
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
@mnsadhikrut • 495,859 subscribers
मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे. This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).
Shorts
Videos

“माझ्यावर दाखल झालेला पहिला गुन्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी होता; आणि आज माझ्यावर दाखल झालेला दुसरा गुन्हा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा मला अत्यंत अभिमान आहे!“ - श्री. अमित राजसाहेब ठाकरे #MNVSAdhikrut #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत155,466 views • 4 days ago

भारतीय जनता युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांचा दणका. शिवतीर्थावर जिथे लोकं न्याय मागायला येतात, जिथे लोकं प्रश्न सुटतात या आशेने येतात तिथे येऊन उगाच बेटकुळ्या दाखवण्याचा भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. मग त्यांना महाराष्ट्र सैनिकांनी चांगलाच प्रसाद दिला. अर्थात उगाच आंदोलनाच्या नावाखाली फुटकळ शक्तिप्रदर्शन करणाऱ्या भाजयुमो पदाधिकाऱ्यांच्या ऐवजी महाराष्ट्र सैनिकांनाच अटक करण्याचे आदेश सरकारने दिले.. #RajThackeray #AmitThackeray #MNSAdhikrut #Mahim #BJPVsMNS
MNS Adhikrut - मनसे अधिकृत26,081 views • 3 days ago

समृद्धी महामार्गावर आता कुटुंबासह प्रवास करणंही सुरक्षित राहिलं आहे का? वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर कुटुंबासह प्रवास करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना अडवण्यात आलं. आधी मुलाला पकडून कुटुंबाला धाक दाखवण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर वारंवार अशा प्रकारे वाहनं अडवून प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडत असतील, तर महामार्गाची सुरक्षा व्यवस्था नेमकी कुठे आहे? कुटुंबाने महामार्गावर प्रवास करताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी करायची की प्रशासनाने? महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? महाराष्ट्र सरकार ने या घटनांची तातडीने दखल घेऊन लुटारूंवर कठोर कारवाई करावी तसेच महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ त्वरित थांबवावा. #MNSAdhikrut #samruddhimahamarg #safety
MNS Adhikrut - मनसे अधिकृत34,089 views • 5 days ago

गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, छ. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले. पाहणीदरम्यान अस्वच्छ शौचालये, सडलेले कांदे, कॅन्टीनच्या जेवणात आढळलेल्या अळ्या, तसेच वॉटर कूलरमध्येही कीडे सापडल्याने धक्कादायक परिस्थिती उघडकीस आली. या गंभीर प्रकारानंतर माननीय अमित राजसाहेब ठाकरे यांनी तत्काळ थेट प्राध्यापकांच्या कॅबिनमध्ये धडक दिली आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेशी खेळ सुरू असताना प्रशासन नेमके काय करत आहे, याबाबत प्राध्यापकांना जाब विचारला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन करणार नाही! #MNVSAdhikrut #MNSAdhikrut #Pune
MNS Adhikrut - मनसे अधिकृत17,806 views • 4 days ago

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राजसाहेब ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सिडको परिसरातील वसंतराव नाईक कॉलेजला भेट दिली. यावेळी काही विद्यार्थिनींनी कॉलेजच्या बाहेरील मुलांकडून त्रास होत असल्याची तक्रार अमित ठाकरे यांच्याकडे केली. विद्यार्थिनींच्या तक्रारीची गंभीर दखल घेत अमित ठाकरे यांनी कॉलेज प्रशासनाला २४ तासांच्या आत विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा अल्टिमेटम दिला. तसेच, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची तातडीने दखल घेत लवकरात लवकर कारवाई करावी करून विद्यार्थिनींच्या समस्या सोडवाव्यात, अशी विनंती केली. #AmitThackeray #chhatrapatisambhajinagar #MNVSAdhikrut #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत30,353 views • 11 days ago

ताडदेव, मुंबई येथे “नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर मिळणार नाही” असे म्हणणारे इस्टेट एजंट भावेश कावरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अमित राजसाहेब ठाकरे यांनी भावेश कावरे यांच्याशी संवाद साधत, समाजात विभाजन निर्माण करणारे किंवा जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे कोणतेही व्हिडिओ बनवू नयेत, असा सल्ला दिला. #MNSAdhikrut #MNVSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत45,257 views • 19 days ago

