Loading video...

Video Failed to Load

Go Home

'आपण पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो. आता सासरी जाणाऱ्या लेकीला हातात संविधान द्या'

46,367 views • 7 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

“बाबासाहेबांचं संविधान आणि छत्रपतींचा स्वाभिमान या देशात जिवंत राहायला हवा, यासाठी आजची ही लढाई आहे. ही निवडणूक नसून लढाई म्हणून आम्ही स्वीकारू.” बच्चू कडू साहेबांची ही भूमिका सर्वसामान्य जनतेची भावना बोलून दाखवणारी आहे. देशभरात निवडणूक ही आता निवडणूक राहिलेली नाही तर जनतेची लढाई झालेली आहे आणि जेंव्हा जनताच निवडणूक हातात घेते तेंव्हा काय निकाल येतो ते कसबा पोटनिवडणुकीत आपण बघितलंय. तसाच निकाल ४ जूनलाही येईल यात काही शंका नाही. मधला काही काळ बच्चू कडू साहेब भरकटले असले तरी उशिरा का होईना त्यांनी जागं होऊन जनतेची बाजू घेतली याबद्दल त्यांचे आभार. आता केवळ ‘सागर’ किंवा ‘वर्षा’वर बैठक होऊन तडजोडी करून त्यांनी झोपेचे सोंग घेऊ नये ही अपेक्षा! ते स्वाभिमानी आणि लढाऊ असल्याने देशाच्या संविधांनासाठी आणि छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी तरी ते इतरांप्रमाणे उपसलेली तलवारी म्यान करणार नाहीत, असा विश्वास वाटतो!

Rohit Pawar

28,834 views • 2 years ago

भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत आयोजित केलेल्या विशेष चर्चा सत्रामध्ये शिवसेना पक्षाच्यावतीने संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अगदी मुद्देसूद आणि आक्रमक भाषण करून विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने आजवर हा देश चालला, उभा राहिला आणि पुढेही चालत राहील. मात्र संविधान वाचण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसनेच वेळोवेळी संविधानाचा अपमान केला असे यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी निक्षून सांगितले. कधी उच्च न्यायालयाचा निर्णय डावलून तर कधी आणीबाणी लादून संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसनेच केला. लोकसभा निवडणुकीवेळी तर संविधान हातात घेऊन संविधान धोक्यात असल्याचा फेक नरेटिव्ह ही काँग्रेसने पसरवला. पण, ही संविधानाची ताकद आहे जिने काँग्रेसला ४०० वरून ४० वर आणले आणि एका गरीब घरातील व्यक्तीला देशाचा पंतप्रधान आणि एका रिक्षावाल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले, असे ठाम मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेबांना सुरवातीपासूनच विरोध होता. यामुळेच त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम ही काँग्रेसने केले. मात्र काँग्रेसचा हा फेक चेहरा लोकांनी आता ओळखला आहे. आणि त्याला चपराक लगावण्याचे काम मतपेटीतून केले आहे. त्यामुळे आता कितीही खोटा गाजावाजा केला तरी फरक पडणार नाही. कारण, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde Shivsena - शिवसेना

Dr Shrikant Lata Eknath Shinde

159,808 views • 1 year ago

मराठ्यांनो उद्या मुंबईला निघताना आयोजकांनी सांगितलेले सर्व नियमांचे व्यवस्थित काटेकोरपणे पालन करा व निघताना गरजेच्या वस्तू बरोबर ठेवा..! सर्वांना विनंती गाड्या काळजीपूर्वक चालवा कोणाची गाडी बंद पडली किंवा काही अडचण आली तर लगेच थांबून एकमेकांना मदत करा…! सर्वांनी शक्यतो रात्रीचा प्रवास व दुचाकीवरून प्रवास टाळायचा आहे नीट लक्षात ठेवा रस्त्यात हिमंत तर कोण करणार नाहीच तरी कोणी समाजकंटक दगडफेक व बाकी काही गोष्टी करायचा प्रयत्न करतील तरी तुम्ही आता दुर्लक्ष करायचे व पुढे जायचे आहे…! मागे सांगितल्या प्रमाणे जरांगे पाटीलांचा ताफा सत्कारासाठी जास्त कोणी थांबवायचा नाहीये कमीत कमी वेळात मुंबई जवळ करायची आहे…! ज्यांना मुंबईचा मार्ग जवळ आसेल त्यांनी थेट मुंबईत जायचे पाटलांच्या ताफासोबत यायचे नाही जेणेकरून रोडवर जास्त गर्दी होणार नाही…! आपल्याला पोलीस व प्रशासन यांना संपूर्ण सहकार्य करायचे आहे व आपले आंदोलन शांततेत यशस्वी करायचे आहेत…! व अतिशय महत्वाचे आपल्या जरांगे पाटलांचे उपोषण का आंदोलन हे आपण सर्वांनी नंतर मिळून ठरवू पन उपोषण नकोच हे माझं मत आहे…! आम्ही सोबत नसलो तरी तुमच्यासोबत सोशल मीडियाद्वारे चोवीस तास असणार आहेत…! जय शिवराय 🙏🙏 #चलो_मुंबई #चला_मुंबई #मराठा_आरक्षण

