Loading video...

Video Failed to Load

Go Home

मुंबईकरांची सेवा करणाऱ्या डब्बेवाल्यांची स्वप्नपूर्ती! तुमच्या अथक प्रयत्नांना आलेले हे यश आहे! खूप खूप अभिनंदन! #MumbaiDabbawala #Maharashtra #Housing

228,188 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

Pranit Rane's profile picture
Pranit Rane2 years ago

खूप अभिनंदन

महिपाल चौधरी's profile picture
महिपाल चौधरी2 years ago

शुभकामनाएं बहुत मेहनत के बाद यह सब हुआ है

Pranit Rane's profile picture
Pranit Rane2 years ago

खूप छान साहेब

ThoughtStorm's profile picture
ThoughtStorm2 years ago

Deva bhau kadak

Prashant K Gosavi's profile picture
Prashant K Gosavi2 years ago

धन्यवाद देवाभाऊ 🙏

PAWAN Bhagat's profile picture
PAWAN Bhagat2 years ago

Great leader

Simran kumari's profile picture
Simran kumari2 years ago

Best

Priya pujari's profile picture
Priya pujari2 years ago

Great

Neha Kulkarni's profile picture
Neha Kulkarni2 years ago

आमचा नेता आमचा विश्वास

ThoughtStorm's profile picture
ThoughtStorm2 years ago

Ekach number

Related Videos

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिमानास्पद क्षण..! मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर 5 अनाथ मुलांची थेट PSI पदाला गवसणी! अनाथ तरुणांना शिक्षणात आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 1% आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला होता. याच आरक्षणामुळे पालकांचे छत्र हरपलेली 5 अनाथ मुले पोलीस दलात दाखल होत PSI पदावर पोहोचली आहेत. या तरुणांनी मिळवलेल्या यशामुळे अभिमानाने ऊर भरून आला. अनाथ आरक्षणाच्या माध्यमातून तरुणांच्या स्वप्नांना बळ मिळत आहे हे पाहून समाधान मिळते. या सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन व भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा! तसेच आमदार श्रीकांतजी भारतीय, तर्पण परिवार यांचेही या तरुणांना सर्वतोपरी बळ देण्याकरिता आभार व त्यांच्या सत्कार्यास मनापासून शुभेच्छा! Shrikant Tara Pandit Bharatiya Tarpan Foundation #Maharashtra #OrphanReservation

Devendra Fadnavis

97,474 views • 1 year ago

दिल्लीत विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाचं यश हे पूर्णपणे विद्यार्थी आणि युवा एकजुटीचं आहे… तसंच सत्तेच्या दहशतीला न घाबरता राज्यातील अनेक मराठी पत्रकारांनीही थेट दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन हा विषय महाराष्ट्रासह देशभरातील मराठी माणूस आणि देशवासियांसाठी कव्हर केला. या सगळ्यांचेच आभार मानायला हवेत. काही पत्रकारांना ‘गोदी मिडिया’ म्हणून आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असलं तरी ही आंदोलकांची चूक नाही आणि पत्रकारांनीही ही बाब मनावर घेतली नाही, हा त्यांच्यातील समजूतदारपणा आहे. चॅनेल किंवा वर्तमानपत्राचे मालक हे जरी सरकारच्या दबावाखाली असले तरी ग्राऊंडवर रिपोर्टींग करणारे पत्रकार हे नेहमी सत्याच्याच बाजूने असतात.. हे सत्य दाखवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतल्याचं मी स्वतः अनुभवलंय. यासोबतचत हजारो सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि छोट्या माध्यमांचे पत्रकार यांनीही खूप प्रभावी कामगिरी केली. या सर्वांचीच नावं घेणं शक्य नसलं तरी त्यांचंही योगदान मुख्य माध्यमातील पत्रकारांइतकंच महत्त्वाचं आहे, हे मान्य करतो. या सगळ्यांचेच मनापासून आभार..!

