Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

अजित दादांच्या अपघातानंतर पार्थिव दवाखान्यात नेतानाचा व्हिडिओ

75,028 Aufrufe • vor 7 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

अजित दादांच्या अंत्यसंस्काराला आलेली लोक ही बघ्यांची गर्दी नव्हती.ती आपल्या घरातला जबाबदार पुरुष गमावल्यावर जशी माणसं जमतात, तशी जमलेली माणसं होती. लोक तिथे चेहरा पाहायला आले नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या एका आधाराला निरोप द्यायला आले होते. कारण अजित दादा फक्त नेता नव्हते. गावगाड्यातला एक ओळखीचा चेहरा होते. अडचणीत नाव घ्यावं असं एक नाव होते. संकटात आपला माणूस म्हणून आठवणारा एक पत्ता होते. एखाद्या घरात कर्ता पुरुष जातो, तेव्हा रडणं कमी असतं, गोंधळ कमी असतो, पण माणसं जास्त असतात.कारण सगळ्यांना कळलेलं असतं.इथं माणूस नाही, एक आधार गेला आहे. अजित दादांच्या बाबतीत तेच झालं. लोक आपल्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून निघाले.ते औपचारिकतेसाठी नाही, तर आपल्या गावगाड्यातलं काहीतरी तुटलंय ही जाणीव त्यांना तिथपर्यंत घेऊन गेली. त्या रांगेत उभा असलेला प्रत्येक माणूस एकच गोष्ट बोलत होता.आपल्या मधला कुणीतरी गेला आहे. ती गर्दी गावगाड्याच्या एका आधारस्तंभासाठी होती.

Pratik S Patil

75,568 Aufrufe • vor 7 Monaten

श्री.एकनाथ खडसे साहेब यांना पवार साहेबांनी विधान परिषद दिली आमदार केलं आणि लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाने महाविकास आघाडीमध्ये रावेरची लोकसभेची जागा हट्टाने घेतलेली असताना ऐनवेळी खडसेंनी वेगळी भूमिका घेतली. त्यावेळी खडसेंच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा होती त्यावर एका पत्रकाराने ती विधानपरिषद आपण परत घेणार का असा सवाल आदरणीय शरद पवार साहेबांना केला होता तेव्हा साहेबांचं वाक्य होत "दिलेल्या गोष्टी परत घ्यायच्या नसतात" हा प्रसंग आज सांगण्याचा उद्देश इतकाच कि अजित दादांच्या राष्ट्रवादीतील विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी ज्यांना अजित दादांनी आमदार केलं.त्यांना पक्षाने विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्याठिकाणी संजय काकडे यांच्या मुलाला संधी देण्याची चर्चा सुरु असल्याची बातमी पाहिली. अजित दादांनी अमोल मिटकरी,इद्रिस नायकवडी यांच्यासारख्या लोकांना संधी दिली पवार साहेबांबद्दल तर कित्येक उदाहरण देता येतील अशी नेतृत्व उगाच मोठी होत नसतात त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची आणि नेतृत्व करण्याची धमक असावी लागते.

yogesh sawant

42,045 Aufrufe • vor 4 Monaten

सुनेत्रा पवार शपथविधीसाठी मुंबईत पोहोचणं.. शरद पवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेणं., शपथविधीबाबात आपल्याला कल्पना नाही असं सांगणं.. विलिनीकरणसाठी दादा तयार होते, त्या बैठकीचा व्हिडिओ आताच बाहेर येणं..! शरद पवारांच्या नेत्यांकडून विलिनीकरणांची तारीखही सांगणं... दादांच्या नेत्यांकडून मात्र विलिनीकरणाच्या विषयावर बोलणं टाळणं...! हे पाहून तरी नक्कीच वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची दादांना इच्छा होती पण त्यांना कितीही इच्छा असली तरीही अनेकांना हे होऊ नये असंच वाटत असावं..! दादांची राष्ट्रवादी काकांनी टेकओव्हर करण्याआधीच शपथविधी उरकणे... आणि दादांचा काकांसोबतचा व्हिडिओ शपथविधी आधीच समोर येणे... दादांवरचा हक्क सांगण्याची चढाओढ दोन्ही पक्षांमध्ये सुरु झालीय हेही नक्की.. खरा खेळ तर आता सुरु झालाय... #राजकारण #शरदपवार #SharadPawar #AjitPawar #NCP #SunetraPawar #supriyaSule

