Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

हेच ते कोंडाजी वाघ ज्यांच पवार साहेबांनी काल भर सभेत नाव घेतल!

22,876 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

4 Yorum

🔥 माज तेजाचा 🔥 profil fotoğrafı
🔥 माज तेजाचा 🔥2 yıl önce

जुन्नर...हो

𝕯𝖎𝖑 𝖘𝖊 𝕴𝖓𝖉𝖎𝖆𝖓 (Stay Home Stay Safe) profil fotoğrafı
𝕯𝖎𝖑 𝖘𝖊 𝕴𝖓𝖉𝖎𝖆𝖓 (Stay Home Stay Safe)2 yıl önce

🫡🫡🫡🫡🫡

जय जगदंबा ( तुजसाठी मरण ते जनन ) profil fotoğrafı
जय जगदंबा ( तुजसाठी मरण ते जनन )2 yıl önce

व्होरा समिती अहवाल स्मरणशक्ती अशीच राहीली तर नार्को टेस्ट ची गरज भासणार नाही @pawarspeak

सर्जन ऑफ डेमोक्रसी profil fotoğrafı
सर्जन ऑफ डेमोक्रसी2 yıl önce

वळसे पाटील पडतील याचा आत्मविश्वास बाबांना नाही...पडायला पाहिजेत बोलतात🤣🤣

Benzer Videolar

पवार साहेब म्हणाले हे खरे आहे. 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. परंतु मी काल जे बोललो ते एकतर पवार साहेबांनी ऐकले नाही किंवा ऐकले असेल तर ते त्यांना अस्वस्थ करणारे होते. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. मी असे सांगितले की : 1978 साली पवार साहेब वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले 40 लोक बाहेर काढले आणि जनसंघासोबत सरकार तयार केले. आता एकनाथराव शिंदे हे तर आमच्याच सोबत निवडून आले होते. ते 50 लोकं घेऊन बाहेर पडले आणि आमच्या सोबत सरकार तयार केले. मग पवार साहेबांनी तयार केलेले सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदे यांनी तयार केलेले सरकार ही बेईमानी कसे होऊ शकते?मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचो होतो; इतिहास बदलत नाही. कोण जन्माला आले, कधी आले याच्यावर इतिहास बदलत नसतो. इतिहासात लिहून ठेवले आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वात 40 लोकांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. ते बाहेर पडले. आणि भाजपसोबत म्हणजे तेव्हाच्या जनसंघासोबत सरकार तयार केले. तेच मी सांगितले.

Devendra Fadnavis

269,960 görüntüleme • 3 yıl önce

फडणवीस आणि फडणवीसांचे पक्षाच्या आतले आणि पे रोलवर काम करणारे पक्षाच्या बाहेरचे सगळेच म्हणत आहेत की, फडणवीस आरक्षण देणार आहेत. याचा अर्थ ते हे मान्य करतात की फडणवीसांकडे देण्याची कुवत आहे. मग प्रश्न असा उरतो की फडणवीस वाट कसली बघत आहेत ? ते जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी थांबले आहेत का? – फडणवीसा बद्दल अपशब्द वापरू नये असे वारंवार आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडणारे भाजपचे आमदार खासदार बोलत आहे. अपशब्द वापरणे चुकीचे हे मान्यच. पण हेच तत्त्वज्ञान सभागृहामध्ये शंभूराजे देसाई जेव्हा आईबहिणी वरून शिवीगाळ करत होते, अमित साटम अत्यंत गलिच्छ भाषेत अधिकाऱ्यांशी बोलत होता, किंवा काही चित्रविचित्र बायका भर सभेत आयझेड ची भाषा करत होत्या तेव्हा भाजपच्या लोकांना का सुचले नसेल बरे? "मराठा आंदोलनासाठी रिसोर्सेस कोणी उभे केले ते आम्हाला सारं दिसते. मात्र आंदोलनात फायदा पाहणाऱ्यांचं नुकसान होईल" असंही देवेंद्रजी म्हणाले. खरंतर आंदोलनासाठी येणारे लोक पायी, सायकलने, मोटरसायकलवर वडापमध्ये जमेल तसे येत आहेत आणि स्वाभिमानाने पदरमोड करून येत आहेत. पण तरीही देवेंद्रजींनी वरील वाक्य हे नेमके कुणाकडे बघून उच्चारले? काय ते एकनाथ शिंदेंना इशारा देऊ पाहत आहेत का? असेलही कदाचित. आमचं मात्र एवढेच म्हणणं आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसी जे गावगाड्यांमध्ये गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत ती वीण उसवण्याचं पाप फडणवीसांनी करू नये. @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #आरक्षणलढा