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

37,151 views • 1 year ago

देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवा... भाजपाचा एकही आमदार विधानसभेला निवडून येणार नाही असे पहा -मनोजदादा जरांगे पाटील जरांगे पाटलांचे हे विधान मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नाही तर महाविकास आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी आहे . आणि त्यासाठी फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण टार्गेट करीत आहात . मराठा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही हे ठामपणे बोलणारे शरदचंद्र पवार साहेब यांना मात्र आता खोटा पुळका मराठा समाजासाठी का? उट सुट उपोषणाला बसायचे - उठायचे. देवेंद्रजी फडणवीस यांना शिवीगाळ करायची काय खेळ मांडून ठेवलाय का जरांगे पाटील आपण? मराठ्यांची भाषा रांगडी आहे पण अर्वाच्य, अश्लील नाही . आपण मराठ्यांचे नेते आहात तर मराठ्यांची मान गर्वाने ताठ राहील अशीच भाषा अपेक्षित आहे पण आपल्या भाषेमुळे माझ्यासारख्या असंख्य मराठ्यांना मान खाली घालावी लागत आहे. सत्ताधारी पक्षाने मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक लावली त्यावेळेस विरोधी पक्षातील मराठा नेते उपस्थित राहिले नाहीत ,त्यांना उपस्थित राहण्याचे, मिळून तोडगा करण्याचे आवाहन आपण का केले नाही? तसे न करता उलट मराठा समाजाच्या आडून फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करण्याचा विडा आपण घेतला आहे, तुमची ही कृती न समजन्या इतका मराठा समाज मूर्ख नाही. माझा मराठा समाज राकट आहे, कणखर आहे, पण तो लाचार नाही.. हे लक्षात ठेवा, जरांगे पाटील. त्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठा नेत्यांना माझी विनंती आहे ,एकत्र या. फक्त जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही सर्वपक्षीय मराठ्यांनो एकत्र या राजकारण बाजूला ठेवून आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढूया . छत्रपतींचा आशीर्वाद मराठा आरक्षणासाठी देऊया साथ फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत राहण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार केला त्या सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठक करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या मनोज जरांगे पाटील आणि शरदचंद्र पवार साहेब यांचा खरा चेहरा जनतेसमोर येऊ देत . भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra BJP Mumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Kishor Wagh #MarathaReservation #maratha

Prof.Varsha Bhosale

54,134 views • 2 years ago

संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला ! गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीने संपविण्यात आले होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असेल अन् त्याची कातडी सोलली जात असेल तर आपणाला खरंच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचे नमूद करून सरकारचा उल्लेख "निर्दयी" असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल तर मी उल्लेख केलेला निर्दयी हा शब्द किती योग्य आहे, याची प्रचिती येते. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालहाल करून मारले जात असेल तर या गोरगरीब, दलित समाजातील तरूणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल !

Dr.Jitendra Awhad

130,263 views • 1 year ago

'मी अजून बिनलग्नाचा आहे, फार डिप्रेशन मध्ये असतो' घरातील परिस्थिती फार बिकट आहे, आता ते जास्त वर्ष पैसे पाठवू शकणार नाहीत.. खर्च कमी करण्यासाठी एकवेळचा डब्बा लावलाय किंवा फक्त डाळ भात-खात असतो.. काही लोकांकडे पुढे शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत. काही लोकांचे लग्न मोडले आहे कारण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत. काही जण दिवसातून एक वेळचे जेवण खाऊन आपली स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. अशा वेगवेगळ्या कहाण्या आहेत स्पर्धा पुरुष विद्यार्थ्यांच्या. आपण स्पर्धा परीक्षा उमेदवारांना रस्त्यावर आंदोलने करताना पाहिले आहे परंतु त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर फारशी चर्चा झालेली नाही. स्पर्धा परीक्षेतील घोटाळे, घोटाळ्यामुळे चुकणाऱ्या संधी आणि वाढणारे वय, त्यातून येणारे नैराश्य..तर तुटणारी स्वप्ने... बीबीसीचा रिपोर्ट.. Devendra Fadnavis Ajit Pawar Aaditya Thackeray BACCHU KADU Rohit Pawar Dr.Jitendra Awhad Abhimanyu Pawar Satej (Bunty) D. Patil Harshwardhan Sapkal Supriya Sule Eknath Shinde - एकनाथ शिंदे Raj Thackeray Dr Shrikant Lata Eknath Shinde