Rohit Pawar

25,020 views • 2 months ago

यंदाची दिवाळी होणार अधिकच गोड..! दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना फक्त १०० रुपयांत रवा-साखर-चनाडाळ-खाद्यतेल हे चार जिन्नसच नव्हे तर आता मैदा आणि पोहेही देण्याचा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागू न देता त्यांचा दिवाळी सण गोडधोड खाऊन आनंदात साजरा व्हावा,यासाठी राज्य सरकारने देऊ केलेला हा आनंदाचा शिधा खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन व सर्वसामान्य जनतेच्या वतीने खूप खूप धन्यवाद ! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार #आनंदाचाशिधा

Chitra Kishor Wagh

58,329 views • 3 years ago

मुलीचे स्तन पकडणे, तिच्या पायजमाची नाडी तोडणे हे बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप करण्यासाठी पुरेसे नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. या निकालामुळे माझ्यासह प्रत्येक स्त्रीला प्रचंड वाईट वाटलं… मनाला क्लेश झाले. यानिर्णयाविरूध्द देशभरात संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र अखेर आपल्या संविधानाचा विजय झाला. मा.सर्वोच्च न्यायालयाने अलहाबाद उच्च न्यायालयाच्या या आदेशावर ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्ट केलं की, “या निर्णयामुळे निकाल लिहणाऱ्यामध्ये संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो. हे पाहून आम्हाला दु:ख होत आहे. हा निर्णय लगेचच देण्यात आलेला नाही, तर 4 महिन्यांच्या कार्यकाळानंतर हा निर्णय देण्यात आला आहे. परिच्छेद 21, 24 आणि 26 मध्ये केलेले मुद्दे कायद्यात नाहीत आणि मानवतेचा अभाव दर्शवतात. आम्ही या परिच्छेदांमध्ये केलेल्या टिप्पण्यांवर बंदी घालतो.” मा. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निकाल रद्द केल्यामुळे महिलांच्या मनात जे अविश्वासाचं, असुरक्षिततेचं वादळ आलं होतं ते वादळ शमलं. श्रध्देय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचं कवच प्रत्येक नागरिकांना दिलं आहे. देशातल्या लेकींसाठी हे कायद्याचं अभेद्य अभद्य कवच त्यांचा आत्मसन्मान, त्यांची अस्मिता अबाधित ठेवणारं आहे… म्हणूनच मा. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भुमिकेमुळे आलेलं मळभ दूर झालं हे नक्की. मा. सर्वोच्च न्यायालयाचे याबद्दल खूप खूप आभार…🙏 Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan NCW Maharashtra State Commission for Women
1:37

Sensitive content

मुलीचे स्तन पकडणे, तिच्या पायजमाची नाडी तोडणे हे बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप करण्यासाठी पुरेसे नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. या निकालामुळे माझ्यासह प्रत्येक स्त्रीला प्रचंड वाईट वाटलं… मनाला क्लेश झाले. यानिर्णयाविरूध्द देशभरात संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र अखेर आपल्या संविधानाचा विजय झाला. मा.सर्वोच्च न्यायालयाने अलहाबाद उच्च न्यायालयाच्या या आदेशावर ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्ट केलं की, “या निर्णयामुळे निकाल लिहणाऱ्यामध्ये संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो. हे पाहून आम्हाला दु:ख होत आहे. हा निर्णय लगेचच देण्यात आलेला नाही, तर 4 महिन्यांच्या कार्यकाळानंतर हा निर्णय देण्यात आला आहे. परिच्छेद 21, 24 आणि 26 मध्ये केलेले मुद्दे कायद्यात नाहीत आणि मानवतेचा अभाव दर्शवतात. आम्ही या परिच्छेदांमध्ये केलेल्या टिप्पण्यांवर बंदी घालतो.” मा. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निकाल रद्द केल्यामुळे महिलांच्या मनात जे अविश्वासाचं, असुरक्षिततेचं वादळ आलं होतं ते वादळ शमलं. श्रध्देय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचं कवच प्रत्येक नागरिकांना दिलं आहे. देशातल्या लेकींसाठी हे कायद्याचं अभेद्य अभद्य कवच त्यांचा आत्मसन्मान, त्यांची अस्मिता अबाधित ठेवणारं आहे… म्हणूनच मा. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भुमिकेमुळे आलेलं मळभ दूर झालं हे नक्की. मा. सर्वोच्च न्यायालयाचे याबद्दल खूप खूप आभार…🙏 Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan NCW Maharashtra State Commission for Women

