Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

'खासगी लहान वाहनांना टोलमाफी आहे' असं उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले ते धादांत खोटं आहे. इथून पुढे महाराष्ट्र सैनिक टोलनाक्यावर उभे राहतील आणि खासगी वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही आणि जर टोलवाल्यांनी बळजबरी केली तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा आहे ! #TollScamInMaharashtra #RajThackerayLive

117,087 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

33 Yorum

Viraj Deshmukh 🇮🇳 profil fotoğrafı
Viraj Deshmukh 🇮🇳2 yıl önce

देवेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे फोर व्हिलर,थ्री व्हिलर, टू व्हिलर ना टोल नाही ना !! मग आम्ही प्रत्येक टोल नाक्यावर असू ,हे असंच घडतय की नाही हे पाहू ....आणि जर असं घडलं नाही तर आम्ही ते "टोल जाळून टाकू " -सन्मा. राजसाहेब ठाकरे. जय भवानी 💪🏻🔥

American Stories Network profil fotoğrafı
American Stories Network1 yıl önce

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

Sandesh profil fotoğrafı
Sandesh2 yıl önce

मी आज सकाळीच नवी मुंबई वरून पुण्याला स्वतःच्या चार चाकी वाहनाने आलो आणि माझ्या कडून खालापूर व तळेगाव टोलनाका वर टोल वसूल केला गेला.

ॲड. सुनिल कोरपडे profil fotoğrafı
ॲड. सुनिल कोरपडे2 yıl önce

फडणवीस यांनी चुनावी #जुमला करु नये.. नाहीतर #महाराष्ट्र_सैनिक ची एकदा सटकली तर मग अवघड होईल हे लक्षात ठेवावे.. #Toll

राष्ट्रभक्त profil fotoğrafı
राष्ट्रभक्त2 yıl önce

बाईक आणि रिक्षा त्यांना कुठल्याच नाक्यावर टोल द्यावा लागत नाही😂 आता देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे असे होते की राज्य महामार्गावर असलेल्या 40 टोलनाक्यांवरचा टोल बंद केलेला आहे आणि हा 2016 पासून बंद आहे! वडखळ नाका ते अलिबाग पूर्वी दहा रुपये होता तो सुद्धा बंद केला आहे, हो

rakesh raul profil fotoğrafı
rakesh raul2 yıl önce

ऐरोली टोल नाक्यावर होणारी दादागिरी... @mnsadhikrut @avinash_mns @JadhavMns @RajThackeray

SagarShete profil fotoğrafı
SagarShete2 yıl önce

फडणवीसवर विश्वास ठेऊन राज्यातले लोक फसले आहेत, भाजप हा खरं तर अत्यंत हरामखोर आणि महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला पक्ष आहे. गुजरातच्या आणि दिल्लीच्या पायाशी लोळण घेण्यापलिकडे ह्या शेळपटांना काही जमणार नाही, तेव्हा हे फक्त राज ठाकरेच करु शकतात

Vinayak Mumbai profil fotoğrafı
Vinayak Mumbai2 yıl önce

पाहूया यातलं काही होतंय का ते. २४ तास झाले आहेत एकही टोलनाका मनसेने जाळलेला नाही याचा अर्थ खरंच टोल माफी झाली आहे? मग भनसेच उपोषण एक दिखावा होता?

Shuhham profil fotoğrafı
Shuhham2 yıl önce

एक विनंती आहे साहेब , टोल नाक्यावर काम करणाऱ्या गरीब मुलांना मारहाण करण्या पेक्षा थेट कंपनी मालकांना का चोप देत नाही . परप्रांतीय मुलांना थांबवण्या पेक्षा त्यांना काम देणाऱ्या मालकांना सुधारा. कंपनी जे सूचना देतात त्या नुसार ते काम करतात . खरा गुन्हेगार त्यांना सूचना देणारा मालक

Bebale Sunil profil fotoğrafı
Bebale Sunil2 yıl önce

किमान महिती अथवा तसा GR मिळवून जर आंदोलन केलं तर ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल अस मला वाटतं कारण नुसत्या meeting करुन किंवा तोंडी पोकळ आश्वासन घेउन आंदोलन हे तेवढ्या काळा साठी परिणाम कारक ठरेल पण दूरगामी नाही.

जीवन भगत profil fotoğrafı
जीवन भगत2 yıl önce

टोल चा झोल

ghatge shivadas 44 profil fotoğrafı
ghatge shivadas 442 yıl önce

खरोखरच एकदा जाळून टाका साहेब.

HMV पत्रकार profil fotoğrafı
HMV पत्रकार2 yıl önce

मीडिया समोर पोपटा सारखे बोलणारे राज ठाकरे, देवेंद्रजी समोर one to one, टोल या विषयावर, debet करावी.. Open challenge ??

mohini profil fotoğrafı
mohini2 yıl önce

माझ्याकडे मागील महिन्यातील पावत्या आहेत, पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे. फडणवीस खोटेच बोलले आहेत. सगळ्यांनी अशा पावत्या फडणवीस यांच्या ऑफिस मध्ये पाठवायला हव्या का?

Ravindra Mutha profil fotoğrafı
Ravindra Mutha2 yıl önce

राज साहेब जे काही बोलले आहेत, मला एक प्रश्न विचारावासा वाटतो,इलेक्शन (निवडणुका) जवळ आल्यावरच असे कसे बोलावे वाटते. इतके दिवस ही आठवण का आली नाही. निवडणुका जवळ आल्याने एक एक पुडी सोडून लोकांना कन्फ्यूज करायचे. चांगला प्रयत्न आहे.

Lakshman Kadbane profil fotoğrafı
Lakshman Kadbane2 yıl önce

राज साहेब बरोबर बोलतात महाराष्ट्रातील टोल नाके बंद झाले पाहिजे. राज साहेब जास्त इम्पॅक्ट शेतकऱ्यावरती होतो .

केदार कळमकर (मराठी भाषिक) profil fotoğrafı
केदार कळमकर (मराठी भाषिक)2 yıl önce

मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी का पकडले आहे, कोणता गुन्हा केला त्यांनी ?? त्या पोलिसांवर व एकनाथ शिंदे वर गुन्हा दाखल झाला पाहिजे @DGPMaharashtra @mnsadhikrut @RajThackeray

कॅटॅलिस्ट profil fotoğrafı
कॅटॅलिस्ट2 yıl önce

खरे तर हा विषय NHAI म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे, पण मग नितीन गडकरींना टार्गेट करण्यासाठी ही सुपारी कोणी दिली असेल ? काहि अंदाज !

Shuhham profil fotoğrafı
Shuhham2 yıl önce

प्रत्येक टोल नाक्यावर पैसे देण्या ऐवजी फडणवीस साहेबांचा हा व्हिडिओ दाखवा आणि तरीही पैसे मागितले तर व्हिडिओ सहित टोल पावती फडणवीस साहेबांनी पाठवा . जो पर्यंत महाराष्ट्र टोल मुक्त होत नाही तो पर्यंत ही मोहीम सुरू ठेवा . काय @Dev_Fadnavis साहेब बरोबर आहे ना .

DevNimkar.. profil fotoğrafı
DevNimkar..2 yıl önce

Superb. Hope your meeting with CM will give positive results for us.

Sachin profil fotoğrafı
Sachin2 yıl önce

We are with you. Let’s stop this loot. #TollScamInMaharashtra

Mak29 🇮🇳 profil fotoğrafı
Mak29 🇮🇳2 yıl önce

राज्य महामार्गावर खाजगी व्ययक्तिक लहान वाहनांना सुट आहेच...त्यात काहीही खोटे नाही..मनसेने आंदोलन केल्यानंतर ते बऱ्याच वर्षापासून सूट आहे.. राष्ट्रीय महामार्गावर मात्र कसलीही सूट नाही..आणि ते गडकरींच्या कडे येते..

Ajay Patel profil fotoğrafı
Ajay Patel2 yıl önce

Aadarniy Raj Saheb Thakre Makkhiyan 4 varsh ya pasun aamcha Kade electricity Nahin Aaye Hamachi help Kara Ajay Patel. 9833233277

उत्तर भारतीय सेना profil fotoğrafı
उत्तर भारतीय सेना2 yıl önce

ये बात तो सही है हर किसी ने वादे किए लेकिन पूरा @RajThackeray और टीम ने कर दिखाया। तुम्ही मुंबईकरांसाठी जे काही केले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. थोड़ी थोड़ी मराठी लिखने और बोलने का प्रयास कर रहा हूं अगर शब्द कही गलत हो तो माफ करना।

𝓾𝓽𝓴𝓪𝓻𝓼𝓱𝓪𝓷𝓪𝓷𝓭..🥀 profil fotoğrafı
𝓾𝓽𝓴𝓪𝓻𝓼𝓱𝓪𝓷𝓪𝓷𝓭..🥀2 yıl önce

पण यां करिता माणसं सुद्धा केंद्रातून आणावी लागतील, त्याचं कायं??🤔 किंवा भाजप मधील ""गडकरी विरोधी"" सहकार्य करू शकते म्हणजे भविष्यात इडी, सीबीआय यांच्या त्रासापासून सवलत मिळू शकते!! #धागेदोरे #सुपारी

Rohit profil fotoğrafı
Rohit2 yıl önce

छान... पण आता ठाम आहे ना?

shubham koyande profil fotoğrafı
shubham koyande2 yıl önce

Sir ajun Airoli toll naka chlu ahe

Bebale Sunil profil fotoğrafı
Bebale Sunil2 yıl önce

साहेब मी एक गोष्ट तुम्हाला सुचवतो बघा पटते आहे का. मुख्यमंत्री म्हणतायत त्या प्रमाणे दोन आणि तीन चाकी वाहनाला टोल लागत नाही हे खर आहे परंतु ४ चाकी खाजगी गाडीला toll लागतो हे पण खर आहे. त्यासाठी आपण मा. मुख्यमंत्री यांना भेटीची वेळ आणि दिवस ठरे पर्यंत आपण RTI अंतर्गत त्या टोलची

Vipin Tongale profil fotoğrafı
Vipin Tongale2 yıl önce

संपूर्ण महाराष्ट्रात जर car अणि लहान वाहनांना toll माफ आहे तर आपण अमरावती नागपूर दरम्यान 300 rs चा टोल भरतो तो कुठे जातो.

