Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

आता प्रवास होणार आणखी सुसाट! 🛣️ मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग - मिसिंग लिंक प्रकल्पाचा पाहणी दौरा (२६ एप्रिल २०२६)

37,572 Aufrufe • vor 4 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

आपली मुंबई आता पुढची झेप घेण्यासाठी सज्ज आहे. सुरू होत आहे विकासाचा नवा अध्याय. भारत नगर रोड (मुंबई विद्यापीठ परिसर)–वाकोला जंक्शन उन्नत मार्गाच्या पूर्णत्वामुळे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रस्ता नेटवर्कमधील अंतिम दुवा पूर्ण झाला असून, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांच्यात अखंड पूर्व–पश्चिम वाहतूक संपर्क निर्माण झाला आहे. या मार्गिकेला जोडणाऱ्या आठ पोहोचमार्गांमुळे या संपूर्ण मार्गाची प्रवेशयोग्यता आणि जोडणीक्षमता अधिक सक्षम झाली आहे. प्रत्येक मुंबईकरासाठी अधिक सक्षम कनेक्टिव्हिटी, स्मार्ट वाहतूक व्यवस्था आणि अधिक वेगवान प्रवास. Devendra Fadnavis Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR PIBIndia PIB in Maharashtra 🇮🇳 #MumbaiInMinutes #MMRDA #SCLR #ReimaginingMMR #RebootingMumbai #ReshapingMMR #DevendraFadnavis #SmartConnectivity #Mumbai

MMRDA

21,005 Aufrufe • vor 17 Tagen

कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक क्षण! भाजपा-महायुती सरकारने नेहमीच कोकणातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल ४५ वर्षांनंतर कोकणवासीयांची एक जुनी स्वप्नपूर्ती होत आहे – मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग रो-रो बोटसेवा दिनांक १ मार्च २०२६ पासून सेवेत दाखल होत आहे. जलवाहतूकीद्वारे मुंबई ते कोकण प्रवास सुखकर व सुसाट होणार असून यामुळे कोकणवासीयांना केवळ सागरी प्रवासाचा आनंदच नाही तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळणार आहे. ही सेवा म्हणजे केवळ वाहतूक व्यवस्था नसून, कोकणातील लोकांच्या भावनांशी जोडलेलं स्वप्न आहे, जे अखेर प्रत्यक्षात उतरत आहे! CMO Maharashtra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र #KonkanVikas #ROROService #Mumbai #Konkan #NiteshRane

Nitesh Rane

29,535 Aufrufe • vor 6 Monaten

आपली मुंबई आता पुढची झेप घेण्यासाठी सज्ज आहे. सुरू होत आहे विकासाचा नवा अध्याय. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, माननीय उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय उपमुख्यमंत्री श्रीम. सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमएमआरडीएच्या चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. हे चारही टप्पे मुंबई महानगर प्रदेशात अधिक सक्षम कनेक्टिव्हिटी, स्मार्ट वाहतूक व्यवस्था आणि अधिक वेगवान प्रवास सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहेत. ४ महत्त्वपूर्ण प्रकल्प. एक उद्दिष्ट. #MumbaiInMinutes 🚧 एससीएलआर टप्पा - २ सांताक्रूझ ते चेंबूर लिंक रोडचा अंतिम दुवा, १.४ किमी लांबीचा भारत नगर रोड ते वाकोला जंक्शन कॉरिडॉर आता पूर्ण झाला आहे. यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान अखंड पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित झाली आहे. 🚇 चेंबूर मेट्रो स्थानक | मेट्रो मार्गिका २ब मुंबईच्या पूर्व उपनगरांसाठी एक नवे मेट्रो प्रवेशद्वार. मेट्रो, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वे सेवांना एकाच ठिकाणी जोडणारे चेंबूर मेट्रो स्थानक हे मुंबईतील एक महत्त्वाचे बहुविध वाहतूक केंद्र आहे. या स्थानकाच्या लोकार्पणामुळे प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सोयीस्कर करणार आहे. 🚜 टीबीएम अर्जुन | ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा रस्ता प्रकल्प दुसऱ्या टीबीएम अर्जुनच्या लॉन्चिंगमुळे भारतातील सर्वात खोल आणि सर्वात मोठ्या शहरी रस्ता बोगदा प्रकल्पाच्या बांधकामाला मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदर आणि बोरिवलीदरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊन कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार आहे. 🏙️ डॉ. बाबासाहेब भोसले यांच्या नावाने बीकेसी कनेक्टर मिठी नदी आणि रेल्वेवरील उड्डाणपुलांवरून जाणारा १.६२ किमी लांबीचा बीकेसी कनेक्टर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. बाबासाहेब भोसले यांच्या सन्मानार्थ नामांकित करण्यात आला आहे. उन्नत मार्ग, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि भूमिगत पायाभूत सुविधांपासून ते आधुनिक वाहतूक व्यवस्थेपर्यंत एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रवासाची नवी दिशा घडवत आहे. अधिक मजबूत कनेक्टिव्हिटी, अधिक वेगवान प्रवास, मुंबईला पुढे नेणारी नवी वाटचाल..! #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #MMRDA #SmartMobility #DevendraFadnavis #EknathShinde #SunetraPawar #RebootingMumbai #ReshapingMMR #Mumbai Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Dr. Sanjay Mukherjee

