正在加载视频...

视频加载失败

२०२५ मध्ये आपण काय बघितले तर आपल्याला सांगता आले पाहिजे. भाजप नेते कानाखाली खात आहे...!!👇😆

23,608 次观看 • 8 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. प्रयोगातून हे सिद्ध झालेले आहे की जर तुम्ही तुमच्याबद्दल स्वतः मध्ये कमतरता आहे, आपण इतरांपेक्षा कमी आहोत, आपल्याला अमुक काम जमत नाही, जमणार नाही, आपली पात्रता नाही असा विचार करत राहिलात किंवा त्या धारणेतून जगासमोर गेलात तर आपोआप आपल्याला तसेच अनुभव येत जातात आणि त्यातून आपली धारणा आणखी पक्की होत जाते आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच अनुभवातून जात राहतो. त्यामुळे स्वतःबद्दल नेहमी आत्मविश्वास बाळगा, सकारात्मक विचार करा, आपण कार्यक्षम आहोत, प्रभावी आहोत, आपण परिस्थिती उत्तम रित्या हाताळू शकतो अशा मानसिकतेत राहा. आपल्याला तसेच अनुभव येत राहतील.....

Dr prashant bhamare

18,935 次观看 • 5 个月前

सुप्रीम कोर्टाने एससी एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअर हा निर्णय लागू करण्यासाठी एका निवृत न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. बार्टीच्या एका अधिकाऱ्याला सचिव म्हणून नेमण्यात आले आहे, त्यांचा अहवाल हा सादर केला जाईल अहवाल एकदा सादर झाला की सुप्रीम कोर्टाचा उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरचा निर्णय लागू होईल. हा निर्णय लागू झाला तर एससी एसटी त्या अधिकाऱ्यांच्या मुलाला मुलीला आणि कुटुंबाला आरक्षण मिळणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावे आरक्षण वाचवणे हा निवडणुकीचा मुद्दा आपण केला पाहिजे, म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःचे पन्नास हजार रुपये खर्च केले पाहिजे, निवडणुकीत प्रचार करण्यासाठी किंवा मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी कशा पद्धतीने वळवायचं याची आपल्याला अधिक जाणीव आहे. उद्याचे आमदार निवडून आले तर हा निर्णय अंमलबजावणी करण्यापासून थांबवता येतो. म्हणून तमाम फुले शाहू आंबेडकवादी विचाराच्या अधिकाऱ्यांना आवाहन करतोय की आपण या निवडणुकीमध्ये आपल्या पदरचे पन्नास हजार रुपये खर्च करून आपल्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवा असे आवाहन मी करत आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन हे आरक्षण आपण वाचवाल ही अपेक्षा.

Prakash Ambedkar

29,424 次观看 • 1 年前

आज १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर, राजसाहेबांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात राजसाहेबांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे... सध्या मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यावरून जो वाद सुरु आहे, त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यानुसार सर्वानी वागलं पाहिजे. आणि न्यायालयाने जर बंदी घातली आहे तर जैन मुनींनी पण त्याचा विचार केला पाहिजे. कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे अनेक डॉक्टरांनी सांगितलं आहे तरीही कबुतरांना खायला घातलं जाणार असेल तर पोलिसांनी खायला घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. जेंव्हा मुळातच न्यायालयाचा आदेश असताना आंदोलन झालं तेंव्हाच सरकारने कारवाई करायला पाहिजे होती. त्यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले. कोर्टाचा आदेश काय आहे हे लोढांना माहित नाही का ? लोढांनी हे विसरू नये की ते राज्याचे मंत्री आहेत कुठल्या धर्माचे नाहीत. काल मराठी लोकांनी आंदोलन केली तेंव्हा त्यांची धरपकड झाली, पत्रकारांना मारहाण झाली... सरकारचं नक्की काय सुरु आहे हेच कळत नाहीये... निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत... आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय... तसंच १५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्याचा आणि मांसविक्री बंद करण्याचा आदेश दिलाय... मुळात कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला ? मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे की ही बंदी पाळू नका... स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट साजरा करायचा आणि त्या दिवशी खायचं स्वातंत्र्य नाही हा काय प्रकार आहे ? #राजठाकरे #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

