Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तातडीने होणे गरजेचे.

30,108 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von केसरी
केसरीvor 2 Jahren

अकेला देवेंद्र क्या करेगा??

Profilbild von श्री.योगेश ठाकरे
श्री.योगेश ठाकरेvor 2 Jahren

@PawarSpeaks @supriya_sule @RRPSpeaks घड्याळ तेच वेळ नवी.. एकच वादा....अजित दादा.. 🚩 @AjitPawarSpeaks ⏰✌️⏰

Profilbild von पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप
पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुपvor 2 Jahren

@supriya_sule ताई आपणास विनंती आहे की आपल्या मतदार संघातील पुणे - दौंड उपनगरीय विभाग म्हणून घोषित करण्यात यावे आणि पुणे ते दौंड दरम्यान EMU Local चालू करण्यात यावी यासाठी संसदेत मुद्दा मांडावा आणि केंद्रीय रेल्वे मंत्री @AshwiniVaishnaw @RailMinIndia यांचा पाठपुरावा देखील करावा.

Profilbild von मकरंद पाटील
मकरंद पाटीलvor 2 Jahren

टिकीट वाटपात पैसे मिळवायचा आहे .

Profilbild von संतोष दुधाळे
संतोष दुधाळेvor 2 Jahren

ताईंच्या नावापुढे ncp लागलंय ते आता शेवटच व्हिडिओ आहे 🥲🥱🤣😂

Profilbild von Nandu Pawar
Nandu Pawarvor 2 Jahren

सर्वोच्च न्यायालयात अडथळा बनलेली उबाठा शिवसेनेची याचिका काढून घ्यायला सांगा मित्र पक्षाला.

Profilbild von Aniruddha Joshi
Aniruddha Joshivor 2 Jahren

काकु माहिती घेत चला matter court मधे आहे आणि इलेक्शन इलेक्शन कमीशन घेते संसद नाही 😜

Profilbild von Minaj
Minajvor 2 Jahren

Very well researched and well narrated speech it was @supriya_sule ji🙏🏻 you are a great inspiration for women in leadership.. wishing you great success and look forward to seeing you in bigger roles of Indian politics 🙏🏻🙏🏻

Profilbild von Satish Sadaphule
Satish Sadaphulevor 2 Jahren

Because of that all Government office working fine We don't want any such election

Profilbild von 🚩!!🌹🙏दोन्हीं ही रयतेच्या मनातील राजें 🙏🌹!!🚩
🚩!!🌹🙏दोन्हीं ही रयतेच्या मनातील राजें 🙏🌹!!🚩vor 2 Jahren

अजून काही सहकारी साखर कारखाने, संस्था, सातबारा व बॅंका....शिल्लक आहेत अस दिसतयं.....!!! एकादशीला **बिर्याणी**.....संकष्टीला **मटण**.....आणि शंभर कोटींची ** वांगी**.....!!!

Ähnliche Videos

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या पर्यटन विभागाच्या वतीनं जुन्नर येथील शिवनेरी किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महादुर्ग २०२४’ महोत्सवाच्या तयारीचा आढावा आज घेतला. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. अशा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा व्हावा. पर्यटन विभागाच्या वतीनं १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान किल्ले शिवनेरीवर घेण्यात येणारा ‘महादुर्ग’ महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सामाजिक, स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून त्यांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात. यंदाच्या महोत्सवाला भेट देणाऱ्या शिवप्रेमी व दुर्गप्रेमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्यानं कायदा सुव्यवस्था राखण्यासंदर्भातही उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

