正在加载视频...

视频加载失败

राज्यात #पेपरफुटीमुळे युवांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे अन् राज्याचे गृहमंत्री सभागृहात म्हणतात की पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय... म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का? पेपरच फुटले नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? नेमकं गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही कुणाला वाचवण्यासाठी खोटं बोलत आहात? या आणि...

25,410 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

9 条评论

Shrikant 的头像
Shrikant2 年前

पेपर फुटीचा कायदा ग्रूप C पदे MPSC कडे वर्ग ह्या दोन गोष्टी फडणवीस सरकार करेल.पण, वन संरक्षक तलाठी नगर परिषद जलसंपदा आरोग्य विभाग PWD भरती मृदा जलसंधारण या भरती प्रक्रियेत झालेले घोटाळे विसरू नका. विद्यार्थ्यांनो #सिरियस व्हा.. विधानसभेत आपली ताकद दाखवा.

Shekhar 的头像
Shekhar2 年前

#पेपरफुटी विरोधात कठोर कायदा करावाच लागेल.. गरज झालीय आता.

तुषार नेटके 的头像
तुषार नेटके2 年前

अरे बाबा तू दोन तोंडी आहेस सत्ता नसली की प्रेम दिसत, सत्ता असली की प्रश्न पण दिसत नाही..

Akash 的头像
Akash2 年前

तलाठी परीक्षा रद्द कुठे झाली अध्यक्ष महोदय... आणि परत कधी घेणार आहेत

Radhika Phalake 的头像
Radhika Phalake2 年前

Saheb राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया चुकीच्या नियम लाऊन केली जात आहे. अचानक टीईटी 55,60 नियम लाऊन मागासवर्गीय मुलांना ओपन पासून वंचित ठेवले आहे, आणि ओपन चे मेरिट कमी आणि मागासवर्गीय यांचे मेरिट high लागले आहे, त्यामुळे गुणवत्तेला डावलून fact open, EWS चीच भरती झाली आहे, लक्ष द्या

Akshay sarkate 的头像
Akshay sarkate2 年前

Rohit dada, कायदा तर काढतील, पण कायदा अंमलात आणतील का हा पण प्रश्न आहे.

D ASHISH 的头像
D ASHISH2 年前

Talathi rate 25 Lakh Supply Inspector Rate 30-35 Lakh

Pravin Bahir 的头像
Pravin Bahir2 年前

@RRPSpeaks @Dev_Fadnavis लोकसभेला बसलेला फटका कमी पडायला वाटत... विधानसभा अजून बाकी आहे... खुशाल सभागृहात आपण खोटं बोलत आहात फडणवीस साहेब

Viresh Swami 的头像
Viresh Swami2 年前

साहेब तलाठी भरती घोटाळा, नगरपरिषद भरती घोटाळा, अन्न व पुरवठा भरती घोटाळा च काय झाले, आता विधानसभा निवडणूक जवळ आले असताना आम्हाला स्नॅक्स देण्यात येत आहे😕

相关视频

शासन नेमकं कोणाच्या दारी ? शेळी कबुतरे चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलीत आणि एक मराठा मुलांना अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध करतो. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे, गृहमंत्री सुद्धा भाजपचे आहे. ते स्वतः दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील की हे प्रकरण सुद्धा इतर प्रकरणांप्रमाने दाबण्यात येईल ? दलित, ओबीसी, आदिवासी भाजपमध्ये वापरासाठी आहेत. त्यांना वापरा आणि फेका अशी भाजपची भूमिका आहे. उपमुख्यमंत्री,गृहमंत्री आपल्या राज्यातील अश्या घटनांकडे डोळेझाक करून जपानमध्ये मोठं मोठे वल्गना करतात. इकडे त्यांच्याच राज्यात समाज मन संतप्त करणाऱ्या अश्या दुःखद घटना घडत आहे. या घटना राज्यातील कायदा व सुव्यस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहे. या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत आणि कठोर कारवाई करण्यात यावी.अशा घटनांचा केवळ निषेध करणे पुरेसे नाही; गरज आहे ती गुन्हेगारांना शिक्षा देण्याची.

Vijay Wadettiwar

63,320 次观看 • 3 年前

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या प्रामाणिक युवांवर अन्याय होऊ नये म्हणून राज्य सरकारने पेपरफुटीविरोधात कायदा केला असला तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. किमान शिक्षेची तरतूद नसणे, दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास अधिक शिक्षेची तरतूद नसणे, हा गुन्हा करणाऱ्या संघटीत गुन्हेगारांविरोधात कठोर शिक्षेची तरतूद नसणे अशा अनेक त्रुटी त्यामध्ये आहेत. म्हणून त्यात सुधारणा करण्याच्या हेतूने विधानसभेत ‘महाराष्ट्र स्पर्धा परिक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध विधेयक २०२५’ हे खासगी विधेयक मांडले. या महत्त्वाच्या विधेयकावर सखोल चर्चा होऊन पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर आणि परिपूर्ण होण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही या विधेयकाला पाठींबा द्यावा, असं माझं आवाहन आहे. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #खासगीविधेयक #पेपरफुटी

