Loading video...

Video Failed to Load

Go Home

दोन महिन्यांपूर्वी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील मिसिंग लिंकचं उद्घाटन थाटात पार पडलं, पण आता मिसिंग लिंकवर पडले खड्डे

174,878 views • 1 month ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे बदनामी नाही! हजारो कोटींचा प्रकल्प फक्त दोन महिन्यात त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना भाडे के टटू म्हणतात हे निषेधार्ह आहे! माझी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्राची बदनामी नेमकी कोण करत आहे, याचा विचार करायला हवा! मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न विचारणारे, खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणारे लोक महाराष्ट्राची बदनामी करत नाहीत. उलट, हजारो कोटींचे प्रकल्प उभे करून काही महिन्यांतच त्यात दोष निर्माण होणे, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे आणि जनतेचा पैसा खड्ड्यात जाणे ही महाराष्ट्राची बदनामी आहे! लोकशाहीत जनतेच्या पैशातून उभे राहणाऱ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता अपेक्षित असणे,सरकारला जबाबदारी घ्यायल्या सांगणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जर काम दर्जेदार असेल, तर टीकेला उत्तर तथ्यांनी द्यावे. पण प्रश्न विचारणाऱ्यांना बदनाम करणे, त्यांच्यावर आरोप करणे आणि टीकाकारांना भाड्याची लोक म्हणणे ही लोकशाहीला न शोभणारी भूमिका आहे. महाराष्ट्राची बदनामी टीका करणाऱ्यांमुळे होत नाही, तर अपूर्ण नियोजन, निकृष्ट कामे, अपघात, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि उत्तरदायित्व टाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे, कंत्राटदारांमुळे होते. प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापेक्षा, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या. कारण महाराष्ट्राची प्रतिष्ठा घोषणांनी नाही, तर चांगल्या कारभाराने टिकते!

Prof. Varsha Eknath Gaikwad

45,031 views • 1 month ago

मुंबई - पुणे महामार्गावर वाहतूक का बंद आहे.. या संदर्भात विशिष्ट इकोसिस्टम कडून एक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न चालू आहे की, सरकारने या संदर्भात काहीच काळजी घेतली नाही. त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे.. काल संध्याकाळी ५ वाजताच्या आसपास मुंबई पुणे महामार्गावर टँकर पलटी झाला. टँकर उलटताच त्यातून वायूगळती सुरू झाली. परिस्थितीची गंभीरता ओळखून महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील सुमारे ४० जणांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्या टँकरमध्ये प्रॉपेलिन हे अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक रसायन असल्याचे लक्षात येताच संपूर्ण यंत्रणा अधिक सतर्क झाली. अशा परिस्थितीत अगदी छोटासा स्पार्कसुद्धा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकत होता. त्यामुळे कोणतीही घाई न करता तज्ज्ञांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार अतिशय संवेदनशील असून काळजीपूर्वक हाताळणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं. लगेचच राज्य सरकारला याची माहिती देण्यात आली. राज्य सरकारने त्वरित पावलं उचलत बीपीसीएल आणि एनडी आर एफ ला घटनास्थळी पाचारण करण्यात आला. आज पहाटे सुमारे ४.३० वाजल्यापासून एनडीआरएफ आणि बीपीसीएलच्या तज्ज्ञ पथकांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आतापर्यंत टँकरवरील दोन व्हॉल्व्ह बंद करण्यात यश आलं आहे. मात्र, एका ठिकाणाहून अजूनही गळती सुरू आहे. त्यामुळे रिकामे टँकर घटनास्थळी आणून त्यामध्ये हे रसायन सुरक्षितपणे हस्तांतरित करण्याचं काम सुरू आहे. एक टँकर भरून झाल्यानंतर आता दुसऱ्या टँकरमध्ये प्रॉपेलिन हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रॉपेलिनसारखं अतिशय घातक रसायन वाहून नेणारा टँकर अपघातग्रस्त होण्याची ही पहिलीच घटना आहे. जर वाहतूक बंद केली नसती, छोटीशी निष्काळजी मोठं नुकसान केली असती. म्हणून या महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. काही माध्यमांनी प्रवाश्यांची गैरसोय असा कोल्हेकुई चालू केली आहे. त्यांना घटनेची गांभीर्य माहिती असेल किंव्हा नसेल पण, आपली बातमी कशी ब्रेक होईल याची काळजी होती. घटना फक्त टँकर पलटी झालेली नाहीतर अत्यंत ज्वलनशील वायू गळती सुरू होती. फक्त काडीपेटी सुद्धा कोणी टाकली असती तर मोठा विध्वंस झाला असता. त्याच्यावर पर्यायी उपाय म्हणून, पुणे - मुंबई मिसिंग लिंक हा पर्याय येत्या काही महिन्यात जनतेसाठी खुला होणारच आहे. पण, एखाद्या संकटात आपली पोळी कशी भाजून घेयची हे काही मंडळी करत आहेत. असो.. या घटनेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, तसेच घडल्यास आणखी कोणती काळजी घेतली पाहिजे? या संदर्भात शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी एम एस आर डीसी ला दिले आहेत. प्रवाश्यांची गैरसोय झाली यात कोणतीही शंका नाहीच.. दुर्घटना घडल्यावर बऱ्याच मोठया प्रमाणात वाहनांची रांग लागली होती. यात पोलीस प्रशासन आणि सरकारकडून प्रवाशांना आवश्यक ती मदत देण्यात आली. या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते सर्वानी शेअर करावे..

