Loading video...

Video Failed to Load

Go Home

पाहावं ते नवलंच..! हॅन्ड ग्लोव्ह्ज घालून जेवतीय श्रुती मराठे.

22,346 views • 8 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

- पालघरच्या वाडा तालुक्यातला गावठाण पाडा - वेळ रात्री २ ते ३ दरम्यानची... एक हात डोक्यावरच्या हंड्यांवर आणि एका कडेवर लेकरु.. काळोखात पायात साधी चप्पल सुद्धा नाही - आपण ज्या वेळी साखरझोपेत असतो त्याच वेळी या बायकांना अंधाऱ्या रात्री लेकरा बाळांसह विहीर गाठावी लागते... कधी कधी रात्री २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्यासाठी ताटकळत उभं राहावं लागतं. -एवढं केल्यानंतर पाणी किती मिळतं तर ते फक्त २ हंडे. ते सुद्धा विहीरीच्या झऱ्यातून तळाशी आलं तर.... नाहीतर नुसता तळ खरवडत राहावं लागतं. पाणी नाही म्हणून गावातल्या लोकांनी आंघोळी करणं सुद्धा सोडलंय. पिण्यापुरता कसंबसं भागतं. - दिवसभर हजारो लिटर पाणी वाया घालून आपण झोपलेलो असताना त्याच वेळी काहींना हंडाभर पाण्यासाठी कसं धडपडावं लागतंय त्याचं हे उदाहरण

Saurabh Koratkar

92,196 views • 1 year ago

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणाला गावातील आरएसएसच्या पंधरा ते वीस गुंडानी गावातून उचलून नेऊन अज्ञात स्थळी अमानुषपने मारहाण केली. अत्यंत क्रूरपने पायावरून, हातांवरून मोटार सायकल घालून हात-पाय मोडले. त्याला जबर मारहाण करून डोळा निकामी केला आणि आरोपी एवढ्यावरच ते थांबले नाही, तर पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून अज्ञातस्थळी फेकून दिले. अत्यंत घृणास्पद आणि चीड आणणारी ही घटना आहे. या पीडित तरुणाला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. आज पीडित तरुण संजय वैरागर यांच्या वडिलांशी मी फोनवर बोललो. यातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची आमची मागणी आहे. लवकरच पीडित कुटुंबियांची मी भेट घेणार आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबियांच्या सोबत उभी आहे, असा विश्वास पीडित कुटुंबियांना दिला.

Prakash Ambedkar

55,528 views • 9 months ago

मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही. जर असे केले तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही. दोन वेळेस मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न मान्य केलेले नाहीत. सुप्रीम कोर्टने त्याविरोधी निर्णय दिले आहेत. मराठा समाजातला एक वर्ग आहे, जो निजामी मराठा आहे. तो रयतेतल्या मराठ्यांना जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. निजामी मराठे हे निजामाबरोबर राहिलेले आहेत. रयतेतले मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत. सोळाव्या शतकातले भांडण आताही चालू आहे. सत्तेत बसलेला निजामी मराठा आहे आणि तो रयतेतल्या मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. हे जेवढ लवकर रयतेतल्या मराठ्याच्या डोक्यात जाईल आणि जोपर्यंत निजामी मराठ्यांकडून तो फारकत घेणार नाही, तोपर्यंत रयतेतल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. रयतेतल्या मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, तो श्रीमंत मराठा नाही, म्हणून देशभरात हमीभाव हा जाहीर केला जातो त्यासंदर्भातील कायदा करावा ही मागणी सुद्धा निजामी मराठा मान्य करत नाही. निजामी मराठ्यांपासून रयतेतल्या मराठ्यांनी फारकत घेतल्याशिवाय त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही. निजामी मराठ्यांच्या हातातली सत्ता रयतेच्या मराठ्यांच्या हातात जाईल या भितीमुळे निजामी मराठा हा रयतेच्या मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाही. आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की त्यांना बदल हवा आहे की नाही?

