Chandrashekhar Bawankule's banner
Chandrashekhar Bawankule's profile picture

Chandrashekhar Bawankule

@cbawankule113,441 subscribers

Revenue Minister Govt. of Maharashtra | Guardian Minister Nagpur & Amravati District.

Shorts

🔸केरळमधील काँग्रेस सरकारचे गृहमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचे तिरंगा असलेला केक कापतानाचे संतापजनक दृश्य समोर आले आहे. तीनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात वंदे मातरम चा अपमान केल्याचे दृश्य समोर आले. यापूर्वी राहुल गांधी व काँग्रेस नेत्यांनी भारतीय महापुरुषांचा अनादर अनेकदा केला आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वापासून ते स्थानिक नेतृत्वापर्यंत हा राष्ट्रभावनेचा अपमान करण्याचा एक पॅटर्न अधोरेखित होत आहे. काँग्रेसमध्ये अजूनही राष्ट्रभक्त कार्यकर्ते असतील, तर त्यांनी आपल्या नेतृत्वाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही! रमेश चेन्निथला यांच्यावर राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक अधिनियम, १९७१ मधील कलम २ अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. रमेश चेन्निथला या देशाची नाक घासून माफी मागा! 🔸केरल की कांग्रेस सरकार के गृहमंत्री एवं महाराष्ट्र कांग्रेस के प्रभारी रमेश चेन्निथला का तिरंगे वाला केक काटते हुए का शर्मनाक दृश्य सामने आया है। तीन ही दिन पहले कांग्रेस के स्वतंत्रता दिवस कार्यक्रम में वंदे मातरम् का अपमान करने का दृश्य सामने आया। इससे पहले राहुल गांधी और कांग्रेस नेताओं द्वारा भारतीय महापुरुषों का कई बार अनादर किया गया है। कांग्रेस के सर्वोच्च नेतृत्व से लेकर स्थानीय नेतृत्व तक राष्ट्रभावना के अपमान का एक पैटर्न उभरकर सामने आ रहा है। कांग्रेस में अभी भी यदि राष्ट्रभक्त कार्यकर्ता हैं, तो उन्हें अपने नेतृत्व से जवाब मांगने का समय आ गया है। भारत के राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत और राष्ट्रीय अस्मिता का अपमान हम कदापि सहन नहीं करेंगे! रमेश चेन्निथला के खिलाफ राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम, 1971 की धारा 2 के तहत मामला दर्ज होना चाहिए। रमेश चेन्निथला, इस देश की नाक रगड़कर माफी मांगिए! 🔸A shocking visual of Ramesh Chennithala, Home Minister of the Congress government in Kerala and in-charge of Maharashtra Congress, cutting a cake featuring the Tricolour has surfaced. Just three days ago, visuals also emerged of Vande Mataram being disrespected at a Congress Independence Day programme. Earlier, Rahul Gandhi and Congress leaders have repeatedly shown disrespect towards Indian national figures. From the top leadership of the Congress to its local leadership, a pattern of disrespect towards national sentiment is becoming evident. If there are still patriotic workers within the Congress, it is time for them to question their own leadership. We will never tolerate any disrespect towards India’s National Flag, National Song or national identity! A case should be registered against Ramesh Chennithala under Section 2 of the Prevention of Insults to National Honour Act, 1971. Ramesh Chennithala, apologise to the nation! BJP PMO India गृहमंत्री कार्यालय, HMO India भाजपा महाराष्ट्र CMO Maharashtra #Tiranga #VandeMataram #IndiaFirst #NationalHonour

27,310 görüntüleme

Videos

cbawankule's profile picture

मुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis जी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या महसूल विभागामार्फत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन महसूलविषयक सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वतः मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. PMO India CMO Maharashtra Revenue Department, Government of Maharashtra MAHARASHTRA DGIPR IGR Maharashtra #Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #RevenueMinister #ChandrashekharBawankule

