Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

आधुनिकता येत असताना पार्लेकरांनी परंपरा जपल्या मुंबईतील विले पार्ले येथे आयोजित 24व्या पार्ले महोत्सवाला आज उपस्थित राहिलो. यावेळी उपस्थितांना संबोधित केले. पुन्हा एकदा पार्ले महोत्सावत आल्याचा आनंद झाला. मागच्या वेळेस याच महोत्सवात मी पुन्हा येईन असे सांगितले होते. त्यानंतर विले पार्ले येथील लोकांनी, महाराष्ट्रातील लोकांनी असा आशीर्वाद दिला की,...

15,951 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

पवार साहेब म्हणाले हे खरे आहे. 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. परंतु मी काल जे बोललो ते एकतर पवार साहेबांनी ऐकले नाही किंवा ऐकले असेल तर ते त्यांना अस्वस्थ करणारे होते. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. मी असे सांगितले की : 1978 साली पवार साहेब वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले 40 लोक बाहेर काढले आणि जनसंघासोबत सरकार तयार केले. आता एकनाथराव शिंदे हे तर आमच्याच सोबत निवडून आले होते. ते 50 लोकं घेऊन बाहेर पडले आणि आमच्या सोबत सरकार तयार केले. मग पवार साहेबांनी तयार केलेले सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदे यांनी तयार केलेले सरकार ही बेईमानी कसे होऊ शकते?मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचो होतो; इतिहास बदलत नाही. कोण जन्माला आले, कधी आले याच्यावर इतिहास बदलत नसतो. इतिहासात लिहून ठेवले आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वात 40 लोकांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. ते बाहेर पडले. आणि भाजपसोबत म्हणजे तेव्हाच्या जनसंघासोबत सरकार तयार केले. तेच मी सांगितले.

Devendra Fadnavis

269,960 görüntüleme • 3 yıl önce

आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत पार पडलेल्या येवला येथील 'संवाद' सभेला उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. येवल्याला आल्यानंतर दोन गोष्टी जिव्हाळ्याच्या वाटतात एक म्हणजे कांद्याचा सुगंध आणि दुसरी म्हणजे पैठणी साडी... येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावेळी मोठे नुकसान झाले याला केवळ भाजपाचे आयात निर्यात विषयीचे धोरण कारणीभूत असल्याची भूमिका मांडली. कोणत्याही शेतीमालाला आज योग्य भाव नाही. शहरात टोमॅटो महाग विकला जात आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. मग मधला पैसा जातोय कुठे असा सवाल उपस्थित केला. मध्यंतरी केंद्र सरकारने परदेशातून दूध आयात करण्याचा निर्णय घेतला होता पण पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत परदेशातून एक लिटरही दूध भारतात येऊ देणार नाही. त्यानंतर हा निर्णय मागे घेत सरकारने त्याची जबाबदारी राज्यांवर टाकली. एकीकडे कांदा आयात निर्यातीचे धरसोडीचे धोरण आणि दुसरीकडे दूध आयातीचा निर्णय अशी विचित्र भूमिका केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप केला. तुमच्यासाठी इथले स्थानिक का लढले नाही हे माहित नाही. पण ही तुमची भगिनी, तुमची ताई ही हक्काची ताई आहे. तुम्ही म्हणाल ते काम करून न्याय मिळवून देईन, असा शब्द यावेळी दिला. आपल्यातील काहीजण भाजपाकडे गेले आहेत. त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण आज महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. युपीएचे सरकार असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रु होता. तो आज ११५० रुपये झाला आहे. हे बघता पुढच्या निवडणूकीत कोणाला मतदान करणार असा सवाल उपस्थित केला. मागील १५ वर्षात येवल्यात एकही मोठा प्रकल्प आला नाही. पण जर येवलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आणि पवार साहेबांवर ठाम विश्वास असणारा उमेदवार निवडून दिला तर तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळू शकेल. या भागात उद्योग येऊन रोजगार उपलब्ध होतील असे आश्वासन दिले. येथे येत असताना रस्त्यावर असंख्य प्रेम करणारे नागरिक भेटत होते. प्रत्येकजण म्हणत होता, ताई तु घाबरू नकोस लढ, त्यांचे हे प्रेमच आमच्यासाठी ताकत असल्याचे आवर्जून सांगितले. पण मी घाबरत नाही मी जर घाबरले असते तर आज तिकडे गेले नसते का? शोले चित्रपटात एक डायलाॅग आहे जो डर गया वो मर गया आणि आज सत्ताधारी विरोधकांना lCE चा धाक दाखवला जात आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय, आणि ईडी याची भीती दाखवली जाते. कोणी घाबरून तिकडे गेले की वाँशिंग पवाडर वापरून त्याला क्लिन केले जाते. त्यामुळे या प्रवृत्तीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. ही लढाई सोपी नाही, पण निष्ठेने आणि एकीने लढलो तर विजय आपलाच होईल. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीपुढे कधीही झुकला नाही आणि झुकणार नाही हे दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिला हळव्या असतात पण जर कोणी तिच्यावर घात केला तर तीच महिला मा जिजाऊ, ताराराणी आणि अहिल्याबाई होते. माझ्यावर पद मागितल्याचा आरोप केला जात आहे. पण एक लोकसभेचे तिकिट सोडले तर मी पक्षाकडे कोणतही पद मागितले नाही. मी मागितल्यावर मला पद मिळाले असते पण माझी विचारावर निष्ठा आहे. पद मिळाले नाही तरी चालेल पण मी माझा विचार कधीही सोडणार नाही असे ठामपणे सांगितले. सत्ता येत जात असते. केंद्रात सत्तर मंत्री आहेत पण देशाला आज कृषी मंत्री कोण आहे हे माहित नाही. येवल्यात आमदार निवडून आल्यास मांजरा पाडा कॅनाॅल, उणेगाव वरतवाडी कॅनाॅलचा विषय पूर्ण करु असे आश्वासन दिले. महाराष्ट्राविरोधात एक षडयंत्र केले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, आज पवार साहेबांचा पक्ष फोडलाय. पण आज दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारे कोण असतील तर ते पवार साहेब आहेत. म्हणून हे षडयंत्र करत महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. रोजगार बाहेर जात आहेत. यासाठी एक अदृश्य हात काम करत आहे. पण मला महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची आन बान शान टिकवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे असे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तत्वावर काम करणारा आहे. त्यामुळे येवल्यातून सुरु झालेल्या लढाईचा शेवट जनताच करेल आणि महाराष्ट्राविरोधात कट कारस्थान करणाऱ्याला सोडणार नाही असे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. #Live #Nashik #Yeola