Prakash Ambedkar

17,005 views • 9 months ago

मराठे हसले, कोणाच्या पोटात दुखले? जरांगेची भूमिका आपल्याला पटते/ नाही पटत हा भाग वेगळा पण गावखेड्यातून मराठ्यांची पोरं आबाळ होत असताना मुंबईत आली. वर्षभर शेतकरी म्हणून हाल अपेष्टा आहेतच. जरांगेनसोबत आल्यानंतर थोडं मुंबईत फिरले, बघितलं, आनंद घेतला तर इतरांच्या पोटात का दुखतंय? ते काय इराण/ पाकिस्तानातून आलेले नाहीत. आपलेच भाऊबंद आहेत. मुंबई त्यांची पण आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आले म्हणून काय त्यांनी सतत रडवेला चेहरा करून माहेरची साडी मधली अल्का कुबल व्हावं का? आव्हानं, संकट, अनिश्चितता पाचवीलाच पूजलीये. त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाहीच.. पण आरक्षणाच्या मागणीसाठी चूल बंद करत पोटाला चिमटा काढत मराठे मुंबईत आलेयत. 2 ठिकाणं फिरले, ठेका धरला, आनंद घेतला आणि शांतपणे आरक्षण मागितलं तर यात चुकीचं काय? बाया बापड्या म्हाताऱ्यानी नुसते मुंबईचे स्वप्न बघितले आहेत.. कधी यायची हिम्मत झाली नाही. जरांगेच्या एका हाकेवर आहे नाही तेव्हड बळ एकवटून हे गोर गरीब मुंबईत अलेयत... आज कुठं थांबणार, कुठं खाणार याचीही खात्री नाही. आयुष्यात डोंगराएव्हढ्या समस्या असताना आंदोलनासारख्या गोष्टीत थोडं समाधान आनंद शोधत असतील तर शोधू द्या की. कोणीतरी आपल्या त्रासावर फुंकर घालतय , कोणीतरी आपल्यासाठी उभं राहत्य, कोणीतरी आपल्याला न्याय देतंय आणि हे निर्णायक टप्यावर आलं याचा हा आनंद आहे. त्यांना बघून नाक मुरडण्यासारखा निचपणा दुसरा नाही. - सौरभ कोरटकर #jarangepatil #MarathaReservation

Saurabh Koratkar

46,927 views • 11 months ago

आज पुन्हा हलून निघाले. डोकं पुन्हा सुन्न झालं. ३२ वर्षीय रत्नाशील निंबाळकर, राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा १२ मार्चला क्रूर पद्धतीने खून केला गेला. आईवडील, विधवा बहीण, तिची २ मुलं, तो व त्याची पत्नी व २ मुलं या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा मिलिटरी मधे होता, तिथून त्याला काढून टाकण्यात आले होते असे त्या गावाची लोकं सांगतात. ह्या माणसाचे लग्न झाले नव्हते व त्याचा एक स्त्री बरोबर संबंध होते. ह्या माणसाला पूर्ण गाव “काका” म्हणायचं. रत्नाशील नी माझी गावात बदनामी केली या मुळे त्याने मनात राग घेऊन दत्तात्रय नी त्याच्याच आडनावाच्या व्यक्तीचा निर्दयी पणे खून केला. १२ मार्चला बहिणीचा मुलाची १० वी ची परीक्षेला त्याला रत्नशील सोडायला गेला, तिथून घरी येताना, दत्तात्रय नी त्याला गाडीने उडवला आणि खाली पडल्यावर कोयत्याने त्याला अनेकदा मारले. हा अजून फरार आहे. तिथल्या पत्रकारांनी बातमी देखील केली नाही कारण त्याच्यावर “दबाव” आहे. कसला दबाव ? काय हे ? ह्या आरोपी दत्तात्रयचा सख्खा भाऊ हा भाजप चा फलटण चा सरचिटणीस आहे. त्यांना हात जोडून विनंती, कृपया ह्या कुटुंबाला मदत करा आणि न्याय होऊ द्या . मी SP समीर शेख अतिशय चांगले अधिकारी आहेत. मी यांच्याशी बोलले. ते स्वतः लक्ष घालून या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर नक्कीच मिळवून देतील. फोटो इतके भयाण आहेत की ते मी नाही पाठवू शकत. पण त्या आरोपी दत्तात्रय निंबाळकर चा फोटो मी ट्वीट करत आहे. गृह मंत्री Devendra Fadnavis ह्यात न्याय होईल ह्यासाठी आपण निर्देश द्यावेत.

