
Rohit Pawar
@RRPSpeaks • 785,401 subscribers
Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS
Shorts
Videos

देशाच्या शिक्षणमंत्र्यांची ज्यांनी विकेट घेतली ते विद्यार्थी नेता अभिजित दिपके हे #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी आज संध्याकाळी येत आहेत. Abhijeet Dipke #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे #आता_माघार_नाही
Rohit Pawar137,493 просмотров • 7 дней назад

'विवेकानंद' बोले, सत्तेला टोले.. #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
Rohit Pawar31,923 просмотров • 6 дней назад

पुण्यातील नवी पेठेत राहणारा ५ वीतील गोपी राहुल शिंदे गेल्या ५ दिवसांपासून #MPSC विद्यार्थी सत्याग्रहामध्ये रोज हजेरी लावतोय. या वयात मुलं खेळण्यात मग्न असतात, पण गोपीने मात्र आत्ताच त्याचं 'ध्येय' निश्चित केलंय. पण त्याहूनही जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याच्याशी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर देशाच्या आणि स्वतःच्या 'भविष्याची काळजी' स्पष्ट जाणवली. या चिमुकल्याची ही संवेदनशीलता जितकी कौतुकास्पद आहे, तितकीच ती या व्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे आणि सत्याग्रहाची देखील ताकद हीच असते...! #MPSCProtest #MPSCStudentSatyagraha #MPSCPuneProtest #MPSCStudentsProtest
Rohit Pawar22,896 просмотров • 5 дней назад

‘‘मुख्यमंत्री महोदय, क्रेडीट तुम्ही घ्या… पण भिमनवारांना आधी पदावरुन हटवा, तुमचं दायित्त्व हे एका अधिकाऱ्यासाठी नाही तर १३ कोटी जनतेशी आहे.’’ – सतेज ऊर्फ बंटी पाटील (काँग्रेसचे ज्येष्ठ नेते) Satej (Bunty) D. Patil #MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
Rohit Pawar25,033 просмотров • 6 дней назад

पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मित्राच्या जमिनीवर इतर कोणत्याही व्यक्तीने ताबा मारला असता तर त्याला लगेच जेलमध्येही टाकलं असतं, पण भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. कदाचित मोदी साहेबांपेक्षाही त्यांच्या पक्षाचे हे आमदार महाशय मोठे झाल्याचं त्यावेळी जाणवलं.. आणि इकडं दुष्काळामुळं शेतकऱ्याच्या डोळ्यातही पाणी शिल्लक राहिलं नाही, त्यामुळं मुख्यमंत्री राज्यातील दुष्काळाची पाहणी करतायत आणि त्यांचे आमदार आपला वाढदिवस असा धुमधडाक्यात साजरा करुन पैशांची उधळपट्टी करत असतील तर यावरुन आपल्याच पक्षाच्या आमदारांवर सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही, हेच दिसतं…! यालाच म्हणतात असंवेदनशीलतेचा कळस..!
Rohit Pawar25,427 просмотров • 15 дней назад

भाजप कार्यकर्त्याकडून ताब्यात घेतलेले हे SIR चे फॉर्म काल खारघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळं SIR (Special Intensive Revision) ही मोहिम केवळ भाजपाच्या मतदारांचीच नावे मतदार यादीत ठेवून विरोधी पक्षाच्या मतदारांना वगळण्याचं ‘राष्ट्रीय अभियान’ असल्याचं आता जगजाहीर झालंय. त्यामुळं या मोहिमेचं SIR हे नाव बदलून Special BJP Voter Confirmation (SBVC) असं ठेवायला हरकत नाही. भाजप आणि निवडणूक आयोग असं ‘ताकाला जाऊन किती दिवस भांडं लपवणार?’ #SIR #ElectionCommission #मतदार_यादी #निवडणूक_आयोग
Rohit Pawar66,482 просмотров • 1 месяц назад

मा. अजितदादा तुमच्याविना, यंदाचा गणेशोत्सव होता सुना सुना…. पण तुमच्यासाठीचा आमचा लढा थांबलेला नाही.. त्यासाठीच आजच घेण्यात येणारी प्रेस कॉन्फरन्स देशपातळीवर निवडणूक आयोगाबाबत आणि राज्यात दुष्काळाबाबत निर्माण झालेली परिस्थिती बघता पुढं ढकलण्यात येतेय. येत्या १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही ‘मफलरीं’चे खुलासे करतोय…! #Ajitdadapawar
Rohit Pawar20,768 просмотров • 13 дней назад

ही केवळ एका संपादकांचीच नाही तर अंधभक्त सोडून लोकशाहीवर विश्वास असलेल्या देशातील तमाम मतदारांची भावना आहे...
Rohit Pawar22,091 просмотров • 16 дней назад

#NEET पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. याच भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक या देशातील एका महान शिक्षणतज्ज्ञाच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी आता सर्वांनीच जागं होऊन या लढ्याला साथ देण्याची आणि अहंकारी सरकारला जनभावनेपुढं गुडघे टेकवण्यास भाग पाडण्याची गरज आहे. Sonam Wangchuk Abhijeet Dipke Cockroach Janta Party - CJP #We_Support_SonamWangchuk #SonamWangchuk #DelhiProtest #ResignDharmendraPradhan #JusticeForStudents
Rohit Pawar96,862 просмотров • 2 месяцев назад

एका उपमुख्यमंत्र्यांचा पुणे जिल्हा आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री या दोघांचाही सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कानवडी-खानापूर रस्त्याची ही दुर्दशा पहा. या रस्त्यासाठी स्थानिकांनी केलेल्या आंदोलनामुळं सरकारच्या कथित ‘वेगवान’ कारभारावर अक्षरशः चिखल फासला गेला. आता आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी तरी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री याकडं लक्ष देतील का, याकडं आमचं लक्ष आहे. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivendrasinh A Bhonsle
Rohit Pawar58,096 просмотров • 1 месяц назад

गार्गी संदिप जाधव ही चिमुकली SMA Type 1 या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असून तिच्यावर उपचार करण्यासाठी १० कोटी रुपये इतका मोठा खर्च येणार आहे. या गोड चिमुकलीला नवजीवन देण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. आम्ही आमच्यापरीने त्यासाठी प्रयत्न करत असून आपणही आपल्या इच्छेप्रमाणे सोबत दिलेल्या स्कॅनरवर शक्य तेवढं आर्थिक योगदान देऊन या पुण्यकर्मात सहभागी व्हावं, असं आवाहन आहे.
Rohit Pawar28,571 просмотров • 27 дней назад