
Abhijit Karande
@AbhijitKaran25 • 32,444 subscribers
Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.
Shorts
Videos

उद्योजक का राहतील महाराष्ट्रात?? सांगा… खेड MIDC मध्ये हुंडाई कंपनीत केवळ दुसऱ्या भागातील माणसाला काम मिळालं म्हणून गावगुंडांनी त्यांना जबर मारहाण केली. एकजण तर ICU मध्ये आहे. प्रत्येक MIDC मध्ये नेत्यांच्या बगलबच्च्यांची दहशत आहे. हप्ते वसुली सुरु आहे. आज नाही, वर्षानुवर्षे सुरु आहे. यात सगळ्या पक्षांचे लोक सामील आहेत. कुणीही अपवाद नाही. पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, खेडमध्ये तर नंगानाच सुरु आहे. वसुलीवाले कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे, पण दहशतीमुळे उद्योग करणारे लोक बोलत नाहीत. पोलीस सगळीकडे सामील आहेत. Devendra Fadnavis तुम्ही हा दहशतवाद मोडून काढा. लोक आयुष्यभर धन्यवाद देतील. #MaharashtraPolitics #MIDC #industry
Abhijit Karande140,716 просмотров • 1 год назад

कॅन्सरमुळे शरद पवारांच्या चेहऱ्यावर झालेल्या व्यंगाची सदाभाऊ खोतांसारखे नेते खिल्ली उडवतात आणि व्यासपीठावरचे लोक हसत राहतात..! ही आपली संस्कृती आहे का? सर्वपक्षीय नेत्यांनी अशा भाषेत बोलणाऱ्यांना प्रमोट करणं बंद करायला पाहिजे. #MaharashtraElection2024 #MaharashtraPolitics
Abhijit Karande123,776 просмотров • 2 лет назад

पहिला व्हिडीओ लातूरच्या अमोल शिंदेच्या आई-वडिलांचा आहे. दुसरा व्हिडीओ हरयाणाच्या नीलमच्या भावाचा आहे, दोघांनीही संसदेबाहेर कलर गॅस फोडले. दोघेही बेरोजगारीमुळे, गरीबीमुळे त्रासलेत. अमोल पदवीधर आहे. त्याला पोलीसात भरती व्हायचं होतं. रोजंदारीवर कंन्स्ट्रक्शनचं काम करायचा. नीलम एमए, एमएड, नेट झालीय. तिलाही नोकरी नाहीए. बेरोजगारी हे सगळ्यात मोठं संकट आहे. पोटाचा प्रश्न बिकट आहे. पण जातीधर्माच्या राड्यात आणि राजकारण्यांच्या नॅरेटिव्हमुळे खरे प्रश्न निवडणुकीत पुढंच येत नाहीत. मग असे अमोल, नीलम चुकीच्या पद्धतीनं आंदोलनं करताना दिसतात.. दोन्ही व्हिडीओ नक्की बघा आणि ऐका.. #ParliamentAttack #AmolShinde #LokSabha
Abhijit Karande163,352 просмотров • 2 лет назад

ज्यांना ज्यांना असं वाटतंय की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे संतोष देशमुखांना न्याय मिळेल, त्यांचे डोळे Mrs Anjali Damania यांच्या मुलाखतीने उघडतील. SIT ने चार्जशीटमध्ये घातलेले घोळ, वगळलेली नावं बघितली तर ही केस मजबुतीनं कोर्टात उभी राहील असं वाटतं का ? बघा… अंजली दमानियांचे धक्कादायक खुलासे! पूर्ण लिंक - #SantoshDeshmukh #DhananjayMunde
Abhijit Karande80,165 просмотров • 1 год назад

मराठवाड्यातील ठाकरेंचे शिवसैनिक षणमुखानंद सभागृहाबाहेर… लिंक - #Maharashtra #Shivsena #BJP
Abhijit Karande24,353 просмотров • 4 месяцев назад

“मी एक शेतकरी आहे. कुठल्या पक्षाशी संबंध नाही. मी एक माळकरी आहे. मी पण देवाचाच आहे. तीन पिढ्यापासनं माझं घर माळकरी आहे. राम माझ्या मनात आहे. राम मंदिर बांधून राम मला जेवायला देणार नाही. देव मंदिरात आहे, पण इथं जेवायला नाही” प्रियंका गांधी यांच्या सभेनंतर कार्यकर्ते आणि सामान्य लातूरकर काय म्हणाले ..? पूर्ण व्हिडीओ - #LokSabaElections2024 #MaharashtraPolitics
Abhijit Karande79,818 просмотров • 2 лет назад