Chandrashekhar Bawankule

25,344 görüntüleme • 1 ay önce

cbawankule's profile picture

शिवतीर्थ महाराष्ट्र का एक तीर्थस्थल है। शिवतीर्थसे आदरणीय बालासाहब ठाकरे भावनिक रिश्ता है. पहले इसी शिवतीर्थ से आजादी के नायक वीर सावरकर जी की ओजस्वी वाणी से राष्ट्रप्रेम, हिंदुत्व और देशभक्ति की पहली हुंकार उठी थी। इसी शिवतीर्थ से हिंदू हृदयसम्राट वंदनीय बालासाहेब ठाकरे ने मराठी लोगों के सम्मान और अधिकारों के लिए शिवसेना की स्थापना की थी। यहां हिंदू हृदयसम्राट बालासाहेब का स्मारक भी है, जिन्होंने कहा था, ''मैं शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा, बल्कि अपनी दुकान बंद कर दूंगा.'' राहुल गांधी और उनकी पार्टी बालासाहेब को उनकी पुण्यतिथि या जयंती पर अभिवादन नहीं करती. वो क्यों नहीं करते क्या उद्धव ठाकरे में ऐसा सवाल राहुल गाँधी से पूछने की हिम्मत होगी? क्या राहुल गांधी पूज्य बालासाहब की स्मृति को नमन करेंगे? आम शिवसैनिकों के मन में यही सवाल है। आज इसी शिवतीर्थ पर राहुल गांधी 'न्याय यात्रा' की ड्रामा कंपनी के साथ आएंगे। अब क्या उद्धव ठाकरे इस शिवतीर्थ पर जाकर राहुल गांधी के सामने सरेंडर करेंगे? यही सवाल है। अगर निजी स्वार्थ के लिए उद्धव ठाकरे भूल गए हैं तो सुनिए वंदनीय बालासाहब ठाकरे ने कांग्रेस के बारे में क्या कहा था! Narendra Modi Amit Shah

Chandrashekhar Bawankule

221,883 görüntüleme • 2 yıl önce

cbawankule's profile picture

ही तर खोटारडेपणाची हद्द झाली ! पुराव्यानिशी खोटेपणा बघा!! व्हिडिओ डिसेंबर 2023चा 'मिचौंग' चक्रीवादळामधील चेन्नई एअरपोर्टचा. दाखवला आज, मुंबई एअरपोर्टचा आहे म्हणून! आम्ही प्रसारमाध्यमाचा कायमच संपूर्ण आदर करतो. पण, स्पर्धेच्या लालसेपोटी जनतेला वेठीस का धरता? हा यक्षप्रश्न आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत मुसळधारेने जनजीवन अस्तव्यस्त केले आहे. प्रशासन जनतेच्या मदतीसाठी संपूर्ण क्षमतेने उभे आहे. सरकार शक्य ते सर्व प्रयत्न जनतेच्या भल्यासाठी करत आहे. दिलासा देत आहे, मदत करत आहे. अफवांच्या बाजाराला थोपवत आहे. पण, टीआरपीचा धंदा काही थांबत नाही. या पावसानं मुंबईचा एअरपोर्ट भरला, धावपट्टी पाण्यात बुडाली. किती भीषण स्थिती निर्माण झाली याचे रसरसून वर्णन केले जात आहे. टीव्हीवरून विमानतळावरील भयंकर व्हिडिओ टीव्हीवरून दाखविले जात आहेत. साहजिकच, प्रवाशी व जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पण प्रत्यक्षात हा प्रकार महाप्रचंड चीड आणणारा, किळसवाणा, उद्वेकजनक आहे. मुंबई विमानतळाचा आजचा म्हणून जो व्हिडिओ Exclusive म्हणून दाखविण्यात येत आहे , तो प्रत्यक्षात चेन्नई विमानतळावरचा आहे. दीड वर्षांपूर्वीचा. डिसेंबर 2023 मधील !! 'मिचौंग' चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे धावपट्टी आणि विमानतळाच्या परिसरामध्ये पाणी भरले होते. तो व्हिडिओ आज मुंबई एअरपोर्टचा म्हणून दाखवण्यात आला. माध्यमांनी जनतेला जागे करण्यासाठी व प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवण्यासाठी काम जरूर करावे. मात्र असा खोटारडेपणा करून जनतेला अधिक त्रासात नेणे कितपत योग्य आहे? यातून काय साध्य झाले? कोणाला वेठीस धराल? ही तर खोटारडेपणाची हद्द झाली ! PMO India CMO Maharashtra Devendra Fadnavis जी Murlidhar Mohol जी MoCA_GoI Ram Mohan Naidu Kinjarapu जी Ministry of Information and Broadcasting SaamTV News MAHARASHTRA DGIPR PIB India Chennai (MAA) Airport Mumbai Airport SakalMedia #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule

Chandrashekhar Bawankule

84,877 görüntüleme • 1 yıl önce

cbawankule's profile picture

विकसित भारताच्या संकल्पासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. Raj Thackeray यांनी देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांची महायुती अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत. पंतप्रधान Narendra Modi जी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकास आणि समृद्धीच्या वाटेवर निघाला आहे. यात राज ठाकरे यांच्यासारख्या दुरदृष्टी लाभलेल्या नेतृत्त्वाची साथ मिळत आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महायुतीची गुढी अधिक मजबूत झाली आहे. अब की बार 400 पार ! MNS Adhikrut - मनसे अधिकृत

Chandrashekhar Bawankule

152,747 görüntüleme • 2 yıl önce

cbawankule's profile picture

आई आई, तू गेल्यानंतर खूप गमावून बसलो.. नेमके काय हरवले..काय गमावले ती समज नाही मला आणि,शब्दही नाहीत ते सांगायला.. मी अपूर्ण आहे, तुझ्याविना..! आभाळाकडे पाहिले, ढग फिरत होते... कल्लोळ करत होते.. आसमंत भरून आला होता.. एक क्षण वाटले.. तू थेंब बनून परतशील.. आई,तू कायमची सोडून गेलीस.. तू सोबत असेपर्यंत, मी लहान होतो.. खरंच सांगतो, आता क्षणार्धात मोठा झालो... एक सांगू, मुलगा हा आयुष्यभर लहानच असावा.. त्याला आईची सोबत असावी.. तू अनंत हालअपेष्टा भोगल्या आम्हाला घडवले, घराला सावरले, संसार उभा केला.... ईश्वरेच्छेने तू आज अनंतात विलीन झालीस पण, ते काहीही असले, तरी तू कायम माझ्यासोबत आहेस... आजूबाजूला.. मायेची ऊब देत.. तुला देवाज्ञा नव्हे, आई, तूच देव झालीस..!! • चंद्रशेखर 🙏

Chandrashekhar Bawankule

129,692 görüntüleme • 2 yıl önce

cbawankule's profile picture

महिला सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पक्षाची सरकारे विविध योजना सुरू करून आपले योगदान देत आहेत. परंतु जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तिथे तिथे त्यांनी असलेल्या योजना बंद पाडण्याचे काम केले आहे. अगदी महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना‘ बंद करण्याचा डाव काँग्रेसचा होता. यातून काँग्रेसची महिलाविरोधी मानसिकता ढळढळीतपणे दिसून येते. कांग्रेसचा हा कट आम्ही महाराष्ट्रात तरी यशस्वी होऊ देणार नाही. कांग्रेस आणि महाविकास आघाडीने कितीही विरोध केला आणि कितीही दूषणे दिली तरी भारतीय जनता पार्टी व महायुती सर्व माता भगिनी व माय माऊलीच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असेल. #ChandrashekharBawankule #BJP #Maharashtra

Chandrashekhar Bawankule

104,314 görüntüleme • 2 yıl önce

cbawankule's profile picture

दादा… आज अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना मन अक्षरशः गदगदून गेलं… हात फुलांनी भरलेले होते, पण मन सुन्न झालं होतं. डोळ्याच्या कडा पाणावल्या. दादा देहरूपी आपल्यात नाहीत, हे दुःखद, कटू सत्य अजूनही मन स्वीकारायला तयार नाही. आताही वाटतं, कधीही अचानक दादांचा फोन येईल… “मी अमुक ठिकाणी आहे… अमुक व्यक्तीचं असं काम आहे… करून टाका!” तो ठाम आवाज, ती कामाची तळमळ, ती आपुलकी… सगळंच अजूनही कानात घुमतंय. दादा प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्याला मोठं करणारे नेते होते. त्यांच्या उपस्थितीने आत्मविश्वास मिळायचा, त्यांच्या शब्दांनी ऊर्जा मिळायची. दादा, तुमची उणीव कधीही भरून निघणार नाही… तुम्ही सदैव आमच्यात आहात... मार्गदर्शक म्हणून… आणि मित्र म्हणून.....

