
Pratik S Patil
@Liberal_India1 • 94,225 subscribers
YouthActivist | AvidReader | PoliticalAnalyzer | Nehruvian | Legislative Research
Shorts
Videos

मोहन भागवत यांच्या Gen Z संवादातून बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींना लोकमतच्या पत्रकाराने एकच प्रश्न विचारला कसं वाटलं? उत्तरांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसली… देशातील बहुतांश Gen Z आता कोणाच्याही विचारांना केवळ पद किंवा प्रतिमा पाहून स्वीकारत नाही. ते प्रश्न विचारतात, तर्क लावतात आणि स्वतःचं मत बनवतात. हीच नव्या भारतातील तरुणाईची ओळख आहे. अंधानुकरण नाही, तर विचारपूर्वक भूमिका.
Pratik S Patil314,767 просмотров • 7 дней назад

21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा. इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा. त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते. आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.
Pratik S Patil527,936 просмотров • 18 дней назад

जेन झी एकदम डेंजर आहे आंदोलनात पोलिसांनी पकडले तर त्यांना मराठीत कसे भंड करायचे या पोरी सांगत आहेत 🤣🤣
Pratik S Patil198,120 просмотров • 21 дней назад

पुण्यात मोर्चा जेव्हा भाजपा आमदाराच्या कार्यालयापासून गेला तेव्हा 😂😂 पुणेकर रॉक्स 🔥🔥
Pratik S Patil116,579 просмотров • 20 дней назад

एकतर महाराष्ट्राच्या फारसा उपयोग नसलेला बुलेट ट्रेन प्रकल्प रेटून नेला जात आहे… आणि त्यातही निकृष्ट दर्जाची कामे. बुलेट ट्रेन मार्गावरील उल्हास नदीचा पूल वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणतील, अजून टेस्टिंग सुरू आहे. पण जनतेच्या पैशांवर उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमध्ये अशा प्रकारचा निष्काळजीपणा स्वीकारता येणार नाही. विकासाच्या नावाखाली दर्जाहीन कामे आणि नंतर त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, हेच आता नवे वास्तव बनले आहे.
Pratik S Patil129,630 просмотров • 29 дней назад

ह्यांचं नाव आहे अनिरुद्ध मराठे. मराठे काका हळू आणि शांतपणे बोलतात. पण त्यांचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन, संयमाने ऐका. त्यांनी मांडलेले मुद्दे नक्की ऐकण्यासारखे आहेत. अवश्य ऐका. आशा करतो, हे पूर्ण ऐकल्यानंतर तरी काही भक्तांचे डोळे उघडतील. सत्य ऐकण्याची तयारी असेल, तर विचार नक्की बदलू शकतात.
Pratik S Patil70,659 просмотров • 20 дней назад

राहुल गांधी विद्यार्थी आंदोलनात कुठे आहेत?असा नरेटिव्ह एबीपी न्यूजच्या संपादक मेघा प्रसाद सातत्याने चालवत होत्या… पण गंमत बघा त्यांच्याच रिपोर्टरने ग्राउंडवरून राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी असल्याचं दाखवत संपूर्ण नरेटिव्हलाच आरसा दाखवला🤣 कधी कधी विरोधकांना ट्रोल करण्यापेक्षा स्वतःचं कव्हरेजच जास्त प्रामाणिक ठरतं. 😄
Pratik S Patil60,759 просмотров • 22 дней назад

पवन वाघुळकर ने विश्वगुरूची भारी नक्कल केली आहे आणि देशाच्या परिस्थितीवर एकदम सटिक कटाक्ष टाकला आहे 😂😂 #झालमूरी
Pratik S Patil237,165 просмотров • 3 месяцев назад

डोंबिवलीच्या या पोराने लाल कलरच्या साडीवर सरकारविरोधात गाणे बनविले आहे यात एकनाथ शिंदेंना पण गुंडाळले 🤣
Pratik S Patil30,291 просмотров • 20 дней назад

पुण्यात काँग्रेसविरोधात आंदोलन करायला गेलेल्या भाजपलाच जनतेने धारेवर धरले. आता जनता प्रश्न विचारू लागली आहे.
Pratik S Patil30,781 просмотров • 21 дней назад

पुण्यात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दगडूशेठ परिसरात विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी जोरदार आंदोलन केले. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना आता जनतेसमोर उत्तर द्यावेच लागेल. ✊🔥
Pratik S Patil30,454 просмотров • 21 дней назад

अभिनेत्री इला अरुण यांची मुलगी… कलेचा किती नेमका वापर केला आहे बघा अग्रवाल फॅमिली सेलिब्रेशन, राम रहीम बेल, बलात्काऱ्याचं जंगी स्वागत समाजातील ढोंगीपणा, पैशाची ताकद आणि विकृत सेलिब्रेशन संस्कृतीवर एका फ्रेममध्ये इतका तीक्ष्ण कटाक्ष टाकणं… हीच खरी कला.
Pratik S Patil90,565 просмотров • 2 месяцев назад

पार्थ पवार मित्रा काँग्रेसचे पतन करायला तुझ्या आजोबांनी आणि तुझ्या वडिलांनी असंख्य प्रयत्न केले पण काँग्रेसचा डाऊन फॉल करण्याचा अजेंडा त्या दोघांना कधी हशील झाले नाही अजित दादा आणि पवार साहेबाबद्दल आदर आहे पण जे तुझ्या वडिलांना आणि आजोबांना जमले नाही अशा गोष्टी बोलून तुझे हसू करू नकोस प्रफुल्ल पटेलांसोबत सुखी रहा.
Pratik S Patil124,636 просмотров • 4 месяцев назад

काही वर्षांपूर्वी मनोहर भिडेच्या धारकरी चळवळीत सक्रिय असलेला एक तरुणसांगतो आहे की , भिडे सांगतो तो इतिहास आणि खरा इतिहास यामध्ये खूप मोठे अंतर आहे. तरुणांची माथी भडकवण्याचे काम होत असल्याची जाणीव झाल्यानंतर मी ती चळवळ सोडली. आशा आहे, त्याच्याप्रमाणे इतर तरुणांचेही डोळे उघडावेत आणि ते इतिहासाकडे तथ्यांच्या आधारे पाहावेत.
Pratik S Patil28,740 просмотров • 1 месяц назад