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

46,506 views • 1 year ago

आता ही बया नाचते आहे पण हिच्या मागे महाराष्ट्रातल्या कोणत्या मोठमोठ्या नेत्यांचे चेहरे दिसतायत? आहे की नाही गंमत ! हे असले नाच झालेल्या बऱ्याचशा मंचांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार खासदार, नगरसेवक, महिला प्रतिनिधी सगळे जाऊन आलेले आहेत. का नाही प्रत्येक पक्षाचे मोठे नेते आपल्या मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, लोकप्रतिनिधींना एक बैठक घेऊन सांगत की तुमच्या मंचावर संस्कृती संवर्धनाच्या नावाखाली , पारंपारिक सण उत्सव यांच्या नावाखाली असलं काही झालं तर आम्ही तुमच्या मंचावर पाऊल ठेवणार नाही. गर्दीचा मोह इतका मोठा असतो का? आणि या दहीहंडी आयोजकांचे कार्यकर्ते खूपच म्हणजे खूप सोवळे असतात बरं का! शिवशिवत्या दातांनी, हातांनी लावणी पाहून झाली की ते बॅकग्राऊंडला गाणं कुठलं वाजवतात तर,' गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा' तान्ह्या बाळापुढे असले नंगे नाच. खरं म्हणजे वृत्तवाहिन्यांनी या संदर्भात वार्तांकन करताना पुढील प्रमाणे करायला हवं:- 'दहीहंडीच्या पावन मुहूर्तावर जास्तीत जास्त अश्लील नृत्य आपल्या मंचावरून कसे दाखवले जाईल याबाबत मोठमोठ्या नेत्यांमध्ये व लोकप्रतिनिधींमध्ये याही वर्षी चुरस लागली होती. राम कदमांनी याही वर्षी धुरळा उडवून दिला होता, पण ऐनवेळी प्रकाश सुर्वे हिरीरीने मैदानात उतरले आणि जवळपास बाजी मारली. अगदी शिवेंद्र राजेंकडचा फोटोसुद्धा आपण या स्पर्धेत आहोत हे सांगून जाणारा आहे.' नक्की पहा आणि फुलं वहा. ठाण्यात एकाने तर नुसत्या गोविंदा पथकाच्या सरावाला गौतमी पाटीलला नाचायला बोलावले होते आणि गाणं होतं चोली के पीछे क्या है! वाह उस्ताद मान गये. 🫰🫰👌👌 असो. जगनियंत्या योगेश्वराचं मन खूप मोठं आहे. त्याचा हा एक श्लोक आठवूया आणि पुढच्या दहीहंडीसाठी स्वतःला तयार करूया. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः । न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ :- भगवद्गीता १६.७ अर्थ: असुरी प्रवृत्तीचे लोक काय केले पाहिजे व काय सोडले पाहिजे हे जाणत नाहीत. चांगला आचार, विचार, शिष्टाचार, बाह्य व आंतरिक पवित्रता या गोष्टींचा अभाव या लोकांमध्ये आढळतो. (किमान देवाचं नाव घेऊन साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये वरील गोष्टी दिसू नयेत एवढी अपेक्षा या कलियुगात आपण नक्कीच ठेवू शकतो. बाकी आपण सगळे मर्त्य मानवच आहोत आणि कुठल्या ना कुठल्या रूपात असूर प्रत्येकामध्ये आहेच.) --शिवानी गोखले #Detached #Maharashtra

SHIVANI GOKHALE 🚩

29,479 views • 28 days ago

"बहुतेक पुरुषांना त्यांचं पहिलं फूल शेवटी त्यांच्या अंत्यविधीलाच मिळतं"... आणि, जर का त्यांना त्याआधी कोणाकडून फुल दिलं गेलं, तर ते अक्षरशः रडकुंडीस येतात... ते म्हणतात ना, "तो शांतपणे ओझी वाहत राहिला, कौतुकाची अपेक्षा न करता. आणि जेव्हा तो निःशब्द झाला, तेव्हा त्याच्यावर फुलांचा वर्षाव झाला —आणि जे तो कधी पाहू शकला नाही"... समाज अनेकदा पुरूष जिवंत असताना त्याच्याबद्दल कौतुक, प्रेम किंवा मान्यता देण्यास टाळाटाळ करतो. कारण आपण कधीच त्याला वेळेवर बोलत नाही— ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, ‘तू खूप काही केलंस आमच्यासाठी’, ‘आम्ही तुझे आभारी आहोत.’ अनेक पुरुष स्वतःसाठी आपुलकी किंवा मान्यता मिळवण्याची इच्छाच दडपून टाकतात किंबहुना त्यांना ते जबरदस्तीने करावं लागतं. महिलांना वाढदिवस, वर्धापनदिन किंवा कामगिरीवर फुलं मिळू शकतात, परंतु पुरूषांसाठी कोणतेही उत्सव साजरे केले जात नाही. पुरुषांमधील भावनिक दुर्लक्ष किंवा उदासीनतेच्या अपेक्षेमुळे त्यांच्यात एक प्रकारचा शांत-एकटेपणा येतो. परिणामी, त्यांना दैनंदिन जीवनात प्रेम किंवा प्रशंसा मिळू शकत नाही. अहो, फुलं तेव्हाच द्या, जेव्हा समोरचा त्याचा सुगंध घेऊ शकतो. शब्द तेव्हाच बोला, जेव्हा तो ऐकू शकतो. शांततेची वाट पाहू नका, प्रेम आजच व्यक्त करा. म्हणजे, लोक जिवंत असताना त्यांचं भरभरून कौतुक करा. पुरुषत्व आणि भावनिक अभिव्यक्तीभोवतीच्या रूढीवादी कल्पनांना तोडून टाका. तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या प्रयत्नांची प्रशंसा करा, दयाळू शब्द बोला आणि त्यांच्या प्रयत्नांची ओळख पटवा - विशेषतः जे कधीही ते मागत नाहीत. बहुतेक पुरुष जातात नजरेआड, हातात श्रम, मनात वाद... ना गुलाब-ना एक मिठी, शेवटच्या फुलांनीच होतात भेटी. श्वास असतानाच द्या की फुलं, नाही तर नंतर राहील फक्त एक खंत ...!!!

