Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

परदेशी लोकांना समजले , परप्रांतीयांना कधी समजेल ? महाराष्ट्रात #मराठी 😌🧡

11,018 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

8 Yorum

𑘦𑘰𑘪𑘯𑘰 profil fotoğrafı
𑘦𑘰𑘪𑘯𑘰1 yıl önce

भय्या लोकं मठ्ठ झालेत

American Stories Network profil fotoğrafı
American Stories Network2 yıl önce

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

Siddhesh Barve 𑘫𑘱𑘟𑘿𑘠𑘹𑘫 profil fotoğrafı
Siddhesh Barve 𑘫𑘱𑘟𑘿𑘠𑘹𑘫1 yıl önce

त्यांना बेल्ट ने सुधारावे लागेल. त्याशिवाय ते सुधारणार नाही.

राकेश profil fotoğrafı
राकेश1 yıl önce

औरंगजेब च्याऔलादीना त्रास होत मराठी बोलायला

GeoStrat Bharat profil fotoğrafı
GeoStrat Bharat1 yıl önce

150,000 Israelis speak Marathi but 10 DEHATI BIMARUS can’t speak it 🤣🤣🤣🤣

Rahul Futane profil fotoğrafı
Rahul Futane1 yıl önce

Jai Maharshtra

vin yadav profil fotoğrafı
vin yadav1 yıl önce

That's why we say Bimarus to North people cause they are illiterate and arrogant

मराठा🚩ʷᵃʳʳⁱᵒʳˢ࿐ 1🇮🇳 profil fotoğrafı
मराठा🚩ʷᵃʳʳⁱᵒʳˢ࿐ 1🇮🇳1 yıl önce

इथे सुशिक्षित परप्रांतीय मराठीला विरोध करतात अडाणी परप्रांतीयांची अगरबत्ती कुठे लावता.... हा up बिहारीं वर्ग सुधारणार जेव्हा तेथील कायदा व्यवस्था सुधारले....

Benzer Videolar

धक्कादायक! मराठी असल्यामुळे जयपूरमध्ये ऑफिस विकत घेण्यास नकार? एका मराठी उद्योजकाने आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी राजस्थानातील जयपूर येथे एक ऑफिस स्पेस खरेदी करण्याचे ठरवले होते. सर्व बोलणी प्राथमिक टप्प्यात सुरळीत सुरू असताना, जेव्हा समोरील व्यक्तीला खरेदीदार हा महाराष्ट्रातील म्हणजेच 'मराठी' आहे हे समजले, तेव्हा त्यांनी थेट व्यवहार करण्यास नकार दिला. मराठी माणसाने स्वतःच्या हक्कासाठी ओरडायचं की फक्त यातना भोगायच्या? आज आपल्याच राज्यात परप्रांतीयांना राजकारण्यांनी जणू काही आंदणच दिले आहे. त्यांना इथे सर्व सोयी-सुविधा, व्यवसाय आणि मान मिळतो, पण जेव्हा हाच मराठी माणूस देशात इतर राज्यात व्यवसाय करायला जातो, तेव्हा त्याला अशा अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागतो. अजून काय काय पाहायचे बाकी आहे?

मनसे रिपोर्ट | MNS Report

18,401 görüntüleme • 3 ay önce

प्रिय राजसाहेब, तुम्ही होत-नव्हते ते सगळे गमावले... तुम्ही एकेकाळी बालासाहेबांच्या वारशाचे खरे वारसदार म्हणून ओळखले जायचात. तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण आज? तुम्ही राजकीय अप्रासंगिकतेकडे वाटचाल करत आहात. तुम्ही मराठी माणसाच्या भावनांशी खेळता आहात, पण तुमच्या कृतीत सातत्य नाही. निवडणुकांमध्ये तुम्ही कधी भाजपच्या पाठिंब्यावर, कधी विरोधात. हे सर्व पाहून लोक विचारतात: ठाकरे बंधूंवर लोक किंवा कोणीही का विश्वास ठेवत नाही? उद्धवसाहेबांसोबतही तसेच आहे – सत्तेसाठी सोनिया गांधींसोबत हातमिळवणी, शिवसेनेच्या मूळ हिंदुत्वाला सोडून. राजसाहेब, तुम्ही दोघेही बालासाहेबांच्या विचारसरणीपासून दूर गेलात. लोकांना वाटते की तुम्ही सत्तेसाठी काहीही कराल, मग ते वामपंथी असो की मार्क्सिस्ट. राजसाहेब, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी विचार करा. मराठी माणूस आजही तुमच्याकडे आशेने पाहतो, पण तुमच्या या बदलामुळे निराश होतो. कृपया, तुमच्या मूळ विचारधारेकडे परत या. बालासाहेबांच्या हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या लढाईला नवे जीवन द्या. अन्यथा, इतिहास तुम्हाला विसरेल. तुमचा एक सामान्य मराठी माणूस, #Maharashtra #RajThackeray #MNS #ThackerayBrothers #BMCElection2026 #BMCElections2026 #BMCElections

