Supriya Sule's banner
Supriya Sule's profile picture

Supriya Sule

@supriya_sule1,744,682 subscribers

Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements

Shorts

Met Congress President Hon. Shri Mallikarjun Kharge (Mallikarjun Kharge) Ji and extended my warm birthday wishes to him. Wishing him good health, happiness, and many more years of dedicated public service.

232,619 views

Inspiration ⏰⏰😍✌️💪

Inspiration ⏰⏰😍✌️💪

1,237,381 views

मुंबईत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. लाठीहल्ल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना थेट खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओमध्ये, "तुमच्या खिशात ड्रग्जच्या पुड्या ठेवून तुरुंगात टाकेन," अशी उघड धमकी मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी आंदोलक तरुणांना देताना दिसत आहे. हे कृत्य अतिशय विकृत, तितकेच निषेधार्ह आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारे आहे. ज्या मुंबई पोलिसांवर अंमली पदार्थांचा व्यापार मुळापासून उखडण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, तेच पोलीस विद्यार्थ्यांना धमकावण्यासाठी ड्रग्जचा वापर करण्याची भाषा करत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. १. पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? जर पोलीस खुलेआम विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी देत असतील, तर त्यांना ड्रग्जचा स्त्रोत ठाऊक आहे. जर हा स्त्रोत माहिती आहे, तर मुंबईतील ड्रग्ज माफियांवर कारवाई का केली जात नाही? २. राज्य सरकारला ही गुंडगिरी मान्य आहे का? मुंबई पोलीस दल हे थेट राज्याच्या गृह मंत्रालयाखाली येते. राज्याच्या राजधानीत आणि सरकारच्या नाकाखाली सुरू असलेला हा प्रकार गृह खात्याला मान्य आहे का? आंदोलक मुलांना अशा प्रकारे बनावट पुराव्यांची आणि ड्रग्जची धमकी देणे हा भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मानवाधिकार कायद्यांनुसार अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. खोटे पुरावे तयार करणे किंवा कोणालातरी खोट्या व गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठी पुरावे रचणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अंमली पदार्थ बाळगणे, त्याचा व्यापार करणे किंवा कोणाला तरी अडकविण्यासाठी त्याचा गैरवापर करणे हा देखील गुन्हा आहे. हा प्रकार मानवाधिकाराचेही उल्लंघन आहे. मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ अंतर्गत नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगण्याचा आणि आपली मते मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. पोलिसांचे हे कृत्य राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उघड उल्लंघन आहे. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या देशाच्या तरुण पिढीला गुन्हेगार ठरवण्याचा आणि त्यांच्या खिशात ड्रग्ज टाकून त्यांचे आयुष्य व करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्याचा हा प्रकार अत्यंत भयावह आहे. संबंधित व्हिडिओतील पोलीस कर्मचाऱ्यावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच, राज्याच्या गृह मंत्र्यांनी यावर मौन न बाळगता महाराष्ट्रातील जनतेला आणि त्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तर द्यायलाच पाहिजे. Devendra Fadnavis मुंबई पोलीस Mumbai Police

50,952 views

पंढरपूर–महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते रामबाग नाका या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा भोर शहरातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असल्याने नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच इतर वाहनचालकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. या परिसरातील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत यापूर्वीही सातत्याने तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता येईल. Nitin Gadkari Office Of Nitin Gadkari NHAI

42,750 views

Embracing the beauty of gratitude and feeling truly blessed 🙏🏽

Embracing the beauty of gratitude and feeling truly blessed 🙏🏽

374,360 views

देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. CMO Maharashtra

219,534 views

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील आंबेगाव पठार भागात कोयता गॅंगने धिंगाणा घालत दहशत माजविली. या टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून लोकांचे नुकसान केले. तर राजगड तालुक्यातील कोदवडी फाट्यावर टोळक्याने गोळीबार करुन एका हॉटेलची तोडफोड केले. याप्रसंगी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या घटना गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. गृहखात्याची निष्क्रियता जनतेच्या जीवावर उठत असून जनता भीतीच्या छायेखाली जगत आहे. हे सरकार जनतेला सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही, यावर दिवसेंदिवस शिक्कामोर्तब होत आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