महाकाळ

34,240 views • 1 year ago

आज २५ जुलै २०२४ रोजी, मुंबईतील रंगशारदा सभागृहात, मी आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यातील काही महत्वाचे मुद्दे... १) मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला. एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं. २) अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. ३) पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं. ४) पण सध्या कोणाचं लक्ष नाहीये. सगळे व्यस्त आहेत 'लाडकी बहीण', 'लाडक्या भावात'. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मुळात अशा योजना राबवायला राज्यसरकारकडे पैसे आहेत का? सरकारकडे रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनांना कुठून पैसे येणार ? ५) माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे जा, त्यांना मदत करा, त्यांना काय हवं नको ते पहा. ६) महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हेच तुमचं प्रचाराचं कॅम्पेन पाहिजे. ७) आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे. ८) निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही.

Raj Thackeray

43,367 views • 2 years ago

खडकवासला विधानसभेचे उमेदवार श्री. मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला येथे जाहीर सभा घेतली, त्यातील महत्वाचे मुद्दे १) माझा मित्र, सहकारी रमेश वांजळेंचा मुलगा मयुरेश याचा प्रचार करायला मी इकडे आलो आहे. मला तो दिवस अजून आठवतोय. रमेश शेवटचा कोणाशी बोलला असेल तो माझ्याशी बोलला, त्याने मला फोन केला आणि म्हणाला मी एमआरआय काढायला आलोय, तो झाला की फोन करतो. आणि थोड्यावेळाने मला फोन आला की तो गेला. मला काय बोलायचं ते कळेना. मला अनेक जणं सोडून गेले पण आज माझा रमेश असता तर मला सोडून गेला नसता. मयुरेश मला रमेशची आठवण करून देतो. आकाराने पण तसाच आहे आणि सोन्याने मढलेला पण तसाच आहे. त्यामुळे तुम्ही जे मतदान कराल ते मयुरेशला कराल तसंच मतदान तुम्ही रमेशला पण कराल. २) खरंच मनापासून सांगतो की पुण्याचा झालेला सत्यानाश पाहून वाईट वाटतं. पण तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, राग येत नाही हे पाहून मला जास्त वाईट वाटतं. ३) एकदा तुमच्या हातातील फोनमध्ये डोकावून जग कुठे गेलं आहे ते... आपण रस्ते, पाणी, गटारं यातच अडकलो आहोत. पण याचा तुम्हाला राग येत नाही. जगाच्या मागे आपण किती पडलो आहोत याचं आपल्याला काही वाटत नाही हे वाईट आहे. ४) शिवरायांचं निधन झाल्यावर रायगडावर समाधी बांधली गेली आहे. पुढे कोणीतरी समाधीच्या खाली काहीतरी मिळेल या आशेने तिथे उकरून ठेवलं. पुढे महात्मा ज्योतिबा फुले तिकडे गेले, त्यांनी समाधी पुन्हा उभारायचं ठरवलं, त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले आणि त्यांनी ही समाधी चांगली करण्यासाठी पैसे उभे केले. यासाठी अठरापगड जातीतील लोकांनी समाधी उभी करायला पैसे गोळा केले. असा महाराष्ट्र होता आमचा. ५) आम्ही कसं खितपत जगतोय याचं आम्हाला घेणंदेणं नाही, आम्हाला जातीपातीत जास्त स्वारस्य आहे. आज पुण्यात आयसिस, सिमीसारख्या संघटनांचे अतिरेकी सापडत आहेत. पण याकडे कोणाचंच लक्ष नाही. आमदार खासदारांना फक्त टेंडर काढायची आहेत, आणि त्यातून पैसे कमवायचे आहेत, त्यांना इतर गोष्टींशी घेणंदेणं नाही, आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नये म्हणून ते तुम्हाला जातीत गुंतवतात. ६) तुम्ही इतकी वर्ष ज्यांना मतदान केलं त्यांनी तुमचं जगणं हराम करून ठेवलं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मुलं हा देश सोडून निघालेत. शिक्षण, नोकऱ्या त्यांना इथे पण मिळू शकतात, पण ते का चाललेत, कारण आजूबाजूचं वातावरण घाणेरडं आहे. मला या सांगा या असल्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज झटले ? ७) ज्या हिंद प्रांतावर महाराष्ट्राने राज्य केलं, त्या महाराष्ट्राला मला गतवैभव मिळवून द्यायचा आहे. ८) इतर पक्षातील जी लोकं निवडणुकीला उभे आहेत, त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्राबद्दलची कोणीतीही स्वप्न नाहीत. उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा येत आहे. त्यात आपण महाराष्ट्रापुढचे प्रश्न आणि त्याची उत्तरं दिली आहेत. ९) शरद पवारांनी बारामतीत अनेक उद्योग आणले पण त्याच पवार साहेबांनी महाराष्ट्रात उद्योगधंदे का नाही आणले ? मग तुम्हाला महाराष्ट्राचा नेता का म्हणायचं ? स्वतःच्या तालुक्याचा विकास करणाऱ्याला तालुक्याचा नेता का नाही म्हणायचं ? १०) मी तुमच्याकडे महाराष्ट्राची सत्ता मागतोय, मी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेन. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मयुरेश वांजळे, आणि माझे पुरंदरचे उमेदवार उमेश जगताप आणि महाराष्ट्रातील माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