KailashGWagh 🇮🇳

28,034 görüntüleme • 8 ay önce

महाराष्ट्रात कुठल्याही आकाराचा उद्योग असू दे छोटा, मोठा किंवा अतिमोठा त्यात ८०% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळालाच पाहिजे असा कायदा महाराष्ट्र सरकारने २००८ लाच काढला आहे. अर्थात हा कायदा तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूमिपुत्रांसाठी जे तीव्र आंदोलन केलं होतं त्या आंदोलनांच्या नंतर जनमताचा रेटा पाहून केला होता. पण पुढे नेहमीप्रमाणे जा कायदा कागदावरच राहिला आहे आणि मराठी मुला-मुलींना नोकरीच्या संधी नाकारल्या जात आहेत. त्यामुळे आपण मराठी मुलामुलींच्या बेरोजगारीबद्दल जर खरंच चिंतेत असाल तर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सरकार कधी करणार ? इतकी वर्ष याची अंमलबजावणी का नाही झाली ? CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Uday Samant या विषयवार तात्काळ कार्यवाहीसाठी आपला आराखडा महाराष्ट्राला कळेल का ? #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,337 görüntüleme • 1 yıl önce

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।

Raj Thackeray

98,502 görüntüleme • 7 ay önce

कदाचित मी आक्षेप घेतल्याने ….देवभाऊ टॅक्सी चे नाव नमो टॅक्सी करण्यात आले…. पण त्यात काय बदलले? नाव “नमो” असो वा “देवभाऊ” आमचा विरोध तत्त्वाला आहे. हयात राजकारण्यांच्या नावाने सार्वजनिक पैशातून योजना राबवणे अयोग्य आहे. आजच नाही, उद्याही नाही. दोन - अमित शाह यांनी नुकतीच अशीच ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू केली आहे. मग देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचा Cold War आहे का? महाराष्ट्र सरकार “भारत टॅक्सी” का आणत नाही, ह्यामागे काय कारण आहे ते फडणवीसांनी आणि दरेकरांनी स्पष्ट करावे. २८ राज्यांनी आणि ८ केद्रशासित प्रदेशांनी वेगवेगळी टॅक्सी सेवा सुरू करून कसे चालेल? भरत टॅक्सी आणा ना महाराष्ट्रात, काय प्रॉब्लम आहे? नका भांडू आपापसात . एक देशी नाव, देशी उद्देश, देशव्यापी नेटवर्क. हे जनतेच्या हिताचे आहे. राजकीय श्रेयापेक्षा जनसेवा मोठी असते, हे सरकारला कधी कळणार? माझा दुसरा आक्षेप असा आहे की, ‘देवदत्त वाहतूक व पर्यटन सहकारी संस्था’च्या बँक खात्यात शून्य रुपये आहेत. या संस्थेने गेल्या २५ वर्षांत एकदाही निवडणूक घेतलेली नाही. संपूर्ण वर्षभरात ज्या संस्थेच्या खात्यात केवळ ₹२४६ ची उलाढाल झाली, अशा एका ‘शेल’ सहकारी संस्थेचं नाव बदलून ‘नमो टॅक्सी’ ठेवल्याने तिची पात्रता बदलत नाही. मुंबई बँकेचे कर्ज जर याच संस्थेला देण्यात येणार असेल, तर आमचे सर्व आक्षेप कायम आहेत. लोकांना नावात नाही, सेवेत बदल हवा आहे.

Mrs Anjali Damania

37,920 görüntüleme • 3 ay önce

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत. २) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. ३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो. ४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही. ५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. ६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे... ७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ? ८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ? ९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू. १०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे. ११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत... १२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ १३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल... १४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे... १५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?

