारांसाठी एका विशेष स्नेहभोजनाच्या बैठकीचे आयोजन केले होते. महायुतीमधील अंतर्गत मतभेद दूर करणे आणि विकासकामांमध्ये समन्वय राखणे हे या बैठकीचे अधिकृत कारण सांगण्यात आले असले, तरी राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. ही बैठक केवळ स्नेहभोजन नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप समारंभ होता का? भाजपच्या सर्वोच्च अशा केंद्रीय संसदीय मंडळात (BJP Parliamentary Board) फडणवीस यांना स्थान मिळणार का? तसेच आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री किंवा इतर महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवली जाणार का? फडणवीसांच्या दिल्लीतील वाढत्या फेऱ्या, भाजपची राष्ट्रीय रणनीती आणि विरोधकांचे दावे याविषयीचे सविस्तर विश्लेषण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. On August 25, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis hosted a special dinner meeting for ministers and MLAs of the Mahayuti alliance. While officially organized to streamline governance, foster coordination, and resolve internal differences, political circles are abuzz with speculation regarding CM Fadnavis's potential move to national politics. Was this dinner a precursor to a major political reshuffle and a farewell event in state politics? Is Devendra Fadnavis set to be inducted into the BJP’s powerful Central Parliamentary Board? What are the chances of him taking up a key Union Cabinet portfolio, such as the Finance Ministry, in the upcoming cabinet expansion? Watch this detailed analytical video to explore the political calculations, national equations, and major statements surrounding Devendra Fadnavis's future role. #DevendraFadnavis #narendramodi #bjp #eknathshinde #MaharashtraPolitics #BJP #Mahayuti #CabinetExpansion #AmitShah #DelhiPolitics #BJPParliamentaryBoard #Thodkyaaat #MarathiNews #MaharashtraNews #IndianPolitics #politics #maharashtra
थोडक्यात31,415 次观看 • 1 个月前

दाभोळकरांचं नाव घेत बापट काय म्हणाले? . . Vidyanand Bapat, Pune News, Pune Ganeshotsav, Pune DJ Issue, Noise Pollution Pune, Sound Pollution Pune, Pune Traffic Issue, Ganeshotsav 2026, DJ Ban Pune, Pune Protest March, Pune Rally, Festival Noise Pollution, Pune Civic Issues, Pune Police, Public Safety Pune, Maharashtra News, Marathi News, #VidyanandBapat #PuneNews #PuneGaneshotsav #Ganeshotsav2026 #NoisePollution #SoundPollution #DJBan #DJIssue #PuneTraffic #PuneProtest #PuneRally #PublicSafety
थोडक्यात21,402 次观看 • 1 个月前

"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यातील दाम्पत्याला पडलं महागात वाघोली, पुणे “गाडी हळू चालवा” असे सांगणे पुण्यातील एका दांपत्याला चांगलेच महागात पडल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली आहे. भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर या घटनेत दांपत्यासोबत असलेला अवघा 3 वर्षांचा चिमुकलादेखील जखमी झाला आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A shocking incident has occurred in the Wagholi area of Pune, where a couple paid a heavy price for simply asking someone to "drive slowly." Their two-wheeler was intercepted in the middle of the road, and the husband and wife were brutally assaulted. Furthermore, a mere three-year-old child accompanying the couple was also injured in this incident. A case has been registered against three individuals in connection with this matter at the Wagholi Police Station. #punecrimenews #wagholicrimenews #latestmarathicrimenews
थोडक्यात51,649 次观看 • 4 个月前

अल्पवयीन मुलाला जबर मारहाण, थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार . . पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीत धक्कादायक प्रकार! महिलेचा छळ, विनयभंग आणि अल्पवयीन मुलाला मारहाण; पोलीस ठाण्यात दाद न मिळाल्याने थेट आयुक्तांकडे धाव! पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका पीडित महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात न्याय न मिळाल्यामुळे थेट पोलीस आयुक्तांचे दार ठोठावले आहे. महिलेच्या आरोपानुसार, गेल्या ५ वर्षांपासून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात आहे, तसेच तिचा विनयभंग करून तिच्या अल्पवयीन मुलालाही क्रूरपणे मारहाण करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतरही पोलिसांनी दखल न घेतल्याने या महिलेला थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली. पिंपरी-चिंचवडमधील या खळबळजनक प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! #PimpriChinchwad #PuneNews #Morwadi #CrimeUpdate #thodkyaat
थोडक्यात41,387 次观看 • 4 个月前