99,842 views • 1 year ago

"४०००, ५००० करोड एवढे पैसे किती दिवस जगवतील? आपण काय पैसे खाऊन जगणार नाही, जगण्यासाठी जे लागतं, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, ते आपल्याला ही झाडे देणार आहेत. ज्या गुजरातच्या कन्सल्टंटने बनवलेल्या डिझाइननुसार ही नदीकाठची झाडे तोडायला सांगितलं आहे, तो कन्सल्टंट कुठेय ?, आज इथे का नाही आला तो ? जास्त काही नाही साहेब, एकच वाळुंज झाड जगवून दाखवा तुम्हीं, नवीन झाडे लावू म्हणताय, आत्तापर्यंतच्या कामांसाठी भरपाई म्हणून नवीन लावलेली झाडे कुठेय ते दाखवा पहिला. अशाप्रकारे आम्हां जनतेचे पैसे खर्च करायला आम्हीं कोणीच नाही सांगितलं तुम्हांला. रात्रीतनं झाडे का तोडताय तुम्हीं." आपल्या एक वर्षाच्या लेकराला घरी ठेऊन, सुनावणीसाठी आलेल्या काजल डोंगरे हिने अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर घेतले. टाळ्यांच्या कडकटाने उपस्थित नागरिक तिच्या उमटलेल्या तीव्र भावनांना साद देत होते, आणि तेथे उपस्थित पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकारी मात्र फक्त शांतपणे बघत होते. जणू काही आमचा याच्याशी काहीही संबंध नाही अश्या आविर्भावाने. नदीकाठची झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्षेप प्राप्त झाल्यानंतर नागरिकांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी, खरं तर सध्या प्रशासक म्हणून कार्यरत असणाऱ्या आयुक्तांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते, पण ते आले नाहीत. जनतेप्रति आपण काही उत्तरदायी आहोत ही नाही, याचा विचार प्रशासक आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार ह्या सगळ्यांनी आता करण्याची गरज आहे. #पुणे #पिंपरी #चिंचवड #विघातक #नदीकाठ #सुधार #प्रकल्प #नको #राम #मुळा #मुठा #नदी #वाचवा PCMC Commissioner Shekhar Singh PCMC Smart Sarathi MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र MAHARASHTRA DGIPR Aaditya Thackeray Ballot Paper Janata Party Anil Shidore अनिल शिदोरे Mahesh Landge Ajit Pawar Supriya Sule Pune River Revival prajakta mahajan Priyadarshini Karve AngadPatwardhan भिकु म्हात्रे 🔥 Bony Uppal ਬੋਨੀ ਉੱਪਲ Amit Paranjape Sayaji Shinde ameet singh राम सुत रुपेश Rohan Aaron #AirPollution #EnVironMent योगेश कातारे पाटील Rahul Kulkarni Prashant Kadam Sarang Yadwadkar Meghna Bhandari Pune Pulse Shrikishan Kale श्रीकिशन काळे Brijmohan Patil Eeshwari Amar Jedhe Vandana Chaudhary Hema Chari Madabhushi Chaitanya Ket Jaideep Baphna, CFA Raja Bhatia

ChaloPMC Puneसंवाद

65,790 views • 1 year ago

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वाहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला. मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले. आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सांगितले. याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती.त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे सांगितले. यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहन केले.