Mrs Anjali Damania

30,784 views • 1 year ago

लोणी पोलीस स्टेशनचा पोलिसी दहशतवाद उघड! दिनेश चव्हाण नावाचा लोणी पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल, कोल्हार गावातील केक शॉपचे मालक कैलास पिलगर यांना अमानुष मारहाण करून त्यांची गल्ल्याची रक्कम लांबवतो. एवढेच नव्हे तर “खबरदार माझी तक्रार करशील तर…” असा दमही देतो. न्याय मिळवण्यासाठी कैलास पिलगर यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शितल गोरे ताई यांच्याकडे धाव घेतली. चौकशीसाठी शितलताई स्वतः कैलास पिलगर यांच्यासह लोणी पोलीस स्टेशनला गेल्या आणि तिथेच फेसबुक लाईव्ह केले. हाच राग धरून… 👉 शिर्डीचे DYSP अमोल भारती यांनी विधवा महिलेला अमानुष मारहाण केली. याबाबत शितल गोरे ताईंनी एसपींकडे लेखी तक्रार दिली आहे. DYSP अमोल भारती यांनी शितल गोरे ताईंना धमकी दिली : •“तू टोपी घालून सगळीकडे लाईव्ह करतेस का? आज तुला धडा शिकवतो. तुला पाच महिन्यांपासून शोधत होतो. बरं झालं भेटलीस.” •“तुला आणि तुझ्या मुलाला गाडीखाली चिरडून टाकीन. अमोल भारती जे बोलतो ते करतो.” त्यानंतर ताईंना जबर मारझोड करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. मोबाईल हिसकावून घेतला, पासवर्ड घेतला आणि सॉफ्टवेअर करप्ट केलं. 👉 यामध्ये लोणी पोलीस स्टेशनचे API कैलास वाघ यांचाही सहभाग असून त्यांनी तक्रारदार कैलास पिलगर आणि त्यांच्या सोबतच्या दोन महिलांना केबिनमध्ये बसवून ठेवलं, जेणेकरून शितल गोरे ताईंवरची मारहाण-मारझोड त्यांना ऐकू येईल अशी व्यवस्था केली. ⸻ आमचे ठाम मागणीपत्र : 1.या घटनेचे CCTV फुटेज तात्काळ जाहीर करा – नागरिकांना RTI अर्ज करायला लागू नये. 2.DYSP अमोल भारती यांना तत्काळ निलंबित करा. 3.पोलिस दहशतीविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना संरक्षण द्या.

गजाभाऊ

89,283 views • 11 months ago

ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी ? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हाथ होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले? बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते. जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे 'केम छो वरली' म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते. जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असतांना यांना मराठी माणूस आठवला नाही. 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता? जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान!

