Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलावीत, अशी सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली...

13,716 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

9 Kommentare

Profilbild von Many Roy
Many Royvor 2 Jahren

pehle paan aur gutka to band karwao Mumbai me

Profilbild von ajit gholam
ajit gholamvor 2 Jahren

जिथे कंट्रक्शन काम चालू आहे तिथे काय नियोजन आहे?

Profilbild von Kanojiya
Kanojiyavor 2 Jahren

@mybmcWardN जय हिन्द सोसायटी के पास पार्कसाइड विक्रोली वेस्ट @mybmc काम करके चलें गए मलबे वहीं पड़े हैं जिससे धूल मिट्टी उड़कर दुकानों में जा रहे हैं और गाड़ियों को आने-जाने में तकलीफ हो रही है कृपया उठाने की कृपा करें @mybmcWardN

Profilbild von AditiCoelho
AditiCoelhovor 2 Jahren

First start teaching ur BMC employee that they also need to follow the rules which they have created . The one who r creating r disrespecting the rules. Marathit sangaych mhanje “ dhabyavar basvale ahet sagle rules a BMC aadhikaryani “

Profilbild von Prakash Belwade-Patil
Prakash Belwade-Patilvor 2 Jahren

@mybmcWardHW

Profilbild von Anil Gupta
Anil Guptavor 2 Jahren

Pls ask to do same in kdmc area which is also affected by noise & air pollution. @KDMCOfficial

Profilbild von Balasaheb G Kulkarni
Balasaheb G Kulkarnivor 2 Jahren

पाण्याचा दुरूपयोग

Profilbild von Nikhil Waikul
Nikhil Waikulvor 2 Jahren

Aadhi anadhikrut aslela gutka jo bindass viktayt na to bund karun dakhva tya shivay kahi nahi honar. Sagle bhampak ahe tumhi je dakhvtay te svach sarvekshan n all.

Profilbild von Sagar
Sagarvor 2 Jahren

great effort 👌 proud 👏

Ähnliche Videos

🧹बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात व्‍यापक स्‍तरावर संपूर्ण स्‍वच्‍छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्‍याचे नियोजन केले आहे. 🎀या मोहिमेचा शुभारंभ मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्‍या उपस्थितीत आज सकाळी जी उत्‍तर विभागातील धारावीमधून तसेच डी विभागात देखील करण्‍यात आला. या मोहिमेची ही क्षणचित्रं… 🔹मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, प्रभारी महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह संबंधित उप आयुक्त, सहायक आयुक्त व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. #BMCUpdates #DeepCleaningDrive #संपूर्णस्वच्छतामोहीम CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha Iqbal Singh Chahal Ashwini Bhide Dr Sudhakar Shinde WARD GN BMC WARD FN BMC WARD D BMC

माझी Mumbai, आपली BMC

56,351 Aufrufe • vor 2 Jahren

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे दर आठवड्यात एक दिवस प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येत आहे. या अंतर्गत मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये होत असलेल्या कामांची मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज ठिकठिकाणी भेट देवून पाहणी केली. या दौऱ्याची ही चित्रफित.. राज्‍याचे कौशल्‍य विकास, उद्योजकता व नाविन्‍यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, खासदार श्री. मनोज कोटक, खासदार श्री. राहुल शेवाळे, आमदार श्री. राम कदम, आमदार श्री. कालिदास कोळंबकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. #BMCUpdates #DeepCleaningDrive #संपूर्णस्वच्छतामोहीम CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha Manoj Kotak Rahul Shewale - राहुल शेवाळे Ram Kadam MLA Kalidas Kolambkar Iqbal Singh Chahal Ashwini Bhide Dr Sudhakar Shinde

माझी Mumbai, आपली BMC

11,068 Aufrufe • vor 2 Jahren

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने दर आठवड्याच्‍या शनिवारी प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) हाती घेतली आहे. या अंतर्गत मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये होत असलेल्या कामांची मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज ठिकठिकाणी भेट देवून पाहणी केली. या दौऱ्याची ही चित्रफित.. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, खासदार श्री. गोपाळ शेट्टी, आमदार श्री. अमीत साटम, आमदार श्री. पराग अळवणी, आमदार श्री. राम कदम, आमदार श्री. पराग शहा, आमदार श्री. प्रकाश सुर्वे, माजी मंत्री श्री. दीपक सावंत, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त व अधिकारी, तसेच मान्यवर यावेळी उपस्थित होते. #BMCUpdates #DeepCleaningDrive #संपूर्णस्वच्छतामोहीम CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha Gopal Shetty Ameet Satam parag alavani Ram Kadam Prakash Surve - प्रकाश सुर्वे Parag Shah Iqbal Singh Chahal

