
Vaibhav Shetkar
@vaibhavshetkar • 8,482 subscribers
Solopreneur
Shorts
Videos

ज्या कोकणात पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेले खड्डे इतके सुंदर बांधण्याची परंपरा आहे तिकडे आपले प्रशासन सरकार इथल्याच जनतेकडून टॅक्स वसुली करून गेली २० वर्षे #मुंबईगोवाहायवे नावानं नुसत्या खड्ड्यांची निर्मिती करतंय त्यावर तूप ओतावं म्हणून आता mining ⛏️ आणून कोकण पोखरणार माझं गाव रेडी तिथल्या गोगटे माईन्स नी जे ३०/४० वर्षांपूर्वी केलंय त्यामुळं माझ्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण युनिट बसवून गावात पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना पैसे मोजावे लागतायत. माझे सख्खे काका त्या खाणीत काम करायचे त्यावेळी उपजीविका म्हणून पत्करलेलं काम त्यांच्याच पुढच्या पिढीला पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजायला लावेल हे नव्हतं समजलं त्यांना पण आपल्याला तरी ते भविष्यातील दुष्परिणाम कळायला हवेत.
Vaibhav Shetkar15,103 次观看 • 9 天前

१९४५ साली कोकणातील एका ९६ कुळी मराठ्यानं सन्माननीय ब्राह्मणाचं घर विकत घेताना शब्द दिला की या वाड्यातल्या स्वयंपाक घरात मांसाहारी अन्न शिजवलं जाणार नाही. तो शब्द आजची पिढीसुद्धा पाळतेय. अर्थात मांसाहार सोडला नाही😀तो शिजविण्यासाठी त्यांनी वेगळी जागा केली पण दिलेला शब्द पाळला कारण ज्या विद्वान ब्राम्हणाकडून हा ६० खांबी वाडा सुर्वे यांनी विकत घेतला ते थोर मराठी रियासतकार साहित्यिक गोविंद सखाराम सरदेसाई. व्यवहारसुद्धा विद्वानांचा सन्मान करताना साधेभोळेपणा बाळगला जातो म्हणून कोकणची माणसं साधी भोळी❤️
Vaibhav Shetkar57,251 次观看 • 3 个月前

२६ वर्षाचा सावळा, याचा हिरो म्हणून पहिला सिनेमा #WithLove याआधी त्यानं दिग्दर्शित केलेला सिनेमा.. #TouristFamily कंबोज+खरात+झिरवळ यात अडकलेल्या महाराष्ट्रानं फक्त विचारांची प्रगल्भता म्हणून या मुलाच्या या २ सिनेमांची पातळी,फक्त check करून पाहीली तरी आपल्याला आपली लायकी कळेल😬
Vaibhav Shetkar28,013 次观看 • 5 个月前

भारतातील सर्वात दिर्घकाळ लांबलेला महामार्ग #मुंबईगोवाहायवे कायद्यानुसार कंत्राटदाराने एक किमी मधे कमीत कमी ८३४ झाडे असे मानक असताना अक्षरशः तोंडाला पाने पुसली आहेत. जवळ जवळ तीन लाखाहून जास्त कोकणची प्राचीन वृक्ष परंपरा नष्ट झाली आहे . कोकण चे तापमान वाढत आहे ,फळधारणा कमी होत आहे.तरी आपला पाठींबा हवा आहे. १ मे रोजी कोकण च्या दृष्टीने महत्वाचे उपोषण ,हायवे वृक्ष लागवड समिती चिपळूण सुरू करत आहे , ठिकाण - प्रांताधिकारी कार्यालयासमोर. चिपळूण वाटेवरून जे प्रवासी जातील त्यांनी फक्त ५ मिनीटे का होईना जाताना भेट द्या व आपला पाठींबा द्या. हायवे वृक्ष लागवड समिती चिपळूण. (व्हीडीओ चंदगडचा आहे पण सध्या हीच परिस्थिती आहे सगळीकडे मार्केटिंगच्या जाहीरातीत झाडं दिसतात पण जनिनीवर नाही😃)
Vaibhav Shetkar21,683 次观看 • 4 个月前

"चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून या घटकेपर्यंत मोहरला नाही." - अंतु बर्वा पुलंनी महाराष्ट्राला हसवलं असं म्हणतात तेव्हा पुलंचा अंतु बर्वा शेवटच्या एका वाक्यात अख्खं कोकण हळहळवून सोडतो ..🙏🏻 #mariomiranada ची फेमस कार्टून्स figurine रुपात उपलब्ध आहेत मग आपली आवडती मराठी कॅरेक्टर्स पण या रूपात असावीत यासाठी हा प्रयत्न Resin 3D art ♥️ #PuLaDeshpande #पुलं
Vaibhav Shetkar15,900 次观看 • 3 个月前

