
Ambadas Danve
@iambadasdanve • 49,253 subscribers
शिवसैनिक, आमदार, माजी विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद. शिवसेना जिल्हाप्रमुख-संभाजीनगर. सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.
Shorts
Videos

खोटेपणा.. तो पण एपिक.! आता मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी आपल्या या वक्तव्यावर कायम राहावं.
Ambadas Danve10,935 görüntüleme • 5 gün önce

वेरूळ शिक्षक प्रकरणाआ हा व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत! शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी "हा एक नंबर" म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलीस अधिकारी याच 'एक नंबर'ला पेढे भरवताना दिसत आहे! गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर आहेत (त्यात एक पोलिसही स्पष्ट दिसतो आहे), घटनेच्या वेळी ते पोलिसांसोबत हजर आहेत, त्यांचे रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे; असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी 'अनोळखी' कसे काय असू शकतात? हा गुन्हा नावानिशीच दाखल झाला पाहिजे! पोलिसांची ही उघडी दाबादबी आणि गुन्हेगारांचे चोचले आम्ही अजिबात सहन करणार नाही. तात्काळ कारवाई करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे! महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis CMO Maharashtra #Maharashtrapolice
Ambadas Danve40,412 görüntüleme • 3 ay önce

सहा पळपुट्यांना वाटत होतं की शिवसेना नावाचा रथ त्यांच्याच खांद्यावर चाललाय. हा सामान्य शेतकरी मतदार खरं तर हा रथ ओढतोय. तुम्ही रथात बसून जी काही 'सुगंधी घाण' करून ठेवली आहे ना, तिचा वास मतदारापर्यंत पोहोचलाय. हे ऐकाच! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Sanjay Raut Mumbai Tak
Ambadas Danve28,497 görüntüleme • 3 ay önce

क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रीपद गमावलं तर कुणी तुरुंगात सडतंय... पण मंत्री अतुल सावे यांचा 'खास माणूस' असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही. 'पार्टी विथ डिफरन्स'च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला? ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची 'भक्ती' करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर न देवभाऊ? महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CP Chhatrapati Sambhajinagar Police CMO Maharashtra Amit Shah #JusticeDenied #MaharashtraPolitics #ChhatrapatiSambhajinagar #GundaRaj #CommonManVoice #MaharashtraGovernment
Ambadas Danve60,167 görüntüleme • 8 ay önce

कायद्याचे रक्षक की वर्दीची गुर्मी? छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल व्यावसायिक प्रीतेश जैस्वाल यांनी मांडलेली व्यथा धक्कादायक आहे. हॉटेलबाहेर चुकीच्या पद्धतीने लावलेली गाडी नीट पार्क करायला सांगितली, म्हणून पीएसआय राहुल शिंदे यांनी रागाच्या भरात स्वतःहून गाडीची चावी दिली आणि नंतर चक्क 'सरकारी कामात अडथळा' आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला? इतकेच नाही, तर रात्री ५-६ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन हॉटेलवर जात भरचौकात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत 'तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो, तुझ्याकडे किती दम आहे बघतो' अशी धमकी देणे, हा पोलीस खात्याचा कोणता शिष्टाचार आहे? जर सीसीटीव्ही फुटेज तपासले, तर दूध का दूध... होईल. सामान्य नागरिकांनी शिस्त पाळायला सांगणे हा गुन्हा आहे का? @CP_ChhSajinagar साहेब, आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे, हे ध्यानी घ्या! #ChhatrapatiSambhajinagar #PoliceArrogance #JusticeForPriteshJaiswal #MaharashtraPolice #SinghamCulture #LawAndOrder महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CMO Maharashtra Devendra Fadnavis
Ambadas Danve23,204 görüntüleme • 6 ay önce

मुख्यमंत्री महोदय आपल्या 'ड्रीम प्रोजेक्ट' अर्थात समृद्धी महामार्गावर घालून दिलेले नियम ट्रकवाले मिनिटा-मिनिटाला पायदळी तुडवतात. अश्याप्रकारे तीनही लेन व्यापून ट्रक ड्रायव्हर लहान वेगवान गाड्यांची वाट अडवत अपघातांची शक्यता वाढवतात. विशेष म्हणजे आपले पेट्रोलिंग करणारी पथके गायब असतात. स्थानिक पोलीस ठाण्याचे बळ न वापरता समृद्धीसाठी स्वतंत्र फोर्स द्यायला हवी. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्या आधारे ऑनलाईन दंड ठोठावणारी यंत्रणा आता समृद्धीवर आवश्यक झाली आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis
Ambadas Danve28,862 görüntüleme • 11 ay önce

