Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

मोठ्या दादाचा मोठा पुतण्या 'दिल्लीत' येऊन 'दादासाठी' लढतोय! #JUSTICE_for_AJIT_DADA

17,731 görüntüleme • 7 ay önce •via X (Twitter)

23 Yorum

IamAbhijit profil fotoğrafı
IamAbhijit7 ay önce

आधी आज्या च्या नावावर भीक मागून झाली आता २ वर्ष ज्या काका ला त्रास दिलाय ज्याला घालून पडून बोलले त्याच्या नावावर भीक मागायच काम सुरू आहे.. अरे भिकारचोट स्वतःच्या बापाच्या नावावर इमेज बनव ना, नेमकं कोण त्या लायकी च नाही तू का तुझा बाप

WethepeopleofIndia profil fotoğrafı
WethepeopleofIndia7 ay önce

चोर की दाढी मे तिनका ऐकल आहे का? स्वत: एवढा गोंधळ करायचा की समोरच्याला शंकेला पण वाव द्यायचा नाही पण एवढे पुरावे त्यालाच कशे मिळतात हा प्रश्न विचारणार आहे की नाही कोणी त्यालाच दादांच्या भावकीवरून मनात तेढ होती विसरले का

मी मराठा 🚩 profil fotoğrafı
मी मराठा 🚩7 ay önce

दादा हयात असताना दादाला त्रास दिला आणि आता दादाचा पक्ष बळकावयचा आहे म्हणुन नाटक करतोय

Hindustani profil fotoğrafı
Hindustani7 ay önce

Dadansati ladhtoy ase naka mhanu, swatha sati ladhtoy, dadansati ladhnara tya veli Dadansobat gela asta dada baher padale tenvha

मी करामती मोरचूद काका...(मोदिजींच्या परिवारातून) profil fotoğrafı
मी करामती मोरचूद काका...(मोदिजींच्या परिवारातून)7 ay önce

म्हातारं ख्वाट बॉल्ल का इवाईन पडल्याव? क्वान खरं अन् क्वान खोट्ट काय बी कळना? साऱ्या खानदानीचा मेन्यू"फेक"चेरिंग फॉल्ट हाय लबाड्या करायचा बा...

राम 🏹 profil fotoğrafı
राम 🏹7 ay önce

ते काकाने पुतण्याला स्वर्गातून लिहिलेले पत्र पोस्ट करणारा तूच ना?😂😂🤣

pappu Bisleri profil fotoğrafı
pappu Bisleri7 ay önce

Neece baith baramati wale ke marata ❤️ day 🤡🤣

Ravindra Varpe profil fotoğrafı
Ravindra Varpe7 ay önce

विमान कंपनीचा मालकाची नार्को टेस्ट करा दादाचे खुनी आपोआप समोर येतील विनंती आहे तुम्हाला जनता तुमच्या बरोबर आहे

Yashraj profil fotoğrafı
Yashraj7 ay önce

स्वतःच्या अस्तिवासाठी लढतोय अस म्हणा

Harshal profil fotoğrafı
Harshal7 ay önce

तुमचा लढा महाराष्ट्रातील जनता लक्षात ठेवतील, ट्रोलर ला घाबरू नका! keept it up #justiceforAjitdada

Ankush Chavhan profil fotoğrafı
Ankush Chavhan7 ay önce

हि लढाई आर पार ची आहे ✌✌💪💪🙏🙏

Krishna Adhav profil fotoğrafı
Krishna Adhav7 ay önce

Shatta

NDH profil fotoğrafı
NDH7 ay önce

👍🏼

Hamsan2319🎯 profil fotoğrafı
Hamsan2319🎯7 ay önce

दादा रिटर्न 🙏🙏♥️♥️रोहित दादा ♥️♥️🙏🙏👍👍🚩🚩 जय जय महाराष्ट्र माझा 🚩🚩

Raj profil fotoğrafı
Raj7 ay önce

दादा साठी नाही सत्तेत येण्या साठी... दादांना आणि त्यांच्या परिवाराला कुणी त्रास दिला वेगळं झाल्यावर जनतेला माहित आहे

सातारी कंदी पेढा profil fotoğrafı
सातारी कंदी पेढा7 ay önce

लढतोय का सत्तेत येण्यासाठी तडफडतोय 😀😀😀

Prasanna profil fotoğrafı
Prasanna7 ay önce

Nusta PR 😡

mayur profil fotoğrafı
mayur7 ay önce

#justiceforAjitdada

Jaswanth Ram Reddy profil fotoğrafı
Jaswanth Ram Reddy7 ay önce

Please continue your fight..