Ajit Pawar

14,289 Aufrufe • vor 2 Jahren

सर्व मोकाट कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा..! आपल्या पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद चिंताजनकरीत्या वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात 8 हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. मोकाट कुत्र्यांवर कारवाई केल्यास प्राणीमित्र संघटना गोंधळ घालतात, पण जखमी नागरिकांच्या वेदनांकडे कोण लक्ष देणार? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाने तातडीने कठोर धोरण राबवण्याची गरज आहे. नाहीतर सर्व मोकाट कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा.. कारण नागरिकांची सुरक्षा सर्वांत प्रथम! #WinterSession2025 #NagpurSession #MaharashtraAssembly #PublicSafetyFirst #UrbanGovernance #StrayDogIssue #DogBiteCases #MunicipalResponsibility #SupremeCourtGuidelines #LawAndOrder #CitizenSafety #BJP #MahayutiGovernment #PimpriChinchwad #PuneCityUpdates #PolicyIntervention #UrbanDevelopment #CommunityWelfare #PublicHealthConcern #LocalBodiesAction

Mahesh Landge

128,241 Aufrufe • vor 8 Monaten

आजच्या 'एआय' AI च्या युगात तांत्रिकदृष्ट्या सतत अपडेट राहणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या वतीने खेड्यापाड्यातील इयत्ता ५ वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानावर आधारित रोबो सिम्युलेशन सॉफ्टवेअरच्या मदतीने ट्रेनिंग देण्यात आले. यामध्ये औद्योगिक रोबोटचे कार्य, प्रोग्रामिंगद्वारे मशीन नियंत्रण आणि सिम्युलेशनद्वारे प्रत्यक्ष शिक्षण यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांनी रुची घेत हे प्रॅक्टिकल यशस्वीपणे पुर्ण केले.अद्ययावत तंत्रज्ञानाची जवळून ओळख झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तार्किक विचारशक्ती व इंडस्ट्री-रेडी कौशल्यांना चालना मिळाली. हा अनुभव त्यांची भविष्यातील वाटचाल प्रशस्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल. या उपक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेला खुप खुप शुभेच्छा.

Supriya Sule

13,864 Aufrufe • vor 5 Monaten

रुग्णवाहिकेत मृ:त्यूशी झुंज देणारी एक चिमुकली आणि तिला वाचवण्यासाठी रस्त्यावर रक्ताचे पाणी करणारा एक ड्रायव्हर... तामिळनाडूमध्ये माणुसकीचे दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत असून, एका लहान मुलीची प्रकृती कमालीची खालावल्याने तिला तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवणे गरजेचे होते. प्रत्येक सेकंद त्या मुलीच्या आयुष्यासाठी महत्त्वाचा होता. अशा परिस्थितीत या रुग्णवाहिका चालकाने आपल्या जिवाची पर्वा न करता, स्टिअरिंगवर हात ठेवला आणि थेट हॉस्पिटल गाठले. रुग्णवाहिका चालकाने रस्ता फा'डून रुग्णवाहिका पळवली. वाहतुकीची कोंडी फोडत आणि वेळेचे भान राखत त्याने पूर्ण ताकदीनिशी त्या मुलीला वेळेत उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यानंतर आता त्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Shekhar

70,365 Aufrufe • vor 3 Monaten

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे.याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे. Election Commission of India