16,709 views

पुणे शहरातील वाहतुकीची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत असून नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सूस ते नांदे दरम्यानची ही वाहतूक कोंडी पुण्यातील वाहतूक कोंडीचे चित्र स्पष्ट करते. पुणे महापालिका आणि पुणे शहर पोलिस यांनी यावर तोडगा काढावा. PMC Care पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस

102,238 views

प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध.

53,786 views

हिंजवडी फेज २ परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि इतर अनेक भागांत जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते. येथील नालेसफाईसारखी कामे वेळेत होण्याची गरज आहे. परंतु ही कामे वेळेत झालेली दिसत नाहीत. एमआयडीसीने याबाबत तातडीने लक्ष घालून येथे भविष्यात पाणी साठून नागरीकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. Maharashtra Industrial Development Corporation

34,047 views

हिंजवडी परिसरातील राजीव गांधी आयटी पार्क येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. याशिवाय विलास जावडेकर प्रोजेक्ट ते मेगापॉलिस सर्कल या दरम्यानचा भाग अंधारात आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याखेरीज रस्त्यांवर ठिकठिकाणी विशेषतः फेज १ ते फेज ३ दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडले असून याच मार्गावरील स्ट्रीटलाईट सतत बंद असतात, त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. परंतु पीएमआरडीए, एमआयडीसी, मेट्रो आदी आस्थापना जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की, हा सावळा गोंधळ लवकरात लवकर संपणे गरजेचे आहे. कारण याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. कोणती आस्थापना काय काम करणार याबाबतची स्पष्टता व तशी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. यासाठी कृपया तिन्ही आस्थापनांची एकत्रित बैठक बोलावून हा गोंधळ दूर करावा. CMO Maharashtra MIDC India PMRDA Pune Metro Rail

26,512 views

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच 'भिकारी' म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या. CMO Maharashtra Shivraj Singh Chouhan

20,290 views

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील हे अतिशय दुःखद चित्र आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रमी भावाने विकला. पण आता त्याला कवडीमोल दराने व्यापाऱ्यांच्या स्वाधीन करावे लागत आहे. शेतमाल आणि जीवनावश्यक वस्तू यांच्या बाजारभावाबाबत हे सरकार अजिबात गंभीर नाही. ग्राहक आणि उत्पादक यांच्या हिताचा सुवर्णमध्य साधण्यासाठी शासनाने काम करणे अपेक्षित आहे परंतु सरकार निवडणूकीचे तात्कालिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी वर्गाची क्रूर थट्टा करीत आहे. हि अतिशय दुर्दैवी बाब आहे.

18,150 views

Videos

supriya_sule's profile picture

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे.याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे. Election Commission of India

Supriya Sule

1,611,075 views • 2 years ago

supriya_sule's profile picture

बावधन बुद्रुक येथील श्री. दिलीप दगडे यांच्या निवासस्थानाशेजारी तसेच रायन आंतरराष्ट्रीय शाळेच्या परिसरालगत एका बांधकाम व्यावसायिकाने निसर्ग पाम सोसायटी या बंगलो प्रकल्पाचे प्लॉटिंग व बांधकाम केले आहे. या बांधकामादरम्यान परिसरातील पारंपरिक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेला केतकीचा ओढा पूर्णपणे बुजविण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, सध्या पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारा मार्गही अडविण्यात आल्याचे निसर्ग पाम सोसायटीचे सदस्य व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट सोसायटीलगतच्या नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असून, घरातील फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय, निसर्ग पाम सोसायटीला मुख्य रस्त्याशी जोडणारा संपर्करस्ता पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण होते. अनेकदा या पाण्यात दुचाकी अर्ध्यापर्यंत बुडत असल्याने मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचा फटका केवळ सोसायटीतील रहिवाशांनाच नव्हे, तर सर्व्हिस रोडलगत असलेल्या व्यावसायिकांनाही बसत असून त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान होत आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस अथवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे माझी जिल्हा प्रशासनास नम्र विनंती आहे की, संबंधित विभागाने तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी. पाहणीत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आढळल्यास, तो प्रवाह तात्काळ पूर्ववत करून पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल, अशी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात नागरिकांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. PMC Care PMRDA NHAI collectorpune Maharashtra Pollution Control Board Maha Forest Official