Prakash Gade

25,472 views • 6 months ago

आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स्टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही चूक नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच. १) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या काही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. २) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत. ३) राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्याला राजकारण म्हणलं असतं तर कोणी ? ४) २००५ ला मुंबईत प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ? ५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.

Raj Thackeray

75,170 views • 1 month ago

आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते. - गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार! - मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट. - अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली. - भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत. - तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून? - सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. - जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल. सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का? - वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार. - आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल. - एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे. - देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? - काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली? - तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे. - मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत. - माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू. - हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते. - ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा. - माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा. - ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते. - जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो. - 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.

Raj Thackeray

75,907 views • 7 months ago

वरळीतलं प्रकरण हिट अँड रन नाही तर हत्याच... वरळीत नवरा बायको प्रवास करत असताना मागून एक बीएमडब्ल्यु कार बाईकला धडक देते.. नवरा बायको गाडीच्या बोनेटवर पडतात. नवरा लगेच स्वतःला बाजुला होतो आणि बायकोलाही आपल्याकडे खेचणार तेवढ्यात बीएमडब्ल्यु वाला निर्दयीपण अपघातानंतरही जिवंत असलेल्या महिलेच्या अंगावरुन गाडी नेतो. महिलेची साडी गाडीच्या टायरमध्ये अडकते. या महिलेचा नवरा आरोपीला रडवेल्या चेहऱ्याने थांब थांब म्हणतो तरी आरोपी गाडी पुढे नेत २ ते अडीच किलोमीटरपर्यंत त्या महिलेला रस्त्यावरुन फरफटत नेतो. गाडी पुढे नेत असताना गाडीसोबत फरफटत जाणाऱ्या महिलेला किती वेदना होत असतील याचा विचार सुद्धा आरोपी मिहीर शहाच्या डोक्यात येत नाही. इतक्या क्रुरपण तो गाडी पुढे नेत राहतो. आपल्या अब्रुची सर्वाधिक पर्वा करणाऱ्या या पत्नीच्या, दोन मुलांच्या आईचा जीव जातो आणि बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेल्यामुळे अंगावरचा कपडा सुद्धा शिल्लक राहत नाही. पण सगळे कपडे निघुन गेल्यावर सुद्धा आरोपी फरफट सुरुच ठेवतो. आणि हे सगळं हतबलपणे तिचा नवरा बघतो त्याची बायको मरेपर्यंत.. पुण्यातल्या पोर्शे अपघाताप्रमाणेच मुंबई अपघातातला आरोपी मिहीर शहा सुद्धा या अपघातापुर्वी बारमध्ये गेला होता. जवळपास १८ हजारांचं बिल दिल्यानंतर तो निघाला. गाडी बदलली. आणि त्यानंतर कावेरी नाखवांचा जीव घेऊन एक कुटुंब उध्वस्त केलं. आरोपी थांबला असता तर ही महिला आपल्या कुटुंबासोबत आज सुखरूप असती. पण मिहिरने फरफटत नेऊन तिचा जीव घेतला. मग हा अपघात कसा? ही तर हत्या झाली. पण मुंबई पोलिसाना तपासाबद्दल विचारल्यावर या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे का नाहीयेत. ? १. या अपघातातला पीडित आणि ज्याने डोळ्यासमोर आपली बायको गमावली तो माणूस स्वतः सांगतोय की मिहीर शाहाच गाडी चालवत होता तरी पोलिस यावर काही का बोलत नाहीयेत. २. पोलिसांनी त्यावेळी गाड़ीत उपस्थित असलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. पण ड्रायव्हरने गाडी कोण चालवत होतं याबाबत काय जबाब दिला याबद्दल पोलिस का सांगत नाहीयेत. ? 3. पुणे पॉर्शे प्रकरणासारखं इथे सुद्धा प्रकरणत ड्रायव्हरवर ढकलण्याचा प्रयत्न होतोय का? 4. बारमधून आरोपी मिहीर शाह बाहेर पडताना, आणि ड्रायव्हर ड्रायव्हींग सीटवर बसनाचंच फुटेज पोलिसांनी कसं बाहेर येऊ दिलं. ते आरोपीच्या सोयीसाठी का? 5. ज्या भागात अपघात झाला तिथलं सीसीटीव्ही फुटेज जर बाहेर आलं तर त्यात स्पष्टपणे कळेल की गाडी कोण चालवत होतं. म्हणून हे फुटेज बाहेर येऊ दिलं जात नाहीये का ? 6. अपघातानंतर कावेरी नाखवांना आरोपीच्या गाडीने फरफटत नेलं, त्यामुळे मृत महिलेच्या अंगावर एक कपडा सुद्धा राहीला नाही. पण पोलिस फरफटत नेण्यासंदर्भात कुठलीही ठोस माहीती देत नाहीये. ७. गाडीने फरफटत नेतानाच्या मार्गावर अनेक सीसीटीव्ही आहेत. मग पोलिसांना याची शहानिशा करण्यासाठी ईतका वेळ का लागतोय? 8. पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली, गाडी मिळाली. मग आरोपी मिहीर शहा नेमका कसा फरार झाला.? 9. यावेळी जर गाडी ड्रायव्हर चालवत होता तर ड्रायव्हर फरार झाला असता. पण इथे नेमकं उलटं होतंय. ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि मिहीर गाडी चालवतच नसेल तर तो का फरार झाला. या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडे नाहीयेत कारण मरणारी व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी सामान्य होती. आरोपीच्या गाडीपेक्षाही कमी किंमत तुमच्या आमच्या जगण्याची जिवाची आहे. आता बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, पॉर्शे अश्या महागड्या कार विकतानाच मालकांना एक खुन माफ करावा तसं एक दोघांना चिरडलं तरी खून माफ करावे. किंवा लोकांचे जीव घेण्याचं परमिट द्याव. - Saurabh Koratkar