Hindu bhai profil fotoğrafı
Hindu bhai2 yıl önce

2 wheeler aur 3 wheeler ko kaha toll hai?

Zagade sagar profil fotoğrafı
Zagade sagar2 yıl önce

खेड शिवापूर, पुणे टोल सर्वात अगोदर बंद व्हावा. टोलसह वाहनचालकांना अरेरावी ,मानसिक त्रास नेहमीचाच प्रकार. रस्त्यावरील खड्डे हाही गंभीर विषय@ManaseAdhikrut9 @mnsadhikrut

Sachin Suresh Dure Patil profil fotoğrafı
Sachin Suresh Dure Patil2 yıl önce

साहेब हा लढा आता थांबवू नका, टोल पासून मुक्ती झाली पाहिजे आता 🙏🏻

Swaminath #CorruptionHater 🇮🇳 profil fotoğrafı
Swaminath #CorruptionHater 🇮🇳2 yıl önce

नाही, म्हणजे अभ्यासपूर्ण पद्धतीने माहितीचा अधिकार सारखे कायदे वापरून सरकार मधील भ्रष्ट्राचार आणि सुधारणा बाहेर काढून सुसंस्कृत पद्धतीचे राजकारण विरोधी पक्षांना एवढे अवघड का जात असावे असे उथळ मुद्दे घेऊन शॉर्टकट मारण्यापेक्षा? #too_much_scope_for_improvement in #E-Governance

Benzer Videolar

काल लोकसभेत बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या एका खासदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कारवाई करावी अशी मागणी केली. ही मागणी का केली? तर महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला पाहिजे, ती व्यवहारात वापरलीच पाहिजे असं आग्रही आवाहन केल्यानंतर, मूठभर उत्तर भारतीयांनी आम्ही मराठी बोलणार नाही असा आवाज दिला. आता असा आगाऊ आवाज दिला तर त्यांच्या कानाखाली आवाज काढायचा नाही ? आणि इतर पक्षांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आवाज काढेल. आणि हा काही स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सैनिक संघर्ष करत नाहीयेत तर हा संघर्ष मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी करतोय. मग संसदेत एका उत्तर भारतीय खासदाराने अजब मागणी केल्यावर महाराष्ट्रातील खासदार गप्प का बसले ? संघर्ष जर तुमच्या भाषेसाठी सुरु आहे, तुमच्या भाषेचा अवमान केला जातोय याची मराठी म्हणून खंत का नाही वाटत ? #मराठी #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,369 görüntüleme • 1 yıl önce

राष्ट्रहित सर्वोपरी 🇮🇳❤️ आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या साधेपणा आणि राष्ट्रहिताच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी एक आदर्श घालून दिला आहे. ताफ्यात कपात करण्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या वापरातील खासगी विमानालाही नकार दिला. आज मुंबई ते शिर्डी असा प्रवास त्यांनी वंदे भारत रेल्वेने करत सामान्य नागरिकांसारखे प्रवास करण्याचा संदेश दिला. ही केवळ प्रवासाची निवड नाही, तर जबाबदार नेतृत्व आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याची ठोस भूमिका आहे. #VikistBharat #NarendraModiji #DevaBhau #VandeBharat #BJP #AmeetSatamWithMumbai BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Narendra Modi Devendra Fadnavis

Ameet Satam

13,422 görüntüleme • 3 ay önce

सकाळपासून काही लोकांकडून जाणूनबुजून गैरसमज पसरवला जातो आहे.रोहित दादांनी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनाच अध्यक्ष करा असं म्हटलेल नाही त्यांनी बोलत असताना बोरवणकर यांच्यासह मेधा गाडगीळ,वर्षा देशपांडे,मनीषा गुप्ते यांचीही नाव घेतली आणि शेवटी ते असं म्हणाले कोणीही करा परंतु राजकीय व्यक्ती नको अशी मागणी त्यांनी केली. मीरा बोरवणकरांनी अजित दादांबद्दल पुस्तकातून काही लिहिलं म्हणून ती बदनामी आहे आणि रोहित दादा मीरा बोरवणकर यांना अध्यक्ष करा म्हणत आहेत असा बुद्धिभेद करून सकाळपासून रोहित दादांच्या नावाने ढोल बडवणाऱ्याना मला सांगायचं आहे.अजित दादांवर सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले होते ते हि तितकंच खरं आहे. सिंचन घोटाळा,महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा,जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण,खाणी आणि खनिज घोटाळा,पुण्यातील भूखंड वाटप,शिखर बँक कर्ज प्रकरण असे अनेक घोटाळ्यांचे आरोप करून भाजपने अजित दादांना बदनाम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून तुमचा पक्ष बसला आहे त्यावर बोलायची आपली हिंमत आहे काय ? बाकी अजित दादांचं कुटुंब दादांच्या अपघातांवर किती बोलतंय यावरही आम्ही बोलू शकतो लोकांच्या मनात अनेक शंका आहेत प्रचंड रोष आहे बोलायचं असेल तर आम्ही देखील बरच काही बोलू शकतो.दादांच्या अपघातावर बोलणाऱ्या तुमच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांना तुमच्या पक्ष आणि नेतृत्वाने काय बक्षीस दिल तेही आम्ही पाहतोय महाराष्ट्र पाहतोय त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची राहूद्या!

yogesh sawant

16,539 görüntüleme • 3 ay önce

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 görüntüleme • 1 yıl önce

आज २४ ऑगस्ट २०२४ रोजी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे... १) दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतील असं वाटतंय. अर्थात आचारसंहिता लागली की निवडणुका लागल्या असं म्हणता येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मी इथे आलो आहे. २) महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी कधी पाहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडीत तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहे. आणि त्यांच्या आपापसातील माऱ्यामाऱ्या खूप होणार आहेत. पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं आहे तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक आहे. ३) लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होतं. त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं. ४) लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका. विधानसभेला मतदार त्यांच्याशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोकं विधानसभेत या सगळ्या पक्षांना योग्य उत्तर देणार हे नक्की. ५) महाराष्ट्रात जातीचं राजकरण हे शरद पवारांनी सुरु केलं. शरद पवारांनी अगदी पुलोदपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं ते आजपर्यंत सुरु आहे आणि पुढे महाराष्ट्रात जातीजातीत विष कालवलं. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने ,ते विष आज खूप खोलवर रुजलं आहे. ६) जातीचं राजकारण चालतंय हे पाहून सगळे पक्षच आता ते करू पाहत आहेत. पण हा विषय फक्त विधानसभा निवडणुकांपर्यंत मर्यादित विषय नाही. एकूणच समाज विस्कटला आहे. लहान मुलांच्या मनात जर जातीची जाणीव निर्माण होत असेल तर हे गंभीर आहे. ७) मी वरळीत मागच्या वेळेस उमेदवार दिला नव्हता पण जे झालं ते झालं. या वेळेस फक्त वरळीतच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहे, मग तो मतदारसंघ कोणाचाही असो. ८) लाडकी बहीण असो की कोणतीही योजना असो लोकांना पैसे मिळणार असतील तर लोकं पैसे घेतील पण म्हणून मतदान करतीलच असं नाही. लोकं हुशार असतात. त्यांना हेतू कळतात. ९) बदलापूरमध्ये जे घडलं ते भीषण आणि दुर्दैवी आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरला. पण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बलात्कार ते हुंडाबळी ते छेडछाड या घटना वर्षागणिक वाढत आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ७००० हुन अधिक बलात्काराच्या घटना घडल्या ज्यांची पोलिसांकडे नोंद झाली. ज्याची नोंद नाही झाली अशी प्रकरणं त्याहून अधिक आहेत. बीड,सांगली येथे ऊसतोड कामगार महिलांची गर्भाशयं काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आणि इतक्या घटना घडून पण कठोर कायदे नाहीत. दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं. त्या निर्घृण प्रकारातील दोषींना फाशी झाली तब्बल १२ वर्षांनी. इतका वेळ लागतोच कसा ? बरं, असं नाहीये महायुती सरकारच्या काळात महिलांवरचे अत्याचार वाढलेत, तर हे अत्याचार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पण घडले होते. पण आज दोघेही एकमेकांवर फक्त दोषारोप करत आहेत, पण या घटनांबद्दल कोणीच गंभीर नाही हे दुर्दैव आहे. १०) जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस लाठीचार्ज झाला. त्यावेळेस कारवाई कोणावर झाली पोलिसांवर? पण पोलिसांना आदेश कोणी दिला ? त्यांची काही जबाबदारी नाही का? ११) मागे एकदा मी लंडनला गेलेलो असताना तिकडे बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळेस पोलिसांनी कारवाई सुरु केली, त्या कारवाईत एक निरपराध माणूस मारला गेला. त्यावेळेस पोलिसांनी माफी मागितली पण त्याचं राजकारण नाही झालं. आपल्याकडे पण पोलिसाना सगळं माहीत असतं, फक्त त्यांना फ्रीहँड देणार आहात का ? मी नेहमी म्हणतो की सत्तेत आलो तर सगळ्यांना सुतासारखं सरळ करेन, म्हणजे कायकरेन? तर, मी सत्तेत आलो तर पोलिसाना कारवाई करण्यास फ्रीहँड देईन. आणि मग बघा कसा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल ते. अहो पोलिसांचे हात बांधायचे आणि त्यांना सांगायचं की कारवाई करा, कसं शक्य आहे? १२) लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका. लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. लोकांना हाताला काम हवं आहे, नुसते पैसे नको आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज नको असते, त्यांना स्वस्त आणि २४ तास वीज हवी असते. आणि अशा योजना राज्याला घातक आहेत. बरं हे सगळं कोणाच्या जीवावर लोकांच्या पैशातूनच करता ना? मला असं वाटतं एक, दोन महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे देतील, पुढे देऊ शकतील असं वाटत नाही कारण राज्याकडे पैसेच नाहीत. १३) आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही २००,२२५ सीट्स नक्की लढवणार आहोत . १४) माझे सहकारी मला अनेकवेळा म्हणतात की जरा खरं बोलणं कमी करा. पण मला वाटत नाही मला जमेल असं, कारण सुधरण्याचं आणि बिघडण्याचं पण एक वय असतं ते निघून गेलं. त्यामुळे मी आयुष्यभर जे खरं आहे तेच बोलणार...