Chitra Kishor Wagh

45,472 views • 1 year ago

भारतीय जनता पक्षाचं भान आता पार सुटलं आहे. कुठल्याही मुद्द्यावरून राजकारण करणं आणि सतत रडकथा सांगणं इतकंच त्यांचं राजकारण उरलं आहे. श्री. अमित ठाकरे आणि श्री. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या भाजप महाराष्ट्राला जर इतिहासात त्यांच्या नेत्यांकडून अनावधानाने झालेल्या चुका दाखवायच्या ठरवल्या तर अनेक पोस्ट्स टाकणं शक्य आहे. पण मुळात काहीतरी सुमार मुद्द्यावरून राजकारण करणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण नाही. पण तरीही कधीकधी आठवण करून द्यावी लागते म्हणून एक झलक इथे जोडत आहोत. विषय निघालेच तर खूप काही उकरून काढणं शक्य आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक आब आणि ठहराव आहे म्हणून फक्त एक झलक जोडत आहोत. #Nationalanthem #NarendraModi #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

11,852 views • 18 days ago

माझ्या मतदारसंघातील सुपे (ता.कर्जत) येथील विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना एका अडलेल्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली. मुंबईत लोकलने प्रवास करत असताना राम मंदिर रेल्वे स्टेशन वर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं. जवळ कुणी डॉक्टर नव्हता आणि संबंधित महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्सही उपलब्ध होत नव्हती. परंतु प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या या महिलेची अवस्था न पहावल्याने विकासने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन तिच्या सूचनेप्रमाणे यशस्वीपणे प्रसूती केली आणि वेदनांमधून त्या आईची सुटका केली. इथं जात-धर्म न पाहता माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्याच्या या धाडसाचं आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं मनापासून कौतुक वाटतं. या कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन! #माणुसकी_हाच_धर्म

Rohit Pawar

17,008 views • 11 months ago

गोड बोलून केसाने गळा कापणारे “देवेंद्र फडणवीस” किती सहज बोलताहेत मी माझ्या विरोधकांना माफ केलं. माननीय देवेंद्र फडणवीस आज जो काही राजकारणाचा चिखल झालाय तो मागच्या दहा वर्षात झालाय हे आपण विसरताय. सोशल मिडीयावर तुम्हाला ट्रोल केलं यांचे विक्टिम कार्ड खेळताय तर तुमच्या माहितीसाठी सांगतो जी “टीम देवेंद्र” सोशल मिडीयावर नंगानाच करतेय ती कोणाच्या वरदहस्ताने करतेय सांगाल का? आम्ही तर मागच्या दोन वर्षात सोशल मिडीयावर वर ट्रोलिंग सुरू केली. पण मागच्या १२-१५ वर्षांपासून जी भाजप आयटी सेल विरोधी नेत्यांचे विकृतीकरण करत आहे त्यावर तर तुमच्या कधी भावना दुखावल्या गेल्या नाहीत. आज जेव्हा तुमची ट्रेनिंग सुरू झाली तर तुम्हाला विरोधक आणि ट्रोलर दिसायला लागले. खूप जास्त साळसुदपणाचा आव आणला म्हणजे माणूस खूप चांगला होतो असं बिलकुल नाही. मागच्या दहा वर्षात तुम्ही काय थराचे घाणेरडे राजकारण खेळताय ते जाणून आहोत आम्ही. आम्ही शांत तेव्हाच बसू जेव्हा तुमची आयटीसेल शांत बसेल तसं जर होणार नसेल तर मागच्यापेक्षा जास्त ट्रोलिंग केली जाईल.

गजाभाऊ

70,012 views • 1 year ago

मुंबईच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात, मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा 🚩 मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजप नगरसेविका सौ. रितुताई तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेना नगरसेवक श्री संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आज मुंबई महानगरपालिका सभागृहात सौ. रितुताई तावडे यांनी महापौरपदाचा तर श्री. संजय घाडी यांनी उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी तसेच मुंबई भाजप अध्यक्ष श्री अमित साटम जी यांच्यासमवेत उपस्थित राहून नूतन महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित महापौर मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनासाठी तसेच नागरिकांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करतील, असा मला दृढ विश्वास आहे Devendra Fadnavis CMO Maharashtra @devendra_fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ameet Satam Ritu Tawde @ritu_tawde_bjp_official sanjay ghadi-संजय घाडी #BMCMayor #BJPMumbai #मुंबई_महापौर_२०२६

