Rohit Pawar's banner
Rohit Pawar's profile picture

Rohit Pawar

@RRPSpeaks • 785,401 subscribers

Committed to a better Maharashtra & @NCPspeaks MLA from Karjat-Jamkhed CEO Baramati Agro https://t.co/fT5K3JYHRS

Shorts

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं बेलापूर इथं प्रशस्त ऑफिस असताना देखील भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार साहेबांसाठी कफ परेडच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं सेंटर वन बिल्डिंगला १२व्या मजल्यावर ४,००० sq. ft.चं, साधारणतः १० लाख रु. प्रतिमहिना भाडं असलेलं प्रशस्त, lavish आणि exclusive ऑफिस घेतलं असून या ऑफिसचं भिमनवार साहेब थोड्याच वेळात गुपचूप उद्घाटन करून आसनस्थ होणार आहेत. एकीकडे आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह असताना अध्यक्ष मात्र अशाप्रकारे उधळपट्टी करत आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांकडून एकेक हजार रुपये परीक्षा फी घेता आणि दुसरीकडे मात्र स्वतःसाठी १० लाख रु. प्रतिमहिना भाडं असलेलं ऑफिस घेता, हे शोभतं का? राजकीय खलबतं करता यावीत, कलेक्शनचं गणित आखता यावं यासाठी मंत्रालय परिसरात हे नवं ऑफिस घेतलंय का? आयोगाचं कार्यालय बेलापूर आणि अध्यक्ष कफ परेडला बसणार असतील तर आयोगाचा कारभार चालेल कसा? घोटाळे करायला रान मोकळं हवं म्हणून हे कार्यालय घेतलं का? आम्ही आधीपासून सांगतोय, विद्यमान अध्यक्ष भिमनवार भ्रष्ट आहेत आणि ते आयोगाची वाट लावत आहेत. सरकारने तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा!

62,949 görüntüleme

मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कथित विकासासाठी शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेल्या खालापूरच्या लोकप्रतिनिधींचा गोव्यातील हॉटेलमध्ये टेबलवर उभं राहून नाचतानाचा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल… त्यांच्याच खालापूर मतदारसंघातील हा 'विकास' बघा.. रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीतून खांद्यावर नेण्याची वेळ आली.. हा यांचा 'विकास'. शिवाय राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यासुद्धा रायगड जिल्ह्यातील आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यातच महिलांची ही अवस्था असेल तर इतर जिल्ह्यांबाबत न बोललेलंच बरं! #खालापूर #रायगड #विकासाचे_वास्तव #जनतेचे_प्रश्न #महाराष्ट्र

94,589 görüntüleme

मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का? मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार! #MissingLink #MissingSuraksha #जनतेच्याजीवाशीखेळ #SafetyFirst #InfrastructureFailure

74,138 görüntüleme

सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही #दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं! #Maharashtra | #Election2024 |

266,655 görüntüleme

मुंबईत महानायकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलं तरीही नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प आहेत.. आज राज्यात भाजप व्यतिरिक्त महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आज सत्तेत असलेल्या कित्येकांनी रस्त्यावरच्या पाण्यात अक्षरशः डुबकी घेऊन नको ती नौटंकी केली असती आणि अनेक कलाकारांनीही वेगवेगळे डायलॉग मारले असते.. पण आज तसं कुणीही दिसत नाही.. याला काय म्हणावं? #mumbaiRain #दुटप्पीभूमिका #सोयीचंमौन #जबाबदारकोण

44,482 görüntüleme

“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? #कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या

153,978 görüntüleme

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांचा अवमान केल्याप्रकरणी आणि मनुस्मृतीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून नागपुरात काढलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांना केलेल्या मारहाणीचा तीव्र निषेध! काँग्रेसने मनुस्मृतीचा निषेध केल्याने या सरकारला दुःख झालं का, म्हणून पोलिसांना पुढं करून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर बळाचा वापर केला गेला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पण सरकारची ही मुजोरी आम्ही कदापि खपवून घेणार नाही. Shivraj More Maharashtra Congress Indian Youth Congress

16,990 görüntüleme

पुणे मनपा कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं सिद्ध झालं आणि याप्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचं चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केलं तरीही सखोल चौकशी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासन या परीक्षेतून निवड झालेल्यांना नियुक्त्या देण्याची घाई का करतंय? त्यासाठी कुणाचा दबाव आहे का? प्रामाणिकपणे अभ्यास करुन विद्यार्थी परीक्षा देतात आणि परीक्षेत गैरकृत्य करणाऱ्या रॅकेटच्या माध्यमातून भलत्यांचीच निवड केली जाते, हे अजून किती दिवस खपवून घ्यायचं? ही परीक्षा रद्द करुन नव्याने परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी आजही अनेक विद्यार्थी हे महापालिकेसमोर आंदोलन करत आहेत. प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन ही परीक्षा आणि दिलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अन्यथा विद्यार्थ्यांचा हा लढा अधिक तीव्र होईल आणि आमचाही त्यांच्या या लढ्याला पाठींबा असेल. उद्या (मंगळवार) नवी मुंबईत MPSC कार्यालयाला भेट दिल्यानंतर या विद्यार्थ्यांनाही भेटण्याचा माझा प्रयत्न राहील. #पुणे_महापालिका #भरती_प्रक्रिया