आमदार गणपत गायकवाड आज निवडणूक आयोगाच्या परवानगीने मतदानाला विधान भवनात पोचले. केवळ आरोप असताना अनिल देशमुखांना यापूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती. मग गायकवाड यांना पोलिस ठाण्यात गोळीबार करताना तर जगाने बघितले होते. आज निवडणूक आयोग भाजपचा सालदार झाल्याचे यातून दिसते. #MaharashtraAssembly #Maharashtra
Ambadas Danve55,219 görüntüleme • 2 yıl önce

विचित्र विरोधाभास! 'हिंदुत्व' आणि 'संस्कृती'च्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावं लागतंय. ११ वर्षांच्या सत्तेनंतरही प्रशासनाला 'मंगळसूत्र' आणि 'कॉपी' मधला फरक कळत नाही बहुदा. ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? ही परीक्षा हिंदुस्थानात सुरु आहे, पाकिस्तानात नाही.. Devendra Fadnavis PMO India Dharmendra Pradhan Eknath Shinde - एकनाथ शिंदे #TETMaharashtra #CulturalHypocrisy #ExamRule
Ambadas Danve20,816 görüntüleme • 7 ay önce

गर्दी होईल की नाही अशी शंका असणाऱ्या घुबडांनी पाहून घ्यावं.. #ChhatrapatiSambhajinagar #ShivsenaUBT
Ambadas Danve20,592 görüntüleme • 8 ay önce

शिवसैनिकांवरील भाजपचा अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते म्हणे तेव्हा हे खोटारडे! यांच्या पाच उमेदवारांच्या नावावर फूली मारणाऱ्या भाजपच्या कारभारातही यांना आज हिमालयाची उंची दिसायला लागली आहे, यातच सगळं आलं! किती वेगाने रंग बदलतात हे! #EknathShinde #Maharashtra #महाराष्ट्र #BJP #Elections2024 #लोकसभा_२०२४
Ambadas Danve41,375 görüntüleme • 2 yıl önce

श्रेया मोठा गेम झाला यार... शेवटपर्यंत बघा! #MaharashtraPolitics
Ambadas Danve50,342 görüntüleme • 3 yıl önce

हा आहे पालकमंत्री Sanjay Shirsat यांनी घाईघाईत उदघाटन केलेला शिवाजीनगरचा अंडर पास! याला स्टॉर्म ड्रेनचा पत्ता नाही. गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने या अंडरपास मधून कोण गाडी घालणार? तातडीने पाण्याचा निचरा होण्यासाठी स्टॉर्म ड्रेन करता येत नसतील तर समुद्रासारखी रोरो सेवा सुरू करून लोकांना या तिराचे त्या तिराला जाण्याची सोय आता रेल्वे विभाग आणि पालकमंत्री महोदयांनी करावी.. South Central Railway
Ambadas Danve25,835 görüntüleme • 1 yıl önce

शेतकरी बांधवांनो, हे आहेत अगोदरचे विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री.. हे २०२० साली विरोधीपक्ष नेता म्हणून जे जे बोलले आहेत, ते सगळं-सगळं ते आत्ता करणार आहेत, अगदी कागदावर! बोलची कढी आणि बोलाचा भात ते थेट बँक अकाउंटला पाठवणार आहेत. Devendra Fadnavis #marathwadaflood
Ambadas Danve19,138 görüntüleme • 1 yıl önce

Absolutely pathetic "professionalism" from SpiceJet. Passengers on flight SG1082 (BOM-GOX) have been stuck on the aircraft for 90+ mins with NO AIR CONDITIONING. This is a metal oven, not a flight. If a passenger suffers a heat-related health crisis, who is taking responsibility? MoCA_GoI, it’s time to stop watching from the sidelines and take punitive action against this blatant disregard for safety. Mumbai Airport how is this allowed on your watch? SpiceJet चा अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक कारभार! मुंबई-गोवा विमान (SG1082) गेल्या ९० मिनिटांहून अधिक काळ रखडले असून विमानातील वातानुकूलित यंत्रणा बंद आहे. हे विमान नसून जणू लोखंडी 'ओव्हन' झाले आहे. उकाड्यामुळे एखाद्या प्रवाशाला गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण? MoCA_GoI, आता तरी या प्रकाराची दखल घेऊन कठोर कारवाई करणार का? Mumbai Airport, तुमच्या डोळ्यादेखत प्रवाशांचे असे हाल कसे चालतात? PMO India Mumbai Airport Ram Mohan Naidu Kinjarapu Murlidhar Mohol CMO Maharashtra #SpiceJet #AviationIndia #DGCA #MumbaiAirport #MoCA #PassengerRights
Ambadas Danve11,994 görüntüleme • 7 ay önce