Supriya Sule

1,610,904 Aufrufe • vor 2 Jahren

विदर्भातील 'सगळ्यात मोठा' पक्ष कालही भाजपा, आजही भाजपा आणि उद्याही भाजपाच राहील! वर्धा येथे भाजपा-विदर्भच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन मेळाव्यामध्ये आज सहभागी झालो आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ही बैठक केवळ रणनीतीसाठी नव्हती, तर आपण मिळवलेल्या जनसमर्थनाच्या बळावर पुढची दिशा निश्चित करण्यासाठी होती. विधानसभा निवडणुकीत तुम्हा सर्वांच्या मेहनतीने विदर्भ पुन्हा भाजपाच्या बाजूने ठाम उभा राहिला, याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने काम सुरू केल्यापासून अनेक निर्णय घेतले, अनेक योजना राबवल्या, आणि 5 वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलल्याचे आपल्याला दिसेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. विदर्भात सिंचन, शेती, रस्ते, वीज, उद्योग आणि घरे, या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. गडचिरोलीपासून अमरावतीपर्यंत आपण औद्योगिक गुंतवणुकीपासून ते ग्रामीण विकासाच्या प्रत्येक पैलूवर लक्ष केंद्रित केले आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारचे अनेक आघाड्यांवर काम: ✅ विदर्भातील 20 वर्षांपासून रखडलेल्या 89 सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी ✅ वैनगंगा–नळगंगा प्रकल्प : 10 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार ✅ ₹2 लाख कोटींची औद्योगिक गंतवणुकीसह गडचिरोली होणार स्टील सिटी ✅ समृद्धी महामार्गामार्फत विदर्भात परिवर्तनाची नांदी ✅ अमरावती ‘PM मित्रा’ टेक्स्टाईल हब – 2 लाख रोजगार ✅ वर्धा आणि इतर भागांमध्ये नव्या औद्योगिक ईकोसिस्टम्सची उभारणी राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते, सौर कृषी वाहिनी योजनेमार्फत दिवसा वीज, प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत 30 लाख घरांसाठी मंजुरी, 1000 लोकसंख्येवरील गावांना सीमेंट रस्त्यांनी जोडण्याची योजना, हे सर्व प्रकल्प प्रत्यक्ष आकार येऊ लागले आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आपल्यासाठी विकास हीच रणनीती आहे. मात्र आपले विरोधक विकासाशी स्पर्धा करू शकत नाहीत म्हणून ते ‘फेक नॅरेटिव्ह’ तयार करतात. कधी भाषेवरून, कधी जातीवरून, तर कधी विशेष जनसुरक्षा सारख्या कायद्यावरून. पण जनतेने ठामपणे विश्वास दाखवला आहे तो विकासाच्या बाजूने, भाजपाच्या बाजूने! आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. हा आपल्यासाठी नवा संकल्प आणि विजयाचा निर्धार करण्याचा क्षण आहे, विजयाचा नवीन विक्रम स्थापित करण्याची हिच संधी आहे. भाजपा ही बजरंगबलीसारखी आहे फक्त आपली शक्ती जागृत करण्याची गरज आहे. हेच बळ आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विजयासाठी वापरायचे आहे आणि विदर्भात भाजपाचा भगवा फडकवायचा आहे! यावेळी मंत्री डॉ. अशोक उइके, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार रणधीर सावरकर, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहीर, भाजपाचे जेष्ठ नेते आमदार चैनसुख संचेती, आमदार समीर कुणावार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा महाराष्ट्र Dr.Ashok Uike Pankaj Rajesh Bhoyar Randhir Sawarkar Hansraj Ahir Chainsukh Sancheti MLA Samir Kunawar #Maharashtra #Vidarbha #BJP

Devendra Fadnavis

103,447 Aufrufe • vor 1 Jahr

देवेंद्र फडणवीस म्हणतात की नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित व्हिडिओ हा तीन-चार वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र करून चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, त्यांनी झिरवळ यांना तातडीने अधिकृत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, व्हिडिओची पूर्ण पडताळणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे विधान बारकाईने ऐकल्यास एक गोष्ट स्पष्ट होते — फडणवीस यांनी स्वतः व्हिडिओ खोटा आहे असे थेट सांगितलेले नाही; त्यांनी केवळ नरहरी झिरवळ यांच्या दाव्याचा उल्लेख केला आहे. “तीन-चार व्हिडिओ जोडून बनवला” हा दावा जर खरा असेल, तर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात: ते तीन-चार व्हिडिओ नेमके कोणते आहेत? त्या सर्व क्लिप्समध्ये दिसणारी व्यक्ती, कपडे आणि ठिकाण एकसारखे का दिसतात? जर संपूर्ण फुटेज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी चित्रित झाले असेल, तर त्याला “एडिटिंगमुळे चुकीचा अर्थ लावला” असे म्हणायचे, की “घटना मूळतः खरी आहे” असे मानायचे? राजकीय भाषेत अशा प्रकारचे विधान हे सरळ नकार नसून, अनेकदा डॅमेज कंट्रोलचा भाग असतो. जर एडिटिंगमुळे संदर्भ बदलला असेल, तर तो स्पष्टपणे मांडला गेला पाहिजे. आणि जर संपूर्ण व्हिडिओ खोटा असेल, तर त्यासाठी ठोस व अधिकृत पुरावे तात्काळ सादर केले गेले पाहिजेत. अन्यथा “तीन-चार व्हिडिओ” याकडे केवळ एक बचावात्मक कथा म्हणूनच पाहिले जाईल. #नरहरी_झिरवाळ #आक्षेपार्ह_व्हिडिओ #सत्य #राजकारण #पारदर्शकता