#मुंबईगोवाहायवे वर माझा सर्वात जास्त प्रवास चिपळूणला होतो. कघी तो पुणेमार्गेसुध्दा होत असतो. या व्हीडीओतला घाट पुणे-चिपळूण मार्गावरचा. पण गेली १५/२० वर्ष कोकणात एकही सायकल स्पर्धा झाली नसल्याकारणाने हे भोग आमच्या पदरात पडलेत असो कौल आमच्या एका ग्रामदेवतेन नुकताच दिलान झो! 😁
Vaibhav Shetkar23,267 次观看 • 7 个月前

आज सकाळी चिपळूणशी संबंधीत सगळ्याच ग्रुपवर हा व्हीडीओ आला. काम पूर्ण व्हायच्या आधीच पूल कोसळणं हे मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीत आधी घडलेलं. आज पुन्हा चिपळूणात त्याचा प्रत्यय आलाय. १५ हजार कोटींच्या वर खर्च होऊनसुध्दा १०-१५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पदरात हेच.🤦🏻♂️ #मुंबईगोवाहायवे
Vaibhav Shetkar68,108 次观看 • 2 年前
0:34
Sensitive content
This media may contain sensitive content.

Being pure मालवणी मी कीतीही म्हावऱ्याच्या पोस्ट केल्या ना तरी माझी सौ, शुद्ध “वरण-भात-तूप” आहे.मी प्रत्येक शाकाहारी माणसाला ‘वरण-भात-तूप’ म्हणतो😃 पंजाबी पनीरला माझा विरोध नाही पण… But pls don’t accept परप्रांतीय as it is जसं वडा पाव चं अस्तित्व आहे♥️ पावा सोबत नातं जडलं तरी अस्सल मराठीपण नाही हरवलंय♥️ वानखेडेवर तेंडुलकर जेव्हा म्हणतो ना की माझ्या आईनं माझी मॅच प्रत्यक्ष पहावी म्हणून मी विनंती केली की माझी शेवटची मॅच please वानखेडेवर घ्या माझी आई बघू शकेल! ती भावना त्या emotions तुम्ही अहमदाबादला प्रत्यक्षात आणणं कोण्या एका जन्मात तरी शक्य आहे का ? धंदा करा ना! धंद्यात emotional marketing असू शकतं तेंडुलकर पैदा करून दाखवा तेव्हा मानू😃💪
Vaibhav Shetkar13,621 次观看 • 4 个月前

कोकणात अनेक आंदोलनं सध्या चालू आहेत तळकोकणातलं हे अभिनव… अवैध वाळू उपसा विरोधात. ३०/३५ रेती उपसा करणाऱ्या बोटी २ गावांच्या शेतीत खारं पाणी शिरणं गोड्या विहीरीत खारं पाणी जाणं पोलिसांचं गावकऱ्यानी अवैध रेती उपशाच्या भरलेल्या बोटींना पकडून देऊनही नोंद करून न घेणं आदी प्रश्न मोठ्या न्यूज चॅनल्सना तकलादू वाटत असल्याने त्यांनीही याकडे दुर्लक्ष केलंय ज्यांनी बातम्या चालवल्यात ते पब्लिकचे रात्रीच्या काळोखातले व्हीडीओ आहेत बाकी हा एक रिलस्टार पुढे आला त्याचे आभार. त्याच्या कमेंटमध्ये घरी बसून पब्लिक बाकी रिलस्टार कुठे आहेत त्यांना टॅग करून शिव्या देतायत. म्हणजे पत्रकार-मिडीया यावरचा विश्वास केव्हाच उडालाय. बाकी संबंधित मंत्री प्रशासन यांचा या विषयाकडे दुर्लक्ष करण्याचाच इंटरेस्ट आहे.
Vaibhav Shetkar15,926 次观看 • 5 个月前

साखरपा♥️ अचानक कौतुक वाढलंय या गावचं #मुंबईगोवाहायवे वर येत नसल्याने याला तसं ग्लॅमर कमी पण जो काही आजवर मान मिळालाय तो कोल्हापूरला नेणारा रस्ता या गावातून जातो म्हणून. आणि आता तर भला मोठा चार पदरी रत्नागिरी कोल्हापूर आणि आताची बिग बॅास मराठीची विनर सध्या ट्रॅाफी हातात घेऊन या गावची सगळी मंदिरं फीरतेय😃म्हणून!
Vaibhav Shetkar14,036 次观看 • 4 个月前

आमच्या वाडीत लग्नानंतर अहेराची पाकीटं मोजायच्या बैठकीत ११ रू. ज्यानं पाकीटात दिले त्याचं नाव सुध्दा सन्मानाने वहित लिहीलं जायचं. त्या अहेराच्या पैशातून त्या लग्नाचा खर्च सुटावा अशी भावना प्रत्येक गावकऱ्याची असायची. Prafulla Wankhede 🇮🇳 सरांचा जुना व्हीडीओ आणि आजचा हुंडाबळी 🙏🏻
Vaibhav Shetkar35,824 次观看 • 1 年前