Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

स्वामी समर्थांचा असा अपमान करू नका 🙏🙏 त्याना यात पूर्ण वेड्या सारखे दाखवत आहे प्रचंड अनाधार आहे 😡😡😡

75,911 görüntüleme • 2 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

मा. नितीन गडकरी साहेब (केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार ) Nitin Gadkari , एक नम्र विनंती…सर मला एकदा तुमच्या हेलिकॉप्टरमध्ये बसवा. तिकीटाचे जे काही पैसे असतील ते मी आनंदाने देईन. फक्त मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाची तुमच्यासोबत हेलिकॉप्टरमधून पाहणी करू द्या. कारण मी पूर्ण रस्ता पायी चालत गेलोय या महामार्गावरील प्रत्येक छोटा -मोठा खड्डा मला इतका तोंडपाठ झाला आहे की, हेलिकॉप्टरमध्ये बसूनही मी तुम्हाला खाली बोट दाखवत सांगू शकतो—“साहेब, इथे खड्डा आहे… पुढे अजून एक आहे… आणि थोड्याच अंतरावर पुन्हा एक मोठा खड्डा आहे.” ही अतिशयोक्ती नाही, तर या महामार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांची वेदना आहे. कोणी बोलो वा ना बोलो आम्हाला कोकणकरांचे जीव वाचवायचे आहेत जीव . President of India CMO Maharashtra Sunil Tatkare Shivendrasinh A Bhonsle Pratap Baburao Sarnaik Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rajdeep Sardesai ravish kumar Piyush Tewari 🇮🇳 Chirag Paswan Cockroach Janta Party of India 🚨Indian Gems Hindustan Times Governor of Maharashtra The Times Of India २ जुलै २०२६. सर धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना) 📞8766797529 पेण- रायगड #latepost #mumbaigoahighway #accident #preventionisbetterthancure #tollcollection #citizen #india

Er. Chaitanya Usha Laxman Patil

102,929 görüntüleme • 1 ay önce

महामार्गाचे यश उद्घाटनाने ठरत नाही; ते गुणवत्तेने, सुरक्षिततेने आणि नागरिकांच्या विश्वासाने ठरते. MORTHINDIA NHAI “मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग ३१ जून,३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल,” असे वारंवार सांगितले जाते. पण एक प्रश्न आहे—नेमके कोणत्या वर्षी? Nitin Gadkari MORTHRoadSafety Indian Road Safety Council NHRC India सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- झाराप झिरो पॉईंट, सावंतवाडी येथे नव्याने बांधलेल्या पुलावरील Reinforced Earth (RE) Wall च्या पॅनेलची डागडुजी सुरुवातीलाच करावी लागत आहे. काही ठिकाणी सिमेंट लावून दुरुस्ती सुरू असल्याचे दिसते. इतकेच नव्हे, तर पुढील भागात भिंतीमध्येही विकृती दिसत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. प्रश्न असा आहे की, नव्याने उभारलेल्या संरचनांवर इतक्या लवकर दुरुस्तीची वेळ का यावी? कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी नेमकी कोणाची? सर्वसामान्य नागरिकांना या त्रुटी सहज दिसतात; मग संबंधित अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधी आणि मंत्रालयाच्या नजरेत या बाबी का येत नाहीत? Shivendrasinh A Bhonsle CMO Maharashtra Pratap Baburao Sarnaik मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही; तो कोकणच्या विकासाचा, पर्यटनाचा, व्यापाराचा आणि लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा जीवनदुवा आहे. त्यामुळे या महामार्गावरील प्रत्येक पूल, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक किलोमीटरची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे महामार्गावरील अनेक कामे अद्याप सुरू आहेत, तर दुसरीकडे टोल वसुली सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात स्वाभाविकच प्रश्न निर्माण होतो—पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार महामार्ग मिळण्यापूर्वी टोल आकारणी कितपत योग्य आहे? आश्वासने नव्हे, दर्जेदार आणि सुरक्षित मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग हवा! व्हिडिओ चित्रीकरण : सर्वेश पेडणेकर धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक

