Loading video...

Video Failed to Load

Go Home

Anti Narcotics Task Force (ANTF) has been established in Maharashtra. अँटीनार्कोटिक्स टास्कफोर्स (ANTF) राज्यात स्थापन करण्यात आला आहे. राज्यात बंद कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करतो आहोत. गुप्तचर माहितीची देवाणघेवाण प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणात 4 पोलिस बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटीलला प्रथम अटक झाली, तेव्हा...

20,733 views • 2 years ago •via X (Twitter)

7 Comments

Vishal Sunil Chaudhari's profile picture
Vishal Sunil Chaudhari2 years ago

माननीय मंत्री महोदय,ANTF स्थापन केल्याचे स्वागतच आहे पण यासाठी नवीन संख्याबळ तयार करणे गरजेचेच आहे. नाही तर त्याच पोलिसांना अतिरिक्त भार देऊन हे काम होणार असेल तर मग फक्त pendancy वाढेल बाकी काही नाही.

🚩माजी शिवसैनिक🚩🏹🏹's profile picture
🚩माजी शिवसैनिक🚩🏹🏹2 years ago

Great leader Deva Bhau

Gautam Kamble's profile picture
Gautam Kamble2 years ago

कार्यतत्पर नेता

Sanchit Shigvan's profile picture
Sanchit Shigvan2 years ago

Great leader taking great decisions....

Nikhil Parkar's profile picture
Nikhil Parkar2 years ago

जनतेच्या सेवेसाठी देवा भाऊ सदैव तत्पर

Rushikesh Tapkir's profile picture
Rushikesh Tapkir2 years ago

लोककल्याणकारी नेता देवा भाऊ

ढाण्या मांजर 🐆's profile picture
ढाण्या मांजर 🐆2 years ago

व्यसनमुक्तीसाठी मोठी यंत्रणा उभारण्याचे काम सुद्धा सोबतच हाती घेण्यात येईल.

Related Videos

नरसापूर प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही प्रकारची लाठीचार्ज केला नाही. - पुणे पोलीस आयुक्त कांबळे नावाचा नराधामला सोडलं जाणार नाही, पण, भावनिक होऊन चालणार नाही. जे काम कायदा करतो ते काम कोणीही करू शकत नाही. तुमची माझी लाख जरी ईच्छा असली कांबळेला फाशी आजच होयला पाहिजे. पण, हे प्रत्यक्षात शक्य नाही. राग , संताप सगळं समजू शकतो , तुम्हाला जेवढा राग आहे, तेवढा राग मला सुद्धा आहे, सर्वांना राग आहे. देशात आपल्या कायदा हा सर्वोपरी आहे. मान्य आहे कायदेशीर मार्ग वेळखाऊ असतात. पण, कायदा हातात घेऊन आपण सुद्धा कायद्याचं उल्लंघन करून स्वतःच आयुष्य देखील आपण अडचणीत आणतो. त्यासाठी कायदा त्याच काम करणार भावनिक होऊन चालणार नाही. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. १०० टक्के त्याला मृत्यू दंड होणार आहे. कारण, तशी कायद्यात तरतूद आहे.

Prakash Gade

36,799 views • 4 months ago

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज स्थानिक पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही. गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे? ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही. #pressconference

Sharad Pawar

80,246 views • 3 years ago

मणिपूरमधील घटना अतिशय दु:खद आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. ही घटना केवळ मणिपूर नाही तर 140 कोटी देशवासीयांना प्रचंड वेदना देणारी आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे कालच मा.पंतप्रधान Narendra Modi नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले आणि 4 आरोपींना अटक सुद्धा झाली. महिला सुरक्षा हा विषय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अधिक गांभीर्याने घेतला आणि सर्वच राज्यांना महिला सुरक्षेचे कायदे अधिक कठोर करण्यास सांगितले. वेदना जाणवून थांबून जाणे किंवा नुसते विव्हळत राहणे, हा कुठल्याच समस्येवरील उपाय असू शकत नाही, तर वेदनेवर उपचार अधिक महत्वाचा असतो. मा. नरेंद्र मोदीजी यांची हीच कार्यशैली नेहमी राहिली आहे, आम्हाला खात्री आहे,मणिपूरच्या दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. #Manipur

Chitra Kishor Wagh

53,125 views • 3 years ago

शासन नेमकं कोणाच्या दारी ? शेळी कबुतरे चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलीत आणि एक मराठा मुलांना अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध करतो. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे, गृहमंत्री सुद्धा भाजपचे आहे. ते स्वतः दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील की हे प्रकरण सुद्धा इतर प्रकरणांप्रमाने दाबण्यात येईल ? दलित, ओबीसी, आदिवासी भाजपमध्ये वापरासाठी आहेत. त्यांना वापरा आणि फेका अशी भाजपची भूमिका आहे. उपमुख्यमंत्री,गृहमंत्री आपल्या राज्यातील अश्या घटनांकडे डोळेझाक करून जपानमध्ये मोठं मोठे वल्गना करतात. इकडे त्यांच्याच राज्यात समाज मन संतप्त करणाऱ्या अश्या दुःखद घटना घडत आहे. या घटना राज्यातील कायदा व सुव्यस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहे. या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत आणि कठोर कारवाई करण्यात यावी.अशा घटनांचा केवळ निषेध करणे पुरेसे नाही; गरज आहे ती गुन्हेगारांना शिक्षा देण्याची.

Vijay Wadettiwar

63,320 views • 3 years ago