Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

मा. मुख्यमंत्री महोदय २०२० मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपण आणि मा. अजितदादा २०२२ मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपणही राज्यात #ओला_दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. पण आज त्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे. मा. #देवाभाऊ आपल्या पाठीशी केंद्र सरकारची ताकद तर मा. अजितदादा आपल्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळं राज्यात...

11,792 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

धुळ्यातील साक्री तालुक्यात होणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी #आदिवासी कुटुंबांची #झोपडी मध्ये येत असल्याने ती जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करून जाळण्यात आली. ही सत्तेची मस्ती नाही का? इंग्रजांना आणि मुघलांनाही लाजवेल एवढी सत्तेची मस्ती आज सत्ताधारी करत आहेत. अशाप्रकारे आदिवासी कुटुंबाच्या संसाराची होळी केली जात आहे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब, Devendra Fadnavis साहेब, Ajit Pawar दादा आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी या आदिवासी कुटुंबाला विस्थापित केलंय, उद्या आपण याठिकाणी येणारच आहात तर या कुटुंबाचं पुनर्वसन आपण करायलाच पाहिजे. या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर सरकार केवळ भंपकबाजी करतंय, हे सिद्ध होईल. #मोठ्याचा_आला_गाडा_गरीबाचे_झोपडे_मोडा

Rohit Pawar

28,289 просмотров • 2 лет назад

#CID, #CBI एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषीमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी मा. अजितदादा आणि मा. फडणवीस साहेबांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी. महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल.

Rohit Pawar

26,669 просмотров • 1 год назад

मी अधिवेशनात ओरडून, हात जोडून सरकारला विनंती करत होतो… की बाबाहो पीक विम्याचे ट्रिगर बदलू नका, हे शेतकऱ्याच्याच मुळावर येणार आहे, परंतु रम्मी खेळण्यात बेधुंद असलेल्या सरकारने याकडं दुर्लक्ष केलं आणि आज सरकारच्या चुकीचे परिणाम बिचाऱ्या शेतकऱ्याला भोगावे लागतायत..आज अतिवृष्टीने शेतकरी बरबाद झाला पण स्थानिक आपत्तीचा ट्रिगरच नसल्याने शेतकऱ्याला विम्याची फुटकी कवडीही मिळणार नाही. केवळ ३८०० कोटी वाचावेत म्हणून सरकारने हा ‘महापराक्रम’ केला. आता उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला यंदा पिकविम्याचा आधार नसल्याने तत्काळ #ओला_दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रु. मदत द्या, एवढीच सरकारला हात जोडून कळकळीची विनंती..! Devendra Fadnavis Ajit Pawar Dattatray Bharane

Rohit Pawar

14,640 просмотров • 1 год назад

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासातील अत्यंत काळा दिवस आज आपण अनुभवत आहोत. चांदा ते बांदा, शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी आपल्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले. “दादा… यावेळी वेळ चुकली…” असे शब्द ओठांवर येऊनही ते स्वीकारायला मन तयार होत नाही. अजितदादा सत्तेत असताना मी विरोधी पक्षात काम केले, मी सत्ताधारी पक्षात असताना काही काळ अजितदादा विरोधी पक्षात राहिले, तर अनेक वर्षे आम्ही दोघांनी एकत्र सत्तेतही काम केले. या संपूर्ण वाटचालीत जनतेचे हित हेच अजितदादांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचे केंद्रस्थान राहिले. कोणताही निर्णय घेताना महाराष्ट्रातील सामान्य माणसाला त्याचा कसा लाभ होईल, याची ते नेहमीच काटेकोर काळजी घेत. कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही अनेक विषयांवर दीर्घ आणि कधी कधी तीव्र चर्चा केल्या. या चर्चांमधून “कर्तव्यकठोर” या प्रतिमेच्या आड दडलेले अजितदादांचे हळवे, आपुलकीचे व्यक्तिमत्त्व मी जवळून अनुभवले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची सततची धावपळ सुरूच असायची… आणि आज ती धावपळ कायमची थांबली आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. माझे मित्र, राजकारणातील रांगडे पण तितकेच प्रामाणिक व्यक्तिमत्त्व अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज केवळ एक नेता नाही, तर माझा दमदार, दिलदार मित्र आणि एक खंबीर साथीदार हरपला आहे. “काम करणारा माणूस” ही प्रतिमा कुणी दिलेली नव्हे, ती दादांनी त्यांच्या कृतीतून स्वतः निर्माण केली होती. राजकारणापलीकडे संबंध जपणारा, स्पष्टवक्तेपणा, बोलण्यातली मिश्कीली आणि राजकारणातील अस्सल “नमुना” आज आपण गमावला आहे. काल कॅबिनेटमध्ये आमच्यासोबत असलेले दादा आज आपल्यात नाहीत… यापुढे ते समोर दिसणार नाहीत, बोलणार नाहीत, खांद्याला खांदा लावून उभे राहणार नाहीत… हे वास्तव स्वीकारायला मन तयार होत नाही. “कामाचा माणूस” म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणारे अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या कार्यातून, निर्णयांतून आणि असंख्य आठवणींतून ते सदैव आपल्या मनात चिरायू राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली! #AjitPawar #Ajitdada #अजितपवार

Girish Mahajan

11,606 просмотров • 8 месяцев назад