Manoj Kotak

102,615 views • 7 months ago

विदर्भातील 11 जिल्हे आणि त्यातील 120 तालुक्यांची नावे मुखोदगत असलेला सहावीत शिकणारा अनिकेत रवींद्र पांडे... नद्या आणि त्यांची उगमस्थाने सांगणारा, विभागश: जिल्ह्यांची नावे सांगणारा दुसरीतील सुदीप दीपक पांडे... अशी अनेक उदाहरणे अलिकडे माझ्या पाहण्यात आली. अभ्यासाव्यतिरिक्त सामान्य ज्ञानाचा हा पाठांतरक्रम थोडा वेगळा आणि मनाला सुखावणारा वाटला. सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ माझ्या पाहण्यात आले. यवतमाळच्या जिल्हाधिकार्‍यांकडून मी माहिती घेतली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, एकंबा, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील हे विद्यार्थी आहेत. अविनाश नारवाडे त्यांचे शिक्षक आहेत, तर कल्याण बोबळे हे तेथे मुख्याध्यापक आहेत. समस्त शिक्षकवृंद आणि या प्रतिभाशाली विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. 900 लोकसंख्या असलेल्या या गावातील हे अस्सल हिरे आहेत. शिकत रहा आणि खूप मोठे व्हा... माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत आहेत...! #Maharashtra #Vidarbha #Education

Devendra Fadnavis

59,372 views • 1 year ago

आता ही बया नाचते आहे पण हिच्या मागे महाराष्ट्रातल्या कोणत्या मोठमोठ्या नेत्यांचे चेहरे दिसतायत? आहे की नाही गंमत ! हे असले नाच झालेल्या बऱ्याचशा मंचांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार खासदार, नगरसेवक, महिला प्रतिनिधी सगळे जाऊन आलेले आहेत. का नाही प्रत्येक पक्षाचे मोठे नेते आपल्या मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, लोकप्रतिनिधींना एक बैठक घेऊन सांगत की तुमच्या मंचावर संस्कृती संवर्धनाच्या नावाखाली , पारंपारिक सण उत्सव यांच्या नावाखाली असलं काही झालं तर आम्ही तुमच्या मंचावर पाऊल ठेवणार नाही. गर्दीचा मोह इतका मोठा असतो का? आणि या दहीहंडी आयोजकांचे कार्यकर्ते खूपच म्हणजे खूप सोवळे असतात बरं का! शिवशिवत्या दातांनी, हातांनी लावणी पाहून झाली की ते बॅकग्राऊंडला गाणं कुठलं वाजवतात तर,' गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा' तान्ह्या बाळापुढे असले नंगे नाच. खरं म्हणजे वृत्तवाहिन्यांनी या संदर्भात वार्तांकन करताना पुढील प्रमाणे करायला हवं:- 'दहीहंडीच्या पावन मुहूर्तावर जास्तीत जास्त अश्लील नृत्य आपल्या मंचावरून कसे दाखवले जाईल याबाबत मोठमोठ्या नेत्यांमध्ये व लोकप्रतिनिधींमध्ये याही वर्षी चुरस लागली होती. राम कदमांनी याही वर्षी धुरळा उडवून दिला होता, पण ऐनवेळी प्रकाश सुर्वे हिरीरीने मैदानात उतरले आणि जवळपास बाजी मारली. अगदी शिवेंद्र राजेंकडचा फोटोसुद्धा आपण या स्पर्धेत आहोत हे सांगून जाणारा आहे.' नक्की पहा आणि फुलं वहा. ठाण्यात एकाने तर नुसत्या गोविंदा पथकाच्या सरावाला गौतमी पाटीलला नाचायला बोलावले होते आणि गाणं होतं चोली के पीछे क्या है! वाह उस्ताद मान गये. 🫰🫰👌👌 असो. जगनियंत्या योगेश्वराचं मन खूप मोठं आहे. त्याचा हा एक श्लोक आठवूया आणि पुढच्या दहीहंडीसाठी स्वतःला तयार करूया. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः । न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ :- भगवद्गीता १६.७ अर्थ: असुरी प्रवृत्तीचे लोक काय केले पाहिजे व काय सोडले पाहिजे हे जाणत नाहीत. चांगला आचार, विचार, शिष्टाचार, बाह्य व आंतरिक पवित्रता या गोष्टींचा अभाव या लोकांमध्ये आढळतो. (किमान देवाचं नाव घेऊन साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये वरील गोष्टी दिसू नयेत एवढी अपेक्षा या कलियुगात आपण नक्कीच ठेवू शकतो. बाकी आपण सगळे मर्त्य मानवच आहोत आणि कुठल्या ना कुठल्या रूपात असूर प्रत्येकामध्ये आहेच.) --शिवानी गोखले #Detached #Maharashtra

SHIVANI GOKHALE 🚩

29,479 views • 22 days ago