Supriya Sule

62,924 views • 1 month ago

supriya_sule's profile picture

The brutal crackdown on students who were peacefully protesting and demanding accountability is deeply condemnable. Equally shocking is the reported manhandling of the Leader of the Opposition, Shri Rahul Gandhi ji, who sought to question this assault, along with the detention of Smt. Priyanka Gandhi ji and Shri Akhilesh Yadav ji. Such treatment of the Leader of the Opposition in the world’s largest democracy is an affront to democratic norms and constitutional values. A government that responds to peaceful dissent with force instead of dialogue undermines the very foundations of our Republic. We strongly condemn this repression and will continue to stand with the students and fight to protect our Constitution and democracy. लोकशाही मार्गाने आंदोलन करीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा जाब विचारणारे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना लोककल्याण मार्ग येथे धक्काबुक्की करण्यात आली. त्यांना खाली पाडून, खेचण्यात आले. त्यांना तसेच खासदार प्रियांकाजी गांधी, समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेशजी यादव यांनाही पोलीसांनी बळाचा वापर करुन ताब्यात घेतले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारताच्या विरोधी पक्षनेत्याला मिळालेली ही वागणूक लोकशाहीविरोधी आहे. या देशातील संवैधानिक मूल्ये आणि लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही कायम संघर्ष करीत राहू. आम्ही या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत.

Supriya Sule

48,179 views • 1 month ago

supriya_sule's profile picture

इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी गांधी स्मृती येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. याप्रसंगी NEET आणि Re-NEET परीक्षेतील गोंधळामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. या परीक्षेतील गोंंधळाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनास आमचा पाठिंबा असून त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्याच पाहिजेत, अशी आमची ठाम भूमिका आहे. Members of Parliament from the INDIA Alliance paid tribute at Gandhi Smriti to the students who lost their lives in the aftermath of the NEET paper leak. Those young lives will forever remain in our hearts and memories. We stand with their families in their grief and will continue to fight for justice, accountability, and an education system that upholds the trust and aspirations of every student.

Supriya Sule

39,287 views • 1 month ago

supriya_sule's profile picture

मुंबईतील दादर येथे एका महिला आंदोलनकर्त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ बघा. साध्या पोशाखातील ही व्यक्ती पोलीस कर्मचारी आहे. मुंबई पोलीसांबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण अशा पद्धतीने महिलांना असभ्य वागणूक देणारे पोलीस जर या दलात आहेत ही खेदाची बाब आहे. आंदोलनकर्ते हे गुन्हेगार नाहीत, लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानले जाते पण जेंव्हा सत्ताधाऱ्यांना लोकशाहीची मूल्येच मान्य नसतात तेंव्हा अशा पद्धतीने असभ्य वागणाऱ्यांना बळ मिळते. महिलांचा अवमान करणाऱ्यांचा चौरंग करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. येथे अशा अपप्रवृत्तींना अभय मिळता कामा नये, सदर कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. Devendra Fadnavis मुंबई पोलीस Mumbai Police