Supriya Sule

44,909 görüntüleme • 3 yıl önce

मुंबई हे या शहराचं मूळ नाव आणि खरी ओळख आहे. हे नाव कोळी समाजाची आराध्य देवता असलेल्या ‘मुंबादेवी’वरून पडलं आहे. कोळी समाज हे या बेटांचे आद्य रहिवासी मानले जातात. ‘मुंबा’ आणि ‘आई’ यांपासून ‘मुंबई’ हे नाव तयार झालं आहे. मुंबई हे नाव फक्त संस्कृतीशी जोडलेलं नाही, तर ते बलिदानाशीही जोडलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबई महाराष्ट्रातच राहावी, यासाठी जनतेने लढा दिला. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी फ्लोरा फाउंटनजवळ शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात १०७ जण हुतात्मा झाले. आज त्या जागेला ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखलं जातं. या बलिदानातूनच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मुंबई त्याची राजधानी झाली. म्हणूनच मी ‘मुंबई’ म्हणते तेव्हा ते भावनिक किंवा राजकीय कारणासाठी नाही, तर या शहराच्या ओळखींसाठी प्राण अर्पण केलेल्या १०७ हुतात्म्यांचा, इतिहासाचा आणि मुळांचा सन्मान म्हणून म्हणते. Post Credit priyanka lathi

Shekhar

14,857 görüntüleme • 8 ay önce

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज स्थानिक पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही. गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे? ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही. #pressconference

Sharad Pawar

80,246 görüntüleme • 3 yıl önce

सुप्रीम कोर्टाने एससी एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअर हा निर्णय लागू करण्यासाठी एका निवृत न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. बार्टीच्या एका अधिकाऱ्याला सचिव म्हणून नेमण्यात आले आहे, त्यांचा अहवाल हा सादर केला जाईल अहवाल एकदा सादर झाला की सुप्रीम कोर्टाचा उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरचा निर्णय लागू होईल. हा निर्णय लागू झाला तर एससी एसटी त्या अधिकाऱ्यांच्या मुलाला मुलीला आणि कुटुंबाला आरक्षण मिळणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावे आरक्षण वाचवणे हा निवडणुकीचा मुद्दा आपण केला पाहिजे, म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःचे पन्नास हजार रुपये खर्च केले पाहिजे, निवडणुकीत प्रचार करण्यासाठी किंवा मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी कशा पद्धतीने वळवायचं याची आपल्याला अधिक जाणीव आहे. उद्याचे आमदार निवडून आले तर हा निर्णय अंमलबजावणी करण्यापासून थांबवता येतो. म्हणून तमाम फुले शाहू आंबेडकवादी विचाराच्या अधिकाऱ्यांना आवाहन करतोय की आपण या निवडणुकीमध्ये आपल्या पदरचे पन्नास हजार रुपये खर्च करून आपल्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवा असे आवाहन मी करत आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन हे आरक्षण आपण वाचवाल ही अपेक्षा.