Er. Chaitanya Usha Laxman Patil

11,748 görüntüleme • 1 ay önce

दादा अखेरचा दंडवत..! ज्या हातांनी हजारो निवेदने स्वीकारली, ज्या आवाजाने अन्यायाविरुद्ध आणि जनतेच्या हक्कासाठी साद घातली, तो आवाज आज शांत झाला. दादा, तुमची दररोजची सकाळ लोकांच्या समस्या सोडवण्यापासून सुरू व्हायची आणि शेवटचा श्वासही जनसेवेच्या त्या अर्जांच्या गराड्यातच असावा, हे तुमच्या महान कार्याचे प्रतीक आहे. ​तिरंग्यात लपेटलेलं तुमचं शरीर बघताना आजही वाटतंय की, तुम्ही अचानक डोळे उघडाल आणि म्हणाल, "अरे बाबाहो, काळजी नका करू, मी हाय अजून!" ​तुमची शिस्त, तुमचा रोखठोकपणा आणि तो प्रेमळ 'दिलदार' स्वभाव आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. ज्या देहाने शेवटच्या क्षणापर्यंत जनतेची गाऱ्हाणी ऐकली, निवेदने स्वीकारली आणि सामान्यांचे अश्रू पुसले, तो देह आज शांतपणे विसावलेला पाहून मन प्रचंड दुःखी झाले. रस्त्यावरचा सामान्य कष्टकरी असो, शेतकरी असो वा छोटा कार्यकर्ता, प्रत्येकाला वाटतंय की माझ्या पाठीवरचा मायेचा हात निघून गेला. दादा, तुमची ती शिस्त, तो रोखठोकपणा आणि तुमच्या शब्दाशब्दातून ओसंडून वाहणारं प्रेम आम्हाला सदैव आठवणीत राहील. अखेरचा दंडवत दादा..! साश्रू नयनांनी तुम्हाला निरोप देताना मनी हीच भावना आहे "पुन्हा असा दादा माणूस होणे नाही.." #AjitPawar

Dr.Amol Kolhe

17,512 görüntüleme • 6 ay önce

महाराष्ट्रात मनाचे श्लोक नावाचा मराठी चित्रपट आज प्रदर्शित होत आहे व नेहमीप्रमाणे पुणेरी लोकांनी विरोध करायला सुरूवात केलेली दिसतेय…! ह्या खालच्या बाई कोण आहे ठावुक नाही पण ह्या रामदासाचा इतिहास भलाताच सांगत आहे त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचा थोडक्यात समाचार होतो …! पहिले रामदासाला वारकरी संप्रदाय कोणतेच स्थान नाही त्यामुळे राष्ट्रसंत काय संताचा पण दर्जा त्याला नाही..! दुसरे ह्याच्या श्लोकाने विस्कटलेले संसार नीट झाले म्हणे 🤣🤣 आहो ताई जो स्वतः लग्नाच्या मंडपातून टांग लावून पळाला त्यावर जास्त काय सांगावे….! तिसरे बाल संस्कार जर म्हणाल तर ह्याचा लंगोटावरचा पेहराव पाहता बालमनावर काय परिणाम होत असतील ते ती तुमची बाल मुलच जाणे…! 🤷‍♂️🤷‍♂️ शेवटचा मुद्दा तुम्ही बोलताय रामदासामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं व ते गुरू होते तर आता शेवटचं सभ्य भाषेत सांगतो रामदास व शिवाजी महाराज यांची कधी भेटच झालेली नाही व स्वराज्य स्थापनेत रामदासाचा काडीचा संबंध नाही तेव्हा परत जर आमच्या छत्रपती व ह्या येडपट रामदासाचा गुरू म्हणून उल्लेख कराल तर आमच्या #संभाजी_ब्रिगेड व आम्हाला कसे व कोणत्या भाषेत प्रतिउत्तर द्यायचे हे चांगले माहित आहे…! 🤬🤬 बाकी जर तुम्ही चित्रपट पाहिलाच नाही तर फक्त मनाचे श्लोक ह्या नावावरून तुम्ही विरोध कसा काय करू शकता ..? तेव्हा तुमचे संस्कार व तुमचा संत तुमच्याच घरात ठेवा व पटत नसेल चित्रपट पाहू नका ..!🙏🙏

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

17,366 görüntüleme • 10 ay önce

आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स्टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही चूक नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच. १) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या काही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. २) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत. ३) राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्याला राजकारण म्हणलं असतं तर कोणी ? ४) २००५ ला मुंबईत प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ? ५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.

Raj Thackeray

75,095 görüntüleme • 1 ay önce

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी परवा नोकरीतून निवृत्त होत असताना आपल्या स्टाफला भेट म्हणून त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तके वाटली. तर त्यातील काही धर्मांध नर्स की ज्यांना प्रबोधनकार, जोतिबा, सावित्रीबाई कोण हेच ठाऊक नाही, त्यांना राग आला. ती पुस्तके त्यांना हिंदु धर्माची बदनामी वाटली आणि त्यांनी त्या राजेंद्र कदम यांचा अपमान करुन ती पुस्तके त्यांच्या अंगावर फेकली.. काय म्हणायचं या मुर्ख बायांना..? 😡 इथे तो संतापजनक व्हिडीओ पहा आणि मग याच विषयावर आपल्या अभिव्यक्ती चा आजचा व्हिडीओ आहे. त्याची लिंक खाली कमेंट बॉक्स मध्ये देतो. तोही अवश्य पहा..

Ravindra Pokharkar

29,831 görüntüleme • 10 ay önce