
Abhijit Karande
@AbhijitKaran25 • 32,185 subscribers
Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.
Shorts
Videos

उद्योजक का राहतील महाराष्ट्रात?? सांगा… खेड MIDC मध्ये हुंडाई कंपनीत केवळ दुसऱ्या भागातील माणसाला काम मिळालं म्हणून गावगुंडांनी त्यांना जबर मारहाण केली. एकजण तर ICU मध्ये आहे. प्रत्येक MIDC मध्ये नेत्यांच्या बगलबच्च्यांची दहशत आहे. हप्ते वसुली सुरु आहे. आज नाही, वर्षानुवर्षे सुरु आहे. यात सगळ्या पक्षांचे लोक सामील आहेत. कुणीही अपवाद नाही. पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, खेडमध्ये तर नंगानाच सुरु आहे. वसुलीवाले कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे, पण दहशतीमुळे उद्योग करणारे लोक बोलत नाहीत. पोलीस सगळीकडे सामील आहेत. Devendra Fadnavis तुम्ही हा दहशतवाद मोडून काढा. लोक आयुष्यभर धन्यवाद देतील. #MaharashtraPolitics #MIDC #industry
Abhijit Karande140,701 views • 1 year ago

मराठवाड्यातील ठाकरेंचे शिवसैनिक षणमुखानंद सभागृहाबाहेर… लिंक - #Maharashtra #Shivsena #BJP
Abhijit Karande24,332 views • 2 months ago

कॅन्सरमुळे शरद पवारांच्या चेहऱ्यावर झालेल्या व्यंगाची सदाभाऊ खोतांसारखे नेते खिल्ली उडवतात आणि व्यासपीठावरचे लोक हसत राहतात..! ही आपली संस्कृती आहे का? सर्वपक्षीय नेत्यांनी अशा भाषेत बोलणाऱ्यांना प्रमोट करणं बंद करायला पाहिजे. #MaharashtraElection2024 #MaharashtraPolitics
Abhijit Karande123,746 views • 1 year ago

पहिला व्हिडीओ लातूरच्या अमोल शिंदेच्या आई-वडिलांचा आहे. दुसरा व्हिडीओ हरयाणाच्या नीलमच्या भावाचा आहे, दोघांनीही संसदेबाहेर कलर गॅस फोडले. दोघेही बेरोजगारीमुळे, गरीबीमुळे त्रासलेत. अमोल पदवीधर आहे. त्याला पोलीसात भरती व्हायचं होतं. रोजंदारीवर कंन्स्ट्रक्शनचं काम करायचा. नीलम एमए, एमएड, नेट झालीय. तिलाही नोकरी नाहीए. बेरोजगारी हे सगळ्यात मोठं संकट आहे. पोटाचा प्रश्न बिकट आहे. पण जातीधर्माच्या राड्यात आणि राजकारण्यांच्या नॅरेटिव्हमुळे खरे प्रश्न निवडणुकीत पुढंच येत नाहीत. मग असे अमोल, नीलम चुकीच्या पद्धतीनं आंदोलनं करताना दिसतात.. दोन्ही व्हिडीओ नक्की बघा आणि ऐका.. #ParliamentAttack #AmolShinde #LokSabha
Abhijit Karande163,352 views • 2 years ago

ज्यांना ज्यांना असं वाटतंय की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे संतोष देशमुखांना न्याय मिळेल, त्यांचे डोळे Mrs Anjali Damania यांच्या मुलाखतीने उघडतील. SIT ने चार्जशीटमध्ये घातलेले घोळ, वगळलेली नावं बघितली तर ही केस मजबुतीनं कोर्टात उभी राहील असं वाटतं का ? बघा… अंजली दमानियांचे धक्कादायक खुलासे! पूर्ण लिंक - #SantoshDeshmukh #DhananjayMunde
Abhijit Karande80,165 views • 1 year ago

आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आजही कोल्हापूर हिरवंगार आहे. राधानगरी धरण हे राजर्षी शाहूंची मोठी देण आहे. २०१९ ला पावसाने ओढ दिली होती, तेव्हा राधानगरी धरणाचा इतिहास टिपून ठेवला होता. थोडा वेळ असेल तर नक्की पाहा.. राजा लक्षात राहतो तो शाळा, कॉलेज, रुग्णालय, उद्योग, शेती आणि समाजाला दिशा देणाऱ्या दूरदर्शी निर्माणामधून…! राजर्षी शाहूंना विनम्र अभिवादन 🙏 #RajarshiShahuMaharaj #Maharashtra
Abhijit Karande14,916 views • 2 months ago

विरोधक मोदींना बदनाम करतायत. त्यांच्या हातामध्ये काहीही नाहीये - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
Abhijit Karande21,160 views • 3 months ago