MMRDA

46,195 Aufrufe • vor 17 Tagen

🚆 पुणे मेट्रो लाईन-३ लवकरच आपल्या सेवेत! 🔥 🚇 माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर... पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला मिळणार वेग, सोय आणि आधुनिकतेची जोड! 🏁 ‘मेट्रो लाईन ३’ चे काम अंतिम टप्प्यात असून, महानगराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवण्यास सज्ज आहे. आयटी हब हिंजवडीपासून पुण्याच्या मध्यवर्ती भागापर्यंतचा प्रवास आता अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. ✅ मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट ✅ प्रकल्पाचे तब्बल ९४.२०% काम पूर्ण ✅ सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी व सुरक्षा तपासणी (RDSO/CMRS) पूर्ण ✅ शिवाजीनगर ते हिंजवडी अंतर आता काही मिनिटांत पार ✅ सार्वजनिक-खासगी भागीदारीतील (PPP) देशातील पहिली मेट्रो लाईन ✨ पुणेकरांसाठी जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा अध्याय सुरू होण्याच्या उंबरठ्यावर…🚇 #PuneMetro #MetroLine3 #ComingSoon #SmartCityPune #HinjewadiToShivajinagar #FutureOfPune #ITPark #Connectivity

PMRDA

13,104 Aufrufe • vor 5 Monaten

मा. श्री. नितीन गडकरी सर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार Nitin Gadkari Office Of Nitin Gadkari MORTHINDIA MORTHRoadSafety NHAI साहेब, कोकणवासीयांचा एक छोटासा पण गोंधळलेला प्रश्न आहे… 😄 मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत आपण अनेकदा म्हणालात… “यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी रस्ता पूर्ण होईल.” आता आम्हालाच आठवत नाही की हे वाक्य नेमकं किती वेळा ऐकलंय 🫢 म्हणून एक विनंती… कृपया तुम्हीच सांगा ना, “यंदाचा गणेशोत्सव” म्हणजे नेमका कोणत्या वर्षाचा? 😅 आम्ही दरवर्षी बाप्पाच्या आगमनाची वाट बघतोच, पण आता सुरक्षित महामार्ग पूर्ण होण्याचीही तेवढ्याच श्रद्धेने वाट पाहत आहोत. कोकणवासीयांना आश्वासनांची तारीख नको, तर पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग हवा आहे. 🙏 आज दि: २६ जुलै २०२६ चिपळूण - रत्नागिरी येथील दृश्य आहे. Nitin Gadkari सर Shivendrasinh A Bhonsle सर भारतीय नागरिक म्हणून आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य, प्रत्यक्ष पाहणी, माहिती संकलन किंवा जनजागृतीची आवश्यकता भासल्यास कृपया नक्की कळवा. “Prevention is Better Than Cure” या भावनेतून रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव सकारात्मक सहकार्य करण्यास तयार आहोत. धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक 📞8766797529 मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र #mumbaigoanationalhighway #RoadSafety #अपघातमुक्तभारत #preventionisbetterthancure #chaitanyaushalaxmanpatil

