Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

कठीण आहे !!! 😅 चौथीचं इतिहासाचं पुस्तक परत वाचायला दिलं पाहिजे …!!! #वाघनखं #इतिहास

55,759 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Yogesh Kasar
Yogesh Kasarvor 2 Jahren

अवघड आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज अन याना च इतिहास माहिती नाही, कदाचित म्हणून प्रत्येक किल्ल्यावर मोघल अतिक्रमण करत आहेत, अन वंशज झोपले आहेत, कळलं किल्यांच्या दुरवस्था होण्यास कारणीभूत कोण आहे,

Profilbild von Lycus
Lycusvor 2 Jahren

कमी प्या हो महाराज 😹

Profilbild von MILIND PATEKAR
MILIND PATEKARvor 2 Jahren

यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार...

Profilbild von Shekhar
Shekharvor 2 Jahren

सगळ्यांनी 😂😂😂

Profilbild von arjun patil
arjun patilvor 2 Jahren

Next level

Profilbild von Nikhil Jadhav
Nikhil Jadhavvor 2 Jahren

त्यांच्यावर का प्रश्न उपस्थित करत आहात ? ते आता भाजप सोबत आहेत ना 😡

Profilbild von MILIND PATEKAR
MILIND PATEKARvor 2 Jahren

वड पाच्ची..

Profilbild von राहुलभाऊ
राहुलभाऊvor 2 Jahren

फडणवीस चा विडिओ दिसला नाही का?

Profilbild von पै. Akash Jadhav
पै. Akash Jadhavvor 2 Jahren

महाराज 🥺

Profilbild von AKASH BAGUL
AKASH BAGULvor 2 Jahren

खरं आहे 😂😂

Ähnliche Videos

आज पुण्यात विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात, माझ्या हस्ते अभिनेते आणि माझे मित्र, श्री. रितेश देशमुख यांचा सत्कार झाला. या संमेलनाला मी उपस्थित रहावं अशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी मला गळ घातली. आणि त्याचा मान राखून, मी या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. यावेळी माझं मनोगत मी व्यक्त केलं. त्या मनोगतातील महत्वाचे मुद्दे... '... मी हल्ली अनेक ठिकाणी बघतो की २ मराठी माणसं भेटली की ती एकमेकांशी हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतात, का असं ? आपणच आपल्या भाषेचं अस्तित्व टिकवलं नाही तर कसं होणार ? आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मराठी माणसांना जसा मानसन्मान मिळायला हवा तो मिळत नाहीये. त्यात आपली भूमी, इथली जमीन बाहेरचेच गिळंकृत करत आहेत. आपण इतिहास असं म्हणतो तो कुठल्यातरी प्रदेशाला पादाक्रांत करण्यासाठी झालेल्या लढाईचा इतिहास असतो. आज महाराष्ट्रातील जमीन गिळंकृत करण्याचा जो डाव सुरु आहे, त्यातून उद्या जर आपलं म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्वच पुसलं गेलं, तर मराठी भाषेचं अस्तित्व तरी काय राहणार आहे? मग आपला इतिहास तरी काय असणार ? यामुळे सरकारने मराठी भाषा टिकवण्यासाठी जसे प्रयत्न केले पाहिजेत, तसे प्रयत्न मराठी माणूस टिकावा म्हणून केले पाहिजेत. आम्ही आमच्या परीने मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी जे जे करणं शक्य आहे ते करत आहोत, करत राहू. सरकारने त्याला साथ द्यावी, काही वेळेला आमचे मार्ग वेगळे असतात, त्यामुळे सरकारने आमच्यावर केसेस टाकू नये, कारण जे आम्ही करत आहोत ते मराठी माणसासाठी करत आहोंत. बाकी साहित्यिकांनी साहित्य निर्माण केलंच पाहिजे पण भूमिका पण घेतली पाहिजे. आणि मराठी तरुण-तरुणींनी पण साहित्य वाचायला हवं, पुस्तक वाचलीच पाहिजेत. बौद्धिक मशागतीसाठी पुस्तकांना पर्याय नाही. आपला इतिहास, आपले महापुरुष हे जगापर्यंत आपण पोहचवले पाहिजेत, पण हे करताना सध्या आपल्या महापुरुषांना जातीत विभागणं सुरु आहे, ते थांबलं पाहिजे... आपण मराठी भाषिक म्हणून एकत्र आलो, आपल्या भाषेशी, संस्कृतीशी घट्ट राहिलो तर जगात आपलं कोणीच वाकडं करू शकणार नाही हे विसरू नका....' या भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहे. ती जरूर बघा..