नाना फडणवीस आणि शिंदे शाही {मोदी का परिवार} profil fotoğrafı
नाना फडणवीस आणि शिंदे शाही {मोदी का परिवार}7 ay önce

Nautanki

Amit Kaduskar profil fotoğrafı
Amit Kaduskar7 ay önce

It's called Photo-Optics

Mohnaaz S Shaikh. profil fotoğrafı
Mohnaaz S Shaikh.7 ay önce

All the best.

🚩ModiKeSaath 🇮🇳 🇺🇸 profil fotoğrafı
🚩ModiKeSaath 🇮🇳 🇺🇸7 ay önce

DHOLYA

Benzer Videolar

हाच तो #VSR कंपनीचा मालक रोहित सिंग… आज तो जणूकाय राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झालाय आणि याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रीपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते… म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडूनच प्रयत्न होताना दिसतोय.. विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा त्याचा माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला हाच तो व्हिडिओ..! #DGCA ची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्यांच्याकडून यावर कारवाई होईल की नाही, याबाबत आमच्या मनात शंका आहे. पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सो..ड…णा….र….. नाही. #justice_for_AJIT_DADA

Rohit Pawar

54,156 görüntüleme • 7 ay önce

आज साताऱ्याच्या एका छोट्या गावात राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा ड्रग्स साठा सापडल्याचे कानावर येत आहे. जिथे 43 कर्मचारी होते ते फक्त तीन कर्मचारी दाखवून हे मोठा ड्रग्सचा कारखाना राज्यातील लाखो युवकांचे आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब करत आहे. होणाऱ्या चर्चेतून माहिती अशी आहे की हे सर्व प्रकरण दाबण्यामध्ये राज्याच्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे. प्रकाश शिंदे हे नाव वाचवण्यासाठी वारंवार संबंधित पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आहे. राज्यातील सत्ताधारी जर अशा पद्धतीने देशाच्या भविष्याला राज्याच्या भविष्याला ड्रग्स आहारी टाकणार असेल तर देशाचे व राज्याचे भविष्य हे खूप वाईट असेल. साताऱ्याचे ग्रामीणचे एसपी हे प्रकरण दाबून खूप मोठे पाप करत आहे.

Sagar Kailas Salunke

38,869 görüntüleme • 9 ay önce

सर्वज्ञानी Sanjay Raut देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमचं अजिबात मातेरं झालेलं नाही. उलट, तुमच्या संगतीत उद्धवजींच्या उरल्या-सुरल्या सेनेचं पोतेरं झालंय… मोठ्या भावाचं मोठेपण तुम्हाला खुपत होतं; घराचं कारभारीपण आपल्याकडे न जाता मोठ्या भावाकडंच जाणार, या असूयेपोटी तुम्ही त्याच्या पाठीत खंजीर खुपसलात. वेळ येताच मोठ्या भावाने या दगाबाजीचं व्याजासहित उट्टं काढलं. तेव्हापासून हा एके काळचा धाकटा भाऊ भ्रमिष्टासारखा बडबडत असतो. मोठा भाऊ मात्र जमिनीवर घट्ट पाय रोवून कुटुंबाला आधार देत ठामपणे उभा आहे. देवेंद्रजींना खोटारडा म्हणण्याचे माकडचाळे करणं म्हणजे काजव्याने सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यामुळे ही थुंकी पडणार ती तुमच्याच अंगावर... तुम्ही तर त्या घाणीत अगोदरच पुरते बरबटलेले आहात…. Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #वाचाळरौत

Chitra Kishor Wagh

30,134 görüntüleme • 3 yıl önce

पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माघार घेताच काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची लढण्याची तयारी होती, काँग्रेस पक्षाचा आकडा सगळ्यात मोठा होता, मात्र या जागेसाठी शरद पवार साहेबांच्या पक्षाने दावा केला होता, पक्षाने मोठ्या मनाने ही जागा साहेबांच्या पक्षाला सोडली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने यातून माघार घेतल्याने आमच्या सोबत धोका झाला असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. #LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews #Politics