Vijay Kumbhar

23,664 Aufrufe • vor 4 Monaten

भर पावसात घाटकोपर पूर्व परिसरात ठिकठिकाणी महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी, स्थानिक यंत्रणेला दिल्या सूचना 🔹मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक ३ जुलै २०२६) त्या प्रतिनिधित्व करीत असलेल्या निवडणूक प्रभाग क्रमांक १३२ (घाटकोपर पूर्व) मधील विविध भागांचा भर पावसात प्रत्यक्ष दौरा केला. मुसळधार पावसाचा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि योग्य त्या उपाययोजना तातडीने व्हाव्यात, यासाठी महापौरांनी प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन विविध ठिकाणी पाहणी केली आणि आवश्यक निर्देश दिले. 🔹या पाहणी दौऱ्यात स्थानिक आमदार श्री. पराग शाह, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी यांच्यासह महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी व अभियंता उपस्थित होते. 🔹घाटकोपर पूर्व परिसरातील सखल आणि अतिसखल भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी विशेष लक्ष दिले आहे. आजच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुढीलप्रमाणे महत्त्वाच्या सूचना व निर्देश दिले. 🔹संपूर्ण मतदारसंघात पुनर्विकास (Redevelopment) होत असलेल्या सर्व इमारतींच्या बाहेर पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन गटारे बांधण्याचे तसेच मॅनहोल्सवर मजबूत झाकणे लावण्याचे आदेश देण्यात आले. संकल्प सेवा जवळील रुपारेल इमारतीच्या बाहेर संपूर्ण गटार नव्याने बांधण्याचे काम तातडीने हाती घेण्यास सांगितले. 🔹सत्कार आणि सुखदा इमारतीबाहेर साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नवीन नलिका बांधण्यात येतील. तसेच विद्याभवन रस्ता, भजन समाज मार्ग (गारोडिया पॅलेस समोर) पदपथावर ढापा झाकण लावण्याच्या सूचना महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिल्या. 🔹डॉ. हेडगेवार उद्यानाजवळ नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकावी, जेणेकरून भर रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी थांबून ते थेट पर्जन्य जल वाहिनीद्वारे वाहून जाईल, असे महापौरांनी सांगितले. पुष्प विहार मार्गावर ठिकठिकाणी पदपथालगत नलिकांवर जाळ्या व झाकणे लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. 🔹प्रगती चाळीच्या प्रवेशद्वारावरील मॅनहोलवर नवीन बांधकाम करून सुरक्षित झाकण लावावे. तसेच, प्रगती चाळीच्या पाठीमागे असलेल्या नाल्याला दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे (Railing) उभारावे. याशिवाय, नागरिकांना नाला ओलांडून शौचालयात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग आणि त्यावर संरक्षक कठडे तयार करण्याचे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले. 🔹दरम्यान, नाथ पै रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या पार्किंगमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी येथे 'नो पार्किंग' अंमलबजावणी करण्याच्या आणि मेट्रो उड्डाणपुलाखाली पादचाऱ्यांसाठी सुरक्षित 'क्रॉसिंग' देण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक पोलिस विभागाला दिल्या. 🔹गारोडिया नगर फेडरेशनच्या जागेवर कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून खासगी जागेमध्ये सुंदर उद्यान (Garden) विकसित करण्याचे नियोजन करावे, असे महापौरांनी उद्यान विभागाला सूचित केले. तसेच, रस्त्यांच्या कामांमुळे झाडांना इजा पोहोचू नये म्हणून झाडांची मुळे मोकळी राखण्याचे निर्देशही दिले. यासोबतच, श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्वान लसीकरण आणि निर्बीजीकरण मोहीम वेगाने राबवण्याच्या सूचना संबंधित विभागाला महापौरांनी दिल्या. 🔹पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षा आणि सोयी-सुविधांना महानगरपालिकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभागात अनेक सखल परिसर आहेत. तेथील पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने व्हावा आणि पायाभूत कामे दर्जेदार व्हावीत यासाठी स्थानिक प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे, असे महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या. 🔹भर पावसात महापौर श्रीमती रितू तावडे, आमदार श्री. पराग शाह, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी आणि इतर लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून पाहणी करीत असल्याने स्थानिक नागरिकांनी या पाहणीचे स्वागत केले. निर्देश दिलेली सर्व कामे वेगाने पूर्ण होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