Raj Thackeray

49,024 görüntüleme • 2 yıl önce

हडपसर विधानसभेचे उमेदवार श्री. साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे आज जाहीर सभा घेतली, त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) २००९ ला हडपसर मतदारसंघ तयार झाला. इथली गावं महापालिकेत आली. आज कित्येक लोकं म्हणतात की आमची गावं होती ती बरी होती, विनाकारण महापालिकेत आलो. या संपूर्ण भागाचा विचका ट्रॅफिकने झाला आहे. आज महाराष्ट्रात मी असे अनेक भाग बघतो, त्याची अवस्था अशी आहे की मरण येत नाही म्हणून जिवंत आहोत. रोजच्या जगण्यातील स्वस्थता गेली आहे, लहान मुलांना बाहेर पाठवताना माता-भगिनींना धाकधूक होते. आणि या मूळ प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये म्हणून तुम्हाला नको त्या प्रश्नांमध्ये गुंतवलं जातं. २) महाराष्ट्राच्या राजकारणाचा जातींनी झालेला विचका मोठा आहे. जातीपातीत तुम्ही गुंतून पडावं आणि तुमचं मतदान काढून घ्यायचं असं सुरु आहे. ३) मराठवाड्यातील दुर्दैवी घटना सांगतो. एका गावातील घरात निधन झालं, घरात तीन माणसं, मृत व्यक्तीला खांदा द्यायला माणूस नव्हता, नातेवाईक यायला सहा तास लागले, म्हणून अंत्यसंस्कार थांबले. दुसऱ्या जातीची माणसं बहुसंख्य माणसं शांतपणे बघत राहिली पण कोणी पुढे आलं नाही. याहून दुर्दवी घटना काय असू शकते ? हे सगळं विष पेरलं गेलं ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर. ४) आज महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की महापुरुषांना आपण जातीत विभागलं आहे. महाराष्ट्रात जातीबद्दलचं प्रेम होतं, पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष कधीच नव्हता. आपल्याकडे आत्ता काय पसरतंय याचा विचार केलाय का ? इथल्या मोहल्ल्यांमध्ये सिमी, आयसिसचे अतिरेकी सापडलेत. बरं जे सापडले ते सापडले पण जे नाही सापडले ते काय करतील ? ५) शहरांचा सत्यानाश झाला आहे, इथे रोजगार मिळत नाहीयेत, इथे महिला सुरक्षित नाहीयेत, लोकांना घरं परवडत नाहीयेत, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत आणि तरीही या सगळ्याची चिंता करायची सोडून सत्ताधारी आणि विरोधक तुम्हाला जातीत गुंतवतात... ६) इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अहवलेंना केली गेली, त्यावेळेला फक्त आमचा साईनाथ रस्त्यावर उतरला होता. त्यावेळेला आमदार आणि इतर पक्षांचे नेते कुठे होते ? अशा माणसांच्या हातात सत्ता देणार का तुमच्यासाठी धावून येणारा साईनाथ सत्तेत हवा ? विचार करा साईनाथ आमदार झाले तर तुमच्यासाठी रात्रीअपरात्री धावून येतील. ७) तुम्ही कुठल्याही पुण्यातील असो की मुंबईतील किंवा ठाण्यातील किंवा अगदी कुठल्याही शहरातील जुन्या माणसाला विचारून बघा की तुम्हाला तुमचं जुनं शहर हवं का नवं तर लोकं उत्तर देतात जुनं शहर. पण दुबईत विचारून बघा तिथल्या लोकांना, कुठलं शहर आवडतं तर म्हणतील आत्ताची दुबई आवडते, का तर तिथल्या माणसांची गरज लक्षात ठेवून दुबई घडवली आहे. ८) ५ वर्षात मी तुम्हाला सगळं बदलून दाखवेन असं सांगणार नाही, पण या ५ वर्षात असं काम करून दाखवेन की ज्याने तुम्हाला पुढची ५ वर्ष आम्हाला सत्तेत परत आणावं असं वाटेल, इतकं सुंदर आणि मनापासून काम करून दाखवेन, ९) महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज्यातील नाहीतर देशातील एकमेव पक्ष आहे ज्याने राज्याचा विकास आराखडा मांडला. मला खुर्चीचा सोस नाही. मी शिवछ्त्रपतींच्या राज्यात जन्माला आलो आहे, त्या राज्याचं गतवैभव मला परत आणायचं आहे. १०) आज माझी मुलाखत घ्यायला येणारे पत्रकार मला फक्त यांनी असं म्हणलं त्यांनी तसं म्हणलं यावरच प्रश्न विचारतात. पण कोणी महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विसरू नका हे महाराष्ट्र राजय आहे, कोणतं लेचापेचं राज्य नाही. या राज्याला इतिहासाला भूगोल पण आहे आणि इतिहास पण आहे. अशा राज्याच्या विकासाबद्दल तळमळीने बोलणाऱ्या माझ्या पक्षाला, माझ्या उमेदवारांना निवडून द्या. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, यासाठी मला तुमची साथ हवी आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या राज्यात तमाशा करणाऱ्यांना एकदा धडा शिकवा, आणि तुम्ही जर धडा नाही शिकवलात तर या सगळ्यांची खात्री पटेल की तुम्ही काहीही केलंत तरी सगळं चालून जातं. ११) मला आणि माझ्या उमेदवारांना एकदा संधी देऊन बघा. माझा साईनाथ तर आहेच पण जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्या प्रत्येकाला मतदान करा. मी सगळ्या मतदारसंघात पोहचूच शकत नाही, त्यामुळे मी इथून प्रत्येकाला आवाहन करतो की माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

Raj Thackeray

56,039 görüntüleme • 1 yıl önce

आज १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर, राजसाहेबांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात राजसाहेबांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे... सध्या मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यावरून जो वाद सुरु आहे, त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यानुसार सर्वानी वागलं पाहिजे. आणि न्यायालयाने जर बंदी घातली आहे तर जैन मुनींनी पण त्याचा विचार केला पाहिजे. कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे अनेक डॉक्टरांनी सांगितलं आहे तरीही कबुतरांना खायला घातलं जाणार असेल तर पोलिसांनी खायला घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. जेंव्हा मुळातच न्यायालयाचा आदेश असताना आंदोलन झालं तेंव्हाच सरकारने कारवाई करायला पाहिजे होती. त्यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले. कोर्टाचा आदेश काय आहे हे लोढांना माहित नाही का ? लोढांनी हे विसरू नये की ते राज्याचे मंत्री आहेत कुठल्या धर्माचे नाहीत. काल मराठी लोकांनी आंदोलन केली तेंव्हा त्यांची धरपकड झाली, पत्रकारांना मारहाण झाली... सरकारचं नक्की काय सुरु आहे हेच कळत नाहीये... निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत... आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय... तसंच १५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्याचा आणि मांसविक्री बंद करण्याचा आदेश दिलाय... मुळात कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला ? मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे की ही बंदी पाळू नका... स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट साजरा करायचा आणि त्या दिवशी खायचं स्वातंत्र्य नाही हा काय प्रकार आहे ? #राजठाकरे #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

