Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ हा माहितीपट पाहा... माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जुलै १९६८ मध्ये फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून हा माहितीपट तयार केला आहे. #DrAmbedkar #DrBabasahebAmbedkar #FilmsDivision

11,625 просмотров • 5 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

'भीमा तुम्हा वंदना' 📘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विशेष माहिती पुस्तिका आज प्रकाशित करण्यात आली आहे. 📱'भीमा तुम्हा वंदना' या संकल्पनेवर आधारित या पुस्तिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित गीतांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. ही सर्व गीते वाचकांना ऐकता यावीत, यासाठी क्यूआर कोड देखील पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. 🔹महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे दादर येथे चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुरवलेल्या नागरी सेवा सुविधांची माहिती देखील पुस्तिकेत समाविष्ट आहे. 🔗ही पुस्तिका बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्यासाठी कृपया पुढील लिंकचा उपयोग करावा. #MyBMCUpdates #MahaparinirvanDiwas #महापरिनिर्वाणदिन

माझी Mumbai, आपली BMC

28,771 просмотров • 1 год назад

📍नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई जी आणि मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांच्यासह संविधान प्रास्ताविका पार्क (Constitution Preamble Park)चे उदघाटन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. न्यायमूर्ती श्री नितीन सांबरे जी, राज्याचे मंत्री श्री Chandrashekhar Bawankule जी, श्री Sanjay Shirsat जी, राज्यमंत्री श्री Adv.Ashish jaiswal जी, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू तसेच मान्यवर उपस्थित होते. नागपूर विद्यापीठाला गौरवशाली इतिहास लाभला आहे. विधी महाविद्यालय परिसरात संविधान प्रास्ताविका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेले कर्तव्य, जबाबदारी व आपले अधिकार यांची योग्य शिकवण विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी याचा निश्चितपणे उपयोग होईल.

Nitin Gadkari

21,340 просмотров • 1 год назад

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला. हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली. मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते.त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले.मी याबद्दल जाहीर माफी मागतो. गेली अनेक वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो ही बाब सगळ्यांना माहिती आहे.डॉ.बाबासाहेबांचा माझ्याकडून अनवधानाने झालेला हा अवमान माझ्यादेखील जिव्हारी लागलेला आहे. मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही.मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावलेली आहे.मात्र आज मी माफी मागतोय,कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील,हा विश्वास आहे.

Dr.Jitendra Awhad

96,816 просмотров • 2 лет назад