32,908 次观看 • 1 年前

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना पाहिले जाते त्या माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकार बांधवांची आपण भरसभेत खिल्ली उडविली. हे काही योग्य झाले नाही. या देशात माध्यमांना आपल्याला जे आकलन होते ते लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांचा आपण राजकारणात तथा समाजकारणात काम करणाऱ्या सर्वांनी सन्मान केलाच पाहिजे. पत्रकार कधी माझ्याही विरोधात लिहितात,कधी तुमच्या विरोधात लिहितात. म्हणून आपण चिडचिड करणे अयोग्य आहे. 'मतभिन्नता, विरोध असणे' हेच तर लोकशाहीचे सौंदर्य आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर आपल्याच विरोधात टोपणनावाने लेख लिहून छापून आणला होता. 'उडदामाजी काही गोरे तर काही काळेही' असतात म्हणून संपूर्ण क्षेत्रच किंवा सगळे पत्रकारच भ्रष्ट आहेत असे म्हणणे हा माध्यमांचा अवमान आहे. आपल्या बाजूने लिहिले म्हणून ते चांगले आणि विरोधात लिहिले किंवा दाखविले म्हणून ते वाईट हि भूमिका काही बरी नाही.सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांनी संयम पाळला पाहिजे. लक्षात ठेवा, 'दांडकेवाले' पण स्वाभिमानी असतात. Lokmat TV9 Marathi Pudhari News ABP माझा SakalMedia SaamTV News @News18lokmat ABP News #पत्रकारबांधव

Nilesh Lanke - निलेश लंके

28,993 次观看 • 2 年前

हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदूत्त्वासाठी जागरुकपणे उभं राहणं हीच खरी जबाबदारी! 🔥🚩 "हिंदू म्हणून जन्म झालेला पुरेसं नाही… हिंदुत्वासाठी जाणीवपूर्वक काम केलं पाहिजे!" ही केवळ शिकवण नाही, तर काळाची गरज आहे! सांगली, सोनईसारख्या हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या घटनांनी आपल्याला हादरवून सोडलं आहे. जर अशी घटना आपल्या परिवारात, आपल्या बहिणी किंवा लेकरांवर घडली असती तर? त्या क्षणी फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकून उपयोग आहे का? आपण आपली मुलं घडवत असताना, केवळ शिक्षण पुरेसे आहे का? आज प्रत्येक हिंदू कुटुंबानं निश्‍चित केलं पाहिजे की ✊ – "माझं मूल फक्त शिकलेलं नसेल, तर सजग, हिंदूत्त्ववादी आणि संस्कारी देखील असेल!" आपल्या मुलांना... 👉 संस्कार द्या! 👉 हिंदुत्वाचे भान द्या! 👉 लढण्याची जिद्द द्या! 👉 अन्यायाविरुद्ध उभं राहायचं बळ द्या! जर आपण हे करु शकलो, तर आपली नवी पिढी उद्याच्या भारतात निश्चितच रामराज्य घडवेल! जय श्रीराम! 🚩 Vishva Hindu Parishad -VHP BajrangDal Sakal Hindu Samaj RSS Friends of RSS BJP भाजपा महाराष्ट्र Hindu IT Cell #Hindutva #HinduPride #SanatanDharma #HinduUnity #HinduCulture #HinduNation #JaiShriRam #HindutvachiJid #DharmaRaksha #HinduShakti #RamRajya #VishwaHindu #HinduSanskriti #HinduYouth #DharmaSeva #HindutvaForNation

Mahesh Landge

13,782 次观看 • 1 年前

सभागृहात रम्मी खेळणारे… पैशांच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे… आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे.. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची… सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा..! Devendra Fadnavis #बेलगाम_सरकार #बेफाम_मंत्री