Rohit Pawar

23,057 次观看 • 1 年前

राज्यभरातील लाखो विद्यार्थी #combine जाहीरातीची वाट पाहत आहेत. पण अद्यापही आयोगाला गृह विभागाकडून पीएसआय पदांचे मागणीपत्र सादर न झाल्याने संबंधित जाहीरातीस विलंब होत असल्याचे समोर आले आहे. खरंतर राज्यातील युवांच्या रोजगाराचा प्रश्न सोडून राज्याचे गृहमंत्री नेमकं करत काय आहेत ? हा प्रश्न आज उपस्थित होतो. राज्य सरकारने आतातरी निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर serious होऊन combine परीक्षेचा मार्ग मोकळा करावा अन्यथा आम्हाला विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरावे लागेल...ही विनंती समजा अथवा इशारा... पण आम्ही इथल्या युवांच्या रोजगारासाठी कायम कटिबद्ध आहोत… Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Maharashtra Public Service Commission #MPSC

Rohit Pawar

26,205 次观看 • 2 年前

आज मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये. मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही. आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये. आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत — हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. माध्यमं हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहेत का? कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे. आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का? मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – तिथून काही शिकून येतात का? परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही. #मुंबईलोकल #MumbaiLocal

Raj Thackeray

105,347 次观看 • 1 年前

ओऽऽऽऽऽ12मतीच्या मोठ्या ताई Supriya Sule तुमच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार गटाने महिलांच्या सुरक्षेसाठी मोठमोठ्या बाता मारल्या पण आज राज्यातील महिलांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तुमचे नेते हाड हाड यांच्यावर एका बलात्कार प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या संदर्भात एक आडिओ क्लिप देखील समोर आली आहे, ज्यात हे स्पष्टपणे ऐकायला येतंय की आव्हाड आरोपीला मदत करत होते.. तुमच्याकडून महाराष्ट्रातील जनता आता उत्तराची अपेक्षा करते. या प्रकरणात पीडित महिलेची बाजू घेण्यासाठी तुम्ही पुढे येणार आहात का..? आजपर्यंत महिलांच्या सुरक्षेसाठी लढण्याचा दावा करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपली सुरक्षा परत करण्याची घोषणा करणाऱ्या सुप्रियाताई, आता आपल्या नेत्याचा, जो एका बलात्काराच्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचं सुरक्षा कवच काढून घेणार आहात का..? तुमच्या पक्षाच्या धोरणांत महिलांच्या सुरक्षेसाठी आश्वासन दिलं जात असताना, तुम्ही अश्रू ढाळले होते. पण आता या गंभीर प्रकरणावर तुम्ही पक्षांतर्गत तरी कारवाई करणार आहात का..? किंवा हे प्रकरण अडीच वर्षांपूर्वीच आहे म्हणून तुम्ही त्यावर पांघरूण घालणार आहात..? प्रकरण जुनं असले तरी आता ते समोर आलं आहे, त्यामुळे तुम्ही यातून पळ काढू शकत नाहीत. हे लक्षात घ्या की गुन्हा करणारा जितका दोषी असतो, तितकाच त्याला वाचवणारा दोषी असतो. महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, तुमच्या लाडक्या आव्हाडांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात..? सुप्रियाताई, आज तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा केवळ भाषणांपुरता, आंदोलनापुरता मर्यादित ठेवणार आहात की खरंच आव्हाडांवर कारवाई करून महिलांना न्याय देणार आहात..? Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Chitra Kishor Wagh

22,093 次观看 • 2 年前

सत्ता आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय मार्गी लावण्याचं आश्वासन देऊन आज १० वर्षे उलटली आणि ३०० हून अधिक मंत्रिमंडळ बैठका झाल्या.. शिवाय केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असूनही धनगर आरक्षणाचा निर्णय अजूनही का होऊ शकला नाही? राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आणि केंद्राची मान्यता घेतली की लगेच प्रश्न मिटेल, असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे का? राज्यसरकारचे सकारात्मक प्रयत्न कधी फळास येतील? किमान आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पवित्र जन्मभूमी चोंडी जेथे आरक्षणाच्या लढ्याची सुरवात झाली आज त्याच पवित्र भूमीत प्रथमच होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी हा प्रश्न मार्गी लावला जाईल याची राज्यातील तमाम धनगर समाज बांधव वाट बघत आहेत. या पवित्र भूमीचे पावित्र्य लक्षात ठेवून तरी सरकार नेहमीप्रमाणे केवळ पोकळ घोषणा करून आणि आश्वासने देऊन बोळवण करणार नाही आणि दगाफटका करणार नाही, ही अपेक्षा! CMO Maharashtra

Rohit Pawar

22,006 次观看 • 1 年前