36,883 Aufrufe • vor 1 Monat

अमरावती जिल्ह्यातील MPSC क्लर्क भरती प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझी भेट घेऊन या भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांच्या व्यथा मांडल्या. MPSC क्लर्क या पदासाठी जानेवारी 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती,पूर्व परीक्षा एप्रिल 2023 मध्ये पार पडली तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये झाली. या परीक्षेसाठी कौशल्य चाचणी जुलै 2024 मध्ये पूर्ण झाली आहे परंतु कौशल्य चाचणी दरम्यान किबोर्ड खराब आल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे व याच कारणामुळे काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयात (MAT) दाद मागितली आहे परंतु MAT ने भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही. सदर भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत 20 महिन्यांचा कालावधी लोटला आहे तरीही अद्याप ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही यामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय न होऊ देता लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. अनेक अडचणींचा सामना करत गोरगरिबांची मुलं आपल्याला नोकरी मिळेल या आशेने परीक्षा देत असतात परंतु भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एवढा मोठा कालावधी लागणं ही खेदजनक बाब आहे. माझी मा. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे तसेच मा. उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis व Ajit Pawar यांना विनंती आहे की आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे.

Adv. Yashomati Thakur

12,676 Aufrufe • vor 1 Jahr

मुंबई - पुणे महामार्गावर वाहतूक का बंद आहे.. या संदर्भात विशिष्ट इकोसिस्टम कडून एक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न चालू आहे की, सरकारने या संदर्भात काहीच काळजी घेतली नाही. त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे.. काल संध्याकाळी ५ वाजताच्या आसपास मुंबई पुणे महामार्गावर टँकर पलटी झाला. टँकर उलटताच त्यातून वायूगळती सुरू झाली. परिस्थितीची गंभीरता ओळखून महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील सुमारे ४० जणांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्या टँकरमध्ये प्रॉपेलिन हे अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक रसायन असल्याचे लक्षात येताच संपूर्ण यंत्रणा अधिक सतर्क झाली. अशा परिस्थितीत अगदी छोटासा स्पार्कसुद्धा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकत होता. त्यामुळे कोणतीही घाई न करता तज्ज्ञांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार अतिशय संवेदनशील असून काळजीपूर्वक हाताळणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं. लगेचच राज्य सरकारला याची माहिती देण्यात आली. राज्य सरकारने त्वरित पावलं उचलत बीपीसीएल आणि एनडी आर एफ ला घटनास्थळी पाचारण करण्यात आला. आज पहाटे सुमारे ४.३० वाजल्यापासून एनडीआरएफ आणि बीपीसीएलच्या तज्ज्ञ पथकांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आतापर्यंत टँकरवरील दोन व्हॉल्व्ह बंद करण्यात यश आलं आहे. मात्र, एका ठिकाणाहून अजूनही गळती सुरू आहे. त्यामुळे रिकामे टँकर घटनास्थळी आणून त्यामध्ये हे रसायन सुरक्षितपणे हस्तांतरित करण्याचं काम सुरू आहे. एक टँकर भरून झाल्यानंतर आता दुसऱ्या टँकरमध्ये प्रॉपेलिन हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रॉपेलिनसारखं अतिशय घातक रसायन वाहून नेणारा टँकर अपघातग्रस्त होण्याची ही पहिलीच घटना आहे. जर वाहतूक बंद केली नसती, छोटीशी निष्काळजी मोठं नुकसान केली असती. म्हणून या महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. काही माध्यमांनी प्रवाश्यांची गैरसोय असा कोल्हेकुई चालू केली आहे. त्यांना घटनेची गांभीर्य माहिती असेल किंव्हा नसेल पण, आपली बातमी कशी ब्रेक होईल याची काळजी होती. घटना फक्त टँकर पलटी झालेली नाहीतर अत्यंत ज्वलनशील वायू गळती सुरू होती. फक्त काडीपेटी सुद्धा कोणी टाकली असती तर मोठा विध्वंस झाला असता. त्याच्यावर पर्यायी उपाय म्हणून, पुणे - मुंबई मिसिंग लिंक हा पर्याय येत्या काही महिन्यात जनतेसाठी खुला होणारच आहे. पण, एखाद्या संकटात आपली पोळी कशी भाजून घेयची हे काही मंडळी करत आहेत. असो.. या घटनेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, तसेच घडल्यास आणखी कोणती काळजी घेतली पाहिजे? या संदर्भात शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी एम एस आर डीसी ला दिले आहेत. प्रवाश्यांची गैरसोय झाली यात कोणतीही शंका नाहीच.. दुर्घटना घडल्यावर बऱ्याच मोठया प्रमाणात वाहनांची रांग लागली होती. यात पोलीस प्रशासन आणि सरकारकडून प्रवाशांना आवश्यक ती मदत देण्यात आली. या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते सर्वानी शेअर करावे..