Shishupal Kadam

30,660 Aufrufe • vor 7 Monaten

सोलापूरच्या करमाळा येथे महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा या अवैध उत्खननाविरुद्ध कारवाईसाठी पोहोचल्या असता गुंडांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून कायद्याने काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला धमकी दिली की कारवाई थांबवा, अन्यथा तुमच्यावर ॲक्शन घेण्यात येईल. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी स्वतः उपमुख्यमंत्रीच जर अवैध उत्खनन करणाऱ्या गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असतील आणि कायद्याचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्याला धमकावलं जात असेल तर हे, राज्यासाठी अतिशय लाजिरवाणी बाब आहे. अंजली कृष्णा यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे, पण अजित पवार यांचे हे वर्तन राज्यासाठी खरंच दुर्दैवी आहे. सरकारच्या आशीर्वादानेच भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर बाबींना प्रोत्साहन मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे. Ajit Pawar #अवैधउत्खनन #अजितपवार #महिला_अधिकारी #Maharashtra

Adv. Yashomati Thakur

45,695 Aufrufe • vor 1 Jahr

७० हजार कोटीचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी( हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत) तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय ... अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राजसाहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर ...??? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी…!!! मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू ... उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका... पक्ष चोरून पण १ खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची (ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले) टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला ... आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत !!!

Gajanan Kale

44,457 Aufrufe • vor 2 Jahren

सकाळपासून काही लोकांकडून जाणूनबुजून गैरसमज पसरवला जातो आहे.रोहित दादांनी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनाच अध्यक्ष करा असं म्हटलेल नाही त्यांनी बोलत असताना बोरवणकर यांच्यासह मेधा गाडगीळ,वर्षा देशपांडे,मनीषा गुप्ते यांचीही नाव घेतली आणि शेवटी ते असं म्हणाले कोणीही करा परंतु राजकीय व्यक्ती नको अशी मागणी त्यांनी केली. मीरा बोरवणकरांनी अजित दादांबद्दल पुस्तकातून काही लिहिलं म्हणून ती बदनामी आहे आणि रोहित दादा मीरा बोरवणकर यांना अध्यक्ष करा म्हणत आहेत असा बुद्धिभेद करून सकाळपासून रोहित दादांच्या नावाने ढोल बडवणाऱ्याना मला सांगायचं आहे.अजित दादांवर सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले होते ते हि तितकंच खरं आहे. सिंचन घोटाळा,महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा,जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण,खाणी आणि खनिज घोटाळा,पुण्यातील भूखंड वाटप,शिखर बँक कर्ज प्रकरण असे अनेक घोटाळ्यांचे आरोप करून भाजपने अजित दादांना बदनाम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून तुमचा पक्ष बसला आहे त्यावर बोलायची आपली हिंमत आहे काय ? बाकी अजित दादांचं कुटुंब दादांच्या अपघातांवर किती बोलतंय यावरही आम्ही बोलू शकतो लोकांच्या मनात अनेक शंका आहेत प्रचंड रोष आहे बोलायचं असेल तर आम्ही देखील बरच काही बोलू शकतो.दादांच्या अपघातावर बोलणाऱ्या तुमच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांना तुमच्या पक्ष आणि नेतृत्वाने काय बक्षीस दिल तेही आम्ही पाहतोय महाराष्ट्र पाहतोय त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची राहूद्या!

yogesh sawant

16,539 Aufrufe • vor 4 Monaten

क्षणभर काळ थांबल्यासारखा वाटला… तो व्हिडिओ सुरू होताच आजूबाजूचं सगळं विसरून गेलो. आमचे नेतृत्व, आधारवड असलेल्या अजितदादांचा आवाज कानावर पडताच मन भरून आलं. शब्द ऐकताना डोळे पाणावले, गळा दाटून आला. जणू दादा पुन्हा एकदा समोर उभे आहेत, असं क्षणभर वाटलं. आज दादा देहाने आपल्यात नाहीत, ही जाणीव मनाला सतत टोचत राहते. तरीही असे क्षण त्यांच्या विचारांची, त्यांच्या आपुलकीची आणि मार्गदर्शनाची उपस्थिती ठळकपणे जाणवून देतात. पद असो वा नसो, लोकांशी नातं घट्ट ठेवून काम करणं दादांचा हा विचार आजही माझ्या प्रत्येक निर्णयामागे आहे. हा व्हिडिओ पाहताना केवळ आठवणीच नाही, तर जबाबदारीची जाणीवही अधिक ठळक झाली. लोकांसाठी ठामपणे उभं राहणं, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणं हेच दादांकडून शिकलेलं खरं भांडवल आहे. हा व्हिडिओ तयार करणाऱ्या त्या कार्यकर्त्याचे मनापासून आभार. दादांच्या आठवणी पुन्हा एकदा मनात जिवंत झाल्या. दादा देहाने नसले, तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या प्रत्येक लोकाभिमुख कामात कायम सोबत राहील. #AjitDada

Chetan Vitthal Tupe

15,197 Aufrufe • vor 7 Monaten