Saurabh Koratkar

61,104 views • 2 years ago

हैदराबाद निजाम सरकारने तत्कालीन मुंबई प्रांतिक सरकारला नोव्हेंबर 1956 मध्येच सर्व रेकॉर्ड ऑफिशिअली दिल्याच्या नोंदी आहेत. काखेत कळसा आणि गावाला वळसा ! पाच निवृत्त न्यायाधीशांची कमिटी पाठवली तरी हैदराबादमध्ये काय मिळणार ? इथे रेकॉर्ड पोचल्याच्या दोन्ही सरकारने नोटिफिकेशन सुद्धा काढल्या होत्या. मग गरीब शेतकऱ्यांचे रेकॉर्ड गेले कुठे ? आज रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर त्या परिस्थितीला किती मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री जबाबदार ? विश्वास पाटील . याबाबतीतले माझे नम्र निवेदन माझ्या यूट्यूब चैनल वर या संकेतस्थळावर आपण मुद्दाम ऐका. तत्कालीन हैदराबादच्या चीफ सेक्रेटरीनी आपल्या अखत्यारीतील सर्व District Collectors ना निजामाच्या हद्दीतील मराठवाड्याचे रेकॉर्ड तात्काळ मुंबई सरकारकडे व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे सर्क्युलर ऑक्टोबर 1956 मध्ये काढले होते. त्यानुसार एक नोव्हेंबर 1956 च्या दरम्यानच सर्व रिव्ह्यून्यू, ट्रेझरी, पोलीस आणि त्यानंतर काही महिन्यात न्यायालयीन रेकॉर्ड मुंबई सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते. तशी नोटिफिकेशन्स हैदराबाद आणि मुंबई सरकार या दोघांनीही काढली होती. तर ते रेकॉर्ड गेले कुठे ? गेली दोन वर्ष आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. भारत सरकारच्या स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 च्या सेक्शन 76 तसेच 77 व इतर संबंधित कलमानुसार नवीन राज्य किंवा त्याची पुनर्रचना झाली झाल्यावर तात्काळ संबंधित रेकॉर्ड ज्या त्या सरकारकडे देण्याचे आदेश पारित झाले होते. त्यानुसार किती तारखेपर्यंत कुठले रेकॉर्ड हस्तांतर झालेच पाहिजे अशा “डेडलाईन” सुद्धा ठरवणारे आदेश काढले गेले होते. त्यानुसार महसूल व जमाबंदी दप्तर हे डिसेंबर 1956, ट्रेझरी लेजर्स 31 डिसेंबर 1956 आणि हैदराबादच्या सचिवालयातील संबंधित सर्व सेक्रेटरीएट फाईल ह्या फेब्रुवारी 1957 पर्यंत द्यावयाच्या डेडलाईन्स ठरवून गेल्या दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार संबंधित हस्तांतरण त्यावेळीच्या उत्तम प्रशासकीय यंत्रणेने विनाविलंब पार पाडले होते. मग मग ते दिलेले सर्व रेकॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी कोणाची ? कायद्याच्या भाषेत हू इज कस्टस्टोडीयन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स ? 18 91 मध्ये “इम्पेरियल रेकॉर्डस कीपर” नावाची पोस्ट निर्माण झाली होती. आता भारत सरकारने 1993 मध्ये पब्लिक रेकॉर्डस Act निर्माण केला आहे. कायद्यानुसार महसुली रेकॉर्डसाठी डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि त्या विभागाचे जे प्रमुख असतात ते कस्टोडियन ऑफ गव्हर्मेंट रेकॉर्ड असतात. त्यानुसार एक नोव्हेंबर 1956 च्या दरम्यान औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बिदर लातूर, नळदुर्ग ह्या सीमेवरील जिल्ह्यांचे हस्तांतरण तीन राज्यांमध्ये विधिवतरीत्या पार पाडले गेले आहे. जेव्हा एखादे नवीन राज्य किंवा देश निर्माण होतो. तेव्हा सैन्य किंवा सुरक्षा घुसवण्याच्या आधीही त्या प्रांतातले जमिनींचे नकाशे आणि मालकी हक्कपत्रक