SushmaTai Andhare

23,868 görüntüleme • 1 yıl önce

आदरणीय मेघनाताई, आपल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ बघितला तर आपण मंत्री असूनही अधिकाऱ्यांकडून आपला इगो दुखावला असल्याचे स्पष्ट दिसून येते. अधिकाऱ्याला कानात मारण्याची भाषा करण्याअगोदर आपण काय बोललात तो व्हिडिओ देखील मी इथं शेअर करतोय, त्यात कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने आणि राजकीय श्रेय मिळत नसल्याने आपला दुखावलेला इगो स्पष्ट दिसतो. ताई, आपल्याबद्दल आदरच आहे परंतु संवैधानिक पदावर असताना असंवैधानिक कृती करणार असाल तर मात्र ते समर्थनीय नाही. भर सभेत आपल्या कुटुंबियाकडून बंदोबस्तावरील पोलिसांना अत्यंत अश्लाघ्य शिवीगाळ केल्यावर टाळ्या वाजवून दाद देणाऱ्या राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार..!

Rohit Pawar

21,857 görüntüleme • 1 yıl önce

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासातील अत्यंत काळा दिवस आज आपण अनुभवत आहोत. चांदा ते बांदा, शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक ठिकाणी आपल्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले. “दादा… यावेळी वेळ चुकली…” असे शब्द ओठांवर येऊनही ते स्वीकारायला मन तयार होत नाही. अजितदादा सत्तेत असताना मी विरोधी पक्षात काम केले, मी सत्ताधारी पक्षात असताना काही काळ अजितदादा विरोधी पक्षात राहिले, तर अनेक वर्षे आम्ही दोघांनी एकत्र सत्तेतही काम केले. या संपूर्ण वाटचालीत जनतेचे हित हेच अजितदादांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचे केंद्रस्थान राहिले. कोणताही निर्णय घेताना महाराष्ट्रातील सामान्य माणसाला त्याचा कसा लाभ होईल, याची ते नेहमीच काटेकोर काळजी घेत. कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही अनेक विषयांवर दीर्घ आणि कधी कधी तीव्र चर्चा केल्या. या चर्चांमधून “कर्तव्यकठोर” या प्रतिमेच्या आड दडलेले अजितदादांचे हळवे, आपुलकीचे व्यक्तिमत्त्व मी जवळून अनुभवले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची सततची धावपळ सुरूच असायची… आणि आज ती धावपळ कायमची थांबली आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. माझे मित्र, राजकारणातील रांगडे पण तितकेच प्रामाणिक व्यक्तिमत्त्व अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज केवळ एक नेता नाही, तर माझा दमदार, दिलदार मित्र आणि एक खंबीर साथीदार हरपला आहे. “काम करणारा माणूस” ही प्रतिमा कुणी दिलेली नव्हे, ती दादांनी त्यांच्या कृतीतून स्वतः निर्माण केली होती. राजकारणापलीकडे संबंध जपणारा, स्पष्टवक्तेपणा, बोलण्यातली मिश्कीली आणि राजकारणातील अस्सल “नमुना” आज आपण गमावला आहे. काल कॅबिनेटमध्ये आमच्यासोबत असलेले दादा आज आपल्यात नाहीत… यापुढे ते समोर दिसणार नाहीत, बोलणार नाहीत, खांद्याला खांदा लावून उभे राहणार नाहीत… हे वास्तव स्वीकारायला मन तयार होत नाही. “कामाचा माणूस” म्हणून महाराष्ट्रभर ओळख असणारे अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या कार्यातून, निर्णयांतून आणि असंख्य आठवणींतून ते सदैव आपल्या मनात चिरायू राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली! #AjitPawar #Ajitdada #अजितपवार

Girish Mahajan

11,597 görüntüleme • 6 ay önce

आरोप सोपे, पुरावे कुठे? 🤔💥 संजय राऊत, रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांना 'Gen Z' पिढी म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचे साधन वाटतेय का? कथित पेपर फुटीवर बिनबुडाचे आरोप करून अराजकता माजवण्यापेक्षा ताकद असेल तर पुरावे समोर आणा! लातूर NEET घोटाळ्यात शिवराज मोटेगावकरवर जशी कारवाई झाली, तशीच कारवाई दोषींवर होईल. पण ज्यांना 'Percentage' आणि 'Percentile' मधला फरक कळत नाही, ते शिक्षणव्यवस्थेवर बोलतायत! महाराष्ट्रात गोंधळ घालणारे हेच नेते कर्नाटक आणि पंजाबमधील पेपर फुटीवर मूग गिळून गप्प का? स्टंटबाजी सोडा, आजचा Gen Z कोणाचा पाळीव नाही... तो प्रश्न विचारणारच! ✊🔥 Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #GenZSpeaks #MaharashtraPolitics #PaperLeakTruth #RohitPawar #SanjayRaut #YouthPower #FactCheck #PoliticalHyprocrisy