Er. Chaitanya Usha Laxman Patil

30,876 Aufrufe • vor 1 Monat

मराठ्यांनो उद्या मुंबईला निघताना आयोजकांनी सांगितलेले सर्व नियमांचे व्यवस्थित काटेकोरपणे पालन करा व निघताना गरजेच्या वस्तू बरोबर ठेवा..! सर्वांना विनंती गाड्या काळजीपूर्वक चालवा कोणाची गाडी बंद पडली किंवा काही अडचण आली तर लगेच थांबून एकमेकांना मदत करा…! सर्वांनी शक्यतो रात्रीचा प्रवास व दुचाकीवरून प्रवास टाळायचा आहे नीट लक्षात ठेवा रस्त्यात हिमंत तर कोण करणार नाहीच तरी कोणी समाजकंटक दगडफेक व बाकी काही गोष्टी करायचा प्रयत्न करतील तरी तुम्ही आता दुर्लक्ष करायचे व पुढे जायचे आहे…! मागे सांगितल्या प्रमाणे जरांगे पाटीलांचा ताफा सत्कारासाठी जास्त कोणी थांबवायचा नाहीये कमीत कमी वेळात मुंबई जवळ करायची आहे…! ज्यांना मुंबईचा मार्ग जवळ आसेल त्यांनी थेट मुंबईत जायचे पाटलांच्या ताफासोबत यायचे नाही जेणेकरून रोडवर जास्त गर्दी होणार नाही…! आपल्याला पोलीस व प्रशासन यांना संपूर्ण सहकार्य करायचे आहे व आपले आंदोलन शांततेत यशस्वी करायचे आहेत…! व अतिशय महत्वाचे आपल्या जरांगे पाटलांचे उपोषण का आंदोलन हे आपण सर्वांनी नंतर मिळून ठरवू पन उपोषण नकोच हे माझं मत आहे…! आम्ही सोबत नसलो तरी तुमच्यासोबत सोशल मीडियाद्वारे चोवीस तास असणार आहेत…! जय शिवराय 🙏🙏 #चलो_मुंबई #चला_मुंबई #मराठा_आरक्षण

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

37,151 Aufrufe • vor 1 Jahr

📍संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 🛣️ पालखी मार्ग निरिक्षण लाखो वारकऱ्यांची ‘वारी’ सुखकर व आल्हाददायक व्हावी, या उद्देशाने पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५) कामाचे आज निरिक्षण केले. भारत भूमीच्या सनातन परंपरेत वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजेच ‘वारी’ ही श्रद्धा, तपस्या आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. दर वर्षी आषाढी एकादशीच्या पर्वावर लाखो वारकरी पालखी समवेत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मात्र अनेक वर्षे ही वारी वाहन संस्था, अरूंद रस्ते, वाढती वाहतूक आणि विशेषत: दिवे घाटाचा अरूंद, कठीण व धोकादायक टप्पा यांसारख्या विविध आव्हानांना, अडचणींना सामोरे जात होती. या समस्यांवर उपाय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) या मार्गांचा व्यापक पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला, जो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांची वारी आता सुखकर व आल्हाददायक होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूर आणि पुढे मोहोळ ते वाखरी असा सुमारे २३४ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे, जो पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. ७,६२५ कोटी रुपयांच्या तरतुदीसह विकसित करण्यात येत असलेल्या या मार्गाचे बांधकाम मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धर्मपूरी, धर्मपूरी ते लोणंद, लोणंद ते दिवे घाट आणि दिवे घाट ते हडपसर अशा ६ पॅकेज मध्ये करण्यात येत आहे. यापैकी ४ पॅकेजचे काम पूर्ण झाले असून धर्मपूरी ते लोणंद काम अंतिम टप्प्यात आहे, तर दिवे घाट ते हडपसर या पॅकेजचे ६५% काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर यांसारख्या भागांना बायपास करत जलद आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करतो. या मार्गावर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पदयात्रा मार्ग उभारण्यात आला असून, यामुळे वारकऱ्यांची वारी आता अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित झाली आहे. विशेषत: दिवे घाट विभाग-२ वरून ४-लेनमध्ये रूंद आणि मजबूत करण्यात येत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि प्रवास अधिक सुखकर होईल. यासोबतच उड्डाणपूल, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरपास आणि आधुनिक पुलांच्या माध्यमातून हा मार्ग अधिक सक्षम करण्यात आला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर याठिकाणी बाह्यवळण रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या हेतूने माळशिरस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी निर्माण केलेली ऐतिहासिक विहीर, वेळापूर येथील पुरातन लेणी व वाखरी जवळील बाजीराव विहीर या ऐतिहासिक स्थळांचे जतन करून प्रगती व संस्कृतीची सांगड घालण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम करताना सोलापूर व सातारा जिल्ह्यांत बुलढाणा पॅटर्नच्या धर्तीवर जवळपास ४३ तलावांचे खोलीकरण करून तेथील मुरुम, माती महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आली आहे. यामुळे अतिरिक्त जलसंचय झाला असून तेथील पाणी पातळीत वाढ झाली आहे. #Palkhi_Marg_Inspection #SantDnyaneshwarMaharajPalkhiMarg #PalkhiMarg #पालखीमार्ग #PragatiKaHighway #GatiShakti