32,880 görüntüleme • 1 yıl önce

६ आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिकच्या दौऱ्यात पदाधिकारी आणि नाशिकमधील माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठका घेतल्या. आणि आज ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. १) राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन. २) मी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पाहिले. २०१५ च्या कुंभमेळ्याबद्दल बोलूया. २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून जी कामं झाली, त्याचं जे नियोजन झालं ते इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने झालं, उत्तम कामं झाली, उत्तम रस्ते झाले, सगळं नियोजन झालं. हे का झालं ? तर यातून काही अर्थकारण व्हावं असला उद्देश नव्हता. उत्तम काम व्हावं ही इच्छा होती म्हणून ते शक्य झालं. पण आत्ता जे दिसतंय, जे ऐकायला येतंय त्यातून सध्याच्या या सत्ताधाऱ्यांना यातून फक्त कमिशन कमवायचं आहे. यातले बरेचसे काँट्रॅक्टर्स गुजरातमधले आहेत. थोडक्यात वरून जसे आदेश येईल तसं वागायचं इतकंच ठरलं आहे. बाकी रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, माणसं मरत आहेत याचं या सरकारला काही घेणंदेणं नाही. ३) मला वाईट वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात आम्ही नाशिक शहर इतकं सुंदर केलं, इतके चांगले रस्ते बांधले, त्या सगळ्याची पार वाट लागली आहे. बोटॅनिकल गार्डन असेल की माननीय बाळासाहेबांच्या नावाने उभारलेलं स्मारक असेल सगळ्याची पार वाट लावून टाकली आहे. दुसऱ्यांनी केलं मग ते का टिकवायचं, ही कुठली वृत्ती ? नाशिकमध्ये झाडं तोडली गेली, लोकांनी आंदोलनं केली, प्रशासन ढिम्म राहिलं, तरीही नाशिककर जर त्याच लोकांना निवडून देणार असतील तर काय बोलायचं ? ४) दिल्लीत जंतरमंतरला जे आंदोलन झालं, तिथे विद्यार्थी, तरुण-तरुणी जमले ते काही फक्त NEET परीक्षेतील घोटाळ्यांमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी नव्हते. ते आसपासच्या एकूणच परिस्थितीने त्रस्त झालेले विद्यार्थी होते. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे. हे आंदोलन घराघरात शिरलं. जेंव्हा आंदोलकांना मारलं तेंव्हा प्रत्येकाला वाटलं की माझ्या मुलाला मारलं. ५) सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु आहे. दहावीची परीक्षा झाली की मुलं आधी क्लास लावणार आणि मग क्लास मुलांना सांगणार कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्या ते. ही मुलं ८,८ तास क्लासला जाऊन बसणार असतील, तर मग कॉलेज काय करत आहे ? कोचिंग क्लासेसकडूनच NEET चा पेपर फुटला. आता नंदन निलेकणीना आणलं आहे, त्यांनी क्लासेसवर पहिलं लक्ष आणावं. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासेसची फी १ लाख ४० हजार रुपये, हे काय आहे ? क्लासला ८ तास बसल्यावर कॉलेजला अटेंडंन्स कशी लागते ? म्हणजे क्लास आणि कॉलेजमध्ये काही अर्थकारण आहे का ? आणि या सगळ्याने त्रस्त झाल्यावर विद्यार्थी चिडले, त्यांनी आंदोलन केलं तर त्यांचं चुकलं काय ? ६) काल नाशिकमध्ये विद्यार्थी भेटले ते म्हणाले, सर परत पेपर नाही ना फुटणार ? मला ऐकूनच वाईट वाटलं. काल नाशिकमध्ये मला NEET परीक्षेतील गोंधळाने नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे (यश गोसावी ) आई वडील भेटले. ज्या २१ मुलांनी आत्महत्या केली त्यात त्याचं नाव नाहीये. आपल्या जिल्ह्यातील मुलगा व्यथित होऊन आत्महत्या करतो, याबद्दल पालकमंत्र्यांना सहानुभूती नाही वाटत ? ७) सध्या भाजपमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष सुरु आहे. तुम्ही जेंव्हा बाहेरचे शत्रू संपवता तेंव्हा तुमच्या आत शत्रू तयार होतात हा इतिहास आहे आणि हेच भाजपमध्ये सुरु आहे. ८) क्लासेसचा जो काही धंदेवाईक अप्रोच आहे आणि कॉलेजेसची काही भूमिकाच नाहीये या सगळ्यावर सरकारने आता स्पष्ट भूमिका घ्यावी. वर्तमानपत्रांत पानपानभर क्लासेसच्या जाहिराती येतात की हा पहिला आणि तो पहिला आला. कसा आला ? जेंव्हा पहिल्यांदा NEET चा पेपर फुटला तेंव्हा त्याचा रेट २५ लाख होता असं ऐकायला आलं आणि आता तो दीड कोटी होता असं ऐकायला आलं. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आता. ९) आज देशातील तरुण-तरुणी त्यांच्या मोबाईलवर बाहेरचे जग बघतात आणि जेंव्हा आसपासची परिस्थिती बघतात तेंव्हा त्यांना नैराश्य नाही का येणार ? त्यांना का रहावसं वाटेल इथे ? या सरकारमधल्या मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात, ज्यांचा राजीनामा झाला त्या धर्मेंद्र प्रधानांची मुलगी परदेशात शिकत आहे. जर तिचाच या देशातील शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलो आहोत आपण ?

Raj Thackeray

64,409 görüntüleme • 22 gün önce

समाजाला जागं करणारा प्रश्न - “आपण कोणावर विश्वास ठेवतोय?” वादग्रस्त ज्योतिष **कॅप्टन अशोक खरात** यांच्या संदर्भात समोर येत असलेल्या घडामोडींनी एक गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न समाजासमोर उभा केला आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही लोक त्यांचे स्वागत करताना, फुलांची उधळण करताना दिसतात. पण दुसऱ्या बाजूला गंभीर आरोप, पोलिसांची कारवाई आणि संशयास्पद बाबीही समोर येत आहेत. मग प्रश्न असा - 👉 जर एखाद्या व्यक्तीकडे इतका पैसा, प्रभाव आणि मोठा पाठिंबा असेल, तर तो खरोखर “सच्चा” आहे का? 👉 की हा सर्व फक्त लोकांच्या अंधविश्वासावर उभा असलेला दिखावा आहे? ❗ समाजासमोर उभे राहिलेले महत्त्वाचे प्रश्न 👉 आपण कोणावर आणि कशाच्या आधारावर विश्वास ठेवतो? 👉 फक्त गोड बोलणे, भविष्य सांगणे किंवा प्रसिद्धी - हेच विश्वासाचं मापदंड आहे का? 👉 गंभीर आरोप असूनही लोक अशा व्यक्तींच्या पायावर का पडतात? 👉 समाजात शिक्षण आणि माहिती असूनही अंधश्रद्धा का टिकून आहे? ⚠️ अंधविश्वास की वास्तव? अशा प्रकरणांमध्ये अनेकदा लोक भावनिक, आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणींमुळे “कोणीतरी मदत करेल” या आशेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत अनेक भोंदू लोक स्वतःचं साम्राज्य उभं करतात. 👉 मोठे दावे 👉 राजकीय किंवा सामाजिक संपर्क 👉 दिखाऊ जीवनशैली हे सगळं “विश्वासार्हता” निर्माण करण्यासाठी वापरलं जातं - पण ते खरं असतंच असं नाही. 🚨 समाजासाठी महत्त्वाचा संदेश 👉 कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका 👉 संशयास्पद गोष्टी दिसल्यास दुर्लक्ष करू नका 👉 स्वतः जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा 👉 आणि सर्वात महत्त्वाचं - जर अशा प्रकारचा त्रास, फसवणूक किंवा गैरप्रकार तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील कोणासोबत होत असेल, तर त्वरित **नाशिक पोलीस** किंवा संबंधित प्रशासनाकडे तक्रार करा. 🧠 निष्कर्ष हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही - हा आपल्या समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे. 👉 आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली, तरच बदल होईल 👉 जागरूक समाजच सुरक्षित समाज असतो

Shekhar

17,829 görüntüleme • 5 ay önce

बेलापूर विधानसभेचे उमेदवार श्री. गजानन काळे आणि ऐरोली मतदारसंघाचे उमेदवार श्री. निलेश बाणखेले यांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) या भागाला नवी मुंबई म्हणतात कारण त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा विचार व्यापक होता. मुंबई आणि त्याला लागून नवी मुंबई उभी करावी हा विचार वसंतराव नाईकांच्या डोक्यात आला. कारण त्यांच्या लक्षात आलं की १९५० ते १९७० या २० वर्षात मुंबईची लोकसंख्या दुपटीने वाढली. आणि आता यापुढे मुंबई माणसं घेऊ शकणार नाही म्हणून नवी मुंबईला आकार देण्यात आला. पुढे मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स उभं राहिलं. हे सगळं उभं करताना शहर कसं उभं करायचं याचा विचार केला गेलाच नाही. ब्रिटिशांनी मुंबई उभी करताना खूप विचार केला. आपल्याकडे शहराचा विकास आराखडा बनवला जातो पण इथे शहर नियोजन आराखडा बनवला जात नाही. २) ब्रिटिशांनी मुंबई उभारताना अनेक मैदानं उभी केली. पण त्यानंतर जी शहरं उभी राहिली त्यात कुठे मैदानं दिसत नाहीत. आज नवी मुंबईत खाजगी क्रीडासंकुल आहे पण सरकारी क्रीडासंकुल का नाही ? नवी मुंबईत फक्त एक नाट्यगृह का आहे ? हेच मुंबईत बघा तर किती नाट्यगृहं आहेत. नवी मुंबईत शिवाजी पार्कसारखं किंवा आझाद मैदानासारखं मैदान आहे? नाहीये... ३) ब्रिटिशांनी अनेक हॉस्पिटल्स एकत्र करणारा एक भाग बनवला. थोडक्यात लोकसंख्येला काय काय लागेल याचा केवढा विचार ब्रिटिशांनी केला ? पण नवी मुंबईत समजा एखाद्या कुटुंबाला कुठे जायचं असेल तर कुठे जायचं ? मॉलमध्ये ? थोडक्यात काय शहराच्या कुठल्याच गरजांचा विचार केला जात नाही. ४) गेली ६०-७० वर्ष निवडणुका होत आहे, पण तेच प्रश्न, तीच आश्वासनं हेच सुरु आहे आणि जगणं तसंच सुरु आहे. याला काय अर्थ आहे ? आपल्याकडे प्रगती म्हणजे विविध उपकरणं येणं, गाड्या येणं इतकं नसतं. मला विकासाचा विचार इतका तोकड्या पद्धतीने करता येत नाही. महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता. बरं तो जाहीरनामा होता, तर प्रत्येक प्रश्नावरच उत्तर आम्ही त्यात दिलं. ५) आज नवी मुंबईत एकाच घरातील २,२ जणं वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत, दिवसभर वेगवेगळ्या पक्षातून फिरतात रात्री घरी पुन्हा एकत्र येतात. काय चाललं आहे नवी मुंबईत ? ६) नाशिकमध्ये ५ वर्ष आमची सत्ता होती, त्या ५ वर्षाच्या काळात आम्ही मुकणे धरणांतून थेट पाईपलाईन टाकून नाशिकमध्ये पाणी आणलं, आणि नाशिक शहराचा ५० वर्षांचा प्रश्न सोडवला. असा विचार इतर कोणी करतं का हो तुमच्यासाठी ? ७) रतन टाटा गेल्यावर संपूर्ण भारत हळहळला. एक सज्जन आणि सरळ उद्योगपती गेला म्हणून लोकं दुखी झाले. का दुःखी झाले ? कारण लोकांना सरळ, सज्जन माणसं आवडतात जर सरळ, सज्जन माणसं लोकांना आवडतात, तर मग लोकांना सरळ विचार करणारे राजकारणी का नाही आवडत ? तिथेच नेमकी वेडावाकडा विचार करणारी आणि कृती करणारी माणसं का निवडता तुम्ही ? ८) महाराष्ट्रात दुकानांवर मराठी मध्ये पाट्या लागत नव्हत्या, मी साधंसोपं पत्र लिहिलं आणि त्यात त्यांना लिहिलं की तुम्ही ठरवाव की दुकानाची पाटी महाग आहे का दुकान महाग आहे ? आणि पुढे त्या पत्रात लिहीलं की जर तुम्ही पाट्या नाही केलात तर माझे महाराष्ट् सैनिक तुम्हाला भेटीला येतील. आणि पाट्या झाल्या. आम्ही सत्तेत नसताना कामं करून दाखवत असू तर सत्तेत आल्यावर किती कामं करू याचा विचार करा. ९) माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रातील माझ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