Raj Thackeray

49,591 Aufrufe • vor 1 Jahr

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर मध्ये अंजनवेल तालुक्यात गोपाळगड नावाचा किल्ला आहे या किल्ल्याचा इतिहास फार मोठा असून महत्त्वाचा आहे पण इथे एका लांड्या ने कब्जा केला आहे आणि तो म्हणतो की ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे गोष्ट अशी आहे स्वातंत्र्यपूर्व काळात या किल्ल्यावर इंग्रजांच्या ताबा होता इंग्रज या किल्यावरील गवत व साफसफाई कंत्राट काढायची बरेच वर्ष वेगळ्या लोकांना कंत्राट मिळायची नंतर कंत्राट एक मणियार नावाच्या लांड्या ला जवळपास सलग ४०वर्ष हे कंत्राट मिळालं नंतर या व्यक्तीने कागदोपत्री नाव लावण्याचा प्रयत्न केला पण दोन वेळा पुरातत्व विभागाने यावर कारवाई करून परत घेतलं पण या व्यक्तीने अधिकृत पद्धतीने परत ताब्यात घेतली आणि अजून ही ती व्यक्ती तिथे आंब्याचा व्यवसाय करत आहे या व्यक्तीने किल्ल्यातील महत्त्वाचे वास्तू, चौथारा पाडुन आंब्याची झाडे लावली हा महाराष्ट्र हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच आहे आणि इथला प्रत्येक किल्ला राज्याचा एक दागिना आहे असे कोणतेही लांडे अशे आपल्या हक्क गाजवू शकत नाही जास्तीत जास्त शेअर करा

दिग्विजय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

31,153 Aufrufe • vor 3 Monaten

पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही... ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे! पहिल्या पावसात झाड कोसळून एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला..आज साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला. हे अपघात नाहीत, तर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराच्या हत्या आहेत! मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? महापौर प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत, तर प्रशासन नेहमीप्रमाणे सूचना दिल्या,कारवाई सुरू आहे, चौकशी करू अशी उत्तर देत आहे. पण एकमेकांवर जबाबदारी ढकलताना यांना लाज वाटत नाही का? मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडण्याच्या एक-दोन नव्हे तर सलग तीन घटना घडल्या. मागील वेळी महापौरांच्या दौऱ्यात कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्यावर चौकशीचे आदेश दिले गेले होते. आता एका सामान्य मुंबईकराचा जीव गेला आहे...आता कोणाची चौकशी होणार? आणि त्या चौकशीतून मृत व्यक्ती परत येणार आहे का? मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी कारभाराची जबाबदारी महापौर, उपमहापौर आणि महापालिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. तुमच्या चौकशीने जीव गेलेल्या मुंबईकरांचा जीव परत येणार नाहीत. मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी आहे!

Prof. Varsha Eknath Gaikwad

23,255 Aufrufe • vor 2 Monaten

मुंबईत अशा अजीज शेख सारखे किंवा ज्यांचं नाव घेतोत कोण तरी मुन्ना आहे असे भाई खूप वाढलेत का मुंबईत? मुंबई पोलीस Mumbai Police आपले लक्ष हवे.. रस्त्यावर व्यवसाय आहे म्हणतोय आणि पालिका गप्प आहे ? माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardN कुठं याचे अनधिकृत धंदे आहेत तात्काळ कारवाई झालीच पाहिजे..#घाटकोपर #स्थानक आपण मोकळीक दिली शहर गहाण ठेवले आहे म्हणून हे माजले आहेत. घाटकोपर रेल्वे स्थानकच्या गेटवर फळाचे धंदे लावणारा हा परप्रांतीय अजीज शेख मराठी माणसावर इतकी दादागिरी करतोय. इतका माज आलाय कुठून... आज पळून गेलाय, परत भेटला की जय महाराष्ट्र..!!! #प्रशांतबढे #मराठीएकीकरणसमिती #महाराष्ट्र #परप्रांतीयफेरीवालामुक्त_मुंबई