20,573 görüntüleme

हा आहे मुंबईतील 'वांद्रे-वरळी सी-लिंक' आज १६ वर्षांनंतरही तो भक्कमपणे उभा आहे आणि त्यावर साधी डागडुजीही करावी लागली असेल असं वाटत नाही.. आणि हा पूल कुणी बांधलाय आठवतंय का? हा पूल काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने बांधला. त्यावेळी पंतप्रधान होते स्व. डॉ. मनमोहन सिंग साहेब, मुख्यमंत्री होते स्व. विलासराव देशमुख साहेब आणि संबंधित खात्याचे मंत्री होते ज्यांच्यावर भाजपाने खोटे आरोप केले ते मा. अनिल देशमुख साहेब. इथं क्वालिटी असते, मिसिंग लिंकप्रमाणे पहिल्याच पावसात खड्डे पडत नाहीत..! #वांद्रे_वरळी_सी_लिंक #Infrastructure #QualityInfrastructure

40,496 görüntüleme

राज्यातील लाखों विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा खुन करणाऱ्या #MPSC च्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि पेपरफुटीचा योग्य तपास व्हावा यासाठी आज अमरावती येथे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत आपल्या भावना मांडल्या. सरकारने वेळीच MPSC च्या गैरकारभाराची दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अन्यथा आज अमरावतीत हा मोर्चा झालाय उद्या राज्यभरात यापेक्षा मोठे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission #MPSC #पेपरफुटी #अमरावती #विद्यार्थी_आंदोलन

17,641 görüntüleme

तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…! पण निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध..! #WestBengalLegislativeAssemblyelection2026

54,281 görüntüleme

आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपल्याविषयी आदर आहे, पण सत्य सांगणं देखील गरजेचं आहे. आपला नेहमीच आदर राहिलेला आहे आणि आपला मनमोकळा स्वभाव देखील नेहमीच आवडतो परंतु जावळी भागात सद्यस्थितीला जे चाललंय ते कदापि योग्य नाही. सोसायट्याच्या ठरावासाठी बाहेरून गुंड बोलवून स्थानिकांवर दहशत निर्माण करणं हे अंत्यंत खेदजनक आहे. आपण भाजपमध्ये असलात, वरून दबाव असेलही किंवा चुकीच्या नेत्यांची सोबत असेलही परंतु आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात हे आपण विसरु नये. आपण योग्य माणसासाठी आदेश दिलात तर एकच काय जावळीतील शेकडो गावे ठराव देतील, पण अशाप्रकारची दहशत जनतेला आवडणारी नाही. यासंदर्भात आपण गांभीर्याने विचार कराल, ही अपेक्षा वजा विंनती..! Shivendrasinh A Bhonsle #जावळी #जनतेचा_आवाज #महाराष्ट्र

24,010 görüntüleme

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांची भेट झाली असता त्यांनी पारंपरिक तारपा वाद्य वाजवून दाखवलं. तारपा हे आदिवासी संस्कृतीतील एक अनोखं वाद्य असून ते वाजवण्याची परंपरा भिकल्या लाडक्या धिंडा यांच्याकडं त्यांच्या वडीलांकडून आली आहे. तारपा वाद्य वाजवण्याच्या कलेची साधना पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब, अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षयाताई नाईक, साम्याताई कोरडे यावेळी उपस्थित होत्या.

22,014 görüntüleme

हा व्हिडिओ एखाद्या पार्किंगचा नाही तर तो आहे पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे भागातील. हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणारे हजारो IT Professionals या आणि आसपासच्या भागात राहतात. याच भागातील विविध IT कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला, मात्र गेल्या काही वर्षांपासून हा भाग पूर्णतः वाहतूक कोंडीत अडकलाय. परिणामी अनेक कंपन्यांनी स्थलांतर केलं असून काही कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत. या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर स्थानिकांना रोजगार देणाऱ्या आणि इथल्या आर्थिक प्रगतीला चालना देणाऱ्या अनेक कंपन्या बाहेर जातील आणि त्याची जबर किंमत इथला युवा आणि स्थानिकांना मोजावी लागेल. त्यामुळं सरकारने प्राधान्याने ही वाहतूक कोंडी सोडवावी. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar #वाहतूककोंडी #Traffic #Hinjewadi #ITPark