Supriya Sule

14,606 views • 5 months ago

किड्यामुंग्याच जगणं - विज्ञान आणि व्हिडीओचं तंत्रज्ञान. कीटकांबद्दल विकीपिडीयावर फार चांगली माहिती दिलेली आहे. कीटकांना साधारणपणे डोके, वक्ष, उदर आणि पायांच्या तीन जोड्या असतात. यात कीटकांचे विविध प्रकारचे वर्गीकरणही दिलेले आहे. माणसाने यात कीटकांचे वर्गीकरण आपल्या सोईने करून ठेवलेय. जसं की - पिकांचे नुकसान करणारे कीटक, मानवी रोगराई पसरवणारे किटक, परागकण वाहून नेणारे हवेतून उडणारे वनस्पतींसाठी उपयोगी कीटक. निवळी सारखे किटक तर पाण्यावरही चालू शकता. तसेच जगातील ८० % देशांमध्ये तर किटकांचा अन्न म्हणूनही मानव उपयोग करतो. असो. परंतू यातले बहुतांश किटक हे एकांडे किंवा एकएकटे राहणारे असतात. आता खरी गंमत अशी आहे की त्याच विकीपिडीयामधे एक फार इंटरेस्टिंग ओळ आहे. ती म्हणजे - मधमाशा, मुंग्या आणि वाळवी हे मात्र समुदायाने राहणारे कीटक आहेत. हे कीटक काहीही झाले तरी एकत्रच राहतात. उत्क्रांतीचा इतिहास जर आपण अभ्यासला तर असे लक्षात येते की माणूसही पहिला असाच एकांडा असावा. नंतर तो समुहाने राहू लागला. शेती करायला लागला. नंतर तो सामाजिक, अतिसामाजिक बनला. याच मुंग्या, मधमाश्या किंवा वाळवी सारखा एकत्र जगू लागला. हे तिन्ही किटक एकटे जगूच शकत नाहीत. ते अतिप्रचंड सामाजिक आहेत. ते एखाद्या ठिकाणी फार जास्त प्रमाणात झाले की “बायोडायव्हर्सिटी” वगैरेवर पोट भरणाऱ्या विद्वानांही ते सहन होत नसावे. आपल्या कपड्यांच्या कपाटाला वाळवी लागू नये. आपल्या किचनमधे मुंग्या होऊ नयेत किंवा आपल्या घरच्या बाल्कनीत आग्या मोहोळ बसू नये असंच त्याला वाटत असावं. परंतू माणसाला मात्र या उत्क्रांतीच्या प्रेसेसमधेच एक भारी विद्या अवगत झाली तिचे नाव विज्ञान. विज्ञानाचीही विकिपीडियावर भारी व्याख्या आहे - विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय. माणसाने आज जी काही प्रगती केलेली आहे त्याचे मुळ या विज्ञान, त्याचे आकलन आणि पुढे केलेल्या उपयोगात आहे. आता ही विज्ञानाची व्याख्या आणि वरचे किटक ही संकल्पना आपण जोडूया. या सर्व माणसांना जे इथे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमलेत त्यांना कीटकांसारखे हवेत उडतां येत असावे का? निवळी सारखं पाण्यावर चालता येत असावं का? वाळवी सारखं काहीतरी पोखरून आत जाता येत असावं का? या गर्दीत जर चूकूनही काही नको तो प्रकार झाला तर नक्की काय होईल एवढी बुद्धी, मेंदू, वा विचार करण्याची क्षमता असताना अशा गर्दीत आपली लोकं बिनधास्त फिरताहेत. BTW कीटकांना ‘बग’ पण म्हणतात बरं….. तो व्हिडीओ नीट पाहिला तरी काळजात धस्स होतंय….. आपल्यात खरचं भीती, सुरक्षा, विचार, आपली, कुटूंबांच्या जीवाची काळजी हा प्रकारच उरलेला नाही का? आपणही किड्यामुंग्यासारखेच जगायचे का?

Prafulla Wankhede 🇮🇳

16,517 views • 1 year ago

आता रात्रीचे १;३२ वाजले आहेत मी भीमनगर येथून घरी जाण्यासाठी निघालो आहे सोबत मी पोलिस आणि महानगर पालिकेच्या संघनमताने उध्वस्त झालेल्या कष्टकरी गरीब जनतेचे रस्त्यावर झोपले वीडियो जोडत आहे.पण त्याच बरोबर पोलिसांनी दुपारी कबुल केल्या प्रमाणे कोणतीच सुरक्षा ठेवली नाही.त्या ठिकाणी जवळजवळ २०० प्राइवेट बाऊन्सर फिरत आहेत आणि काँक्रीट भरण्याच काम सुरु आहे. पोलिसांनी सरळ सांगितले की हे आमच्या समोर झालेच नाही.सोनवणे साहेब जे त्या ठिकाणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत,चांगला मानुस आहे. त्यानी सांगितले मी १० वाजता माझ्या खालच्या आधिकाऱ्यांना ड्यूटी लाऊन गेलो होतो. परंतु हे सर्व काम महानगर पालिका अधिकारी व पोलीस ह्यांच्या संघनमताने एका धनाढ्य बिल्डर ज्याचे नाव मी उद्या सकाळी पत्रकार परीषद मधे जाहीर करेल आणि त्याचा हस्तक संजय पांडे हे सगळा खेळ खेळत आहे. गुंड पोसण्याचे काम करत आहे आणि गरीब मराठी कष्टकरी माणसांना रस्त्यावर आणण्याचे काम करत आहेत. एकतर आधीच मुंबईचा मराठी गरीब माणूस त्रस्त आहे आणि त्यात अश्या धनाड्य बिल्डरच्या हातात गेलेले महानगर पालिकेचे आधिकारी आणि काही पोलिस यांमुळे आजून ही ते उध्द्वस्त होत आहेत मी रात्री ११:३० वाजता तिथे गेलो तेथील सर्व परिस्थिती बघितली आणि स्वतःचीच लाज वाटली की ह्या राज्यतल्या पोलिसांना आणि कर्मचार्याना झाले तरी काय??? गरीबांबद्दल कोणाला प्रेमच नाही जसे काय हे आदानी आणि आंबानी च्या घरात जन्माला आले आहेत ही गरीब शेतकऱ्याच्या पोर हवालदार होतात पीएसआय होतात ह्यांना आपल्या गरिबीची देखिल जाणीव नसावी की आपण ही एकेकाळी गरीबच होतो!!!