42,727 görüntüleme • 1 yıl önce

आम्ही एसआयटी ला भेटायला गेलो होतो एस आय टी या मुख्य इमारती पासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पस मध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डी मध्ये हे प्रिवीलेज का मिळाले ? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय... १. जर दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांच म्हणणं आहे तर अजून पर्यंत दमानिया ला अटक का केली नाही? २. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी ? ३. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ? ४. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियाने सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर मध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही? ५. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ? ६. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एस आय टी ला ? दमानिया महाराष्ट्राला ? SIT पीडित महिलांना ? _ कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे... !

SushmaTai Andhare

69,076 görüntüleme • 4 ay önce

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार श्री. राजू पाटील यांच्या प्रचारार्थ मी आज शुभारंभाची सभा घेतली. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे- १) आज आमचे आमदार श्री. राजू पाटील यांच्या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. आज व्यासपीठावर आमचे उल्हास भोईर, भगवान भालेराव आणि संगीताताई चेंदवणकर उपस्थित आहेत. संगीताताईनी बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यामुळे ती भयानक घटना महाराष्ट्राच्या समोर आली, आख्ख प्रशासन हललं. त्यांनी जे काम केलं त्याची शाबासकी म्हणून त्यांना मी विधानसभेची उमेदवारी दिली. २) मी तुमच्याकडून हमी घ्यायला आलोय की जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही विजयी कराल. हे सगळं कशासाठी तर महाराष्ट्राची आज जी अवस्था आहे ती बदलण्यासाठी. २०१९ ला युतीत कोण होतं, आघडीत कोण होतं आता युतीत कोण आहे आघाडीत कोण आहे काहीच कळत नाहीये. गेल्या ५ वर्षात जे घडलं त्याची मतदारांनी उजळणी केली पाहिजे. कोणी कुठेही गेलं, पण आमचा राजू विधानसभेत एकटा होता, आणि मला राजुचा अभिमान आहे की माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. ३) २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजप यांच्यासमोर कोण तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मग निकाल लागले, मग सकाळी एक शपथविधी झाला, ते लग्न १५ मिनिटांत तुटलं, कारण काकांनी डोळे वटारले मग हे आले घरी काका मला माफ करा म्हणत. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोरबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. कारण काय तर अमित शाह यांनी मला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. तुमच्यासमोर जर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मग तेंव्हाच का नाही आक्षेप घेतलात ? २०१९ चा निकाल लागेपर्यंत गप्प बसले आणि जेंव्हा लक्षात आलं की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही तेंव्हा यांनी अडीच वर्षांचा मुद्दा बाहेर काढला. ४) उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यावर त्यांनी सन्माननीय बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट करणं बंद केलं. होर्डिंगवर पण हिंदुहृदय सम्राट असा उल्लेख करणं बंद केलं. काही ठिकाणी होर्डिंगवर तर उर्दूत त्यांनी चक्क जनाब बाळासाहेब ठाकरे पण लिहिलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतके खाली गेलात तुम्ही ? ५) मग हे गेले काँग्रेसबरोबर, यांची अडीच वर्ष संपली आणि यांना यांचे चाळीस कुठे गेले हे कळलंच नाही. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. त्यांच्याकडे गुप्तचर विभाग रोज काय चाललं आहे हे सांगत असतात तरी मुख्यमंत्र्यांना कळलं नाही. या चाळीस जणांना घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणि त्यातल्या त्यात अजित पवारांबरोबर बसताना आमचा श्वास कोंडतो. मग पुढे अचानक अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून बाहेर पडले आणि इथे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. काय राजकारण सुरु आहे ? महाराष्ट्रात इतके ज्वलंत प्रश्न सुरु असताना हे सगळे हवं तसं वागतात कारण तुम्ही चिडत नाही, शांत लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असतात. महाराष्ट्रातील जनता आम्ही कसेही वागलो तरी आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची खात्री आहे त्यांना. ६) पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता काही वाटत नाही या लोकांना. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तरीही तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला... ७) फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती सन्माननीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही ? माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीये. महाराष्ट्राची किती वैचारिक घसरण झाली आहे ? देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा ? ८) आत्ता मी एक क्लिप पाहिली... मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावरती एक बाई भोजपुरी गाण्यावर लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून नाचत आहे... ही लाडकी बहीण योजना ? व्यासपीठावर बायका आणून नाचवणं हे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये व्हायचं, हे आपल्याकडे कधीपासून सुरु झालं ? ९) महाराष्ट्रातले प्रश्न प्रलंबित असताना आपल्याकडे चेष्टा सुरु आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रासाठी जागा रहा. आपल्याकडे त्या ओळी आहेत ना महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले।अनेकांचा डोळा आहे हे राज्य मारण्यासाठी. महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी सुरु आहेत त्या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत. मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून माझ्या हाती सत्ता द्या. १०) राजू पाटील यांनी कोव्हीड काळात खूप काम केलं. तुमच्या सगळ्यांसाठी झगडणारा राजू आहे, त्याला भरघोस मतांनी निवडून द्या. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