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

76,838 Aufrufe • vor 7 Tagen

"भाषा बोलणे, ऐकणे, समजणे इतपर्यंत मर्यादित नाही. भाषा तुमची ओळख आहे, संस्कृती आणि इतिहासाशी त्याच नातं असतं. जगाशी संपर्क ठेवण्यासाठी इंग्रजी येणं जरी आवश्यक असलं तरी स्वतःची ओळख आणि पाळंमुळं घट्ट फक्त मातृभाषाच ठेवू शकते." २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरमराठी पुस्तक प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्या प्रदर्शनाच्या उदघाट्न सोहळ्याच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पटकथा लेखक श्री. जावेद अख्तर यांनी मातृभाषा का जपली पाहिजे, वृद्धिंगत केली पाहिजे हे विशद करणारं एक अप्रतिम भाषण केलं. #अभिजात_पुस्तक_प्रदर्शन२०२५

Raj Thackeray

83,392 Aufrufe • vor 1 Jahr

शनिवारवाड्याचे गतवैभव परत मिळवून देणार 🚩 एकेकाळी संपूर्ण देशाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आणि देशाच्या राजकारणावर जेथून प्रभाव टाकला जात होता, अशा शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करून वाड्याची तत्कालीन पद्धतीशी जुळणारी डागडुजी, दुर्मिळ चित्रांचे जतन, इतिहासाची योग्य पद्धतीने मांडणी, होलोग्रामद्वारे दृकश्राव्य चित्री सादरीकरण यासारखी कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि परवानगी यांची आवश्यकता आहे. यासाठी त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक विभागाकडे मी पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी या संदर्भातील जागा पाहणी मी काल आयोजित केली होती. यावेळी जेष्ठ इतिहास तज़्ज्ञ व भारत इतिहास संशोधन मंडळाचे सचिव श्री. पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. उदय कुलकर्णी, श्री. लवाटे, श्री. मोहन शेटे, पेशव्यांचे वंशज श्री. पुष्कर पेशवे, श्री. रश्मीन कुलकर्णी, श्री. निनाद पटवर्धन, भारतीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संरक्षक सहाय्यक श्री. गजानन मंडावरे, श्री. ओमकार गरुड, वास्तुविशारद श्री. प्रचित कलमदाणी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व इतिहास इतिहास तज़्ज्ञांचे मी मनापासून आभार व्यक्त करते कारण त्यांच्या अभ्यासाच्या जोरावरच केवळ आज मी हा प्रयत्न करू शकत आहे. #shaniwarwada #peshwai #chatrapatishivajimaharaj #hindaviswarajya #hindu #pune #punecity Narendra Modi

Dr. Medha Kulkarni

41,285 Aufrufe • vor 2 Jahren

सर्व भारतीयांना #राममंदिर मिळालं. आता पुणेकरांना #पुण्येश्वर मंदिर मिळालं पाहिजे! प्रश्न फक्त एका मंदिराचा नाही तर कट्टरपंथी मानसिकतेचा आहे. इथे आम्हाला जे हवं ते करू! तुमच्या पुरातन मंदिरावर दर्गा बांधू! तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही! ही मुजोरी आहे. तिला वेसण घालणे गरजेचे आहे. जागो जागी अनधिकृत प्रार्थनास्थळे उभी होतात मग तेथे अनेक देशविघातक षडयंत्रे सुरू होतात. बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्या इत्यादींचा सुळसुळाट होतो. लव जिहादसारख्या घटना वाढत जातात. यांना वेळीच आळा नाही घातला, तर काही वर्षात सर्व पुण्यात कोंढव्या सम स्थिती निर्माण होईल. पुण्येश्वराची पुर्नप्राप्ती प्रतिकात्मक आहे. हे मंदिर परत मिळणं हा पुणेकरांचा अधिकार आहे. पुणे सुरक्षित झाल्याशिवाय विकसित आणि समृद्ध होऊ शकत नाही! #NaMoPuneBikeRally च्या माझ्या भाषणात मी #Punyeshwar मंदिराचा मुद्दा पुन्हा उचलला! जय पुण्येश्वर 🚩🛕👇🏼

सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर

28,493 Aufrufe • vor 2 Jahren