Dr.Jitendra Awhad

86,970 views • 2 years ago

आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती. तेंव्हा श्री. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती. माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार. मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत... • भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा. • या भाषेत प्राचीन साहित्य हवं. • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. •'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. २०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी श्री. रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो... तर, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील... •मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल. •भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल. •प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल. •महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील. •मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल. * प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल. * अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल. या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता. जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे. पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन... राज ठाकरे ।

Raj Thackeray

147,848 views • 2 years ago

'9 किलोमीटर उंच ढग' तसे '4 किलोमीटर वर मंदिर'! जन्मतःच ढिल्लाच असलेला 'स्क्रू' आर्थर रोड वारीत पडल्यानंतर ठार वेडे झालेले Sanjay Raut म्हणत आहेत की अयोध्येतील राम मंदिर हे बाबरी जमीनदोस्त केली गेली त्या रामजन्मभूमी पासून 4 किलोमीटर लांब बनवलं जात आहे..🤣 यावर एवढंच म्हणेन : संजय राऊत सर्व हिंदूंना प्रबोधनजीवी शिउबाठा सैनिकांसारखे मूर्ख समजून धडधडीत खोटं बोलत आहेत. आणि, लाचार मराठी मीडिया त्यांचं खोटं शंभर वेळा दाखवून संभ्रम पसरवण्याची सुपारी बजावत आहेत. दोघांनाही माझा सविनय आक थु! आता फॅक्ट काय आहे बघा : भाजपकडून बाबरी जमीनदोस्त केली गेली, बरोबर 'त्याच' ठिकाणी राम मंदिर उभारले जात आहे! 'मंदिर वहीं बनाएंगे' मधील 'वहीं' म्हणजे काय हे तरी माहीत आहे का यांना? 'मंदिर वहीं बनाएंगे' मधील 'वहीं' म्हणजे तीच 2.77 एकर जमीन ज्यावरून सुप्रीम कोर्टात लढा सुरू होता आणि जी जमीन सुप्रीम कोर्टाने 5-0 निकाल देत हिंदूंना परत द्यायचा ऐतिहासिक निकाल दिला होता. आता 67 एकर : काँग्रेस ने बाबरीचे रक्षण करण्यासाठी या 2.77 एकर जमिनीसहित (मशिदीसहित) एकूण 67 एकर जमीन अधिग्रहण केली होती, त्यातील ही 2.77 एकर ज्याला 'रामजन्मभूमी' मानले जाते. निकालानंतर : सुप्रीम कोर्टाने या 2.77 एकर जमिनीचा निकाल दिल्यानंतर काँग्रेसने अधिग्रहण केल्यामुळे केंद्राच्या मालकीची असलेली एकूण 67 एकर जमीन मोदी सरकारने राम मंदिर ट्रस्ट ला दिली. गेल्या 2 वर्षात राम मंदिर ट्रस्ट ने अजून साधारण 150 एकर जमीन विकत घेतली आहे. भाजपने बाबरी पाडली तेंव्हा : सोपं करून सांगतो. भाजपने बाबरी पाडली त्यावेळी त्याठिकाणी तात्काळ, त्याच 2.27 एकर मधील बाबरी 'समतल' करण्यात आलेल्या जागेवर, अर्थात रामजन्मभूमीवर एक रामाची मूर्ती स्थापन करण्यात आली. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर 'त्याच' ठिकाणी गर्भगृह आलं पाहिजे म्हणून ती मूर्ती योगी आदित्यनाथ यांनी स्वतः हातात घेऊन ती मूर्ती केवळ 100-125 मीटर अंतरावर पुनर्स्थापना केली व मूळ ठिकाणी मंदिराचे काम सुरू झाले (विडिओ जोडला आहे). आजही अयोध्येत गेलेले भाविक 'मंदिर वहीं बनाएंगे' मधील 'वहीं' जागेवर अर्थात रामजन्मभूमी वर निर्माणाधिन असलेल्या मंदिराच्या फक्त 100-125 मीटर अंतरावर योगींनी मूर्ती ठेवली, त्या रामाच्या मूर्तीचे दर्शन घेत आहेत. मस्जिद कुठं बनत आहे? : त्याकाळी फैजाबाद जिल्हा होता आणि अयोध्या त्यातील एक गाव. सुप्रीम कोर्ट अयोध्येतच मशिदीसाठी जागा द्यायला भाग पाडू शकते याचा अंदाज आल्याने मोदी-योगी जोडगोळीने फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण करून अयोध्या जिल्हा बनवला (नोव्हेंबर 2018). 'मशिदी साठी अयोध्येतच वेगळी जागा द्या' आदेश आल्यावर राममंदिराच्या बाजूला जागा द्यावी लागली असती कारण अयोध्या नगरी फार मोठी नव्हती. मोदी-योगी जोडगोळी यांच्याकडील दूरदृष्टी चा परिणाम असा झाला की आता SC च्या आदेशानुसार 'अयोध्या जिल्ह्यात' जागा देण्यात आली आहे. ही जागा दिली आहे त्या जागेचे नाव आहे धन्नीपूर! धन्नीपूर हे गाव अयोध्या जिल्ह्यातच आहे पण ते रामजन्मभूमी पासून 24.6 किलोमीटर दूर आहे. अयोध्येत मंदिर-मशीद वादाला स्कोपच नाही ठेवलाय आता.. तात्पर्य.. 'आम्ही बाबरी पाडली' म्हणणाऱ्या लोकांना अयोध्येचा 'अ' पण नाही माहीत. मला तर वाटतंय की यांचे गुडघ्यात मेंदू असलेले यांचे फट्टू शिलेदार तेंव्हा अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी पासून 4 किलोमीटर लांब कुठं तरी काही तरी भलतंच बाबरी समजून पाडून, तसेच कलकत्त्याला पिकनिकला निघून गेले असावे. म्हणून संजय राऊत यांना वाटतंय की मंदिर त्या ठिकाणाहून चार किलोमीटर लांब बांधलं जात आहे. असो! यांची चुतीयागिरी हा एक वेगळाच संशोधनाचा विषय आहे. त्यावर पुन्हा कधी तरी.. जय श्रीराम!🚩