51,754 görüntüleme • 1 yıl önce

कसबा विधानसभेचे उमेदवार श्री. गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ पुण्यात कसबा पेठेत सभा घेतली. त्यात मांडलेले मुद्दे १) माझ्यासाठी कसब्याचं वेगळं महत्व आहे. मी जेंव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो आणि महाराष्ट्राचा दौरा केला आणि पक्षाची स्थापना केली, त्यावेळी कसबा गणपतीची पूजा करून पक्षाची स्थापना केली होती. याचं कारण या जागेचं महात्म्य. या जागेचं महत्व काय आहे समजून घ्यायला हवं. शहाजी राजांनी जेंव्हा बंड केलं ते बंड मोडण्यासाठी संपूर्ण पुणे उध्वस्त केलं. मग शहाजीराजे आदिलशाहीकडे गेले आणि नंतर कित्येक वर्ष शाहजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब बंगलोरला राहिले. पुढे जेंव्हा महाराज आणि जिजाऊ महाराज इकडे परत आले. इथे लाल महाल बांधला गेला. तेंव्हा इकडे आपलं देऊळ नव्हतं. जिजाऊ महाराजा २) या भागाने अख्ख्या हिंदवी प्रांतावर जवळपास एक शतक राज्य केलं. पण आपण आपला इतका दैदिप्यमान इतिहास विसरलो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्यांच्या जयंतीलाच आठवतात. परदेशात बघा लहान लहान मुलांना कसा त्यांचा इतिहास शिकवला जातो. ३) ज्या कस्ब्याचा इतिहास इतका दैदिप्यमान आहे आज त्या कसब्याची परिस्थिती किती भीषण आहे. इतक्या छोट्या गल्ल्या, कशीही पसरलेली वस्ती. पण तुम्हाला काहीच वाटत नाही. ४) आज मी उमरखेडला गेलो, तिकडे मी बोललो की या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या उमरखेडला झाली त्यावर लोकांनी टाळया वाजवल्या. काय झालंय लोकांना ? आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाबद्दल पण आपल्याला सहानभूती नाही वाटत. काय झालं आहे या महाराष्ट्राला? ५) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची कारकीर्द संपायच्या आधी १० दिवस असताना एक कायदा केला, की युद्धावरती जे कुत्रे बॉम्बचा शोध घेण्यासाठी पाठवले जातात त्या कुत्र्यांना युद्धाच्या ठिकाणी जखमा झाल्या किंवा तो अपंग झाला तरी त्याला अमेरिकन भूमीत परत आणलं पाहिजे, कारण काय तर तो कुत्रा पण अमेरिकन नागरिक आहे. कुत्र्यांचा पण जगभरात सन्मान होतो आणि भारतात नागरिकांना पण किंमत दिली जात नाही. काय अवस्था झाली आहे आपली ? ६) आज पुण्यात मेट्रो, फ्लायओव्हर बनत आहेत, पण ही प्रगती नाही. पुणे शहर आतून पोखरले जातंय. आज पुण्यात हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, बागा नाहीत, चालायला धड रस्ता नाही, मला सांगा तरीही तुम्ही कसं म्हणू शकाल की पुण्याची प्रगती झाली म्हणून ? ७) २०१९ ला आधी अजित पवारांचा शपथविधी झाला, पण ते लग्न पंधरा मिनिटं नाही टिकलं, काकांनी डोळे वटारले आणि अजित पवार परत आले. पुढे उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसले. मग शिंदेंना म्हणे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना घुसमट होते म्हणून शिंदे ४० आमदार घेऊन गेले, बरं हे जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला नकोसं वाटत होतं तेच अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यायच्या आधी १० दिवस नरेंद्र मोदी म्हणाले होते की ७०,००० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकू, पण पुढे १० दिवसांत जेलमध्ये टाकायच्या ऐवजी त्यांना उपमुख्यमंत्री केलं. ८) माझ्या पक्षाने जितकी आंदोलनं केली तितकी आंदोलनं कोणी केली ते सांगा? मोबाईलवर जे मराठी ऐकू येतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कानफटीमुळे सुरु झालं. मी मोबाईल कंपन्यांना सांगितलं की ४८ तासाच्या आत मोबाईलवरमराठी ऐकू यायला पाहिजे आणि ते करून घेतलं. हे का नाही इतर कुठल्या पक्षांना सुचलं ? ९) मी मराठीपण सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. मी जितका कडवट हिंदुत्ववादी आहे तितका कडवट मराठी आहे. इतर भाषिक लोकं किती कडवट असतात. मी सिंगापूरला गेलो होतो तेंव्हा एका दुकानात एक तामिळ बाई तमिळ रेडिओ ऐकत होती. आपण असं करू कधी ? महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो देशात कुठल्याही प्रांताला नाही. आपण भाषेबद्दल कडवट नाही, इतिहासाबद्दल आपल्याला प्रेम नाही. १०) काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत मी फोटो पाहिले की रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेश, बिहार मधून आलेली मुलं झोपली आहेत. मग जरा चौकशी केली तेंव्हा कळलं की ती रेल्वेभरतीसाठी आली आहेत. बरं रेल्वेभरती महाराष्ट्रातील पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्राच्या बाहेर. मग असं का म्हणून आम्ही संघर्ष केला, त्या संघर्षानंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या परीक्षा मराठीत घ्यायला सुरुवात झाली आणि हजारो मराठी मुलांना रेल्वेत नोकरी मिळाल्या. ११) मराठी पाट्या होत नव्हत्या, आमच्या आंदोलनामुळे त्या झाल्या. मी त्या आंदोलनाच्या वेळेस त्यांना एक पत्र लिहिलं, त्यात लिहिलं की दुकान महाग आहे का पाटी महाग आहे का हे ठरवावे आणि शेवटची ओळ लिहिली की तरी पण तुम्ही पाट्या मराठीत नाही केल्या तर माझे महाराष्ट्र सैनिक त्यांना भेटायला येतील. पाट्या झाल्या मराठीत. १२) मशिदींवरचे भोंगे उतरवले पाहिजेत म्हणून मी आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मी सरकारला समज दिली की मशिदींवरचे भोंगे नाही उतरवलेत तर माझे महाराष्ट्र सैनिक मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा लावतील. त्यावर उद्धव ठाकरेंनी भोंगे उतरवायच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मशिदींवरचे भोंगे उतरवायचा ऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर केसेस टाकतो ? १३) राहुल गांधींना एका सभेत खासदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत होत्या तर राहुल गांधी सरळ दुर्लक्ष करून निघून गेले. आपल्या महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही निवडून देणार ? १४) महाराष्ट्राच्या राजकारणाची पार रया घालवली ती संत शरद पवारांनी. इतर संतांनी जातीभेद विसरा म्हणून सांगितलं तर शरद पवार नावाच्या संताने मात्र जाती जातीत भांडण लावणे, एकमेकांना शिव्या द्यायची शिकवण देत आहेत. १५) या महाराष्ट्राला आकार देण्याचं माझं स्वप्न आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं माझं स्वप्न आहे, इथल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळायला हवी, इथल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, शेतकरी सुखी व्हायला हवेत ही माझी इच्छा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, इतरांना संधी दिलीत मला एकदा संधी देऊन बघा. #विधानसभ_२०२४

Raj Thackeray

62,399 görüntüleme • 1 yıl önce

आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते. - गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार! - मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट. - अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली. - भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत. - तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून? - सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. - जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल. सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का? - वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार. - आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल. - एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे. - देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? - काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली? - तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे. - मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत. - माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू. - हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते. - ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. - माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा. - ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते. - जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो. - 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.

Raj Thackeray

75,907 görüntüleme • 7 ay önce

आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा २० वा वर्धापनदिन. त्यानिमित्त आयोजित मेळाव्यात माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील सहकाऱ्यांना संबोधित केलं. १) माझ्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी सेनेतून झाली. तिथे काम करत इथपर्यंत आलो. अमित आणि त्याचे सहकारी उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. २) NEET परीक्षेतील गोंधळाच्या नंतर देशभर विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्यानंतरचा विद्यार्थ्यांचा हा पहिला मेळावा. मी जेंव्हा कामाला सुरुवात केली तेंव्हा काळ वेगळा होता, तेंव्हाचे विद्यार्थ्यांच्या समोरचे प्रश्न वेगळे होते, आजचे प्रश्न वेगळे आहेत. सगळं स्वरूपच बदललं आहे. मी टेलिग्राम ते इंस्टाग्राम काळ पाहिला आहे. ३) आज 'जेन झी' आंदोलनानंतर 'जेन झी' बद्दल खूप बोललं जात आहे. पण जेन झी म्हणजे फक्त शहरातील जेन झी असा समज करून घेऊ नका. जसे त्यांचे प्रश्न आहेत ते समजून घेतले पाहिजेत तसे ग्रामीण महाराष्ट्रातील पण याच वयोगटातील जे तरुण-तरुणी आहेत. त्यांचे प्रश्न काय आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सहकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ४) सगळ्याच कल्पना आता बदलल्या आहेत. आमच्या लहानपणी सांगायचे की रोज डोक्याला तेल लावा मग बुद्धी तल्लख होते. पण सध्या राज्याचे जे उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत ते त्यांच्या डोक्यावरच्या प्रत्येक केसाला तेल लावतात तरीही त्यांच्या बुद्धीत फारसा फरक पडला नाही. ते म्हणाले दिल्लीत आंदोलनाच्या दरम्यान जी दगडफेक झाली त्या दगडांवरचे फूटप्रिंट घेऊन ते आधार कार्डशी लिंक करून दगडफेक करणाऱ्याना शोधणार. काय बोलताय ? फूटप्रिंट आणि फिंगरप्रिंटमधला फरक नाही कळत ? अशा माणसांबद्दलचा 'जेन झी' च्या मनात राग असणारच ना. कोल्हापूरकरांनी पुण्याला यांना पाठवलं की विद्येच्या माहेरघरात जाऊन काही फरक पडेल पण काहीही फरक पडला नाही यांच्यात. ५) आज सकाळीच पंतप्रधानांचं निवेदन पाहिलं. त्यात त्यांनी म्हणलं आहे ते मान्य आहे. त्यांच्याबद्दल जी भाषा वापरली गेली ती अयोग्यच होती. अशी भाषा कोणी कोणाच्या बाबत वापरूच नये. हे चूकच आहे. पण हे तुमच्या लोकांना पण सांगा. २०१२ पासून ज्या ट्रोलच्या सेना तुमच्या पक्षाने पोसल्यात त्या महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी ते आमच्यासकट सगळ्यांना घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करतात. आज महाराष्ट्रात कलाकारांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर ट्रोल केलं जातं. या सगळ्याबद्दल तुमच्या लोकांना पण कधीतरी सांगा. जे पेराल तेच उगवतं. पंतप्रधान म्हणाले की माझ्या आईबद्दल चुकीचं बोललं गेलं. ते चूकच आहे. असं होता कामा नये. पण दुसऱ्यांना सुद्धा आई असते हे तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुमच्या पक्षाने जे ट्रोल पोसलेत त्यांना सांगा. तुम्ही म्हणालात की 'मुलांना माफ केलं आहे'. पण तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार ? ज्यांनी विद्यार्थ्यांवर लाठ्या मारल्या, ज्यांनी विद्यार्थ्यांची डोकी फोडली आणि हे सगळं करा असं ज्यांनी सांगितलं ते कधी माफी मागणार ? ६) जे आंदोलन झालं ते फक्त NEET परीक्षांतील गोंधळामुळे झालं आहे असं नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन मुलांच्या, तरुण-तरुणींच्या मनात काय खदखदतंय याचा विचार करा. आज रस्ते धड नाहीत, सगळीकडे पाणी तुंबतं, मैदानं नाहीत, बागा नाहीत, धड शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत, सर्वत्र खाजगीकरण सुरु आहे. सगळ एकाच उद्योगपतीच्या घशात टाकणं सुरु आहे. आज आमदार, खासदार ५०, १०० कोटी देऊन फोडले जात आहेत. डिजिटल इंडियाची घोषणा करणारं सरकार आमदार खासदार फोडताना कार्ड कुठे स्वाईप करता ? या सगळ्या परिस्थितीचा राग आज विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या, तरुण-तरुणींच्या मनात आहे, आणि त्याचा हा उद्रेक होता. आणि अजून सुद्धा उद्रेक बाहेर येणार आहे. कोणाला सत्तेवरून खेचणं आणि कोणालातरी सत्तेत आणणं हा विषय नाहीये. देशातील तरुणांच्या भविष्याचा विषय आहे. ७) ग्रामीण भागातील तरुण-तरुणींच्या मनात काय सुरु असेल ? ते काय विचार करत असतील ? आज त्यांच्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जे आत्महत्या करत आहेत ते तरुण-तरुणींच्या नात्यातील, ओळखीतील लोकं असतील. त्यांच्या अंत्यविधीला जाताना या मुलांच्या मनात काय विचार येत असेल ? आपल्या घरच्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून ही मुलं गाव सोडून शहरांत येतात. नोकरीसाठी वणवण करतात. आणि इथे येऊन सुद्धा काय तर शहरं बकाल झालेली आहेत हे पाहतात. ८) या सरकारने 'स्मार्ट सिटी'चा गाजावाजा केला. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटी ? इथलं एकही शहर धड नाही. आज मुलं परदेशात जात आहेत. का तर इथे त्यांना राहावंसं वाटत नाही. शहरं बकाल आहेत, मुलाबाळांना कुठे बाहेर नेण्याची सोय नाही. परदेशात उत्तम रस्ते, मैदानं, बागा, स्वच्छता, खेळांची संकुल सगळं काही आहे. या सगळ्यामुळे या मुलांना परदेशात जाऊन स्थायिक व्हावंसं वाटतं. आणि आपल्याला याचं काहीच वाटत नाही ? ९) सरकारने लोकसभेत मान्य केलं आहे की या देशातील उद्योजक हा देश सोडून जात आहेत. मोदींच्या आयुष्यावरच्या सिनेमात मोदींची भूमिका करणारा विवेक ओबेरॉय हा दुबईत राहतो. मोदींच्या काळात कसं सगळं छान झालं, कसा देश बदलला असल्या गप्पा मारणारा आर माधवन कुटुंबासकट दुबईत जाऊन राहतो. जर मोदींनी सगळं कसं छान केलं आहे असं वाटतंय ना मग तुम्ही का परदेशात स्थायिक होत आहात ? हे लोक इथे येणार सरकार स्पॉन्सर्ड फिल्ममधे काम करणार आणि पुन्हा दुबईला जाणार. उद्योगपती परदेशात जात आहेत १०) पंतप्रधान म्हणतात विद्यार्थी चुकीच्या रस्त्यावर भरकटलेत. ते भरकटले नाहीयेत तर त्यांना तिकडे ढकललं जात आहे. ओशोंच एक सुंदर वाक्य मध्ये ऐकलं, ते म्हणाले, "कौन कहता है देश का युवक गलत रास्ते पर भटक रहा है। अगर रास्ता बननेवालेने गलत रास्ता बनाया है तो युवकों का क्या उसमें दोष ?" या मुलांच्या अपेक्षा मारल्या जात आहेत. त्यांना आसपास आपल्यासाठी काहीच चाललं नाहीये हे दिसल्यावर त्यांनी काय करायचं ? ११) आज देशातील तरुण-तरुणी माझं सगळं चांगलं होऊ दे, मला नोकरी मिळू दे, माझं लग्न होऊ दे म्हणून देवळात जाऊन देवाकडे प्रार्थना करतात. त्या देवाच्या देवळातच चोरी होत आहे. राम मंदिर या देशातील करोडो लोकांच्या भावनेचा विषय. पण त्याच देवळातून पैशाचा अपहार होणार असेल तर या मुलांनी कुणाकडे बघायचं ? मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला स्वतः एकटे आत होते आणि स्वतः एकट्याने पूजा केली. मग मोदी राम मंदिरातील अपहाराबद्दल का बोलत नाहीत ? का अयोध्येत खासदार निवडून नाही आला म्हणून यांचा संबंध संपला ? १२) या देशातील तरुण-तरुणी श्रद्धाळू आहेत जे योग्य आहे पण त्यांना धर्मांध बनवू नका. त्यांना शिक्षणाच्या वाटेवर न्या. त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नका. फक्त जय श्रीराम म्हणून काय होणार ? देशात गोरक्षक गाड्या पकडतात आणि नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात अभिमानाने सांगतात की जगात बीफ एक्स्पोर्टमध्ये भारताचा नंबर पहिला आहे. गायी मारल्याशिवाय बीफ एक्स्पोर्ट होईल का ? मग गोरकाक्षांनी काय करायचं ? १३) देशातील एक लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत... १५,००० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही... १० लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत.२००४ मध्ये शिक्षणावर ३.२% खर्च होत होता, आज २०२६ मध्ये २.८%. खर्च होत आहे. १४) सिद्धिविनायक मंदिरात अपहार झाल्याचं या मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहून कळवलं आहे. दानपेटीतुन १८ कोटी रुपये लुटले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना सरकारवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणून ते देवळात जाणार तर त्या देवळातच चोरी सुरु आहे, या मुलांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर ? १५) माझ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील सहकाऱ्यांना सांगणं आहे की सदस्य नोंदणी कराच पण या विद्यार्थ्यांच्या मनात नक्की काय सुरु आहे हे पण समजून घ्या. राज ठाकरे