Raj Thackeray

33,719 görüntüleme • 1 yıl önce

आज २४ ऑगस्ट २०२४ रोजी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे... १) दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतील असं वाटतंय. अर्थात आचारसंहिता लागली की निवडणुका लागल्या असं म्हणता येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मी इथे आलो आहे. २) महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी कधी पाहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडीत तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहे. आणि त्यांच्या आपापसातील माऱ्यामाऱ्या खूप होणार आहेत. पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं आहे तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक आहे. ३) लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होतं. त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं. ४) लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका. विधानसभेला मतदार त्यांच्याशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोकं विधानसभेत या सगळ्या पक्षांना योग्य उत्तर देणार हे नक्की. ५) महाराष्ट्रात जातीचं राजकरण हे शरद पवारांनी सुरु केलं. शरद पवारांनी अगदी पुलोदपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं ते आजपर्यंत सुरु आहे आणि पुढे महाराष्ट्रात जातीजातीत विष कालवलं. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने ,ते विष आज खूप खोलवर रुजलं आहे. ६) जातीचं राजकारण चालतंय हे पाहून सगळे पक्षच आता ते करू पाहत आहेत. पण हा विषय फक्त विधानसभा निवडणुकांपर्यंत मर्यादित विषय नाही. एकूणच समाज विस्कटला आहे. लहान मुलांच्या मनात जर जातीची जाणीव निर्माण होत असेल तर हे गंभीर आहे. ७) मी वरळीत मागच्या वेळेस उमेदवार दिला नव्हता पण जे झालं ते झालं. या वेळेस फक्त वरळीतच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहे, मग तो मतदारसंघ कोणाचाही असो. ८) लाडकी बहीण असो की कोणतीही योजना असो लोकांना पैसे मिळणार असतील तर लोकं पैसे घेतील पण म्हणून मतदान करतीलच असं नाही. लोकं हुशार असतात. त्यांना हेतू कळतात. ९) बदलापूरमध्ये जे घडलं ते भीषण आणि दुर्दैवी आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरला. पण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बलात्कार ते हुंडाबळी ते छेडछाड या घटना वर्षागणिक वाढत आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ७००० हुन अधिक बलात्काराच्या घटना घडल्या ज्यांची पोलिसांकडे नोंद झाली. ज्याची नोंद नाही झाली अशी प्रकरणं त्याहून अधिक आहेत. बीड,सांगली येथे ऊसतोड कामगार महिलांची गर्भाशयं काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आणि इतक्या घटना घडून पण कठोर कायदे नाहीत. दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं. त्या निर्घृण प्रकारातील दोषींना फाशी झाली तब्बल १२ वर्षांनी. इतका वेळ लागतोच कसा ? बरं, असं नाहीये महायुती सरकारच्या काळात महिलांवरचे अत्याचार वाढलेत, तर हे अत्याचार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पण घडले होते. पण आज दोघेही एकमेकांवर फक्त दोषारोप करत आहेत, पण या घटनांबद्दल कोणीच गंभीर नाही हे दुर्दैव आहे. १०) जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस लाठीचार्ज झाला. त्यावेळेस कारवाई कोणावर झाली पोलिसांवर? पण पोलिसांना आदेश कोणी दिला ? त्यांची काही जबाबदारी नाही का? ११) मागे एकदा मी लंडनला गेलेलो असताना तिकडे बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळेस पोलिसांनी कारवाई सुरु केली, त्या कारवाईत एक निरपराध माणूस मारला गेला. त्यावेळेस पोलिसांनी माफी मागितली पण त्याचं राजकारण नाही झालं. आपल्याकडे पण पोलिसाना सगळं माहीत असतं, फक्त त्यांना फ्रीहँड देणार आहात का ? मी नेहमी म्हणतो की सत्तेत आलो तर सगळ्यांना सुतासारखं सरळ करेन, म्हणजे कायकरेन? तर, मी सत्तेत आलो तर पोलिसाना कारवाई करण्यास फ्रीहँड देईन. आणि मग बघा कसा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल ते. अहो पोलिसांचे हात बांधायचे आणि त्यांना सांगायचं की कारवाई करा, कसं शक्य आहे? १२) लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका. लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. लोकांना हाताला काम हवं आहे, नुसते पैसे नको आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज नको असते, त्यांना स्वस्त आणि २४ तास वीज हवी असते. आणि अशा योजना राज्याला घातक आहेत. बरं हे सगळं कोणाच्या जीवावर लोकांच्या पैशातूनच करता ना? मला असं वाटतं एक, दोन महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे देतील, पुढे देऊ शकतील असं वाटत नाही कारण राज्याकडे पैसेच नाहीत. १३) आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही २००,२२५ सीट्स नक्की लढवणार आहोत . १४) माझे सहकारी मला अनेकवेळा म्हणतात की जरा खरं बोलणं कमी करा. पण मला वाटत नाही मला जमेल असं, कारण सुधरण्याचं आणि बिघडण्याचं पण एक वय असतं ते निघून गेलं. त्यामुळे मी आयुष्यभर जे खरं आहे तेच बोलणार...

