Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना शाई पुसणे हे जादूचे खेळ वाटत आहेत पण नाही ही जादू नाही तर लोकशाही पुसून टाकण्याचा हा खेळ खेळला जातोय. #votechori

16,587 просмотров • 7 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केल्यावर मा. फडणवीस साहेबांना पत्रकारांनी याबाबत विचारलं असता, प्रश्न आणि उत्तरं ३०-३५ दिवस आधी सबमिट केले जात असल्याचं सांगून त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण शब्दांचा खेळ करण्यात आणि रेटून खोटं बोलण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात कुणीही धरू शकत नाही, हे खरं असलं तरी खोटारडेपणा फार काळ टिकत नाही. केंद्र सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात २६/११/२०२५ पर्यंत किती नुकसान झालं याची आकडेवारी दिलीय, याचा अर्थ किमान २६/११/२०२५ पर्यंत उत्तर अपडेटेड आहे. फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार? शब्दांचा खेळ करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यावर भर द्या, ही विनंती. Devendra Fadnavis

Rohit Pawar

32,020 просмотров • 9 месяцев назад

देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवा... भाजपाचा एकही आमदार विधानसभेला निवडून येणार नाही असे पहा -मनोजदादा जरांगे पाटील जरांगे पाटलांचे हे विधान मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नाही तर महाविकास आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी आहे . आणि त्यासाठी फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण टार्गेट करीत आहात . मराठा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही हे ठामपणे बोलणारे शरदचंद्र पवार साहेब यांना मात्र आता खोटा पुळका मराठा समाजासाठी का? उट सुट उपोषणाला बसायचे - उठायचे. देवेंद्रजी फडणवीस यांना शिवीगाळ करायची काय खेळ मांडून ठेवलाय का जरांगे पाटील आपण? मराठ्यांची भाषा रांगडी आहे पण अर्वाच्य, अश्लील नाही . आपण मराठ्यांचे नेते आहात तर मराठ्यांची मान गर्वाने ताठ राहील अशीच भाषा अपेक्षित आहे पण आपल्या भाषेमुळे माझ्यासारख्या असंख्य मराठ्यांना मान खाली घालावी लागत आहे. सत्ताधारी पक्षाने मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक लावली त्यावेळेस विरोधी पक्षातील मराठा नेते उपस्थित राहिले नाहीत ,त्यांना उपस्थित राहण्याचे, मिळून तोडगा करण्याचे आवाहन आपण का केले नाही? तसे न करता उलट मराठा समाजाच्या आडून फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करण्याचा विडा आपण घेतला आहे, तुमची ही कृती न समजन्या इतका मराठा समाज मूर्ख नाही. माझा मराठा समाज राकट आहे, कणखर आहे, पण तो लाचार नाही.. हे लक्षात ठेवा, जरांगे पाटील. त्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठा नेत्यांना माझी विनंती आहे ,एकत्र या. फक्त जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही सर्वपक्षीय मराठ्यांनो एकत्र या राजकारण बाजूला ठेवून आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढूया . छत्रपतींचा आशीर्वाद मराठा आरक्षणासाठी देऊया साथ फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत राहण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार केला त्या सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठक करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या मनोज जरांगे पाटील आणि शरदचंद्र पवार साहेब यांचा खरा चेहरा जनतेसमोर येऊ देत . भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra BJP Mumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Kishor Wagh #MarathaReservation #maratha

Prof.Varsha Bhosale

54,134 просмотров • 2 лет назад

काल लोकसभेत बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या एका खासदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कारवाई करावी अशी मागणी केली. ही मागणी का केली? तर महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला पाहिजे, ती व्यवहारात वापरलीच पाहिजे असं आग्रही आवाहन केल्यानंतर, मूठभर उत्तर भारतीयांनी आम्ही मराठी बोलणार नाही असा आवाज दिला. आता असा आगाऊ आवाज दिला तर त्यांच्या कानाखाली आवाज काढायचा नाही ? आणि इतर पक्षांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आवाज काढेल. आणि हा काही स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सैनिक संघर्ष करत नाहीयेत तर हा संघर्ष मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी करतोय. मग संसदेत एका उत्तर भारतीय खासदाराने अजब मागणी केल्यावर महाराष्ट्रातील खासदार गप्प का बसले ? संघर्ष जर तुमच्या भाषेसाठी सुरु आहे, तुमच्या भाषेचा अवमान केला जातोय याची मराठी म्हणून खंत का नाही वाटत ? #मराठी #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,369 просмотров • 1 год назад

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा अंतर्गत कलह आणि जातीय मानसिकता महाराष्ट्रासमोर उघडी पडली! यूपीएससी-एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चर्चा होण्याऐवजी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद झाला. त्यानंतर "हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे" असा आरोप-प्रत्यारोप झाल्याने कार्यक्रमाचे गांभीर्यच संपले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडत असताना त्यांनी यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. हा भाजपचा "सबका साथ, सबका विकास" आहे की "खुर्चीसाठी भांडा आणि जातीत समाजाला विभागा" हा नवा मंत्र? यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्याऐवजी भाजपच्या नेत्यांनी स्वतःच्या अहंकाराचा आणि अंतर्गत गटबाजीचा देखावा केला. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला हे शोभणारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर मौन सोडून महाराष्ट्राला उत्तर द्यावे. भाजपमध्ये खुर्ची मोठी की संविधान आणि समानतेची मूल्ये?