Lokmat

30,711 görüntüleme • 4 ay önce

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची व फळबागांची पाहणी केली! बार्शी तालुक्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे अनेक भागांतील सोयाबीनसह विविध पिके व फळबागा पाण्याअभावी वाळत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, बळीराजा गंभीर संकटात सापडला आहे. आज बार्शी तालुक्यातील पांगरी, घारी,पुरी,कुसळंब,बाभळगाव येथे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि व्यथा समजून घेतल्या. पिकांचे झालेले नुकसान अत्यंत गंभीर असून, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आवश्यक ती शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. संकटाच्या या काळात बळीराजाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांना योग्य तो न्याय आणि शासनाची मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. #सोयाबीन #शेतकरी #पीकनुकसान #पंचनामा #बार्शी #बळीराजा #शेतकरीहित

Omprakash Rajenimbalkar

15,675 görüntüleme • 16 gün önce

🔹पावसाळापूर्व कामाचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नदी / नाले स्वच्छतेची, गाळ काढण्याची कार्यवाही वेगाने नि अहोरात्र सुरु आहे. 🔹मानखुर्द - शिवाजीनगर दर्गा परिसरातील पूर्व मुक्त महामार्गालगत मोठा नाला वाहतो. हा नाला महामार्गाखालून जाण्यासाठी येथे मोरी (Culvert) उभारण्यात आली आहे. या मोरीमधून विविध उपयोगिता वाहिन्यादेखील गेल्या असल्याने तिची नियमित स्वच्छता करणे हे महानगरपालिकेसमोरील मोठे आव्हान ठरते. विशेषतः तरंगता कचरा, अवजड वस्तू आणि मोठ्या प्रमाणावर साचणारा गाळ यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहास अडथळा निर्माण होतो. 🔹यंदा महानगरपालिकेने विशेष मोहिम (Systimatic Cleaning) राबवून व संयंत्राच्‍या (Super Sucker) सहायाने मोरीतील साचलेला गाळ, कचरा आणि अडथळे पूर्णतः हटविले आहेत. पावसाचे पाणी कोणताही अडथळा न येता सुरळीत वाहून जावे यासाठी मोरीची सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. त्याची ही चित्रफीत ... #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

15,260 görüntüleme • 4 ay önce

महाराष्ट्र माझा ! मराठी माणूस राज्याबाहेर किंवा जगाच्या कोपर्‍यात कुठेही असो, त्याचे मातीशी नाते कधीच तुटत नाही आणि ज्याचे मातीशी नाते तुटत नाही, तोच मोठा होतो. आज ज्येष्ठ शिल्पकार रामभाऊ सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार त्यांच्या नोएडातील निवासस्थानी जाऊन प्रदान करण्याचे भाग्य मला आणि माझे सहकारी एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, आशिष शेलार यांना लाभले. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला स्पर्श करताना आणि प्रकृती फारशी साथ देत नसतानाही त्यांच्या तोंडून निघालेले शब्द हृदयाला स्पर्श करुन गेले. ते शब्द होते... ‘महाराष्ट्र माझा’! महाराष्ट्रधर्म जगणारे असे अनेक दिग्गज आपल्या राज्याला लाभले, हे आपले भाग्य! ज्यांनी महाराष्ट्र धर्म जागवला, वाढविला, त्याला आकार दिला, असे आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, आपले वारकरी संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना आकार देण्याचे काम रामभाऊ करीत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच तमाम महाराष्ट्रजनांच्या वतीने प्रार्थना! #Maharashtra #MaharashtraBhushan