Prakash Gade

25,472 Aufrufe • vor 6 Monaten

शिवाजी राजांना जन्म देणाऱ्या महापित्याची आणि जिजाऊ मातेच्या कुंकवाच्या धन्याची समाधी अत्यंत विपन्न अवस्थेत ! The Tomb of Great Shivaji’s father and Rajmata Jijau’s husband valiant Shahajiraje is in the wilderness ! – विश्वास पाटील दूर कर्नाटकामध्ये दावणगिरी जिल्ह्यात होदीगीरे नावाच्या गावात एखाद्या सामान्य, अनामिक शिपायाच्या समाधी सारखं महाराष्ट्राचे ते महातीर्थ ऊन्हापावसात करपते आहे. भिजते आहे. 360 वर्षांपूर्वी याच ठिकाणी शिवरायांचे महापिता शहाजीबाबांचे घोड्यावरून पडून अपघाती निधन झाले होते. एखाद्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या, तेही शिवरायांसारख्या महापुरुषाच्या जन्मदात्याच्या समाधीकडे महाराष्ट्राने जे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तसे बेच्छूट उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच पाहायला मिळणार नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांच्या वडिलांची कोटी कोटी रुपयांची स्मारके सरकारी खर्चाने या महाराष्ट्रभूमीत बांधली गेली. मात्र आमच्या शहाजीराजांच्या नशिबी हे असे काय यावे. कोण होते शहाजीराजे? 1 . ज्यांनी शिवरायांना जन्म दिला.“गनिमी काव्या” ची दीक्षा दिली. बेंगलोरच्या किल्ल्यात शिवरायाना लष्करी शिक्षण दिले.. स्वतः ज्यानी ती शिवरायांची सुप्रसिद्ध “राजमुद्रा” लिहिली. 2 . औरंगजेबाचा आजोबा जहांगीर याच्या फौजांच्या विरोधात 1624 ची भातवडीची लढाई जिंकली. 3. औरंगजेबाच्या बापाच्या शहाजानच्या फौजांना इतके सळो की पळो करून सोडले की, त्याला ताजमहालचे बांधकाम बाजूला ठेवून 1634 मध्ये शहाजीबाबांच्या विरोधात स्वतः लढाईसाठी महाराष्ट्रात यायला भाग पाड पाडले. 4. “ज्या भूमीत शहाजी राहतो तिथल्या पहाडाना आपोआप पाय फुटतात”असे अनुमान काढून दिल्लीचा बादशहा शहाजहानने 31 मे 1635 च्या माहुलीच्या कराराच्या तिसऱ्या कलमानुसार शहाजीराजांना महाराष्ट्रातून हद्दपार केले होते. म्हणून त्यांना दीर्घकाळ कर्नाटकात राहावे लागले. असा तो स्फूर्तीचा झरा, पेटता वारा, मराठ्यांच्या महापराक्रमाचा तुरा, जिजाऊंच्या कपाळीचा कुंकुमहिरा आज दूर कर्नाटकात गेली 360 वर्ष तसाच वैराण माळावर पहुडलेला