Harshwardhan Sapkal

28,317 просмотров • 2 месяцев назад

राजकीय पक्षाचा प्रचार अशा पद्धतीने कीर्तनकार उघड उघड करत आहे.. संगमनेर येथे लोकांनी निवडून दिलेला खताळ काही कामाचा नाही.. गावोगावातील मुलांना व्यसने लावून धर्माचे राजकारण करने सुरु आहे त्याच.... आता हे लोकांना पटत नाही तर असे कीर्तनकार आमदार खताळ तुमच्या पोरांना कामधंदा देऊ शकत नाही किंवा तालुक्याचा विकास करू शकत नाही त्यामुळे हिंदुत्वसाठी त्याला माफ करा अस गावातील लोकांना बिंबवतोय..हा कीर्तनकार वारकरी संप्रदायचे काम नाही करत हा कोणाचे काम करतोय ते लक्षात आले असेल.. वारकऱ्यात सनातनी घुसलेत.. संत ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरू संत तुकोबाराय यांना त्रास देणाऱ्याचे वारस आहेत हे लोक.. वारकरी संप्रदाय बदनाम करण्याची ही चळवळ आहे त्यांची.. कोणता कीर्तनकार गांजा दारू इतर व्यसने लावणाऱ्या माणसाचे कौतुक करील.. हे लोक करत आहेत..

Bhaiya Patil

34,066 просмотров • 1 год назад

मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही. जर असे केले तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही. दोन वेळेस मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न मान्य केलेले नाहीत. सुप्रीम कोर्टने त्याविरोधी निर्णय दिले आहेत. मराठा समाजातला एक वर्ग आहे, जो निजामी मराठा आहे. तो रयतेतल्या मराठ्यांना जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. निजामी मराठे हे निजामाबरोबर राहिलेले आहेत. रयतेतले मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत. सोळाव्या शतकातले भांडण आताही चालू आहे. सत्तेत बसलेला निजामी मराठा आहे आणि तो रयतेतल्या मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. हे जेवढ लवकर रयतेतल्या मराठ्याच्या डोक्यात जाईल आणि जोपर्यंत निजामी मराठ्यांकडून तो फारकत घेणार नाही, तोपर्यंत रयतेतल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. रयतेतल्या मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, तो श्रीमंत मराठा नाही, म्हणून देशभरात हमीभाव हा जाहीर केला जातो त्यासंदर्भातील कायदा करावा ही मागणी सुद्धा निजामी मराठा मान्य करत नाही. निजामी मराठ्यांपासून रयतेतल्या मराठ्यांनी फारकत घेतल्याशिवाय त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही. निजामी मराठ्यांच्या हातातली सत्ता रयतेच्या मराठ्यांच्या हातात जाईल या भितीमुळे निजामी मराठा हा रयतेच्या मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाही. आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की त्यांना बदल हवा आहे की नाही?

Prakash Ambedkar

17,019 просмотров • 10 месяцев назад

हा घ्या आणखी एक पुरावा. हे आहेत देगलूरकर फडाचे शब्दप्रभू चैतन्य देगलूरकर आणि त्यांचे 2024 मधील पंढरपुरातील कीर्तनकारांच्या मेळाव्यातील भाषण. #वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य सर्व काही संपणार आहे म्हणून #भाजप शिवाय कुणीच आपल्याला वाचवणार नाही. अशी काल्पनिक भीती दाखवून निवडणुकीत प्रचार कसा करावा, जनतेचा बुद्धिभेद कसा करावा याचे आपल्या रसाळ वाणीने प्रशिक्षण देत आहेत. त्यानंतर राज्यात अनेक #कीर्तनकार आपल्या कीर्तनातून भाजपाचा उघड खरा नव्हे खोटा प्रचार करत होते. सामान्य जनतेचा बुद्धिभेद करत होते. भागवत #वारकरी संप्रदायातील संतांच्या कोणत्या ग्रंथात आहेत ? राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय नवा मंत्र रुजवणाऱ्या सन्माननीय देगलूरकर यांना वारकरी संप्रदायातील #घुसखोर नाही म्हणायचे तर काय मग म्हणायचे ? त्यांच्या समर्थकांनी सांगावे. बाकी त्यांच्या #देगलूरकर फडाचा पूर्व इतिहास, ते वर्णवर्चस्ववादी आहेत की नाही, त्यांची घराची परंपरा याच्याशी मला आत्ता काहीच बोलायचे नाही बोललो नाही. राम कृष्ण हरी! #warkari

Vikas Lawande

13,677 просмотров • 4 месяцев назад