Loading video...

Video Failed to Load

Go Home

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा

12,827 views • 7 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

"पुस्तकं वाचलीत तरच तुम्ही सुसंस्कृत व्हाल. मी लहानपणापासून मिळतील ती पुस्तकं वाचत, पुढे उत्तमोत्तम साहित्य वाचत गेले यामुळे माझी भाषा समृद्ध होत गेली. मराठी भाषा टिकवायची असेल तर घरात मुलांशी मराठी बोललं पाहिजे. आई बाळाला जेंव्हा गुटी देते, दूध पाजते त्यावेळेस ती त्याला भाषेचे बाळकडू पण देत असते. इंग्रजी शिकलं पाहिजे पण म्हणून मातृभाषा सोडून द्यायचं असं नाही. मराठी शाळांमध्ये एक तास मराठी पुस्तक वाचनाचा असला पाहिजे." २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मराठी पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घटनानंतर, काव्य वाचन सोहळ्यात बोलताना आशाताईंनी मराठी भाषेबद्दलच्या या भावना व्यक्त केल्या. #अभिजात_पुस्तक_प्रदर्शन२०२५

Raj Thackeray

27,179 views • 1 year ago