घाटकोपरमधील पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद आता दादरपर्यंत पोहोचला आहे. दादरमधील गोखले मार्गावरही पांढऱ्या पट्ट्या काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पांढऱ्या पट्ट्या हटविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवार, दुपारी ३ पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार प्रशासनाने सकाळीच घटनास्थळी पोहोचून पांढऱ्या पट्ट्या पुसण्याची कार्यवाही सुरू केली. जैन बांधव आपल्या धर्मगुरूंप्रती श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या काढत असले, तरी सार्वजनिक रस्ते आणि सार्वजनिक जागांवर कोणत्याही धर्म, पंथ किंवा समाजासाठी विशेष व्यवस्था निर्माण करणे योग्य नाही. सार्वजनिक ठिकाणे ही सर्व नागरिकांसाठी समान असून, तेथे कोणालाही अडथळा निर्माण होईल किंवा वेगळे नियम लागू होतील अशी कृती टाळली पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मांडली आहे. #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत159,632 views • 2 months ago

“राजकीय पक्षांकडून तुमचा वापर केला जातोय. मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण व्हावा, हाच काहींचा उद्देश असावा. सोसायटीमध्ये धर्मगुरू येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी कार्पेट टाका आणि भेट संपल्यानंतर ते काढून टाका. धर्माचे कार्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखलेले नाही. जैन मुनी पद्मसागर हे माझ्या घरीही येऊन गेले आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारून इतरांना त्रास होईल असे प्रकार करू नका.” – मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना मा. श्री. राजसाहेब ठाकरे. #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत113,810 views • 2 months ago

“राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन.” मा. राजसाहेब ठाकरे #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत44,070 views • 28 days ago

अवघ्या २ महिन्यांपूर्वी गाजवाजा करत उदघाट्न झालेल्या मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. हा दरडप्रवण भाग आहे याचा विचार करून काही उपाययोजनांची तरतूद केली नव्हती का ? त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की अजून या पुलाची टेस्टिंग सुरू आहे.. टेस्टिंग सुरु आहे असं मुख्यमंत्री महोदयांचे म्हणणं असेल तर तसं त्यांनी उद्घटनाच्या वेळेस कधीच का नाही सांगितलं? नागरिकांचा प्रवास सुरु करून टेस्टिंग करण्यामागे काय प्रयोजन? तुम्ही श्रेय घेतलंत पण आता या दुर्लक्षाची जबाबदारी घेणार का ? #MNSAdhikrut #MissingLink
MNS Adhikrut - मनसे अधिकृत80,162 views • 2 months ago

आपल्या प्रश्नांबद्दल खरी आस्था फक्त राज ठाकरेंनाच असते याची खात्री मराठी माणसाला आहे, त्यामुळे मराठी माणूस त्याचे प्रश्न हक्काने सत्ता नसली तरी सत्ताधार्यांना हलवू शकणाऱ्या, त्यांना कृती करायला भाग पाडणाऱ्या राजसाहेबांकडेच घेऊन येतात. #राजठाकरे #RajThackeray #मराठी #MNSAdhikrut #MNVSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत14,587 views • 9 days ago

“विद्यार्थ्यांना तुम्ही हात तर लावून दाखवा, आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. त्या सर्व विद्यार्थ्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. तरुण रक्त चिघळले आहे त्यामुळे ते सरकारला जाब विचारत आहे.” श्री. अमित राजाहेब ठाकरे नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut - मनसे अधिकृत56,483 views • 1 month ago

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणी विद्यार्थ्यांनी आज, २५ ऑगस्ट २०२६ रोजी, शिवतीर्थ येथे मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राजसाहेबांना दिले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेत राज ठाकरे हे या विषयावर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले. #RajThackeray #MPSC #Students #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत15,116 views • 10 days ago

नागपुरातील NEET पेपरफुटीच्या दुर्दैवी घटनेनंतर नैराश्यातून जीव गमावलेल्या आकांक्षा चतुर्वेदी यांच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप कुटुंबीयांपर्यंत पोहोचलेली नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. “राजकारण बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या नात्याने या पीडित कुटुंबाची तातडीने भेट घ्यावी,” अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली. या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. #NEETPaperLeak #Nagpur #AmitThackeray #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत11,031 views • 9 days ago

महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेसमोर महिलांना नाचवलं जात आहे. अशा प्रकारचं राजकारण आपण यापूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाहिलं आहे. महिलांना नाचवून लोकांना गोळा करणं किंवा त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहणं, ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. आपण महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचा पायंडा पाडत आहोत का? याच विषयावर काही दिवसांपूर्वी मा. राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं भाष्य. #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत34,569 views • 1 month ago