Sujat Ambedkar

28,236 views • 4 months ago

आज मुंबईतील "शिवतीर्थ" या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं या भाषणातील महत्वाचे मुद्दे - १) गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया.. २) गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यांच्याबद्दल मला बोललंच पाहिजे. पहिला विषय कुंभमेळा. बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं मी पिणार नाही सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशातील नद्यांची जी अवस्था आहे जिला आपण माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं काय लक्ष आहे त्यावर मी बोललो. स्व. राजीव गांधींनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं, पुढे २०१४ ला मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी पण गंगा साफ करण्याचा प्रकल्प हाती घेतला. कुंभमेळ्यानंतर ज्यांनी तिकडे जाऊन स्नान केलं त्यातले लाखो लोक आजारी पडले. प्रश्न कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये तर गंगा स्वच्छतेचा आहे. ज्यागंगेला आपण माता म्हणतो तिची आजची परिस्थिती काय आहे हे दाखवणारी एक चित्रफीत मी आणली आहे... गंगा शुद्धीकरणावर ३३ हजार कोटी खर्च झालेत. तिकडे घाटावर मृत व्यक्तीला अग्नी दिल्यासारखं करतात आणि नंतर पाण्यात ढकलतात. हा कोणता धर्म ? आपल्या नैसर्गिक गोष्टींच्या आड जर धर्म येणार असेल तर काय उपयोग ? हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता तीच परिस्थिती कशी चालेल ? आपण निसर्गासाठी काही सुधारणा करणार आहोत की नाही ? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करतोय. प्रत्येकाला धर्म प्रिय असतो पण त्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजेत. ३) महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे. सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे प्रदूषित आहेत. ४) प्रदूषणाच्या मानकांनुसार (स्टँडर्ड्स नुसार ) उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडा, घोड, तितुर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर आणि ढोरणा या नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अति वाईट आहे. भातसा, पेढी, मोर, बुराई, वेल,पांझरा, सिना, काळू, वेण्णा, कोयना, मांजरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी व कान या नद्यांच्या पात्रांचे पाणी वाईट या कॅटेगरीत म्हणजे तुलनेने कमी वाईट आहे. ५) मुंबईत ५ नद्या होत्या. त्यातल्या चार मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या यांनी मारल्या. मिठी नदी पण मरायला टेकली आहे. मुंबईतील एकमेव राहिलेली नदी मिठी तिची काय अवस्था आहे ते बघा... दरवर्षी मुंबई महापालिका मिठी नदी साफ करणार असं म्हणते, जोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला असलेली घरं हटवत नाही, तोपर्यंत मिठी नदी स्वच्छ होणार नाही. निसर्गाच्या हानीबद्दल कोणी बोललं की आपण म्हणणार धर्माच्या आड येतो. धर्माचं मला सांगूच नका. आपण भिंतीवर झाडं जगवा झाडं लावा असे संदेश लावतो. आणि देशातील हिंदूंचे अंतिम संस्कार लाकडांवर होतात. लाकडं कुठून येतात, जंगलं तोडूनच ना ? विद्युतदाहिन्या आल्या आहेत पण तरीही अनेक लोकं विद्युतदाहिनी नाकारतात. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. आत्ता ते मध्ये अंबानींच्या वंताराला गेले. म्हणजे त्यांना प्राण्यांची आवड आहे. मग जंगलं त्यांनी वाचवली पाहिजेत. ६) भारताचा जन्म-मृत्यूचा आकडा हा दररोज ८१ हजार ७४६ जन्म होतात दररोज २९ हजार ६७९ मृत्यू होतात. दररोज पन्नास हजाराने लोकसंख्या वाढत आहे ७) महिन्याला २४ लाख ५२ हजार ३८० जन्म होतात महिन्याला ८ लाख नव्वद हजार ३७० मृत्यू होतात महिन्याला १५ लाख लोकांची वाढ होते. ८) वर्षाला २ कोटी ९४ लाख २८ हजार ५६० जन्म होतात, वर्षाला १ कोटी ६ लाख ८४ हजार ४४० मृत्यू होतात म्हणून दर वर्षी १ कोटी ८० लाखाने लोकसंख्या वाढते. एका बाजूला आपण दुष्काळाने त्रस्त आहोत म्हणून बोंबलत बसायचं आणि दुसरीकडे जंगलं तोडायची. ९) आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे. १०) छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती ? शहाजी राजे पण आधी आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता ? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती ? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय ? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं. मिर्जाराजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला तेही हिंदू होते ना ? औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही. ११) औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. १२) मरहट्ट्यानी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते... शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला... माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात. १३) महाराष्ट्रात एअरपोर्ट असेल की बंदर असेल सगळं अदानीला देणं सुरु आहे. अदानी हुशार आहे आणि आपण अडाणी निघालो. १४) लाडकी बहीण योजनेचं काय चाललं आहे? विधानसभेत चर्चा सुरू आहे कशावर तर औरंजेबावर... तुमच्या प्रश्नावर नाही. १५) आपण ज्यांना मुघल म्हणतो ते तुर्की -मंगोल आहेत. धर्माच्या आधारावर देश नाही उभं करता येत. हे समजलं टर्कीला. केमाल पाशा तिकडे आला. तिकडे इस्लाम आता मवाळ आहे. तिकडे मशिदी आहेत पण रस्त्यावर धर्म दिसत नाही. केमाल पाशानी ओट्टोमन खलिफाचे पद संपुष्टात आणले, जे इस्लामिक जगताचे धार्मिक नेतृत्व मानले जात होते. १६) तुर्कीच्या राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. इस्लामला राज्य धर्माचा असलेला दर्जा काढून टाकला. सध्याच्या टर्कीच्या अध्यक्षांनी पण मवाळ धर्म स्वीकारला. आज टर्कीला पर्यटनासाठी ५ कोटी लोक भेट देतात. विचार करा किती सुंदर देश बनवला असेल. १७) आम्ही मशिदींवरचे लाऊडस्पिकर बंद करा म्हणून आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की रात्री १० ते सकाळी ६ लाऊड स्पीकर लावता येणार नाही. अहो प्रश्न सकाळी ६ ते १० चा नाहीच, दिवसभर भोंगे वाजतात त्याचं काय ? योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये मात्र मशिदींवरचे भोंगे उखडून टाकले. त्यांना जमतं मग आम्हाला का नाही जमत ? १८) बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. संतोष देशमुखांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी खंडणी आणि पैशाच्या विषयातून मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते ? १९) आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं, का नाही झाली कर्जमाफी ? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही ३० तारखेच्या आत पैसे भरून टाका. २०) लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी ६० हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाहीत. २१) आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे. २२) टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा. २३) ( आज मी माझ्या आजोबांच्या उठ मराठ्या उठ या १९६६ सालातील पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे. तो काळजीपूर्वक ऐका... "आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री अशा मोहमयी अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये, या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनविण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे - गलबला बुद्धी नासते । नाना निश्चय सांगती । ऐकावे कोणकोणाचे । बोलताहे बहुचकी । करंटे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो ।। असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील, तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदानालिस्ती आणि जाहीर सभांतून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मऱ्हाठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्याइतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला, तर सत्ता स्पर्धेच्या, शर्यतीच्या रिंगणात आपापल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्याचे रिकिबीतले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत." प्रबोधनकार ठाकरे । ) २४) तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते... आजच्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या.. २५) आपला एक अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक प्रमोद अरणे हा कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन आजच्या मेळाव्याला चालत आला आहे. अशा सैनिकांमुळे मला ऊर्जा मिळते. #गुढीपाडवामेळावा२०२५