ही सर्व रेकॉर्ड्स महत्वाची असतात. हा बाळबोध नियम आमच्या प्रशासकांना माहित नाही का ? तसेच मौर्य काळापासून संबंधित कास्तकार किंवा शेतकरी याच्या मालकीचे कोणते क्षेत्र आहे अशा कागदपत्रांच्या दुय्यम सत्यप्रती राजाने आपल्या दप्तरांमध्ये सांभाळून ठेवायच्या असतात. तशीच कागदपत्रे ब्रिटिश आणि निजामाच्या किंवा तेव्हाच्या मुंबई राज्यांमध्ये सुद्धा सांभाळली गेली होती. समजा गाव पातळीवरचे तलाठ्याचे दप्तर हरवले, शेतकऱ्याकडचे जरी हरवले तरी राजाकडे म्हणजे सरकारकडे त्याच्या दुहेरी प्रती ठेवणे बंधनकारक असते. त्यानुसार व्हिलेज रेकॉर्डच्या नोंदी, त्यामध्ये काही जिल्हा पत्रके तसेच मुख्य तहशील पत्रके ही सांभाळली जात. त्यानुसार निजाम सरकारने तत्कालीन मुंबई सरकारला प्रत्येक जिल्ह्यातील कोणती पत्रके हस्तांतरित केली होती ? 1 खसरा पत्रक __ज्यामध्ये त्या तालुक्यातील प्रत्येक सर्वे नंबर, खातेदाराचे नाव, फसल अशी पूर्ण माहिती असायची 2 खतौनि पत्रक. ज्याची आजच्या सात बाऱ्याशी तुलना करता येईल. हू इज ओनर अँड हू इस कल्टीवेटर ? 3. जमाबंदी तथा सालाना पत्रक. ज्यामध्ये लगान , मागणी आणि बकाया म्हणजे राहिलेली बाकी याच्या नोंदी असतात. 4. लाल किताब. दिल्लीच्या मुघल प्रशासनापासून ते हैदराबादच्या निजामापर्यंत सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. ते तांबड्या वेस्टर्नमध्ये बांधले जायचे. एक प्रकारे हे गाव पातळीवरचे गॅझेट होते. त्याच्यामध्ये गाव, गावातील माणसे, तळी, पाण्याची साधने, वसूल, जहागिरीचे क्षेत्र सर्व काही असायचे. हे दरवर्षी तलाठ्याकडून प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाऊन त्याचे अवलोकन होऊन पुन्हा गावात परत यायचे. प्रत्येक गावात हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. 5 शजरा ( खेतो का नक्शा) प्रत्येक शेतकऱ्याच्या शेती क्षेत्राचा सरकारमार्फत नकाशा काढला असायचा. त्यासाठी नक्शाणवीस नावाचे खास अधिकारी नेमलेले असायचे. हे पत्रक सुद्धा प्रत्येक गावात होते. 6 माल वसुली रजिस्टर, डिमांड अँड कलेक्शन 7 तहसील दप्तरी रजिस्टर 8 इक्रारनामा आणि सनद रजिस्टर. ज्यामध्ये गावातील इनामे जहागीर तसेच व पुढच्या वफ जमिनीच्या नोंदी असत. अशी सर्व रजिस्टर्स ही जा त्या िल्हाधिकार्‍याकडे निजाम सरकारने सुपूर्त केली होती. ती सुपूर्त करताना स्पष्टपणे “हँड ओव्हर लिस्ट” म्हणजे हस्तांतरणाची यादी सुद्धा तयार केली गेली होती. हे सर्व रजिस्टर्स आज तालुका दप्तर मध्ये किंवा डिस्टिक कलेक्टर दप्तरमध्ये मिळत नसतील तर त्याबाबत गरीब शेतकऱ्यांचा काय दोष ? लोकांकडे जे डॉक्युमेंट्स असतील ते तपासण्यासाठी जर कायदेशीररित्या पर्यायी दप्तर जे पर्मनंट रेकॉर्ड म्हणून कस्टोस्डियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्डने मेंटेन करायला हवे, ते नसेल तर त्यात लोकांचा काय दोष. ? मी चांद्यापासून ते बांधापर्यंतच्या सर्व ब्रिटिश गॅजेटीयारअसचा अभ्यास गेली दोन वर्ष करतो आहे. दिल्लीचे पार्लमेंट लायब्ररी रेकॉर्ड, जनगणना कार्यालय, हैदराबादचे तीन नाक्यावरचे कार्यालय व इतर कार्यालय सारी धुंडाळून झाली आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मराठा हे कुणबी होते असे ब्रिटिशांची गॅझेट सुद्धा सांगत नाहीत. मात्र शेती करणारा बहुतांशी 