Raj Thackeray

49,064 görüntüleme • 2 yıl önce

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभेचे उमेदवार श्री. अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) गेली अनेक वर्ष विदर्भात फिरतोय. १९८९ ला मी प्रत्यक्ष राजकारणात आलो. १९९३ साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढला होता. १९९२ ला बाबरी मस्जिद पडली, मुंबई आणि इतर ठिकाणी दंगली झाल्या, पुढे १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यावेळेस १९९३ च्या डिसेंबरमध्ये माझा मोर्चा झाला. १९९१ ते १९९३ माझा सगळ्यात जास्त वेळ माझा मराठवाड्यात आणि विदर्भात गेला. यवतमाळला यायचो, अमरावती तर माझं घर आहे. हा प्रदेश मला नवीन नाही, इथली माणसं मला नवीन नाही. २) १९९० ते २०२४ मी इथे येतोय, फक्त वाईट एकच वाटतं की प्रश्न तेच आहेत. प्रश्न बदलले नाहीत. हा जिल्हा पांढऱ्या सोन्याचा म्हणजे कापसाचा जिल्हा. खरंतर हा श्रीमंत जिल्हा हवा होता, पण राज्यकर्त्यांनी इथे योजनाच आणल्या नाहीत. हा जिल्हा ओळखला जातो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा. इतकी सरकारं आली गेली पण तरीही आत्महत्या थांबल्या नाहीत. तीच तीच लोकं निवडून येत आहेत आणि ती माणसं तुमच्यासाठी काहीही करत नाही. याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का ? ३) गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात जे झालं त्यात तुम्ही मतदार म्हणून कुठे आहात ? याचा विचार करताय कधी? आत्महत्या करणाऱ्यांच्या घरी परिस्थिती काय होत असेल याचा विचार करवत नाही. पण ही परिस्थिती ज्यांच्यामुळे येते अशा लोकांना शिक्षा देणार आहात का नाही ? ४) यवतमाळमधून वसंतराव नाईक ११ वर्ष मुख्यमंत्री होते तर सुधाकरराव नाईक अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तरीही हा जिल्हा आत्महत्यांचा जिल्हा ठरत असेल तर काय बोलायचं ? जोपर्यंत तुम्ही भाकरी पलटवत नाही, जोपर्यंत या लोकांना तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. ५) २०१४ ला महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा माझा पक्ष या देशातील एकमेव पक्ष आहे. यातून आमची महाराष्ट्राबद्दलची आस्था दिसून येते. आज महाराष्ट्राला जातीपातीत गुंतवून टाकलं जात आहे. जाती याआधी होत्या, जातीबद्दलच प्रेम या आधी होतं पण आता दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण झाला. आणि हा द्वेष शरदचंद्र पवारांनी पेरला. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या जातीपातीत पडू नका. माझ्या तरुण तरुणींना सक्षम करणं हे माझं स्वप्न आहे, त्याला तुम्ही बळ द्या. ६) पाच वर्षांनी पुन्हा एकदा मतदानाची संधी येत आहे, पाच पाच वर्ष तुमच्या आयुष्यातील जात आहेत आणि म्हणून तुम्हाला मतदानाकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. अशोक मेश्राम यांच्यासारखी व्यक्ती मी तुमच्यासमोर आणलं आहे, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं हे माझं आवाहन आहे. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