आहे. “फक्त निवडणुका लढवण्याची आणि जिंकण्याची चटक हेच जीवनध्येय” मानलेला आजचा महाराष्ट्र दुर्दैवाने आपला खरा इतिहास, संस्कृती आणि माणुसकीही विसरून चालला आहे. “दुश्मनांच्याही स्मृतीस्थळांकडं आदराने पहा” असं सांगणाऱ्या शिवरायांच्या जन्मदात्याच्या स्मृतीस्थळाची ही अशी दुर्दैवी अवस्था पाहून काळजाला चटके बसतात. तीन वर्षामागे मी हा विषय महाराष्ट्र समोर मांडला होता. पण प्रश्न आमच्या शिवरायांच्या पित्याचा असतानाही मेलेल्या महाराष्ट्राने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ज्यांनी आधुनिक महाराष्ट्र खऱ्या अर्थी घडवला, त्या जिजाऊ साहेबांना स्वर्गात काय वाटत असेल ? “खूप इज्जत आणि इभ्रत ठेवलीत हो तुम्ही आमच्या कुंकवाच्या धन्याची आणि आमच्या शिवबाच्या परमपूज्य पित्याची”. काळाच्या पाठीवर असामान्य कर्तुत्वाचे ठसे उमटवणाऱ्या या महापुरुषाकडे हा ‘इलेक्शनमग्न’ महाराष्ट्र थोडे ध्यान देईल का? कर्नाटकातली सामान्य माणसे कशीबशी या समाधीची देखरेख करत आहेत. ज्याना कोणाला शिवरायांच्या पित्याच्या समाधीवरच्या छपराचे एखादे कौल आपल्या देणगीतून पांघरले जावे असे वाटत असेल. त्यांनी पुढील क्रमांकावर जरूर संपर्क साधा. Mallesh Rao Shinde 9632065915 President Dawangiri Shahajiraje Trust. अभ्यासक्रम ठरवणाऱ्या विद्वानांनी, लबाड इतिहासकारांनी आणि शासकानीही ज्या स्वराज्य संकल्पक महापुरुषाकडे दुर्लक्ष केले. त्याच्या समाधीवर किमान एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या समाधीला जेवढी सावली मिळते तेवढी तरी देण्याचा प्रयत्न करूया. इलेक्शनबाज स्वार्थी महाराष्ट्रा जागा हो , निदान आपल्या पित्याच्या महापित्यासाठी तरी ! .…विश्वास पाटील Narendra Modi Devendra Fadnavis Ajit Pawar Sharad Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr.Amol Kolhe Supriya Sule SaamTV News Pudhari News 24 ZEE २४ तास TV9 Marathi ABP माझा #ShahajiRajeSamadhi #ShahajirajeBhosale #jijaumata #shivajimaharaj #maharashtrahistory #indianhistory #heritagepreservation #maharaja #maharashtra #shivajimaharaj #author #authorvishwaspatil #vishwaspatil #literature

Vishwas patil

34,394 Aufrufe • vor 2 Jahren