85% मराठा वर्ग हा कुणबी होता हे या रेकॉर्डवरून आढळून येते. तशा अनेक ठिकाणी नोंदी आहेत. निजामाच्या पिरेड मध्ये सुद्धा कोर्टात, हायकोर्टात केसेस जाऊन तसे डिसिजनही झालेले आहेत. आता तत्कालीन जिल्ह्यांचा वानगी दाखल विचार करायचा तर तेव्हाचा रत्नागिरी जिल्हा व सावंतवाडी संस्थान यांची 1881 ची जनगणना लक्षात घेता एकूण संख्या 9 लाख 41 हजार 49 होती. पैकी दोन लाख तीन हजार चारशे सहा हे मराठा होते. तर दोन लाख 84 हजार 267 हे कुणबी होते. जिल्ह्यात धनगर अठरा हजार पाचशे पाच, ब्राह्मण 66 हजार ०४६ महार समाज 85 हजार 513 तर भटक्यांची संख्या 6553 होती. ठाणे आणि मुंबई मध्ये कुणब्यांची संख्या अधिक आहे. तर सोलापूर मध्ये मराठा एक लाख ऐंशी हजार आणि मराठा कुणबी एक लाख 78 हजार 938, माळी 23898 वंजारी 3508 धनगर 57 04 ब्राह्मण 26979 महार समाज 44001 तर मातंग 1923 अशी संख्या आहे. साधारणता माझ्या माहितीप्रमाणे 1985/ 86 पर्यंत महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही सर्व रेकॉर्ड्स उपलब्ध होती. त्याचे महत्व न जाणता रेकॉर्डरुम कोणाच्या आदेशाने आणि कुणी खाली केल्या ? हे अविवेकी आदेश कोणी दिले. गेल्या पंचवीस तीस वर्षात ज्यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून कामे केली त्यांना त्याची उत्तरे द्यावे लागतील. तरच मग महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य वगैरे मैदानातली भाषा शोभून दिसेल. सद्यस्थितीत आता जे रेकॉर्ड आहे त्यातून संबंधित शेतकरी वर्गाला कसा फायदा देता येईल, याचाही विचार व्हावा. माझ्या आजोबांचे आणि पंजोबांच्या नावे मोडीमध्ये कुणबी नावाची नोंद आहे. पण मला इथल्या जटील प्रशासकीय व्यवस्थेने तेव्हा तो दाखला मिळू दिला नाही. आज खानदानाच्या नावाने जे मोठ्या मोठ्या थापा मारतात त्यांचेही रेकॉर्ड माझ्याकडे आहे. संपूर्ण मराठा समाज जरी कुणबी ठरत नसला तरी ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याकडे तरी संशयाने पाहू नका. ब्रिटिशांनी दिलेल्या वर्गवारीनुसार साधारण प्रत्येक तालुक्यात कुठल्या समाजाचे किती लोक होते याची आकडेवारी आहे. त्या सरासरीचा विचार करून लोकांना काही फायदे देता येतील. जे ब्रिटिश रिकॉर्ड पहिले प्लॅनिंग कमिशन आणि शेड्युल्ड कास्ट कमिशन वगैरे रचताना आधारभूत ठरवले गेले होते. ते रेकॉर्ड पूर्णता या प्रश्नावर नाकारण्यात काय अर्थ आहे ? या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हावा आणि उनापावसामध्ये, शेतामध्ये राबणाऱ्या लोकांना न्याय मिळावा आणि तो सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळावं. आपली लोकशाही, प्रत्येक राजकीय पक्षाची लोकशाही ही आज “स्वकुटुंबकल्याणशाही” झालेली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळेच सार्वजनिक हिताच्या गोष्टींकडे सर्वांनीच ध्यान द्यायला हवे. नेत्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अविवेकामुळे लोकांचे हाल होऊ नयेत असेच मला वाटते. विश्वास पाटील #vishwaspatil #author #HistoricalTruth #MissingRecords #FarmersRights #LandOwnership #RevenueRecords #HyderabadNizam #hyderabad #StateReorganization1956 #PublicRecords #CustodianOfRecords #Maratha #AccountabilityInGovernance #LostDocuments