Nitin Gadkari

32,268 Aufrufe • vor 3 Monaten

मुंबई - पुणे महामार्गावर वाहतूक का बंद आहे.. या संदर्भात विशिष्ट इकोसिस्टम कडून एक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न चालू आहे की, सरकारने या संदर्भात काहीच काळजी घेतली नाही. त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे.. काल संध्याकाळी ५ वाजताच्या आसपास मुंबई पुणे महामार्गावर टँकर पलटी झाला. टँकर उलटताच त्यातून वायूगळती सुरू झाली. परिस्थितीची गंभीरता ओळखून महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील सुमारे ४० जणांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्या टँकरमध्ये प्रॉपेलिन हे अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक रसायन असल्याचे लक्षात येताच संपूर्ण यंत्रणा अधिक सतर्क झाली. अशा परिस्थितीत अगदी छोटासा स्पार्कसुद्धा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकत होता. त्यामुळे कोणतीही घाई न करता तज्ज्ञांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार अतिशय संवेदनशील असून काळजीपूर्वक हाताळणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं. लगेचच राज्य सरकारला याची माहिती देण्यात आली. राज्य सरकारने त्वरित पावलं उचलत बीपीसीएल आणि एनडी आर एफ ला घटनास्थळी पाचारण करण्यात आला. आज पहाटे सुमारे ४.३० वाजल्यापासून एनडीआरएफ आणि बीपीसीएलच्या तज्ज्ञ पथकांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आतापर्यंत टँकरवरील दोन व्हॉल्व्ह बंद करण्यात यश आलं आहे. मात्र, एका ठिकाणाहून अजूनही गळती सुरू आहे. त्यामुळे रिकामे टँकर घटनास्थळी आणून त्यामध्ये हे रसायन सुरक्षितपणे हस्तांतरित करण्याचं काम सुरू आहे. एक टँकर भरून झाल्यानंतर आता दुसऱ्या टँकरमध्ये प्रॉपेलिन हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रॉपेलिनसारखं अतिशय घातक रसायन वाहून नेणारा टँकर अपघातग्रस्त होण्याची ही पहिलीच घटना आहे. जर वाहतूक बंद केली नसती, छोटीशी निष्काळजी मोठं नुकसान केली असती. म्हणून या महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. काही माध्यमांनी प्रवाश्यांची गैरसोय असा कोल्हेकुई चालू केली आहे. त्यांना घटनेची गांभीर्य माहिती असेल किंव्हा नसेल पण, आपली बातमी कशी ब्रेक होईल याची काळजी होती. घटना फक्त टँकर पलटी झालेली नाहीतर अत्यंत ज्वलनशील वायू गळती सुरू होती. फक्त काडीपेटी सुद्धा कोणी टाकली असती तर मोठा विध्वंस झाला असता. त्याच्यावर पर्यायी उपाय म्हणून, पुणे - मुंबई मिसिंग लिंक हा पर्याय येत्या काही महिन्यात जनतेसाठी खुला होणारच आहे. पण, एखाद्या संकटात आपली पोळी कशी भाजून घेयची हे काही मंडळी करत आहेत. असो.. या घटनेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, तसेच घडल्यास आणखी कोणती काळजी घेतली पाहिजे? या संदर्भात शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी एम एस आर डीसी ला दिले आहेत. प्रवाश्यांची गैरसोय झाली यात कोणतीही शंका नाहीच.. दुर्घटना घडल्यावर बऱ्याच मोठया प्रमाणात वाहनांची रांग लागली होती. यात पोलीस प्रशासन आणि सरकारकडून प्रवाशांना आवश्यक ती मदत देण्यात आली. या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते सर्वानी शेअर करावे..