Prakash Ambedkar

29,424 görüntüleme • 1 yıl önce

आज पुणे येथील एका कार्यक्रमानंतर समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबाबत पत्रकारांशी संवाद साधला. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी या महामार्गावरुन जात असताना काही लोकांनी याबाबत त्यांचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्या लोकांनी या महामार्गाची महाराष्ट्रात फार मोठी चर्चा झाली, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाद दुसरा अपघात पहायला मिळत आहेत. त्याचे कारण कदाचित याचे सायंटिफिक नियोजन केले नसावे त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत. हा महामार्ग तयार करण्याच्या कालावधीत, निर्णय घेण्यात, त्याचे नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत - नकळत दोषी ठरवतात. काय झाले असेल ते झाले असेल पण जी दुर्घटना घडली ती दु:खद आहे. अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच - सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाहीत. जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी...संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी... कुठे चूक झालेली आहे... कशामुळे चूक झाली आहे...ती शोधून काढावी आणि याप्रकारे लोक जात आहेत ती स्थिती आणि याप्रकारचे वाढते अपघात आहेत ती स्थिती थांबवण्यास हातभार लावावा. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे.आपण प्रवास करताना डोक्यात काही खुणा असतात, काही वळणे दिसतात, झाडे दिसतात परंतु या प्रवासात रस्त्याची सलगता आहे आणि आजुबाजुला कुठे काही नाही. अनेक ठिकाणी या गोष्टीचा परिणाम वाहन चालवतो त्यांच्यावर होतो का अशी शंका काही लोकांनी बोलून दाखवली आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण यातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुठे दुरुस्ती करायची शक्यता असेल तर ती केली पाहिजे. एमएसआरडीसीने त्यांच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दुसर्‍यावर ढकलायचा प्रयत्न केला आहे. माझे मते या देशातील इंडियन रोड काँग्रेसने यांची पाहणी केली असे तुम्ही म्हणत असाल आणि जर हे खरे असेल तर जगातील जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवावे. त्यांची एक कमिटी करावी. त्यामार्फत चौकशी करावी, त्यांचे रिकमेंडेशन घ्यावे आणि करेक्शन मेजर द्यावीत असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी कारण लोकांचे प्राण हे महत्वाचे आहेत.

Sharad Pawar

245,836 görüntüleme • 3 yıl önce

यंदाच्या फुटबॉलच्या महाकुंभात अर्थात ‘फिफा वर्ल्ड कप- २०२६’मध्ये आमचा मित्र व ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण याच्या रूपात मराठी पत्रकारितेचा सन्मान झालाय... मेक्सिको, कॅनडा व अमेरिका या तीन देशांमध्ये पार पडणाऱ्या फिफा विश्वचषकाचे तिथूनच एकमेव अधिकृत मराठी भाषिक क्रीडा समीक्षक म्हणून संदीप चव्हाण कव्हरेज करतोय.. थेट मेक्सिकोहून संदीपने हा ब्लॅाग लिहिलाय… त्यात तो लिहितोय, फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून हे शब्द मी लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; हा फुटबॉलच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी अजूनही या शहराच्या हवेत तरंगताना जाणवतात. आज, त्याच मेक्सिको सिटीत, त्या इतिहासाच्या सावलीत उभा राहून, दै. मुंबई तरुण भारतचा क्रीडा प्रतिनिधी म्हणून अधिकृत मान्यता घेऊन विश्वचषकाच्या प्रेस बॉक्समधून वार्तांकन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. हा केवळ माझा वैयक्तिक प्रवास नाही; हा मराठी पत्रकारितेच्या स्वप्नांचा, जिद्दीचा आणि अस्मितेचा प्रवास आहे. जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. अब्जावधी चाहत्यांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, अशा या महाकुंभासाठी अधिकृत मान्यता मिळवणे हे कोणत्याही माध्यमासाठी अभिमानाचे असते. पण यावेळी अभिमानाची गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच दै. मुंबई तरुण भारतला विश्वचषकाचे अधिकृत अ‍ॅक्रिडिटेशन मिळाले आहे. आणि त्या इतिहासाचा पहिला साक्षीदार, पहिला प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे. हा क्षण केवळ एका पत्रकाराचा नाही. हा प्रत्येक मराठी वाचकाचा आहे. हा त्या मातृभाषेचा आहे, जिच्या शब्दांमध्ये आपण जग पाहतो, स्वप्ने रंगवतो आणि भावना व्यक्त करतो. अनेक दशकांपासून इंग्रजी आणि इतर भाषांच्या माध्यमांनी गाजवलेल्या या जागतिक व्यासपीठावर आज मराठीचा आवाजही तितक्याच अभिमानाने घुमत आहे. मेक्सिको सिटीच्या रंगीबेरंगी रस्त्यांवर, स्टेडियममधील गगनभेदी जल्लोषात, चाहत्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये आणि विजयानंतरच्या आनंदोत्सवात मला जगभरातील भावनांचा महासागर दिसतो आहे. पुढील महिनाभर संपूर्ण जग हसू आणि आसू यांच्या हिंदोळ्यावर झुलणार आहे. कुणाचे स्वप्न साकार होईल, कुणाचे तुटेल; कुणी इतिहास घडवेल, तर कुणी इतिहासाचा भाग बनेल. त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक थराराचा, प्रत्येक भावनेचा साक्षीदार म्हणून मी येथे आहे. आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या माझ्या मराठी वाचकांपर्यंत त्या प्रत्येक क्षणाची धडधड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, या फुटबॉलच्या महाकुंभात आपण सर्वजण सहभागी होऊया. मेक्सिकोच्या या ऐतिहासिक भूमीवरून, मराठी मनांपर्यंत पोहोचणाऱ्या या प्रवासाचे सहप्रवासी होऊया. कारण हा केवळ विश्वचषक नाही; हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. [email protected]