Vishwas patil

16,535 views • 1 year ago

वणी विधानसभेचे उमेदवार श्री. राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ आज वणी येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सगळे पक्ष त्या त्या मतदारसंघात कोणत्या जातीच प्राबल्य आहे हे बघून उमेदवाऱ्या देत आहेत. मला जातीतलं काही समजत नाही. आजारी झाल्यावर डॉक्टरची जात पाहून जाता का ? का तो आजार बरा करू शकेल का हे बघता ? मग आमदार निवडून देताना जात बघून का देता ? म्हणून म्हणतो राजू उंबरकरसारखे चांगले उमेदवार निवडून द्या जो तुमच्यासाठी झटेल. २) विदर्भ, मराठवाड्यातले आमदार निवडून इथून येतात आणि त्यांची मुलंबाळं, कुटुंब मुंबई पुण्याकडे असतात. आपला प्रदेश तसाच भकास ठेवायचा आणि यांनी स्वतः ऐषआरामात रहायचं. इथले आमदार म्हणाले की मी परत निवडून आलो तर माझी हॅट्रिक होईल. तुझ्या हॅट्रीकने काय फरक पडतो. ३) यवतमाळ जिल्ह्याची ओळख कापूस म्हणजेच पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून नाही ओळखला जात तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय;. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा कुटुंबाचं पुढे काय होतं याचं कोणाला काही पडलं नाहीये. निवडणुका येतात तेच खासदार, आमदार निवडून येतात, मात्र परिस्थिती जैसे थे. ४) यवतमाळ जिल्हा पुरेसा सिंचनाखाली का नाही? एकदा तरी आमदारांना/खासदारांना प्रश्न विचारा की तुम्ही नक्की काय केलंत आमच्यासाठी ? ५) सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणी ठरवतात आणि तुम्ही इतक्या महत्वाच्या राजकारणाकडे दुर्लक्ष कस करू शकता? तुमच्या आयुष्यातील ५, ५ वर्ष निघून जातात. आपल्यासमोर आपली मुलं मोठी होतात, आपण म्हणतो की अरे बघता बघता मोठा झाला. तसंच तुमचं पण वय वाढत जातं. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, हाच जन्म खरा आणि या जन्मात तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणली जाते. काय चाललंय ? ६) २०१९ ला तुम्ही ज्यांना मत दिलं ते नक्की कुठे आहे याचा विचार केलात का ? दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष ज्यांच्यातून विस्तव जात नसे ते पक्ष एकत्र आले आणि सत्तेत बसले. लोकांनी मतदान शिवसेना-भाजपला, काँग्रेस-राष्ट्रवादीला केल आणि इकडचा गट तिकडे गेला, तिकडचा गट इकडे आला. वाट्टेल तशा युत्या, आघाड्या झाल्या. आणि यांत काय घडलं तर बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली. वैचारिक व्यभिचार किती करायचा? अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले, पुढे वर्षभरात अजित पवारच शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले. यातून तुमच्या मताची लायकी काय आहे ते कळलं का ? ७) महाराष्ट्र जातीपातीत विभागला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत ? स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि इतकं असताना पण हे राजकीय पक्ष येतील, तोंडावर पैसे फेकून मारतील, आणि त्यांना खात्री आहे की तुम्हाला कसंही वागवलं तरी तुम्ही त्यांना परत निवडून देणार . हा त्या लोकांचा समज तुम्ही मोडून काढणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही. ८) रेल्वे भरती महाराष्ट्रात पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्रात यायच्या नाहीत, शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झटका दिला आणि महाराष्ट्रात जाहिराती यायला लागल्या. ९) मशिदींवरचे भोंगे आम्ही बंद केले, सरकारने जर थोडं सहकार्य केलं असतं तर कायमचे भोंगे बंद केले असते. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं म्हणून माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला खुश करायला उद्धव ठाकरेंनी केसेस टाकल्या. १०) जी कामं सरकारने करायची ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहेत. त्यामुळे एकदा माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता एकदा देऊन तर बघा. ११) गेली ५ वर्ष जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुमचा अपमान केला आहे. येणारी निवडणूक हा तुमच्या अपमानाचा बदला घेण्याची निवडणूक आहे. मी तुम्हाला हमी देतो की राजू उंबरकर हा वणीत राहील, इथल्या लोकांच्यासोबत कायम राहील. माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