Raj Thackeray

49,135 görüntüleme • 28 gün önce

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत. २) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. ३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो. ४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही. ५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. ६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे... ७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ? ८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ? ९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू. १०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे. ११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत... १२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ १३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल... १४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे... १५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?

Raj Thackeray

33,665 görüntüleme • 1 yıl önce

वणी विधानसभेचे उमेदवार श्री. राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ आज वणी येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सगळे पक्ष त्या त्या मतदारसंघात कोणत्या जातीच प्राबल्य आहे हे बघून उमेदवाऱ्या देत आहेत. मला जातीतलं काही समजत नाही. आजारी झाल्यावर डॉक्टरची जात पाहून जाता का ? का तो आजार बरा करू शकेल का हे बघता ? मग आमदार निवडून देताना जात बघून का देता ? म्हणून म्हणतो राजू उंबरकरसारखे चांगले उमेदवार निवडून द्या जो तुमच्यासाठी झटेल. २) विदर्भ, मराठवाड्यातले आमदार निवडून इथून येतात आणि त्यांची मुलंबाळं, कुटुंब मुंबई पुण्याकडे असतात. आपला प्रदेश तसाच भकास ठेवायचा आणि यांनी स्वतः ऐषआरामात रहायचं. इथले आमदार म्हणाले की मी परत निवडून आलो तर माझी हॅट्रिक होईल. तुझ्या हॅट्रीकने काय फरक पडतो. ३) यवतमाळ जिल्ह्याची ओळख कापूस म्हणजेच पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून नाही ओळखला जात तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय;. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा कुटुंबाचं पुढे काय होतं याचं कोणाला काही पडलं नाहीये. निवडणुका येतात तेच खासदार, आमदार निवडून येतात, मात्र परिस्थिती जैसे थे. ४) यवतमाळ जिल्हा पुरेसा सिंचनाखाली का नाही? एकदा तरी आमदारांना/खासदारांना प्रश्न विचारा की तुम्ही नक्की काय केलंत आमच्यासाठी ? ५) सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणी ठरवतात आणि तुम्ही इतक्या महत्वाच्या राजकारणाकडे दुर्लक्ष कस करू शकता? तुमच्या आयुष्यातील ५, ५ वर्ष निघून जातात. आपल्यासमोर आपली मुलं मोठी होतात, आपण म्हणतो की अरे बघता बघता मोठा झाला. तसंच तुमचं पण वय वाढत जातं. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, हाच जन्म खरा आणि या जन्मात तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणली जाते. काय चाललंय ? ६) २०१९ ला तुम्ही ज्यांना मत दिलं ते नक्की कुठे आहे याचा विचार केलात का ? दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष ज्यांच्यातून विस्तव जात नसे ते पक्ष एकत्र आले आणि सत्तेत बसले. लोकांनी मतदान शिवसेना-भाजपला, काँग्रेस-राष्ट्रवादीला केल आणि इकडचा गट तिकडे गेला, तिकडचा गट इकडे आला. वाट्टेल तशा युत्या, आघाड्या झाल्या. आणि यांत काय घडलं तर बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली. वैचारिक व्यभिचार किती करायचा? अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले, पुढे वर्षभरात अजित पवारच शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले. यातून तुमच्या मताची लायकी काय आहे ते कळलं का ? ७) महाराष्ट्र जातीपातीत विभागला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत ? स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि इतकं असताना पण हे राजकीय पक्ष येतील, तोंडावर पैसे फेकून मारतील, आणि त्यांना खात्री आहे की तुम्हाला कसंही वागवलं तरी तुम्ही त्यांना परत निवडून देणार . हा त्या लोकांचा समज तुम्ही मोडून काढणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही. ८) रेल्वे भरती महाराष्ट्रात पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्रात यायच्या नाहीत, शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झटका दिला आणि महाराष्ट्रात जाहिराती यायला लागल्या. ९) मशिदींवरचे भोंगे आम्ही बंद केले, सरकारने जर थोडं सहकार्य केलं असतं तर कायमचे भोंगे बंद केले असते. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं म्हणून माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला खुश करायला उद्धव ठाकरेंनी केसेस टाकल्या. १०) जी कामं सरकारने करायची ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहेत. त्यामुळे एकदा माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता एकदा देऊन तर बघा. ११) गेली ५ वर्ष जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुमचा अपमान केला आहे. येणारी निवडणूक हा तुमच्या अपमानाचा बदला घेण्याची निवडणूक आहे. मी तुम्हाला हमी देतो की राजू उंबरकर हा वणीत राहील, इथल्या लोकांच्यासोबत कायम राहील. माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