Devendra Fadnavis

94,202 görüntüleme • 10 ay önce

“अब्जोंची उलाढाल करणारी #Dmart कंपनी… पण कामावर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय देताना मात्र चिरकुट मानसिकता!” कामावर असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होतो… तरीसुद्धा त्या कुटुंबाला न्याय देण्याऐवजी प्रकरण चिरकुट पद्धतीने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. मृत कामगाराच्या पश्चात फक्त त्याची आई, पत्नी आणि एक छोटी मुलगी आहे. त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कंपनीने पुढे येऊन जबाबदारी घेणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने आज आम्हाला स्वतः जाऊन एवढ्या मोठ्या कंपनीला प्रश्न विचारावे लागले की कामगारांप्रती त्यांची नेमकी सामाजिक आणि नैतिक जबाबदारी काय आहे? कामगार हा फक्त मशीन नसतो… त्याच्यामागे एक संपूर्ण कुटुंब असतं, त्यांच्या भावना असतात, त्यांचं भविष्य असतं. मानवतेच्या नात्याने आणि सामाजिक जबाबदारी म्हणून त्या कुटुंबाला योग्य ती भरपाई आणि न्याय मिळालाच पाहिजे. #राजसाहेबांचाभानुशाली #JusticeForWorker #कामगारन्याय #DMart #मानवता #WorkersRights Raj Thackeray Amit Thackeray Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Repost Thackeray मनसे बातमी ~ MNS INFO

Mahendra Bhanushali

31,620 görüntüleme • 4 ay önce

लोकसभेत आज शून्य प्रहरात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री व माझे ज्येष्ठ बंधू स्व. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या भावाला जाऊन दोन महिने झाले. याच वर्षी २८ जानेवारीला माझ्या भावाचे प्लेन क्रॅश झाले. या घटनेला केवळ दोन महिने झाले आहेत. एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जेव्हा जातो, त्याचं दुःख त्या कुटुंबालाच माहिती असतं. आम्ही पण हे सोसलं आहे. या घटनेला दोन महिने झाले पण माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला का ? माझा मोठा भाऊ महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. त्याला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाला कसा मिळणार? माझ्या मोठ्या भावाचा मुलगा रोहितला एक एफआयआर करायला जंग-जंग पछाडावे लागले. आमच्या राज्याने तर 'एफआयआर' नोंदवून घेतलाच नाही. त्यासाठी रोहित सर्वपक्षीय नेत्यांना भेटला. इतर राज्यांमध्ये गेला, अनेकांना विनवण्या केल्या की एफआयआर करा आणि त्याच्या काकाला म्हणजे अजितदादांना न्याय मिळू द्या, असे नमूद केले. एक एफआयआर करायला एवढी अडचण? या देशातील एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा जेव्हा एवढा मोठा अपघात होतो, त्याचा एफआयआर होत नसेल तर सामान्य माणसाने जायचं कुठे? तो माझा भाऊ होता, अजित पवार जेवढा माझा भाऊ होता, तेवढाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामधला एक लाडका नेता होता. तर एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? माझी नम्रपणे हात जोडून महाराष्ट्र आणि भारत सरकारला विनंती आहे की अजितदादांसह सगळ्यांच्या अपघातांची पारदर्शक चौकशी करा. मग तो अहमदाबादचा असुदे, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये सीडीएस बिपिन रावत गेले तो असुदे, अगर एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा झारखंडला झालेला अपघात असुदे, न्याय हा समानच असला पाहिजे. प्रत्येक कुटुंब मग तो पायलट असेल, माझा दादा असेल, अंगरक्षक असेल किंवा त्या विमानात असलेल्या महिला असतील, त्या विद्यार्थिनी होत्या, त्या तरुण मुलीला पण न्याय मिळाला पाहिजे. आधी आम्हाला सांगितलं गेलं की ब्लॅक बॉक्स मिळणार, आता सांगितलं जातंय की तो खराब झालाय, हे काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित केला. रोहित पवारांच्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी काल याच्यावर स्टेटमेंट केलं. पण माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे की तुम्ही जी काही चौकशी अगर तपास करणार आहात तो कालबद्ध चौकटीत करा. या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत. स्व अजितदादा पवारांच्या विमान अपघातातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे, अशी ठाम भूमिका मांडली.