Rohit Pawar

52,669 次观看 • 1 年前

मराठे हसले, कोणाच्या पोटात दुखले? जरांगेची भूमिका आपल्याला पटते/ नाही पटत हा भाग वेगळा पण गावखेड्यातून मराठ्यांची पोरं आबाळ होत असताना मुंबईत आली. वर्षभर शेतकरी म्हणून हाल अपेष्टा आहेतच. जरांगेनसोबत आल्यानंतर थोडं मुंबईत फिरले, बघितलं, आनंद घेतला तर इतरांच्या पोटात का दुखतंय? ते काय इराण/ पाकिस्तानातून आलेले नाहीत. आपलेच भाऊबंद आहेत. मुंबई त्यांची पण आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आले म्हणून काय त्यांनी सतत रडवेला चेहरा करून माहेरची साडी मधली अल्का कुबल व्हावं का? आव्हानं, संकट, अनिश्चितता पाचवीलाच पूजलीये. त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाहीच.. पण आरक्षणाच्या मागणीसाठी चूल बंद करत पोटाला चिमटा काढत मराठे मुंबईत आलेयत. 2 ठिकाणं फिरले, ठेका धरला, आनंद घेतला आणि शांतपणे आरक्षण मागितलं तर यात चुकीचं काय? बाया बापड्या म्हाताऱ्यानी नुसते मुंबईचे स्वप्न बघितले आहेत.. कधी यायची हिम्मत झाली नाही. जरांगेच्या एका हाकेवर आहे नाही तेव्हड बळ एकवटून हे गोर गरीब मुंबईत अलेयत... आज कुठं थांबणार, कुठं खाणार याचीही खात्री नाही. आयुष्यात डोंगराएव्हढ्या समस्या असताना आंदोलनासारख्या गोष्टीत थोडं समाधान आनंद शोधत असतील तर शोधू द्या की. कोणीतरी आपल्या त्रासावर फुंकर घालतय , कोणीतरी आपल्यासाठी उभं राहत्य, कोणीतरी आपल्याला न्याय देतंय आणि हे निर्णायक टप्यावर आलं याचा हा आनंद आहे. त्यांना बघून नाक मुरडण्यासारखा निचपणा दुसरा नाही. - सौरभ कोरटकर #jarangepatil #MarathaReservation

Saurabh Koratkar

46,947 次观看 • 1 年前

“... मुलांवर हिंदी भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं , अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका. उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला ) येतील.... राज ठाकरे ।

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

16,482 次观看 • 1 年前

नाद निराळा ३२ शिराळा…🐍 सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा येथील नागपंचमी उत्सव जगप्रसिद्ध आहे. येथील जिवंत नागांच्या पूजेची परंपरा सुमारे १२०० वर्षांपासून चालत आलेली आहे. नागपंचमी हा सण शिराळा मध्ये नागाची पूजा यासाठी जगप्रसिद्ध होता पण हे सर्व अपेक्षित नव्हते. याच नाही तर कोणत्याच हिंदू संस्कृती सणाला हे असले अश्लील वर्तन करणाऱ्या बारबाला नाचवलं नाही पाहिजे.. यांना पैसे देऊन नाचवून आपली संस्कृती गहाण ठेवण्यापेक्षा खरच ज्यांना गरज आहे अशा ठिकाणी मदत करून चांगले कार्य केले पाहिजे. लाज वाटली सगळे व्हिडिओ बघून खरच हिंदू धर्म आपण जपतोय का ? महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय का ? हेच कळत नाही 💔🥲 (1/6) #32shirala #nagpanchami #MaharashtraPolitics

Sachin More

15,856 次观看 • 1 个月前

धुळ्यातील साक्री तालुक्यात होणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी #आदिवासी कुटुंबांची #झोपडी मध्ये येत असल्याने ती जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करून जाळण्यात आली. ही सत्तेची मस्ती नाही का? इंग्रजांना आणि मुघलांनाही लाजवेल एवढी सत्तेची मस्ती आज सत्ताधारी करत आहेत. अशाप्रकारे आदिवासी कुटुंबाच्या संसाराची होळी केली जात आहे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब, Devendra Fadnavis साहेब, Ajit Pawar दादा आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी या आदिवासी कुटुंबाला विस्थापित केलंय, उद्या आपण याठिकाणी येणारच आहात तर या कुटुंबाचं पुनर्वसन आपण करायलाच पाहिजे. या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर सरकार केवळ भंपकबाजी करतंय, हे सिद्ध होईल. #मोठ्याचा_आला_गाडा_गरीबाचे_झोपडे_मोडा

Rohit Pawar

28,289 次观看 • 2 年前