Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग ह्यांनी काल कोर्टात जे मांडले ते ऐकून खूप खूप खूप राग आला आहे. प्लास्टिक च्या छडीने मारहाण केली, तर प्लास्टिक ची छडी हत्यार आहे का असे ते कोर्टात म्हणाले. वैष्णवी ची बदनामी त्यांनी करायला सुरुवात केली. नवऱ्याने बायकोच्या काना खाली मारणे हा छळ आहे...

51,055 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 2

Фото профиля jatindesai
jatindesai1 год назад

Their lawyer is a MCP.

Фото профиля OnlineBookClub.org
OnlineBookClub.org2 лет назад

Video version of @EckhartAurelius's new poem, "Catharsis" This is truly worth watching!

Похожие видео

दिल्लीतील स्फोट हे पूर्णपणे सरकारचे अपयश आहे. दिल्ली स्फोटामागे बाह्य किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? ते म्हणतील की, अंतर्गत बॉम्बस्फोट झाले नाहीत. पण, याआधी ही अंतर्गत बॉम्बस्फोट झालेले आहेत. यामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांकडे मटेरियल सापडले आहे. याची सखोल चौकशी व्हावी आणि अशा घटना थांबल्या पाहिजेत हे पाहावे. नांदेड, मालेगाव केस, अजमेर केस, मुंबईतील कबुतरखाना, गिरगाव, फर्ग्युसन कॉलेज, याठिकाणी ब्लास्ट झाले पण यामागे कोण आहे हे अजून माहिती नसलेले अंतर्गत ब्लास्ट आहे. एवढे जर न उलगडलेले आणि ज्याचा तपास लागलेला नाही असे ब्लास्ट असतील तर हे गंभीर आहे.

Prakash Ambedkar

22,179 просмотров • 9 месяцев назад

आज साताऱ्याच्या एका छोट्या गावात राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा ड्रग्स साठा सापडल्याचे कानावर येत आहे. जिथे 43 कर्मचारी होते ते फक्त तीन कर्मचारी दाखवून हे मोठा ड्रग्सचा कारखाना राज्यातील लाखो युवकांचे आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब करत आहे. होणाऱ्या चर्चेतून माहिती अशी आहे की हे सर्व प्रकरण दाबण्यामध्ये राज्याच्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे. प्रकाश शिंदे हे नाव वाचवण्यासाठी वारंवार संबंधित पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आहे. राज्यातील सत्ताधारी जर अशा पद्धतीने देशाच्या भविष्याला राज्याच्या भविष्याला ड्रग्स आहारी टाकणार असेल तर देशाचे व राज्याचे भविष्य हे खूप वाईट असेल. साताऱ्याचे ग्रामीणचे एसपी हे प्रकरण दाबून खूप मोठे पाप करत आहे.

Sagar Kailas Salunke

38,869 просмотров • 8 месяцев назад

भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणतात, "महाराष्ट्रातील लोकशाही, पोलिस, अधिकारी, सर्व समावेशक आणि सामावून घेणारे यांचे मी कौतुक करतो. न्यायालयीन पायाभूत सुविधा उत्कृष्ट आहेत. तथापि, महाराष्ट्रातील कार्यकारी अधिकारी प्रोटोकॉलचे पालन करत नाहीत याबद्दल मी निराश आहे. न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यकारी हे लोकशाहीचे समान आधारस्तंभ आहेत; सर्वांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. जर भारताचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच महाराष्ट्राला भेट देत असतील तर मुख्य सचिव, डीजीपी आणि मुंबई पोलिस आयुक्त उपस्थित राहणे अपेक्षित आहे. असे न करणे हे चिंतनाची गरज आहे. प्रोटोकॉल नवीन नाही, ते संवैधानिक संस्थांमधील आदराचे प्रतीक आहे. जेव्हा एखाद्या संवैधानिक संस्थेचे प्रमुख भेट देतात तेव्हा स्वागताला खूप महत्त्व असते..."