माझी Mumbai, आपली BMC

12,350 Aufrufe • vor 2 Jahren

🔹चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान म्हैसूर कॉलनीजवळ अडकलेल्या मोनो रेलमधून, आतापर्यंत सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका केली आहे. उर्वरित प्रवाशांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरु आहे. 🔹घटनास्थळी महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकांसह उपस्थित होते. मोनोरेलमध्ये अस्वस्थ वाटलेल्या सहा जणांवर रुग्णवाहिकेत जागीच उपचार करुन नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. 🔹सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांच्या सेवेसाठी 'बेस्ट 'च्या बसेस तैनात करण्यात आल्या होत्या. सदर प्रवाशांना या बसेसमधून मार्गस्थ करण्यात आले. 🔹महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमीत सैनी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यावर देखरेख केली व कार्यवाहीला वेग दिला आहे. #MumbaiRains #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha

माझी Mumbai, आपली BMC

129,828 Aufrufe • vor 1 Jahr

सेवा क्षेत्रासाठी (Service Area) अनिवार्य मोकळ्या जागेचा (Compulsory Open Space) वापर करून त्यावर अनधिकृत आच्छादन करणाऱ्या हॉटेलविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. त्यानुसार, संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात ही कारवाई करण्यात येत आहे. या निर्देशानुसार के पश्चिम विभाग कार्यालयाच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्ग आणि ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील नामांकित हॉटेलची वाढीव बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. तसेच, वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. उपायुक्त (परिमंडळ ४) श्रीमती भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी (दिनांक ९ जून २०२६) ही कारवाई केली. आरोग्य विभाग (MOH), अनुज्ञाप्ती विभाग (license), अग्निशमन विभाग (Fire) व बांधकाम व कारखाना विभाग (B&F) यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी (पश्चिम) येथील वीरा देसाई रोड व ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील What’s Your Bahana, Trov9, Juliet आणि Yazu या हॉटेलांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोग्य व परवाना विभागामार्फत २४ खुर्च्या, १ कुकिंग रेंज, मायक्रोवेव्ह ओव्हन, ३ कूलर्स, १ इलेक्ट्रिक फ्रायर व २ स्पीकर्स जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान विभागीय अधिकारी-कर्मचारी, मजूर व अग्निशमन दलाचे कर्मचारी मिळून एकूण २० मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. तसेच, जेसीबी यंत्रसामग्रीचाही वापर करण्यात आला. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

65,796 Aufrufe • vor 4 Monaten

🔹ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती आश्विनी भिडे यांनी श्री. भूषण गगराणी यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज स्वीकारला. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

14,101 Aufrufe • vor 6 Monaten

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाई य. ल. नायर धर्मादाय रूग्णालयाच्या माध्यमातून 'विशेष मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र' साकारण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा परिसरात पाच मजली इमारतीत साकारलेल्या या केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे तसेच कुमारी बुशरा रईस शेख यांच्या संयुक्त हस्ते आज झाले. राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर; कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव, आमदार श्री. रईस शेख, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. रमाकांत बिरादार, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्राडे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. नागपाडा येथे बेलासिस मार्गावर ओझोन बिझ सेंटर, बी व सी विंग या पाच मजली इमारतीत स्थित हे केंद्र सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत तर शनिवार सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत नियमितपणे सुरू राहणार आहे. #BMC #BMCUpdates CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha Rais Shaikh Yamini Yashwant Jadhav Yashwant Jadhav - यशवंत जाधव Iqbal Singh Chahal Dr Sudhakar Shinde