राईट विंग ऑफ महाराष्ट्र

27,707 views • 2 years ago

मी धर्मअभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे. आणि शूद्रांना कुठलेच अधिकार नाही असे सनातनांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या लोकांनी पुरोणोक्त-वेदोक्त प्रकरणी महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे त्या छत्रपती शाहू महाराजांना देखिल अशीच वाईट वागणूक दिली होती. सनातन्यांनी बुद्धांना त्रास दिला, सनातन्यांनी महावीर जैनांना त्रास दिला, सनातन्यांनी बसवेश्वर अण्णांना त्रास दिला, चक्रधर स्वामींना त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांना आत्महत्या करायला लावली, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला. सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव ह्यांना त्रास दिला. विद्रोह झाला आणि शीख धर्म स्थापन झाला तो ह्या सनातन्यांमुळेच. याच सनातन्यानी तुकाराम महाराजांना त्रास दिला त्यांच्या पोथ्या फेकून दिल्या.या सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला. ह्या सनातन्यांनी कट करुन औरंगजेबाला मदत केली व संभाजी राजेंचा घात केला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरले. महात्मा फुलेंनी या पुराणोक्त-वेदोक्त पद्धतीला विरोध करुन महिलांना शिकवलच पाहिजे ही भूमिका घेऊन समाजात बाहेर पडले आणि स्वत:च्या पत्नीला शिकविण्यासाठी पुढे केले. या दाम्पत्याचा खून करण्याचा कट रचला गेला. शाळा उघडण्याला विरोध केला. त्यांच्यावर शेणगोटे मारण्यात आले. पण, महात्मा फुलेंनी आपले काम पुढे चालूच ठेवले. पुरोगामी विचारांचा सर्वात मोठा आधार शाहू महाराज यांना तर अगदीच वाईट वागणूक दिली. पुराणोक्त-वेदोक्त प्रकरण हे इतिहासात गाजले. पण, त्यांच्याही खुनाचा कट ह्या सनातन्यांनी रचला होता. पण, ह्या सनातन्यांना पुरुन उरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. ज्यांनी मनुस्मृती जाळली. ज्यांनी महाड चवदार तळ्याचे आंदोलन केले आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्या. माणूसकी हा धर्म आहे असे म्हणत संविधान लिहीले. आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोक वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. ज्या धर्मामध्ये बहुजनांना स्थानच नाही. बहुजन शुद्र म्हणूनच ओळखले जातील. तो सनातन धर्म आम्हांला मान्य नाही असे खुलेआम सांगावे लागेल. ती वेळ आली आहे. कारण, त्यांनी परत एकदा छत्रपतींच्याच घराण्यामध्ये त्यांना शूद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे. या देशाच्या घटनेत,बाबासाहेबांच्या संविधानात विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3.00वाजता यावे.आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात.

Dr.Jitendra Awhad

107,163 views • 3 years ago