Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

वरवर दिसतोय तेवढा हा सोपा विषय वाटत नाही. याच्या मागे काहीतरी योजना आखली जात आहे. इतके वर्षापासून अशा प्रकारची कृत्य काय झाली नाही तरी आत्ताच एकदम सगळीकडे का केले जाते. घाटकोपर,दादर आता गिरगाव विरोध होतो हे माहीत असूनही परत परत अशा प्रकारे ची गोष्ट करण्याची हिम्मत कशी होत आहे.

19,102 просмотров • 2 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज स्थानिक पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही. गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे? ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही. #pressconference

Sharad Pawar

80,246 просмотров • 3 лет назад

संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले! एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी? शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ? आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!

Maharashtra Congress

81,977 просмотров • 2 месяцев назад

कदाचित मी आक्षेप घेतल्याने ….देवभाऊ टॅक्सी चे नाव नमो टॅक्सी करण्यात आले…. पण त्यात काय बदलले? नाव “नमो” असो वा “देवभाऊ” आमचा विरोध तत्त्वाला आहे. हयात राजकारण्यांच्या नावाने सार्वजनिक पैशातून योजना राबवणे अयोग्य आहे. आजच नाही, उद्याही नाही. दोन - अमित शाह यांनी नुकतीच अशीच ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू केली आहे. मग देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचा Cold War आहे का? महाराष्ट्र सरकार “भारत टॅक्सी” का आणत नाही, ह्यामागे काय कारण आहे ते फडणवीसांनी आणि दरेकरांनी स्पष्ट करावे. २८ राज्यांनी आणि ८ केद्रशासित प्रदेशांनी वेगवेगळी टॅक्सी सेवा सुरू करून कसे चालेल? भरत टॅक्सी आणा ना महाराष्ट्रात, काय प्रॉब्लम आहे? नका भांडू आपापसात . एक देशी नाव, देशी उद्देश, देशव्यापी नेटवर्क. हे जनतेच्या हिताचे आहे. राजकीय श्रेयापेक्षा जनसेवा मोठी असते, हे सरकारला कधी कळणार? माझा दुसरा आक्षेप असा आहे की, ‘देवदत्त वाहतूक व पर्यटन सहकारी संस्था’च्या बँक खात्यात शून्य रुपये आहेत. या संस्थेने गेल्या २५ वर्षांत एकदाही निवडणूक घेतलेली नाही. संपूर्ण वर्षभरात ज्या संस्थेच्या खात्यात केवळ ₹२४६ ची उलाढाल झाली, अशा एका ‘शेल’ सहकारी संस्थेचं नाव बदलून ‘नमो टॅक्सी’ ठेवल्याने तिची पात्रता बदलत नाही. मुंबई बँकेचे कर्ज जर याच संस्थेला देण्यात येणार असेल, तर आमचे सर्व आक्षेप कायम आहेत. लोकांना नावात नाही, सेवेत बदल हवा आहे.

Mrs Anjali Damania

37,920 просмотров • 2 месяцев назад