माझी Mumbai, आपली BMC

10,568 Aufrufe • vor 2 Jahren

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी हे सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. From the Disaster Management Control Room at the BMC Headquarters, Municipal Commissioner & Administrator Shri. Bhushan Gagrani, Additional Municipal Commissioner (City) Dr. Ashwini Joshi & Additional Municipal Commissioner (Eastern Suburbs) Dr. Amit Saini is constantly reviewing the situation. #MumbaiRains #MyBMCUpdates CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha मुंबई पोलीस Mumbai Police राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳 NDMA India | राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरण 🇮🇳

माझी Mumbai, आपली BMC

46,374 Aufrufe • vor 2 Jahren

🔹मुंबई महानगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला आज (दिनांक ४ जुलै २०२६) भेट दिली आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. 🔹महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. शरद उघडे, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) श्रीमती रश्मी लोखंडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

32,647 Aufrufe • vor 3 Monaten

🧹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून बृहन्मुंबई क्षेत्रातील स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम हाती घेण्यात आली आहे. 🔹बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रातील दृश्यमान स्वच्छता वाढवणे, उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध घालणे आणि कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांचे (GVP’s) कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहे. 🔹या अंतर्गत, मुंबईतील विविध विभागांमध्ये आज सखोल स्वच्छता करण्यात आली. #mybmcupdates #CleanlinessDrive CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

37,268 Aufrufe • vor 2 Monaten

🔷 पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत. नागरिकांना या दोन्ही बाबी शुद्ध व गुणवत्तापूर्ण पद्धतीने मिळत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विश्लेषक प्रयोगशाळा कार्यरत आहे. 🔷 दादर येथील ‘जी उत्तर’ कार्यालयातील महानगरपालिका विश्लेषक प्रयोगशाळेत दरवर्षी सुमारे ७० हजारांहून अधिक पाणी आणि अन्नाचे नमुने तपासण्यात येतात. प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले आहेत. 🔷अत्यंत अल्प दरात तसेच अवघ्या २४ तासांत पाणी तपासणी अहवाल वापरकर्त्याच्या मोबाईल आणि ईमेलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा प्रयोगशाळेच्या माध्यमातून देण्यात येते. 🔷नागरिक तसेच व्यावसायिक आस्थापनांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

25,262 Aufrufe • vor 3 Monaten

🔷PARTICIPATE MUMBAI प्रकल्पाचे लोकार्पण आणि बृहन्मुंबई महानगरपालिका-समग्र संस्था यांच्यात सर्वसमावेशक करार मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिका सभागृह येथे आज करण्यात आला. 🔷यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सह पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उप महापौर श्री. संजय घाडी, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे उपस्थित होते. 🔷'Participate Mumbai' या प्रकल्पाचा मुख्य उद्देश महानगरपालिकेच्या नागरी गरजा आणि उद्योग, CSR संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांमधील उपलब्ध क्षमता यांच्यामध्ये एक सुसूत्र आणि परिणामकारक दुवा निर्माण करणे आहे. त्यासोबतच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उद्याने, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि इतर नागरी क्षेत्रामध्ये अनेक विकासात्मक गरजा आहेत. उद्योग क्षेत्राकडे कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून योगदान देण्याची मोठी क्षमता उपलब्ध आहे. 🔷समग्र मुंबईतील १.३ कोटींहून अधिक नागरिकांना नागरी सेवा पुरविणारी बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा वितरण अधिक जलद, सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी व्यापक सुधारणा राबवत आहे. त्या अनुषंगाने शासन व्यवस्थापन आणि सार्वजनिक सेवा सुधारणा क्षेत्रात कार्यरत Samagra या संस्थेसोबत महानगरपालिकेकडून सामंजस्य करार करण्यात आला. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

16,407 Aufrufe • vor 3 Tagen

💐🪷बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे 'मुंबई पुष्पोत्सवाचे' अर्थात 'वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले आहे. मुंबईकरांनी दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून या रंगीबेरंगी फुलांच्या सुंदर दुनियेचा आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी केले आहे. 🌺🌼 🗓️३१ जानेवारी २०२५ ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या या पुष्पोत्सवाला नक्की भेट द्या. 🌷🥀 📍वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा (पूर्व) 🕗सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha @mybmcGardens

माझी Mumbai, आपली BMC

73,239 Aufrufe • vor 1 Jahr