34,724 görüntüleme • 1 yıl önce

आज ५ ऑगस्ट २०२४ रोजी 'नवनिर्माण यात्रेच्या' सुरुवातीला मी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे... १) महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या हव्यात यात जातीचा मुद्दा कुठे येतो. आज खाजगीकरण मोठं आहे, आणि खाजगी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आरक्षणाने खरंच शिक्षणातील असो की नोकऱ्यातील असो किती लोकांना फायदा होणार आहे याचा विचार आपण करणार आहोत का ? इथं फक्त माथी भडकवण्याचं काम सुरु आहे, इथे फक्त मतांचं राजकारण सुरु आहे हे प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे आपल्याला यांच्या मतांच्या राजकारणासाठी मूर्ख बनवलं जात आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मुलामुलींना आपल्याकडच्या शिक्षणसंस्थांमध्ये ऍडमिशन्स मिळतात, पुढे त्यांना नोकऱ्या मिळतात. पण आपल्या मुलांना मिळत नाहीत, यावर कोणी बोल्ट नाहीत. जातपात शाळा-कॉलेजच्या पातळीवर पोहचलं. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीपातीत अडकला आहे. २) माध्यमांवर आणि सोशल मीडियावर कशालाही प्रसिद्धी मिळते हे कळलं की वाट्टेल बोललं जातं हे थांबलं पाहिजे... आणि माध्यमांनी सुजाण भूमिका घेऊन ही असली चिखलफेक दाखवणं थांबवलं पाहिजे. ३) महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये असं जर पवारसाहेबांना वाटत असेल तर त्यांनी पण स्वतः त्याला हातभार लावू नये. ४) लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये माझा नरेंद्र मोदींना पाठींबा आहे हे मी स्पष्ट केलं होतं, तेंव्हा मी कधीच विधानसभेचंबोललो नाही. ५) एका पत्रकाराने मला विचारलं होतं की तुम्ही जी ब्ल्यूफिल्म आणली होती.... त्यावर मी त्याला गमतीत म्हणालो की ती आणली असती तर बरं झालं असतं, कारण तुम्ही पाहिली तरी असतीत. पण महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मी आणली, ती राज्याला अर्पण केली पण दुर्दैवाने ती एकाही पत्रकाराने माझी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट वाचली नाही, त्याबद्दल माझ्याशी कधीही चर्चा केली नाही. ६) कोण कुठल्या मतदारसंघात उभं आहे याच्याशी मला देणंघेणं नाही. वरळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असेल. ७) या महाराष्ट्रात इतक्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत, त्या काय होत आहेत तर बाहेरून येणाऱ्या लोकांना सुविधा मिळाव्यात म्हणून... सरकारला अफाट पैसे पायाभूत सुविधांवर खर्च करावे लागतात ते सुद्धा का? तर लोंढ्यांनी शहरांची पार वाट लावून टाकली आहे, मग त्यावर उपाय म्हणून एका मागोमाग एक प्रकल्प उभे करावे लागतात, आणि यांत मग ग्रामीण भागाकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. ८) देशातील सगळ्यात मोठं स्टेडियम उभं करायचं गुजरातमध्ये, ऑलिम्पिक स्पर्धा भरवायच्या आहेत गुजरातमध्ये ... असं कसं चालेल? अर्थसंकल्पात खेळांसाठी तरतूद करताना सगळ्यात जास्त तरतूद गुजरात आणि उत्तरप्रदेशसाठी... असं का ? या देशाच्या पंतप्रधानांना सगळी राज्य समान हवीत ना... उद्या मराठी पंतप्रधान झाला आणि समजा त्यांनी सगळं महाराष्ट्रात सुरु केलं तर मी त्यांना हीच आठवण करून देईन की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात म्हणून ९) माझ्या पक्षाला या विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चित यश मिळेल. माझा पक्ष जन्माला येऊन १८ वर्ष झाली. आणि चढउतार कोणालाच चुकले नाहीत... काँग्रेस पक्ष ४४ खासदारांवर आलाच होता ना... १०) अजून बोलायला मी सुरुवात नाही केली, मी जेंव्हा बोलायला सुरु करेन तेंव्हा बघू कोण कोण बोलतंय. आणि मी सध्या बोलत नाहीये कारण अजून तशी वेळ आलेली नाही, पण जेंव्हा मी बोलेन तेंव्हा ते त्यांच्या लक्षात राहील असं बोलेन. ११) लाडकी बहीण, लाडका भाऊ, करण्यापेक्षा लाडका मतदार योजना सुरु करा... १२) संविधान बदलणार हे भाजपचा अयोध्येचा उमेदवार बोलला, म्हणजे त्यांनीच विरोधकांना नरेटीव्ह दिलं ना? तोपर्यत चर्चाच नव्हती. म्हणजे भाजपनेच नरेटिव्ह दिलं ना १३) मी निवडणुकासांठी सर्व्हे करण्यासाठी एजन्सी घेतली नाही. माझ्या पक्षाचे लोकं दोनदा महाराष्ट्राच्या विधानसभांमध्ये जाऊन आले, तिथे लोकांना भेटून आलेत. त्यांनी त्यांचं म्हणणं माझ्याकडे मांडलं... १४) धारावीतील स्क्वेअर फुटाचा दर काय आहे हे जर तुम्ही बघितलंत तर तुम्हाला कळेल की धारावी पुनर्विकासा भोवती काय राजकारण सुरु आहे.

Raj Thackeray

31,442 görüntüleme • 2 yıl önce

राज्यातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा : #तलाठी_भरती_घोटाळा #तलाठी_भरती_घोटाळ्यात अख्खे परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात आले होते. त्याबद्दलची ऑडिओ-व्हिडीओ-फोन रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तलाठीचे एक पद २०-२५ लाखात विकण्यात आल्याचे पुराव्यातून स्पष्ट झालं आहे. तलाठी भरतीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पोलीस तक्रार दाखल केली होती. आमच्या तक्रारी नंतरच #धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी FIR दाखल केली आहे. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी महसुलच्या अपर मुख्य सचिवांना पाठविलेला गोपनीय अहवाल अनेक महिन्यांपासून आमच्याकडे आहे. तो अहवाल कधीतरी पब्लिक होईलच पण त्यासोबतच इतर सर्व #पुरावे पब्लिक करण्याबद्दल सुध्दा विचार करण्यात येईल. राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी तलाठी भरती दिलेली आहे. तलाठी भरती घोटाळा इतका मोठा आहे की तो #विधानसभा निवडणुकीसाठी एक मुख्य मुद्दा ठरू शकतो, आणि आम्ही त्याला मुख्य मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू. परंतु राज्याचे #गृह_खाते अत्यंत कर्तव्यदक्ष व्यक्तीच्या हाती आहे. तलाठी भरती घोटाळ्याचा तपास धाराशिव पोलीस करत नाहीयेत किंवा अत्यंत संथ गतीने तपास सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण घोटाळा दाबला गेला असून अनेक भ्रष्टाचाऱ्यांची निवड झाली आहे. #दिल्ली मध्ये बसलेल्या व्यक्तीला रियल टाइम रिमोट ॲक्सेस देऊन भ्रष्ट उमेदवारांचे पेपर सोडविण्यात आले आहेत. यात कोणत्या परीक्षा केंद्राचे मालक सामील आहेत आणि #TCS मधील कोण व्यक्ती सामील आहेत याची नावानिशी माहिती आमच्याकडे आहे. अनेक परीक्षा केंद्र मॅनेज झाल्याचे आमच्या तपासात समोर आलं आहे. परंतु आमच्यातील काही फितूर झाले असतील किंवा सरकारने आमच्यावर जी गुन्हे दाखल केले किंवा काही व्यक्तींनी विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे याप्रकरणी आम्हाला पूर्ण पाठपुरावा आजवर करता आलेला नाही याची आम्ही आज दिलगिरी व्यक्त करतो. निवड झालेल्या उमेदवारांबद्दल आम्हाला कोणताही आकस नाही,पण ते फक्त स्वतःचे बघत आहेत. पण आम्ही तलाठी भरती घोटाळा कधीतरी पूर्ण बाहेर काढूच मग त्यासाठी येत्या विधानसभेत सत्तांतर गरजेचे असेल तर त्यासाठी सुध्दा आम्ही जोमाने प्रयत्न करू. #महसूल_विभाग किंवा पोलीस विभाग यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे स्पष्ट झालं आहे, त्यामुळे फडणवीस सरकार कडून तपासाची कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही. महसूल मंत्री #विखे_पाटील घोटाळा झाला असल्यास संन्यास घेऊ म्हणताय, विखे साहेब नगरच्या जनतेने याआधीच आपल्या पोराला राजकीय बेरोजगार केलं आहे येत्या विधानसभेत आपला पण सुपडा साफ होईल. तलाठी भरतीत घोटाळा झाला आहे, असेल हिम्मत तर करा आमच्यासोबत बैठक,सर्व पुरावे समोर मांडल्या नंतर निर्णय घ्या अन्यथा महसूल मंत्री पदावरून राजीनामा देऊन मोकळे व्हा. राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना तलाठी घोटाळ्याचे फक्त राजकारण करायचे नसेल Rohit Pawar Balasaheb Thorat तर त्यांनी मैदानात यावं, आपण #पंधरा दिवसानंतर जनतेच्या दरबारात आंदोलनाला बसू. वेळ आणि ठिकाण आपण सांगाल तिथं आम्ही येऊ. कुणी साथ दिली नाही तरी, योग्य वेळी तलाठी भरती घोटाळ्याचे वादळ आल्याशिवाय राहणार नाही. #सत्यमेव_जयते !! Radhakrishna Vikhe Patil Devendra Fadnavis Revenue Department, Government of Maharashtra Sujata Saunik CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Aaditya Thackeray Vijay Wadettiwar Shivaani Wadettiwar 🇮🇳 Abhimanyu Pawar Niranjan Davkhare Kunal Raut Supriya Sule Kailas Patil Raju Shetti Ravikant Tupkar Prakash Ambedkar Raj Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nana Patole ABP माझा SaamTV News ZEE २४ तास Girish Kuber BBC News Marathi ashish jadhao nikhil wagle Prashant Kadam Satej (Bunty) D. Patil Satyajeet Tambe Maharashtra Youth Congress Maharashtra Congress भाजपा महाराष्ट्र Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Dipali Jagtap Dr Sujay Vikhe Patil Jayant Patil- जयंत पाटील

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

36,079 görüntüleme • 2 yıl önce