Chandrashekhar Bawankule

15,050 görüntüleme • 7 ay önce

cbawankule's profile picture

अभिनंदन देवेंद्रजी! भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाच्या व तत्पूर्वी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन, अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी, सर्व बंधू भगिनींचे लाडके देवा भाऊ अर्थातच भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय Devendra Fadnavis जी यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात व पंतप्रधान आदरणीय Narendra Modi जी, गृहमंत्री आदरणीय Amit Shah भाई, राष्ट्रीय अध्यक्ष Jagat Prakash Nadda जी, केंद्रीय मंत्री आदरणीय Nitin Gadkari जी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुका लढवल्या. या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत प्राप्त झाले. उद्याचा शपथविधीचा दिवस म्हणजे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचे व राज्यातील लाखो कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आजचा हा क्षण अतिशय आनंददायी व हर्षोल्हास साजरा करण्याचा क्षण आहे. Chandrakant Patil दादा व Sudhir Mungantiwar भाऊ यांनी देवेंद्रजींच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळ गटनेतेपदासाठी मांडला. या प्रस्तावाला समर्थन देत महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या व विरोधकांच्या कटकारस्थानांना, खोटारडेपणाला पुरून उरणाऱ्या आदरणीय देवेंद्रजींसारख्या उत्तम नेतृत्व, वक्तृत्व, कर्तुत्व व चारित्र्य असलेल्या व्यक्तिमत्त्वाची निवड भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी करताना आम्हा सर्वांना अभिमान आहे. यावेळी केंद्रीय निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman जी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री Vijay Rupani Memorial जी, भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री Shivprakash जी, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस Vinod Tawde जी, मुंबई भाजपा अध्यक्ष Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार जी यांच्यासह महाराष्ट्र भाजपाचे सर्व नेते, कोअर कमिटी सदस्य, विधिमंडळ सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. #BJP #Maharashtra #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule

Chandrashekhar Bawankule

32,424 görüntüleme • 1 yıl önce

cbawankule's profile picture

एका रात्रीत अवघ्या ४ तासात १०६ मिलीमीटर झालेल्या पावसाने विस्कळीत झालेले नागपुरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन संपूर्ण क्षमतेने मदत कार्याला लागले आहे. मी स्वतः शहरात पाणी शिरलेल्या अनेक भागात फिरतो आहे. जनतेला दिलासा देत मदत करतो आहे. प्रशासनाशी संवाद करून अडचणी सोडवतो आहे. याचवेळी उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांच्याशी सतत संपर्कात आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव संदीप जोशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासोबत अनेक ठिकाणी पाहणी केली. शहरातील आपत्कालीन मदत नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथून नियंत्रण कसे राखले जात आहे, याची माहिती घेतली व पुन्हा नागरिकांच्या मदतीसाठी बाहेर पडलो. बऱ्याच ठिकाणी नागरिक परस्परांना मदत करत असल्याचे दृश्य दिसले ; आणि, मनोमन नागपूरकरांच्या जिंदादिलीला दाद दिली. अतिवृष्टीने हा प्रसंग उभा झाला असला तरी आपण यावर धैर्याने मात करू असा विश्वास जे जे यादरम्यान भेटत आहेत, त्यांना देत आहे. #Nagpur #Rainfall #Rains #NMC

Chandrashekhar Bawankule

34,189 görüntüleme • 2 yıl önce

cbawankule's profile picture

शतजन्माचे ऋणानुबंध आणि रक्ताच्या नात्यापलिकडचे नाते म्हणजे मा. श्री. देवेंद्रजी ! Devendra Fadnavis जी म्हणजे विश्वास. त्याग, समर्पण, निष्ठा, सहृदयतेचे मूर्त रूप. आमची बंधुत्वाची मैत्री आणि सुदाम्याचे प्रेम. विलक्षण बुद्धिमत्ता, अचाट बुद्धिसामर्थ्य आणि अंगात टिकून असलेला साधेपणा हे त्यांच्या यशाचे गमक. विकासाची स्पष्ट दृष्टी, निश्‍चित दिशा आणि कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न बाळगता कार्यरत राहण्याचा स्वभाव ही या लोकनेत्याची कुशलता आहे. म्हणूनच, देवेंद्रजी हे माझ्यासाठी श्‍वास आणि ध्यास आहेत.! माझ्या सुखदुःखात, माझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात देवेंद्रजी माझ्यासोबत होते, आहेत आणि राहतील हा विश्‍वास अनेक वर्षांच्या सानिध्यातून मला आलेला आहे. वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करताना या माझ्या लोकनेत्याला दीर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा घडो; त्यांची प्रगती हीच आमच्यासाठी आनंदाची कुपी आहे. मला आठवते, आपले लाडके पंतप्रधान मा. Narendra Modi जी यांनी 'नागपूरने महाराष्ट्राला दिलेली भेट..’ असे देवेंद्रजींचे वर्णन केले आहे ; माझ्या अनुभवानुसार ते यथार्थ आहे. प्रिय देवेंद्रजी, पुनःश्च शुभेच्छा!! #HappyBirthdayDevaBhau

Chandrashekhar Bawankule

28,567 görüntüleme • 3 yıl önce