Raj Thackeray

140,098 views • 1 year ago

एक चूक आणि तिचे आयुष्य उद्धवसत.. मी हादरुन गेलो... #सातारा पाटण, सोनवडे : सौ. गौतमी शशिकांत पाटील यांची कुटुंबं नियोजन शस्त्रक्रिया चुकीची झाली. तिला त्रास होतोय हे ओरडून सांगत असताना डॉक्टरांनी हात पाय बांधून तोंडात बोळा घालून निर्दयी पणे अनेक तास ऑपरेशन केले. ऑपेरेशन झाल्यावर ती शुद्धीवर आल्यावर पुन्हा जोरात पोटात दुखायला लागले. डॉक्टरांनी सलाईन मधून पेनकिलर दिले आणि दोन दिवसाने तिला डिस्चार्ज सुद्धा दिला, पुन्हा दुखायला लागलं पुन्हा आणलं पुन्हा तेच सलाईन दिले. हे सगळं घडलं सोनवडे सरकारी रुग्णालय येते, डॉ. ननावरे, डॉ. डुबल यांच्या हलगर्जीपणामुळे जे घडलं ते ऐकून मी स्तब्ध झालो. आता त्यांच्या लक्ष्यात आलं कि काही खरं नाही तेव्हा सरकारी ऍम्ब्युलन्स मधून पाटण ला सोनोग्राफी साठी आणलं. तेथील डॉक्टरने पोट फुगलेले पाहून कराड गाटायला लावले. त्याच गाडीतून पेशन्ट नर्स सोबत सहित कराड येथील कॉटेज कुटीर हास्पिटल ला घेऊन गेले तिथेही केवळ पेनकिलर दिले. आता फरक कशाचाच पडत नव्हता, असाहाय वेदना वाढतच गेल्या, ज्यामुळे त्यांचं ऑक्सिजन लेव्हल कमी झालं आता गरज पडली व्हेंटिलेटरची तेव्हा सातारा सिव्हिल ला भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सोनवडे सरकारी रुग्णालय ते सातारा सिव्हिल रुग्णालय इथपर्यँतचा प्रवास झाल्यावर कुटुंब समजून गेले कि हे कुणीच सोनोग्राफी करत नाहीत तेव्हा त्यांनी खाजगी दवाखान्याचा सहारा घेतला सह्याद्री हॉस्पिटल कराड येते नेलं. त्या हॉस्पिटलने परिस्तिथी पाहून पेशन्ट सिरीयस आहे म्हणत त्यांना कृष्णा हॉस्पिटल ला नेण्याचा सल्ला दिला. आता तेथेही पेशन्टची गंभीर स्तिथी पाहता सांगलीला भारती हॉस्पिटल ला नेले. तिथे पेशन्ट ऍडमिट केल आणि इलाज करणायास सुरवात झाली. यात दोन तिला जाणवत होतं कि माझ्यासोबत काही तरी चुकीच घडलंय. तिला पोटात पुन्हा वेदना सुरु झाल्या आणि आता तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रवास सुरु झाला. यात दोन दिवसाचा कालावधी गेला. या हॉस्पिटलला पेशन्टचे तपासणी केले. या तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली. पोटात आताड्याला भोक पडून सगळीकडे इन्फेकशन झालं आणि त्यामुळे किडनी आणि लिव्हर ला मोठे इन्फेकशन झालं आहे. त्यामुळं या डाक्टरांनी ऑपेरेशन करण्याचा निर्णय घेऊन ऑपरेशन केले. डॉक्टरांनी स्पष्टपने सांगितले कि कुटुंबं नियोजन ऑपरेशन चुकीचे झाले म्हणून तिच्या पोटातली ट्यूब काढून टाकली. त्यानंतर सुद्धा त्रास थांबलेला नाही. ही घटना चिमूटपणे 20 मे ते आजपर्यँत कुटुंबं सहन करत आहे. डॉक्टरांनी तीन महिन्याने पुन्हा दुसरे ऑपरेशन करन्याचा सल्ला दिला आहे. हा अन्याय माझ्या कानावर आला मी तात्काळ सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांना हे प्रकरण समजून सांगितलं. या जिगरबाज वाघाने तात्काळ पीडित कुटूंबाची भेट घेतली आणि आंदोलन सुरु केले. गेली पाच दिवस आंदोलन सुरु होते, पाऊस येत होता पण हे वाघ पाण्या पावसात बसून राहिले. उपोषण सुरूच ठेवले,हि घटना खूप गंभीर होती म्हणून अतिशय मोठा संघर्ष केला. आदित्य गायकवाड यांनी अखेर आज एक जणांच्या निलंबनाची लढाई जिंकली आणि दोन जणांचे निलंबनसाठी चौकशी लावली. गौतमी शशिकांत पाटिल अखेरच्या घटका मोजत आहे. इन्फेकशन एवढं वाढलं कि तिला मी जगणार नाहि अशी खात्री झाली. लेकरं, नवरा ती रडत असतात. आणि इकडे तिचे आयुष्य एका क्षणात उद्धवस्त करणारे आरोपी मोकाट आहेत. ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. तात्काळ आरोपी निलंबीत करावे, राज्यसरकारने आरोग्य मंत्र्यांनी दखल घेऊन या मुलीला मोठ्या दवाखान्यात इलाज करून वाचवणयाचे प्रयत्न करावेत. पीडित कुटुंबंला शासकीय 25लाख रुपये शासकी य मदत द्यावी. पावसात लढून एक जणांचे निलंबन करायला भाग लढणाऱ्या वाघाना जयभिम! ताई तू खचू नको, तुझा भाऊ तुझ्यासोबत आहे... फक्त तू खचू नको CMO Maharashtra Devendra Fadnavis Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Rupali Chakankar #JusticeForGautami

Deepak Kedar

109,429 views • 2 years ago