ashish jadhao

11,702 görüntüleme • 3 ay önce

देवेंद्र फडणवीस म्हणतात की नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित व्हिडिओ हा तीन-चार वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र करून चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, त्यांनी झिरवळ यांना तातडीने अधिकृत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, व्हिडिओची पूर्ण पडताळणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे विधान बारकाईने ऐकल्यास एक गोष्ट स्पष्ट होते — फडणवीस यांनी स्वतः व्हिडिओ खोटा आहे असे थेट सांगितलेले नाही; त्यांनी केवळ नरहरी झिरवळ यांच्या दाव्याचा उल्लेख केला आहे. “तीन-चार व्हिडिओ जोडून बनवला” हा दावा जर खरा असेल, तर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात: ते तीन-चार व्हिडिओ नेमके कोणते आहेत? त्या सर्व क्लिप्समध्ये दिसणारी व्यक्ती, कपडे आणि ठिकाण एकसारखे का दिसतात? जर संपूर्ण फुटेज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी चित्रित झाले असेल, तर त्याला “एडिटिंगमुळे चुकीचा अर्थ लावला” असे म्हणायचे, की “घटना मूळतः खरी आहे” असे मानायचे? राजकीय भाषेत अशा प्रकारचे विधान हे सरळ नकार नसून, अनेकदा डॅमेज कंट्रोलचा भाग असतो. जर एडिटिंगमुळे संदर्भ बदलला असेल, तर तो स्पष्टपणे मांडला गेला पाहिजे. आणि जर संपूर्ण व्हिडिओ खोटा असेल, तर त्यासाठी ठोस व अधिकृत पुरावे तात्काळ सादर केले गेले पाहिजेत. अन्यथा “तीन-चार व्हिडिओ” याकडे केवळ एक बचावात्मक कथा म्हणूनच पाहिले जाईल. #नरहरी_झिरवाळ #आक्षेपार्ह_व्हिडिओ #सत्य #राजकारण #पारदर्शकता

Vijay Kumbhar

23,664 görüntüleme • 6 ay önce

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वाहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सांगितले. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती.त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे सांगितले. यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहन केले.

Supriya Sule

14,606 görüntüleme • 5 ay önce

“भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा. पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का … मी कायम तुमच्या बरोबर आहे .. आपला गळा दाबत आहे तुकाराम जेल मध्येच बसले असते ह्यानी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुश्य भर जेल मध्ये बसवले असते विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे

Dr.Jitendra Awhad

146,198 görüntüleme • 3 yıl önce

ही व्यक्ती शिक्षक आहे म्हणे..म्हणजे MPSC विद्यार्थ्यांना हे शिकवतात...हे कोणावर तरी चिडले आहेत..आणि त्यावर बोलताना त्यांनी वाक्य वापरले... आपल्या बापाचा पत्ता नाही, आपल्या बापाचा चेहरा जुळत नाही! हे वाक्य प्रचंड आक्षेपार्ह आहे..ही व्यक्ती ज्याला शिव्या देते त्याच्या आईच्या थेट चारित्र्यावर संशय घेत आहे! प्रश्न MPSC पेपर लीक आहे अशा वेळी टीका करताना थेट एका बाईच्या चारित्र्यावर घसरायचे? हा माणूस शिक्षक असेल तर त्याच्या विद्यार्थ्यांचा खरे नाही! असा माणूस सरकार आणि मुख्यमंत्र्यां बरोबर चर्चा करतो ? सगळं घाण आहे... मला लज्जा वाटली आणि भावना ही दुखावल्या गेल्या आहेत.. पण उपयोग नाही! #घाण #शिक्षकम्हणे

Rashmi Puranik

30,172 görüntüleme • 12 gün önce