
Lokmat
@lokmat • 830,698 subscribers
महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://t.co/fo3PNUDKYk
Shorts
Videos

गोव्याला फिरायला गेलेल्या मुंबईतील एका कुटुंबासोबत कोलवा इथल्या Golden Crown हॉटेलमध्ये विचित्र प्रकार घडला. रात्री हे कुटुंब झोपलेले असताना हॉटेलचा एक कर्मचारी मास्टर की ने दार उघडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. सुदैवाने, दिनेश शेट्टीगर यांना या आवाजाने जाग आली. त्यांनी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडलं. त्यामुळे तो भांबावला आणि थातूरमातूर कारणे देऊ लागला. या प्रकरणी कुटुंबाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. एवढा सगळा प्रकार होऊनही हॉटेलचा मॅनेजर हॉटेलमध्ये आला नाही, याबद्दल शेट्टीगर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी झाल्या प्रकाराचा व्हिडिओ करून सगळ्यांना सावध केलं आहे. #Lokmatnews #Goa #Scam #Viralvideo #marathinews
Lokmat74,554 views • 2 months ago

पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माघार घेताच काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची लढण्याची तयारी होती, काँग्रेस पक्षाचा आकडा सगळ्यात मोठा होता, मात्र या जागेसाठी शरद पवार साहेबांच्या पक्षाने दावा केला होता, पक्षाने मोठ्या मनाने ही जागा साहेबांच्या पक्षाला सोडली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने यातून माघार घेतल्याने आमच्या सोबत धोका झाला असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. #LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews #Politics
Lokmat30,711 views • 2 months ago

नांदेड शहरासह परिसराला मध्यरात्री भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री १ वाजून ३८ मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांनी, म्हणजेच १ वाजून ४० मिनिटांनी दुसरा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ एवढी मोजली गेली आहे. गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना हे हादरे जाणवताच एकच खळबळबळ उडाली. #Nanded #Earthquake
Lokmat15,242 views • 27 days ago

आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणला जाणाऱ्या जळगावातील एका वृद्ध व्यक्तीला रेल्वे प्रवासादरम्यान बीफ (गोमांस) बाळगल्याचा आरोप करत इगतपुरीजवळ रेल्वेत प्रवाशांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आहे. सादर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #Lokmatnews #jalgaon #kalyan #igatpuri #beef #viralvideo elderly man beaten near igatpuri for doubt over carrying beef in railway from jalgon to kalyan
Lokmat188,083 views • 1 year ago

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या. यावेळी जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी अडवलं. यानंतर पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईल लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या दोघांनी कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादीना त्रास देत आहे असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. #LokmatNews #MaharashtraNews #Jalna #PankajaMunde
Lokmat92,494 views • 11 months ago

आई-वडील आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी आयुष्यभर झटतात, पोटाला चिमटा काढून त्यांना शिकवतात. आपल्या मुलाने आयुष्यात मोठे व्हावे आणि यशाचे शिखर गाठावे, हीच प्रत्येक माता-पित्याची इच्छा असते. जेव्हा हेच यश मुलगा संपादन करतो आणि आपल्या पहिल्या कमाईतून पालकांसाठी काहीतरी खास करतो, तो क्षण शब्दांत मांडता येत नाही. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या आई-वडिलांना घराबाहेर घेऊन येतो. त्याने पालकांना आधी सांगितले होते की, त्याने घरासाठी एक नवीन 'स्कूटर' खरेदी केली आहे. स्कूटर पाहण्याच्या उत्साहात आई-वडील घराबाहेर येतात. मात्र, समोरचे दृश्य पाहून त्यांचे स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. #LokmatNews #MarathiNews #ViralVideo
Lokmat29,025 views • 3 months ago

वसई किनाऱ्यापासून ६६ नॉटिकल अंतरावर खोलसमुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले होते. ११ जानेवारीला एका व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या या घटनेनंतर सर्वच यंत्रणा सजग झाल्या होत्या; परंतु घटनेस सात दिवसांचा अवधी होऊन गेला, तरीही हा प्रवाह नक्की कशामुळे तयार झाला, याचा अंदाज कुठल्याच यंत्रणेला लागलेला नाही. त्यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वसईतील पाचुबंदर येथील 'ओम नमः शिवाय' ही कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती. जीपीएस क्रमांक ३०-१५-५५४, ७१-५८-५७६ याठिकाणी मोठे गोलाकार वर्तुळ तयार झाले होते. त्यातून मातकट रंगाचे पाणी वेगाने निघत असल्याचे निदर्शनास आले. #LokmatNews #Vasai #BoatSurvives #MysteryRing
Lokmat54,116 views • 6 months ago

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बीड दौऱ्या दरम्यान त्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल सय्यद यांचे हृदयविकाराने निधन झाले. यानंतर तातडीने श्रीकांत शिंदे यांनी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आणि पाच लाख रुपयांची आर्थिक मदतही दिली. #LokmatNews #MaharashtraNews #shrikantshinde
Lokmat18,837 views • 2 months ago

पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील टोल नाक्यावर सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या महेश मोटे याने कथितरित्या गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. मी रील स्टार आहे, मला टोल नाही, असे म्हणत टोल कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. #LokmatNews #MarathiNews #PuneNews #Jejuri #TollNaka #ReelStar
Lokmat18,379 views • 2 months ago