Prakash Gade

25,472 Aufrufe • vor 6 Monaten

📍संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 🛣️ पालखी मार्ग निरीक्षण दर वर्षी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि विना अडथळ्यांची व्हावी या उद्देशाने श्रद्धा व आधुनिकतेचा प्रभावी संगम साकारत पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) कामाचे आज राज्याचे कृषीमंत्री श्री Dattatray Bharane जी, आमदार श्री Rahul Subhash Kool जी, माजी आमदार श्री Harshvarrdhan Patil जी यांच्यासह निरीक्षण केले. भारत भूमीच्या सनातन परंपरेत वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजेच ‘वारी’ ही श्रद्धा, तपस्या आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. दर वर्षी आषाढी एकादशीच्या पर्वावर लाखो वारकरी पालखी समवेत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मात्र अनेक वर्षे ही वारी विविध आव्हानांना, अडचणींना सामोरे जात होती. या समस्यांवर उपाय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) या मार्गांचा व्यापक पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला, जो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांची वारी आता सुखकर व आल्हाददायक होणार आहे. देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) हा पाटस ते पंढरपूर असा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. ४,४१६ रुपयांच्या तरतुदीतून उभारण्यात येत असलेला हा मार्ग वारकऱ्यांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवून विकसित करण्यात येत आहे. पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा ३ पॅकेजमध्ये या मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून इंदापूर ते तोंडले भागाचे काम ९६% आणि बारामती ते इंदापूर भागाचे काम ८४% पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण केले जाईल. हा महामार्ग बारामती, भिगवण, अकलूज आणि श्रीपूर यांसारख्या भागांना बायपास करून जलद आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाप्रमाणेच या मार्गावरही स्वतंत्र पदयात्रा मार्ग, आधुनिक पूल, अंडरपास आणि बायपास मार्गांच्या सहाय्याने यात्रा अधिक सुरक्षित आणि वेळेवर होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पालखी मार्गांचा विकास केवळ रस्ते बांधकामापुरता मर्यादित नसून, तो एक समग्र विकास मॉडेल म्हणून साकार झाला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सदर पालखी मार्गावर पॅकेज क्र. २ व ३ वर सुमारे ४०० वृक्षांचे पुनर्स्थापन (ट्रान्सप्लांटेशन) यशस्वीरीत्या करून त्यांचे संगोपन केले गेले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बारामती, निमगाव केतकी, भवानीनगर, बावडा, अकलूज व श्रीपूर/बोरगाव याठिकाणी बायपास रस्ते प्रस्तावित केले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल आणि वाहतूक जलद गतीने होईल. महामार्गाच्या परिसरातील जलसंधारण क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जवळपास २५ तलावांचे खोलीकरण करून अतिरिक्त जलसाठी निर्माण करण्यात आला आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या २५ गावांना याचा फायदा झाला आहे. याठिकाणी आवर्जून स्व. अजितदादा पवार यांची आठवण येते. त्यांनी बारामतीच्या बायपासवर कान्हेरी गावाजवळ तलावाचे खोलीकरण करून घेतले होते. यामध्ये महामार्गाच्या कामासाठी जवळपास २ लाख क्युबिक मटेरियल काढून वापरण्यात आले. पुढे याचे खोलीकरण झाल्यावर तलावाच्या इरिगेशन मधून कॉंक्रीटचा सांडवा तयार करून घेतला. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूने हिंगणगडा व कान्हेरी येथे वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्ग निर्माण करून वन्य प्राण्यांचे अधिवास जतन केले आहेत. त्यामुळे प्राणी व वाहनांच्या अपघाताला आळा बसला आहे. #Palkhi_Marg_Inspection #SantTukaramMaharajPalkhiMarg #PalkhiMarg #पालखीमार्ग #PragatiKaHighway #GatiShakti

Nitin Gadkari

14,005 Aufrufe • vor 3 Monaten