34,724 views • 1 year ago

आज मुंबईतील "शिवतीर्थ" या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं या भाषणातील महत्वाचे मुद्दे - १) गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया.. २) गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यांच्याबद्दल मला बोललंच पाहिजे. पहिला विषय कुंभमेळा. बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं मी पिणार नाही सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशातील नद्यांची जी अवस्था आहे जिला आपण माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं काय लक्ष आहे त्यावर मी बोललो. स्व. राजीव गांधींनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं, पुढे २०१४ ला मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी पण गंगा साफ करण्याचा प्रकल्प हाती घेतला. कुंभमेळ्यानंतर ज्यांनी तिकडे जाऊन स्नान केलं त्यातले लाखो लोक आजारी पडले. प्रश्न कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये तर गंगा स्वच्छतेचा आहे. ज्यागंगेला आपण माता म्हणतो तिची आजची परिस्थिती काय आहे हे दाखवणारी एक चित्रफीत मी आणली आहे... गंगा शुद्धीकरणावर ३३ हजार कोटी खर्च झालेत. तिकडे घाटावर मृत व्यक्तीला अग्नी दिल्यासारखं करतात आणि नंतर पाण्यात ढकलतात. हा कोणता धर्म ? आपल्या नैसर्गिक गोष्टींच्या आड जर धर्म येणार असेल तर काय उपयोग ? हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता तीच परिस्थिती कशी चालेल ? आपण निसर्गासाठी काही सुधारणा करणार आहोत की नाही ? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करतोय. प्रत्येकाला धर्म प्रिय असतो पण त्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजेत. ३) महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे. सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे प्रदूषित आहेत. ४) प्रदूषणाच्या मानकांनुसार (स्टँडर्ड्स नुसार ) उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडा, घोड, तितुर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर आणि ढोरणा या नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अति वाईट आहे. भातसा, पेढी, मोर, बुराई, वेल,पांझरा, सिना, काळू, वेण्णा, कोयना, मांजरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी व कान या नद्यांच्या पात्रांचे पाणी वाईट या कॅटेगरीत म्हणजे तुलनेने कमी वाईट आहे. ५) मुंबईत ५ नद्या होत्या. त्यातल्या चार मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या यांनी मारल्या. मिठी नदी पण मरायला टेकली आहे. मुंबईतील एकमेव राहिलेली नदी मिठी तिची काय अवस्था आहे ते बघा... दरवर्षी मुंबई महापालिका मिठी नदी साफ करणार असं म्हणते, जोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला असलेली घरं हटवत नाही, तोपर्यंत मिठी नदी स्वच्छ होणार नाही. निसर्गाच्या हानीबद्दल कोणी बोललं की आपण म्हणणार धर्माच्या आड येतो. धर्माचं मला सांगूच नका. आपण भिंतीवर झाडं जगवा झाडं लावा असे संदेश लावतो. आणि देशातील हिंदूंचे अंतिम संस्कार लाकडांवर होतात. लाकडं कुठून येतात, जंगलं तोडूनच ना ? विद्युतदाहिन्या आल्या आहेत पण तरीही अनेक लोकं विद्युतदाहिनी नाकारतात. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. आत्ता ते मध्ये अंबानींच्या वंताराला गेले. म्हणजे त्यांना प्राण्यांची आवड आहे. मग जंगलं त्यांनी वाचवली पाहिजेत. ६) भारताचा जन्म-मृत्यूचा आकडा हा दररोज ८१ हजार ७४६ जन्म होतात दररोज २९ हजार ६७९ मृत्यू होतात. दररोज पन्नास हजाराने लोकसंख्या वाढत आहे ७) महिन्याला २४ लाख ५२ हजार ३८० जन्म होतात महिन्याला ८ लाख नव्वद हजार ३७० मृत्यू होतात महिन्याला १५ लाख लोकांची वाढ होते. ८) वर्षाला २ कोटी ९४ लाख २८ हजार ५६० जन्म होतात, वर्षाला १ कोटी ६ लाख ८४ हजार ४४० मृत्यू होतात म्हणून दर वर्षी १ कोटी ८० लाखाने लोकसंख्या वाढते. एका बाजूला आपण दुष्काळाने त्रस्त आहोत म्हणून बोंबलत बसायचं आणि दुसरीकडे जंगलं तोडायची. ९) आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे. १०) छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती ? शहाजी राजे पण आधी आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता ? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती ? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय ? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं. मिर्जाराजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला तेही हिंदू होते ना ? औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही. ११) औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. १२) मरहट्ट्यानी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते... शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला... माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात. १३) महाराष्ट्रात एअरपोर्ट असेल की बंदर असेल सगळं अदानीला देणं सुरु आहे. अदानी हुशार आहे आणि आपण अडाणी निघालो. १४) लाडकी बहीण योजनेचं काय चाललं आहे? विधानसभेत चर्चा सुरू आहे कशावर तर औरंजेबावर... तुमच्या प्रश्नावर नाही. १५) आपण ज्यांना मुघल म्हणतो ते तुर्की -मंगोल आहेत. धर्माच्या आधारावर देश नाही उभं करता येत. हे समजलं टर्कीला. केमाल पाशा तिकडे आला. तिकडे इस्लाम आता मवाळ आहे. तिकडे मशिदी आहेत पण रस्त्यावर धर्म दिसत नाही. केमाल पाशानी ओट्टोमन खलिफाचे पद संपुष्टात आणले, जे इस्लामिक जगताचे धार्मिक नेतृत्व मानले जात होते. १६) तुर्कीच्या राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. इस्लामला राज्य धर्माचा असलेला दर्जा काढून टाकला. सध्याच्या टर्कीच्या अध्यक्षांनी पण मवाळ धर्म स्वीकारला. आज टर्कीला पर्यटनासाठी ५ कोटी लोक भेट देतात. विचार करा किती सुंदर देश बनवला असेल. १७) आम्ही मशिदींवरचे लाऊडस्पिकर बंद करा म्हणून आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की रात्री १० ते सकाळी ६ लाऊड स्पीकर लावता येणार नाही. अहो प्रश्न सकाळी ६ ते १० चा नाहीच, दिवसभर भोंगे वाजतात त्याचं काय ? योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये मात्र मशिदींवरचे भोंगे उखडून टाकले. त्यांना जमतं मग आम्हाला का नाही जमत ? १८) बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. संतोष देशमुखांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी खंडणी आणि पैशाच्या विषयातून मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते ? १९) आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं, का नाही झाली कर्जमाफी ? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही ३० तारखेच्या आत पैसे भरून टाका. २०) लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी ६० हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाहीत. २१) आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे. २२) टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा. २३) ( आज मी माझ्या आजोबांच्या उठ मराठ्या उठ या १९६६ सालातील पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे. तो काळजीपूर्वक ऐका... "आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री अशा मोहमयी अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये, या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनविण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे - गलबला बुद्धी नासते । नाना निश्चय सांगती । ऐकावे कोणकोणाचे । बोलताहे बहुचकी । करंटे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो ।। असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील, तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदानालिस्ती आणि जाहीर सभांतून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मऱ्हाठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्याइतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला, तर सत्ता स्पर्धेच्या, शर्यतीच्या रिंगणात आपापल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्याचे रिकिबीतले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत." प्रबोधनकार ठाकरे । ) २४) तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते... आजच्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या.. २५) आपला एक अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक प्रमोद अरणे हा कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन आजच्या मेळाव्याला चालत आला आहे. अशा सैनिकांमुळे मला ऊर्जा मिळते. #गुढीपाडवामेळावा२०२५

Raj Thackeray

140,098 views • 1 year ago