32,795 görüntüleme • 1 yıl önce

आज ५ ऑगस्ट २०२४ रोजी 'नवनिर्माण यात्रेच्या' सुरुवातीला मी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे... १) महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या हव्यात यात जातीचा मुद्दा कुठे येतो. आज खाजगीकरण मोठं आहे, आणि खाजगी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आरक्षणाने खरंच शिक्षणातील असो की नोकऱ्यातील असो किती लोकांना फायदा होणार आहे याचा विचार आपण करणार आहोत का ? इथं फक्त माथी भडकवण्याचं काम सुरु आहे, इथे फक्त मतांचं राजकारण सुरु आहे हे प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे आपल्याला यांच्या मतांच्या राजकारणासाठी मूर्ख बनवलं जात आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मुलामुलींना आपल्याकडच्या शिक्षणसंस्थांमध्ये ऍडमिशन्स मिळतात, पुढे त्यांना नोकऱ्या मिळतात. पण आपल्या मुलांना मिळत नाहीत, यावर कोणी बोल्ट नाहीत. जातपात शाळा-कॉलेजच्या पातळीवर पोहचलं. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीपातीत अडकला आहे. २) माध्यमांवर आणि सोशल मीडियावर कशालाही प्रसिद्धी मिळते हे कळलं की वाट्टेल बोललं जातं हे थांबलं पाहिजे... आणि माध्यमांनी सुजाण भूमिका घेऊन ही असली चिखलफेक दाखवणं थांबवलं पाहिजे. ३) महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये असं जर पवारसाहेबांना वाटत असेल तर त्यांनी पण स्वतः त्याला हातभार लावू नये. ४) लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये माझा नरेंद्र मोदींना पाठींबा आहे हे मी स्पष्ट केलं होतं, तेंव्हा मी कधीच विधानसभेचंबोललो नाही. ५) एका पत्रकाराने मला विचारलं होतं की तुम्ही जी ब्ल्यूफिल्म आणली होती.... त्यावर मी त्याला गमतीत म्हणालो की ती आणली असती तर बरं झालं असतं, कारण तुम्ही पाहिली तरी असतीत. पण महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मी आणली, ती राज्याला अर्पण केली पण दुर्दैवाने ती एकाही पत्रकाराने माझी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट वाचली नाही, त्याबद्दल माझ्याशी कधीही चर्चा केली नाही. ६) कोण कुठल्या मतदारसंघात उभं आहे याच्याशी मला देणंघेणं नाही. वरळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असेल. ७) या महाराष्ट्रात इतक्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत, त्या काय होत आहेत तर बाहेरून येणाऱ्या लोकांना सुविधा मिळाव्यात म्हणून... सरकारला अफाट पैसे पायाभूत सुविधांवर खर्च करावे लागतात ते सुद्धा का? तर लोंढ्यांनी शहरांची पार वाट लावून टाकली आहे, मग त्यावर उपाय म्हणून एका मागोमाग एक प्रकल्प उभे करावे लागतात, आणि यांत मग ग्रामीण भागाकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. ८) देशातील सगळ्यात मोठं स्टेडियम उभं करायचं गुजरातमध्ये, ऑलिम्पिक स्पर्धा भरवायच्या आहेत गुजरातमध्ये ... असं कसं चालेल? अर्थसंकल्पात खेळांसाठी तरतूद करताना सगळ्यात जास्त तरतूद गुजरात आणि उत्तरप्रदेशसाठी... असं का ? या देशाच्या पंतप्रधानांना सगळी राज्य समान हवीत ना... उद्या मराठी पंतप्रधान झाला आणि समजा त्यांनी सगळं महाराष्ट्रात सुरु केलं तर मी त्यांना हीच आठवण करून देईन की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात म्हणून ९) माझ्या पक्षाला या विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चित यश मिळेल. माझा पक्ष जन्माला येऊन १८ वर्ष झाली. आणि चढउतार कोणालाच चुकले नाहीत... काँग्रेस पक्ष ४४ खासदारांवर आलाच होता ना... १०) अजून बोलायला मी सुरुवात नाही केली, मी जेंव्हा बोलायला सुरु करेन तेंव्हा बघू कोण कोण बोलतंय. आणि मी सध्या बोलत नाहीये कारण अजून तशी वेळ आलेली नाही, पण जेंव्हा मी बोलेन तेंव्हा ते त्यांच्या लक्षात राहील असं बोलेन. ११) लाडकी बहीण, लाडका भाऊ, करण्यापेक्षा लाडका मतदार योजना सुरु करा... १२) संविधान बदलणार हे भाजपचा अयोध्येचा उमेदवार बोलला, म्हणजे त्यांनीच विरोधकांना नरेटीव्ह दिलं ना? तोपर्यत चर्चाच नव्हती. म्हणजे भाजपनेच नरेटिव्ह दिलं ना १३) मी निवडणुकासांठी सर्व्हे करण्यासाठी एजन्सी घेतली नाही. माझ्या पक्षाचे लोकं दोनदा महाराष्ट्राच्या विधानसभांमध्ये जाऊन आले, तिथे लोकांना भेटून आलेत. त्यांनी त्यांचं म्हणणं माझ्याकडे मांडलं... १४) धारावीतील स्क्वेअर फुटाचा दर काय आहे हे जर तुम्ही बघितलंत तर तुम्हाला कळेल की धारावी पुनर्विकासा भोवती काय राजकारण सुरु आहे.

Raj Thackeray

31,457 görüntüleme • 2 yıl önce

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 görüntüleme • 1 yıl önce