34,465 görüntüleme

suggestion for action दादा..! #AjitdadaPawar

54,262 görüntüleme

लढवय्या विद्यार्थ्यांना सर्व विरोधकांची साथ… साहेबही मैदानात..! आता विरोधकांची मोळी बांधल्याने जनरल डायर सरकारची गोळीही इथं चालणार नाही..! Sonam Wangchuk Abhijeet Dipke Cockroaches of India #CJPProtest #JantarMantar #SonamWangchuk #AbhijeetDipke #DharmendraPradhanResign

21,638 görüntüleme

#राजीनामा_द्यावाच_लागेल! सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? #खोटं_बोल_पण_रेटून_बोल |#शेतकऱ्यांवर_अन्याय_नको | #विधिमंडळाचा_अपमान | #राजीनामा_द्या |

63,220 görüntüleme

धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी चार वर्षांपासून गणित आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक नसल्याने थेट शाळेलाच कुलूप ठोकून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. Gen-Alpha च्या या दणक्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाची नियुक्ती केली, पण एकीकडं शिक्षक भरतीसाठी हजारो पात्र उमेदवार उपलब्ध असूनही भरती केली जात नाही तर दुसरीकडं चार-चार वर्षे विज्ञान आणि गणितासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षक नाहीत, ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे इथले आमदार तानाजी सावंत हे स्वतः मोठे शिक्षण सम्राट आहेत, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी याच महाशयांनी दीडशे बैठका घेतल्या होत्या म्हणे…! मग आपल्याच मतदारसंघातील सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी एकही बैठक का घेतली नाही, हा प्रश्नच आहे. सरकारलाही विनंती आहे की, जंतरमंतरवरुन काहीतरी धडा घ्या आणि विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष करायचं बंद करा..! Devendra Fadnavis Dadaji Bhuse #GenAlpha #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या #शिक्षण_वाचवा #धाराशिव #StudentProtest

13,276 görüntüleme

जेंव्हा राजकारण मूलभूत मुद्द्यांना वरचढ होतं, संस्थामध्येही राजकारणाचा शिरकाव होतो, तेंव्हा विकास मात्र हरवतो. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या ST महामंडळाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय गतिमान आणि महाराष्ट्र वेगवान’ अशी केवळ जाहीरातबाजी करण्यापुरताच या सरकारकडून ST चा वापर केला जात असल्याने मूलभूत प्रश्नांकडं मात्र दुर्लक्ष होत असल्याचंच या फोटोवरुन दिसत आहे.

108,043 görüntüleme

लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी रात्री अभिवादन करण्यासाठी गेलो असता विरोधकांचं अत्यंत किळसवाणं आणि शरम वाटावी असं वर्तन बघायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीच्या नावाने स्वतःचाच उदोउदो करुन घेण्याची हौस भागवली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विराट कर्तृत्त्वाचे, उत्तुंग नेतृत्त्वाचे, समाजाप्रतीच्या निष्ठेचे गोडवे गाण्याऐवजी ‘रामभाऊ तुमचं काम एक नंबर’ अशी स्वतःचीच आरती गाणारी ओंगाळवाणी गाणी ऐकावी लागत होती… हे ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे की विरोधकांच्या वाढदिवसाची पार्टी आहे, असा प्रश्न पडला. तिथंच मिरवणुकीसारखं वातावरण दिसलं.. वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक असावी, पण ती मिरवणूक नव्हती तर दुसऱ्या एका आमदाराला काहीजण खांद्यावर घेऊन आत्मस्तुती करणाऱ्या ‘नाद करायचा नाय’ गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे हे सगळं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ घडत होतं आणि यावरही कळस म्हणजे या स्थळाचं पावित्र भंग करणारी शिविगाळही इथं ऐकायला मिळाली.. हे सगळं संतापजनक आहे. किमान कुठं कसं वागायचं याचं तरी भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे..! #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #जयंती #चोंडी #महाराष्ट्राचा_अभिमान

16,342 görüntüleme

Videos

RRPSpeaks's profile picture

पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मित्राच्या जमिनीवर इतर कोणत्याही व्यक्तीने ताबा मारला असता तर त्याला लगेच जेलमध्येही टाकलं असतं, पण भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. कदाचित मोदी साहेबांपेक्षाही त्यांच्या पक्षाचे हे आमदार महाशय मोठे झाल्याचं त्यावेळी जाणवलं.. आणि इकडं दुष्काळामुळं शेतकऱ्याच्या डोळ्यातही पाणी शिल्लक राहिलं नाही, त्यामुळं मुख्यमंत्री राज्यातील दुष्काळाची पाहणी करतायत आणि त्यांचे आमदार आपला वाढदिवस असा धुमधडाक्यात साजरा करुन पैशांची उधळपट्टी करत असतील तर यावरुन आपल्याच पक्षाच्या आमदारांवर सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही, हेच दिसतं…! यालाच म्हणतात असंवेदनशीलतेचा कळस..!

Rohit Pawar

25,427 görüntüleme • 15 gün önce