Loading video...

Video Failed to Load

Go Home

भाषा माझी #मराठी ❤️ कुसुमाग्रजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻 मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!! 💐💐💐 #मराठीभाषागौरवदिन

10,466 views • 7 months ago •via X (Twitter)

14 Comments

Hemant Nagrekar's profile picture
Hemant Nagrekar7 months ago

@Rashtrabhasha_

शुभांगी - मी मराठी ❤️'s profile picture
शुभांगी - मी मराठी ❤️7 months ago

@Rashtrabhasha_ 🙏🏻🚩

Hemant Nagrekar's profile picture
Hemant Nagrekar7 months ago

@Rashtrabhasha_ 🙏🙏🙏

प्रमोद's profile picture
प्रमोद7 months ago

“मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी भाषा — आपली खरी संपत्ती!” मराठी भाषा दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!

शुभांगी - मी मराठी ❤️'s profile picture
शुभांगी - मी मराठी ❤️7 months ago

🙏🏻🚩

Dattatray's profile picture
Dattatray7 months ago

तुमची रेखाटणं अप्रतिम असतात. मराठीचा जाज्वल्य अभिमान प्रकटला या चल चित्रांतून आणि शब्दातून. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभांगी - मी मराठी ❤️'s profile picture
शुभांगी - मी मराठी ❤️7 months ago

🙏🏻🚩

Gia's profile picture
Gia7 months ago

खूप छान व्हिडिओ बनवले आहे 👏👏👏

𝘋𝘦𝘷𝘦𝘯𝘥𝘳𝘢𝘱𝘢𝘵𝘪𝘭𝘙𝘢𝘫𝘱𝘶𝘵's profile picture
𝘋𝘦𝘷𝘦𝘯𝘥𝘳𝘢𝘱𝘢𝘵𝘪𝘭𝘙𝘢𝘫𝘱𝘶𝘵7 months ago

हार्दिक शुभेच्छा 👌👍

Dr Vidya Deshmukh's profile picture
Dr Vidya Deshmukh7 months ago

👌🏻👌🏻

शुभांगी - मी मराठी ❤️'s profile picture
शुभांगी - मी मराठी ❤️7 months ago

❤️🙏🏻

मंगेश मोहिते's profile picture
मंगेश मोहिते7 months ago

@NZadekar #मराठीप्रथम जय महाराष्ट्र!!!

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम्।'s profile picture
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम्।7 months ago

इंग्लंडला गेल्यावर लिहिणार इंग्रजीच्या रोमन लिपीत, पण मराठी. मित्र अचानक सामाजिक माध्यमाच्या टिप्पणीत भेटले आणि पडायचा तो प्रश्न पडला. “हीच जागा मिळाली का?”. असे आपण मराठी, आज आपणच आपले आणि एकमेकांचे कौतुक करूया, मराठी असल्याबद्दल! मराठी भाषा गौरवदिनाच्या मराठीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा

sukhwant Singh's profile picture
sukhwant Singh7 months ago

रांड मराठी...

Related Videos

"पुस्तकं वाचलीत तरच तुम्ही सुसंस्कृत व्हाल. मी लहानपणापासून मिळतील ती पुस्तकं वाचत, पुढे उत्तमोत्तम साहित्य वाचत गेले यामुळे माझी भाषा समृद्ध होत गेली. मराठी भाषा टिकवायची असेल तर घरात मुलांशी मराठी बोललं पाहिजे. आई बाळाला जेंव्हा गुटी देते, दूध पाजते त्यावेळेस ती त्याला भाषेचे बाळकडू पण देत असते. इंग्रजी शिकलं पाहिजे पण म्हणून मातृभाषा सोडून द्यायचं असं नाही. मराठी शाळांमध्ये एक तास मराठी पुस्तक वाचनाचा असला पाहिजे." २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मराठी पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घटनानंतर, काव्य वाचन सोहळ्यात बोलताना आशाताईंनी मराठी भाषेबद्दलच्या या भावना व्यक्त केल्या. #अभिजात_पुस्तक_प्रदर्शन२०२५

Raj Thackeray

27,179 views • 1 year ago

मराठी भाषा गौरव दिन..... कविवर्य कै. विष्णू वामन शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन‘ साजरा केला जातो. मराठी भाषेचा इतिहास हा कैक शतकांचा इतिहास आहे. तिची जडणघडण, तिच्यातील बोली, व्याकरण आणि शब्दसिद्धी उत्तरोत्तर बहरत गेली आहे. भाषेचे वहन सामान्य माणूस आणि प्रतिभासंपन्न साहित्यिकांच्या एकत्रित यत्नांनी होत असते. मराठी भाषेची वाटचाल पाहता, अनेक लेखक, कवी, नाटककार, निबंधकार, पत्रकार, समीक्षक आणि तितक्याच सापेक्षी वाचकांनी तिच्या उन्नतीत भरघोस योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहारकोषाच्या माध्यमातून मराठीवरील फारसी भाषेचे आक्रमण थोपवून धरले. आज हिंदी व इंग्रजीचा आक्रमक विस्तार तसेच नुकसान करू पाहते आहे. त्यामुळे मराठी भाषेतील कथा, कादंबऱ्या, नाटके, निबंध आणि कविता यांच्या वाचनाची आवड नव्या पिढीत निर्माण करणे हे जरुरीचे कर्तव्य झाले आहे. मराठी बोलणे आणि लिहिणे हा आपल्या जीवनक्रमाचा मूलभूत भाग करण्याचा संकल्प यानिमित्ताने सोडणे आणि त्यावर अंमल करणे गरजेचे आहे. मराठी भाषा आणि मराठी नागरिकांना उदंड यश लाभो, या सदिच्छेसह ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !! #मराठीसाहित्य #मराठीलेखणी #marathi #maharashtra

Shekhar

20,705 views • 7 months ago

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।

Raj Thackeray

98,502 views • 7 months ago

"भाषा बोलणे, ऐकणे, समजणे इतपर्यंत मर्यादित नाही. भाषा तुमची ओळख आहे, संस्कृती आणि इतिहासाशी त्याच नातं असतं. जगाशी संपर्क ठेवण्यासाठी इंग्रजी येणं जरी आवश्यक असलं तरी स्वतःची ओळख आणि पाळंमुळं घट्ट फक्त मातृभाषाच ठेवू शकते." २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरमराठी पुस्तक प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्या प्रदर्शनाच्या उदघाट्न सोहळ्याच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पटकथा लेखक श्री. जावेद अख्तर यांनी मातृभाषा का जपली पाहिजे, वृद्धिंगत केली पाहिजे हे विशद करणारं एक अप्रतिम भाषण केलं. #अभिजात_पुस्तक_प्रदर्शन२०२५

Raj Thackeray

83,392 views • 1 year ago

आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती. तेंव्हा श्री. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती. माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार. मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत... • भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा. • या भाषेत प्राचीन साहित्य हवं. • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. •'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. २०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी श्री. रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो... तर, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील... •मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल. •भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल. •प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल. •महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील. •मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल. * प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल. * अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल. या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता. जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे. पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन... राज ठाकरे ।

Raj Thackeray

147,848 views • 2 years ago