Shekhar

25,469 просмотров • 1 год назад

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांना पक्षाच्या वतीने एक पत्र देण्यात आले आहे. संध्याकाळी 5 वाजेनंतर एकंदरीत 75 लाख मतदान झालं आहे. ऑफिशियली 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. संध्याकाळी 6 नंतर प्रत्येक बूथवर टोकन वाटण्यात आलं का? ते वाटण्यात आले असतील तर किती वाटण्यात आले? प्रत्येक मतदारसंघ निहाय त्याची आकडेवारी आम्ही मागितलेली आहे. दुसरं 6 नंतर प्रत्येक मतदान केंद्रावर जो व्हिडिओग्राफी करणारा आहे त्याने व्हिडिओग्राफी केली आहे का? तिसरं हे टोकन जे आहेत 6 नंतर वाटलेले ते कुठल्या अधिकाऱ्याने वाटले आहेत त्याची माहिती आम्ही मागवली आहे. आम्ही अपेक्षा करतो की राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम आम्हाला ही माहिती लवकरात लवकर पुरवतील.

Prakash Ambedkar

20,951 просмотров • 1 год назад

नेहमी प्रमाणे हे असे परप्रांतीय मुंबईच्या मराठी ओळखी विरोधात गरळ ओकू लागले.. सदर चित्रफितीत संबंधित महिलेने महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी जे विधान केले आहे, ते अत्यंत आक्षेपार्ह व वेदनादायक आहे. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक ओळख नसून संत-महात्मे, समाजसुधारक आणि कष्टकरी जनतेच्या त्यागातून उभी राहिलेली संस्कृती आहे. अशा राज्याबद्दल अपमानास्पद बोलणे हे सामाजिक सलोख्याला तडा देणारे आहे. मतभेद असू शकतात, पण ते सभ्य भाषेत आणि तथ्यांच्या आधारे मांडले गेले पाहिजेत. कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला लोकशाही मार्गाने उत्तर देणे हे आपले कर्तव्य आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा टाळावी. आपण सर्वांनी संयम राखून महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकजुटीने उभे राहूया. #मराठीएकीकरणसमिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

20,779 просмотров • 7 месяцев назад

आज १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर, राजसाहेबांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात राजसाहेबांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे... सध्या मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यावरून जो वाद सुरु आहे, त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यानुसार सर्वानी वागलं पाहिजे. आणि न्यायालयाने जर बंदी घातली आहे तर जैन मुनींनी पण त्याचा विचार केला पाहिजे. कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे अनेक डॉक्टरांनी सांगितलं आहे तरीही कबुतरांना खायला घातलं जाणार असेल तर पोलिसांनी खायला घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. जेंव्हा मुळातच न्यायालयाचा आदेश असताना आंदोलन झालं तेंव्हाच सरकारने कारवाई करायला पाहिजे होती. त्यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले. कोर्टाचा आदेश काय आहे हे लोढांना माहित नाही का ? लोढांनी हे विसरू नये की ते राज्याचे मंत्री आहेत कुठल्या धर्माचे नाहीत. काल मराठी लोकांनी आंदोलन केली तेंव्हा त्यांची धरपकड झाली, पत्रकारांना मारहाण झाली... सरकारचं नक्की काय सुरु आहे हेच कळत नाहीये... निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत... आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय... तसंच १५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्याचा आणि मांसविक्री बंद करण्याचा आदेश दिलाय... मुळात कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला ? मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे की ही बंदी पाळू नका... स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट साजरा करायचा आणि त्या दिवशी खायचं स्वातंत्र्य नाही हा काय प्रकार आहे ? #राजठाकरे #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

32,880 просмотров • 1 год назад

" कल्याणमध्ये मराठी माणसाला जी अर्वाच्च शिवीगाळ करत, परप्रांतीय माणसाकडूनजी मारहाण झाली, त्याच्यावर वेळेत सरकारने कारवाई करावी अन्यथा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई केली तर मग म्हणू नका की मनसेने कायदा हातात घेतला. आणि विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना, या घटनेनंतर इतक्या मोठ्या संख्येने जे मराठी आमदार विधिमंडळात निवडून गेलेत ते काही आवाज उठवणार आहेत का ? का ते पण मराठी भय्ये झालेत आणि त्यांना या घटनेवर मूग गिळून बसायचं आहे ?.... सरकारने कायद्याचा धाक काय आहे हे एकदा दाखवून द्यावंच... " अविनाश जाधव, नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना #कल्याण #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,462 просмотров • 1 год назад