Chitra Kishor Wagh

64,578 görüntüleme • 26 gün önce

काँग्रेसी मानसिकता ही पाकिस्तानशी अगदी मिळती जुळती आहे. तिकडे पाकिस्तानी नेता चौधरी फवाद हुसेनने सर तन से जुदा असा प्रधानमंत्री मोदींविरूध्द नारा दिला इकडे काँग्रेसने तसा फोटो एडिट करून त्यांच्या अधिकृत सोशल हॅन्डल्सवर टाकला. पहलगामच्या हल्ल्याबाबत काँग्रेस आणि त्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचं एकच टारगेट आहे ते म्हणजे मोदीजी. दहशतवादी हिंदू नरसंहारावर बोलण्याऐवजी,राजकीय खेळी खेळत जनतेची दिशाभूल करण्यात काँग्रेसी नेते मश्गुल झालेत. त्यात आपल्याकडच्या वडेट्टीवारांचीही वर्णी लागते. तिकडे त्या कर्नाटकातले काँग्रेसी मुख्यमंत्री देखील युध्द नको वगैरे बरळले तेव्हा आमच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध वर्तवला. त्यांच्या विरूध्द घोषणा केल्या. त्याचा त्या सिध्दरामय्यांना इतका राग आला की, पाकिस्तान विरूध्द अहिंसेची भूमिका घेणाऱ्या सिध्दरामय्यांनी त्यांच्या सभेत कर्तव्यावर असतेल्या पोलीस अधिकाऱ्यावर भर सभेत व्यासपीठावर हात उचलला… काय ही मानसिता आहे..? आज त्या पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा एकजुटीने या परिस्थितीशी सामना करण्याऐवजी पाकिस्तानची बाजू धरुन लावताय..? तुम्हाला इथेसुध्दा तुष्टीकरणाचं राजकारण आणि वोट बँक दिसावी यासारखी दुर्देवी बाब कोणती..? निष्पाप भारतीयांचं रक्त केवळ ते हिंदू आहेत म्हणून वाहिलं त्या रक्ताची तुमच्या लेखी काहीच किंमत नाही..? अरे या मातीत राहता ना... त्याची तरी जाण राखा... Rahul Gandhi Vijay Wadettiwar Congress Maharashtra Congress Narendra Modi Narendra Modi Marathi Amit Shah Devendra Fadnavis CMO Maharashtra Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan #पहलगाम_हिंदू_नरसंहार

Chitra Kishor Wagh

13,982 görüntüleme • 1 yıl önce

धन्यवाद महापौर डिंपल मेहता.. हेच कारण होते शहराचा महापौर #परप्रांतीय नको, #मराठीच हवा अशी मागणी करण्यामागचे. शहरात अनेक #परप्रांतीयांनी हैदोस घातलेला असताना परप्रांतीय महापौरांना #मराठी माणसाचाच व्यवसाय अनधिकृत दिसला. मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय महापौर आणि मेहताच्या घराणेशाहीला विरोध करत स्थानिक मराठी महापौर द्यावा यासाठी मोर्चा काढला म्हणून आज मराठी एकीकरण समिती नाव असलेल्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली. मराठी माणसाला व्यसवाय क्षेत्रात राष्ट्यावत उतरून आम्ही व्यसवाय करण्यास प्रोत्साहित करतो, बळ देतो ते आता उध्वस्त केले जात आहे.. मराठी माणसाला संपविण्यासाठीच यापुढे प्रयत्न केले जातील यात मात्र शंका नाही, इथे यांना हिंदुत्व आठवणार नाही कारण मराठी माणूस यांना हिंदू वाटत नाही. या कृतीचा जाहीर निषेध !!! मराठी माणसा जागा हो !!! #मिराभाईंदर #महापौर #मराठीद्वेष #डिंपलमेहता #जाहीरनिषेध #मराठीएकीकरणसमिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

35,546 görüntüleme • 6 ay önce