Supriya Sule

19,560 görüntüleme • 6 ay önce

मुंबई महानगरपालिकेवर भाजपा- महायुतीचा भगवा झेंडा! एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे आज भव्य मुंबई भाजपा 'विजय संकल्प मेळाव्या'ला संबोधित केले. मुंबईमध्ये विजय संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जोश पाहिल्यानंतर, आपला विजय कोणीही थांबवू शकत नाही, हा विश्वास माझ्या मनात दृढ झाला आहे. गेल्यावेळी मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बनत असताना उद्धवजींसाठी एक पाऊल मागे येऊन महापौर पद सोडून दिले. परंतु त्याबदल्यात 2019 च्या विधानसभेला त्यांनी आम्हाला दगा दिला. 2019 ला आमच्याकडून सत्ता हिरावून घेतली गेली, 2022 मध्ये आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024 मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे सरकार आणून दाखवले. यावेळी मुंबई महानगरपालिकेवरही महायुतीचा भगवा झेंडा फडकवणार महायुतीचा; महापौर बसवल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. खरंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे 'ब्रँड' होते; हे ब्रँड नाहीत! भारतीय जनता पक्षामध्ये एक सामान्य कार्यकर्ता हा देखील मुंबई भाजपाचा अध्यक्ष होऊ शकतो, हीच या पक्षाची परंपरा आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातील सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे आणि त्यांचे नाव आहे मा. नरेंद्र दामोदरदास मोदी. मुंबई कोणाची, याचे उत्तर 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभेच्या निकालांनी दिले आहे. मुंबई ही भाजपाची, मुंबई ही भाजप–शिवसेना–महायुतीची! मुंबई महापालिकेला भ्रष्टाचारातून मुक्त करणारा सामान्य कार्यकर्ताच महापौर होणार हे नक्की! बीडीडी चाळीचा प्रकल्प हा संपूर्ण आशियातील सर्वात मोठा अर्बन रिन्युअल प्रकल्प आहे. अभ्युदय नगरमधील मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मेट्रो प्रकल्प बाधित गिरगावकरांना गिरगावातच पुनर्वसनाच्या इमारती आम्ही बांधून दिल्या. विरोधकांनी मुंबईकरांसाठी काय केले? याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावे लागेल. कोविड काळात मुंबईकरांच्या टाळूवरचे लोणी खाणारे, बॉडी बॅगमध्येही घोटाळा करणारे 'कफनचोर' कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर येतील, हा माझा प्रश्न आहे. धारावीतील 10 लाख लोकांना आम्ही धारावीतच घर देणार आहोत. लवकरच मुंबईकरांसाठी एसी लोकल गाड्या आणणार आहोत. मुंबईकरांसाठी असे अनेक विकास प्रकल्प राबवत आहोत. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मा. केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Ravindra Chavan Ameet Satam Piyush Goyal भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai #Maharashtra #Mumbai #BJP

Devendra Fadnavis

17,745 görüntüleme • 1 yıl önce

बावधन बुद्रुक येथील श्री. दिलीप दगडे यांच्या निवासस्थानाशेजारी तसेच रायन आंतरराष्ट्रीय शाळेच्या परिसरालगत एका बांधकाम व्यावसायिकाने निसर्ग पाम सोसायटी या बंगलो प्रकल्पाचे प्लॉटिंग व बांधकाम केले आहे. या बांधकामादरम्यान परिसरातील पारंपरिक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेला केतकीचा ओढा पूर्णपणे बुजविण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, सध्या पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारा मार्गही अडविण्यात आल्याचे निसर्ग पाम सोसायटीचे सदस्य व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट सोसायटीलगतच्या नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असून, घरातील फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय, निसर्ग पाम सोसायटीला मुख्य रस्त्याशी जोडणारा संपर्करस्ता पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण होते. अनेकदा या पाण्यात दुचाकी अर्ध्यापर्यंत बुडत असल्याने मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा फटका केवळ सोसायटीतील रहिवाशांनाच नव्हे, तर सर्व्हिस रोडलगत असलेल्या व्यावसायिकांनाही बसत असून त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान होत आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस अथवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे माझी जिल्हा प्रशासनास नम्र विनंती आहे की, संबंधित विभागाने तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी. पाहणीत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आढळल्यास, तो प्रवाह तात्काळ पूर्ववत करून पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल, अशी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात नागरिकांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. PMC Care PMRDA NHAI collectorpune Maharashtra Pollution Control Board Maha Forest Official

Supriya Sule

62,924 görüntüleme • 2 ay önce