
Ambadas Danve
@iambadasdanve • 48,838 subscribers
शिवसैनिक, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद. शिवसेना जिल्हाप्रमुख-संभाजीनगर. सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.
Shorts
Videos

वेरूळ शिक्षक प्रकरणाआ हा व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत! शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी "हा एक नंबर" म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलीस अधिकारी याच 'एक नंबर'ला पेढे भरवताना दिसत आहे! गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर आहेत (त्यात एक पोलिसही स्पष्ट दिसतो आहे), घटनेच्या वेळी ते पोलिसांसोबत हजर आहेत, त्यांचे रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे; असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी 'अनोळखी' कसे काय असू शकतात? हा गुन्हा नावानिशीच दाखल झाला पाहिजे! पोलिसांची ही उघडी दाबादबी आणि गुन्हेगारांचे चोचले आम्ही अजिबात सहन करणार नाही. तात्काळ कारवाई करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे! महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis CMO Maharashtra #Maharashtrapolice
Ambadas Danve40,289 views • 19 days ago

क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रीपद गमावलं तर कुणी तुरुंगात सडतंय... पण मंत्री अतुल सावे यांचा 'खास माणूस' असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही. 'पार्टी विथ डिफरन्स'च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला? ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची 'भक्ती' करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर न देवभाऊ? महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CP Chhatrapati Sambhajinagar Police CMO Maharashtra Amit Shah #JusticeDenied #MaharashtraPolitics #ChhatrapatiSambhajinagar #GundaRaj #CommonManVoice #MaharashtraGovernment
Ambadas Danve60,135 views • 5 months ago

विचित्र विरोधाभास! 'हिंदुत्व' आणि 'संस्कृती'च्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावं लागतंय. ११ वर्षांच्या सत्तेनंतरही प्रशासनाला 'मंगळसूत्र' आणि 'कॉपी' मधला फरक कळत नाही बहुदा. ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? ही परीक्षा हिंदुस्थानात सुरु आहे, पाकिस्तानात नाही.. Devendra Fadnavis PMO India Dharmendra Pradhan Eknath Shinde - एकनाथ शिंदे #TETMaharashtra #CulturalHypocrisy #ExamRule
Ambadas Danve20,807 views • 4 months ago

मुख्यमंत्री महोदय आपल्या 'ड्रीम प्रोजेक्ट' अर्थात समृद्धी महामार्गावर घालून दिलेले नियम ट्रकवाले मिनिटा-मिनिटाला पायदळी तुडवतात. अश्याप्रकारे तीनही लेन व्यापून ट्रक ड्रायव्हर लहान वेगवान गाड्यांची वाट अडवत अपघातांची शक्यता वाढवतात. विशेष म्हणजे आपले पेट्रोलिंग करणारी पथके गायब असतात. स्थानिक पोलीस ठाण्याचे बळ न वापरता समृद्धीसाठी स्वतंत्र फोर्स द्यायला हवी. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्या आधारे ऑनलाईन दंड ठोठावणारी यंत्रणा आता समृद्धीवर आवश्यक झाली आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis
Ambadas Danve28,842 views • 7 months ago

आमदार गणपत गायकवाड आज निवडणूक आयोगाच्या परवानगीने मतदानाला विधान भवनात पोचले. केवळ आरोप असताना अनिल देशमुखांना यापूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती. मग गायकवाड यांना पोलिस ठाण्यात गोळीबार करताना तर जगाने बघितले होते. आज निवडणूक आयोग भाजपचा सालदार झाल्याचे यातून दिसते. #MaharashtraAssembly #Maharashtra
Ambadas Danve55,219 views • 1 year ago

हा आहे पालकमंत्री Sanjay Shirsat यांनी घाईघाईत उदघाटन केलेला शिवाजीनगरचा अंडर पास! याला स्टॉर्म ड्रेनचा पत्ता नाही. गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने या अंडरपास मधून कोण गाडी घालणार? तातडीने पाण्याचा निचरा होण्यासाठी स्टॉर्म ड्रेन करता येत नसतील तर समुद्रासारखी रोरो सेवा सुरू करून लोकांना या तिराचे त्या तिराला जाण्याची सोय आता रेल्वे विभाग आणि पालकमंत्री महोदयांनी करावी.. South Central Railway
Ambadas Danve25,828 views • 1 year ago

शिवसैनिकांवरील भाजपचा अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते म्हणे तेव्हा हे खोटारडे! यांच्या पाच उमेदवारांच्या नावावर फूली मारणाऱ्या भाजपच्या कारभारातही यांना आज हिमालयाची उंची दिसायला लागली आहे, यातच सगळं आलं! किती वेगाने रंग बदलतात हे! #EknathShinde #Maharashtra #महाराष्ट्र #BJP #Elections2024 #लोकसभा_२०२४
Ambadas Danve41,375 views • 2 years ago

Absolutely pathetic "professionalism" from SpiceJet. Passengers on flight SG1082 (BOM-GOX) have been stuck on the aircraft for 90+ mins with NO AIR CONDITIONING. This is a metal oven, not a flight. If a passenger suffers a heat-related health crisis, who is taking responsibility? MoCA_GoI, it’s time to stop watching from the sidelines and take punitive action against this blatant disregard for safety. Mumbai Airport how is this allowed on your watch? SpiceJet चा अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक कारभार! मुंबई-गोवा विमान (SG1082) गेल्या ९० मिनिटांहून अधिक काळ रखडले असून विमानातील वातानुकूलित यंत्रणा बंद आहे. हे विमान नसून जणू लोखंडी 'ओव्हन' झाले आहे. उकाड्यामुळे एखाद्या प्रवाशाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण? MoCA_GoI, आता तरी या प्रकाराची दखल घेऊन कठोर कारवाई करणार का? Mumbai Airport, तुमच्या डोळ्यादेखत प्रवाशांचे असे हाल कसे चालतात? PMO India Mumbai Airport Ram Mohan Naidu Kinjarapu Murlidhar Mohol CMO Maharashtra #SpiceJet #AviationIndia #DGCA #MumbaiAirport #MoCA #PassengerRights
Ambadas Danve11,994 views • 4 months ago

शेतकरी बांधवांनो, हे आहेत अगोदरचे विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री.. हे २०२० साली विरोधीपक्ष नेता म्हणून जे जे बोलले आहेत, ते सगळं-सगळं ते आत्ता करणार आहेत, अगदी कागदावर! बोलची कढी आणि बोलाचा भात ते थेट बँक अकाउंटला पाठवणार आहेत. Devendra Fadnavis #marathwadaflood
Ambadas Danve19,130 views • 9 months ago

आता मर्यादा ओलांडण्यासाठी सरकारचे पाय कोणी बांधले आहेत हे सांगा मुख्यमंत्री Devendra Fadnavis ? तुमच्या पक्षाच्या एका शाखेच्या प्रमुखाने मुख्यमंत्री असताना शिवरायांची शपथ घेतली होती! अश्या गोष्टी आपण सोयीस्करपणे विसरता, म्हणून आठवण करून दिली.. तुम्ही या व्हिडियोत सांगितलेल्या म्हणीत दोन शब्द कमी आहेत.. ते म्हणजे कमिटी आणि सब-कमिटी.. या दोन्ही बाबी आपण करून ठेवल्या आहेतच! यातून आपली इच्छा शक्ती स्पष्टपणे दिसुन येते. #MarathaReservation #मराठा_आरक्षण
Ambadas Danve14,919 views • 10 months ago

या दोन व्होडियोमधील फरक समजला तरी पुरेसे आहे! #MaharashtraPolitics
Ambadas Danve10,784 views • 2 years ago
No more content to load