Supriya Sule

31,334 views • 1 month ago

supriya_sule's profile picture

Today in the Lok Sabha, I questioned the Public Examinations (Amendment) Bill, 2026, and pointed out that this is not a new Bill but an amendment to the 2024 Act, which still leaves serious contradictions unanswered. I asked why the Government promised wider consultation, yet enacted the law before completing it, and why a committee was constituted a day after the Act came into force. I also sought clarity on conflicting official records regarding NEET and reminded the House that transparency is essential to restoring public trust. Education cannot be governed through confusion and inconsistency. This debate is not about scoring political points; it is about the future of our students. The growing dependence on expensive coaching, repeated examination failures, and the anguish of students and parents require empathy, accountability and systemic reform. Even the Government’s ally Shri Chhagan Bhujbal and senior BJP leader Dr. Murli Manohar Joshi have expressed concern over the handling of this issue and the treatment of protesting students. Their voices reinforce that this is a national concern, not a partisan one. I urged the Government to order an impartial inquiry into the events at Jantar Mantar, constitute a Joint Parliamentary Committee, and convene an all-party consultation to build a truly fair and leak-proof examination system. As I said in the House, this is not BJP versus Congress or UPA versus NDA, it is the system versus the aspirations of our children. India’s youth deserve an examination system that rewards merit, inspires confidence, and treats every student’s dream with dignity.

Supriya Sule

25,018 views • 1 month ago

supriya_sule's profile picture

महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर (Sharad Pawar) नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. आणि साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या. स्थळ - यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई वेळ - दुपारी १.०० वाजता

Supriya Sule

293,626 views • 3 years ago

supriya_sule's profile picture

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.

Supriya Sule

191,134 views • 3 years ago

supriya_sule's profile picture

'राज्य राखीव पोलीस दला'च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करीत असतात.आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल ८५ प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी. CMO Maharashtra Devendra Fadnavis

Supriya Sule

32,471 views • 4 months ago

supriya_sule's profile picture

क्रांतिज्योती सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु होत आहे. या मालिकेत खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. डॉ कोल्हे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. या मालिकेसाठी त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा. एक चांगली मालिका रसिकांच्या भेटीस आणत असल्याबद्दल धन्यवाद...!

Supriya Sule

59,233 views • 9 months ago

supriya_sule's profile picture

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविण्यात येत आहे. भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस

Supriya Sule

24,887 views • 3 months ago

supriya_sule's profile picture

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दाैऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले. गाडी नादुरुस्त झाल्याने प्रवासी पर्यायी वाहनाची वाट पाहत तिथंच उन्हांत थांबले होते. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने हे प्रवासी आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही जणांना दुसऱ्या बसमधून खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर सोडण्याची विनंती केली. तर काही प्रवाशांना माझ्यासोबत असणाऱ्या गाडीतून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत आणले. याठिकाणी त्यांची तात्पुरती व्यवस्था केली. यातील बरेच प्रवासी सांगली आणि मिरजला जाणारे होते. यावेळी माझ्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि माझे काही सहकारी यांना प्रवाशांची सोय करण्याबाबत सांगितले. हे सर्वजण प्रवासी त्याच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये पाठवेपर्यंत थांबतील असा विश्वास दिला. यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. तसेच प्रवाशांना टोलनाक्यापर्यंत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल एसटी बसचे चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांचे आभार मानले. एसटी महामंडळाने आपण बाहेर सोडत असणारी प्रत्येक गाडी तपासून पाठविली पाहिजे. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील आजकाल वाढले असल्याचे प्रवासी सांगतात. राज्याच्या परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Supriya Sule

110,647 views • 3 years ago

supriya_sule's profile picture

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील आंबेगाव पठार भागात कोयता गॅंगने धिंगाणा घालत दहशत माजविली. या टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून लोकांचे नुकसान केले. तर राजगड तालुक्यातील कोदवडी फाट्यावर टोळक्याने गोळीबार करुन एका हॉटेलची तोडफोड केले. याप्रसंगी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या घटना गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. गृहखात्याची निष्क्रियता जनतेच्या जीवावर उठत असून जनता भीतीच्या छायेखाली जगत आहे. हे सरकार जनतेला सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही, यावर दिवसेंदिवस शिक्कामोर्तब होत आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

Supriya Sule

16,709 views • 3 months ago