
Vijay Wadettiwar
@VijayWadettiwar • 72,946 subscribers
CLP ( Maharashtra State Assembly) |Former-LOP & Cabinet Minister| MLA Bramhapuri Assembly Constituency |
Shorts
Videos

विचारांच्या विश्वासार्हतेवर टिकलेला देशातील एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस! Congress #congress
Vijay Wadettiwar140,856 views • 3 years ago

नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेले आहे. हे सगळ मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत. नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी.
Vijay Wadettiwar68,140 views • 1 year ago

दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra
Vijay Wadettiwar76,508 views • 2 years ago

अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे.
Vijay Wadettiwar61,835 views • 1 year ago

भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी संत्रे कुटुंबाला केलेली मारहाण म्हणजे सत्तेचा माज आहे. एखाद्या गावात जमिनीवर नजर पडली तर ती जागा दानवे यांना मिळालीच पाहिजे. मालकाने जमीन देण्यास नकार दिला तर घर जबरदस्तीने पाडून कुटुंबाला मारहाण करण्यात येते. गरीब बहुजन कुंभार समाजातील असलेले संत्रे कुटुंब दिवस रात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत आहे. पण जमीन हडपण्यासाठी या कुटुंबाला रावसाहेब दानवे आणि भाजपच्या गुंडांकडून त्रास दिला जातो, मारहाण केली जाते. भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे का? पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन काय करत आहे? जवखेडा गाव, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचा आमदार पुत्र संतोष दानवे यांच्या गुंड कार्यकर्त्यांना आता कंटाळला आहे. मारहाण करून घर उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप संत्रे कुटुंबियानी त्यांच्यावर केला आहे. जवखेडा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753, एम.साठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबाला मारहाण केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने घर उध्वस्थ केले असा, आरोप पीडित संत्रे कुटूंबानी केला आहे. अज्ञात आठ ते दहा जणांनानी रात्रीच्या सुमारास घरात घुसून मारहाण करत घर उध्वस्थ केल्याची घटना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावात घडली आहे. जवखेडा गावातील कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबियांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून न्याय मिळावा मागणी केली आहे. या प्रकारणी हसनाबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे .या तक्रारीच्या आधारे हसनाबाद पोलिसांनी आज्ञात आठ ते दहाजणा विरुद्ध संत्रे कुटूंबियांना मारहाण करून त्यांचं घर उध्वस्त केल्या प्रकारणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. परंतु हा तपास समाधानकारक नाही. हाय वे जात असताना स्वतःच्या जमिनी, घर वाचवायचे पण दुसऱ्यांची जमीन घ्यायची ही सत्तेतील मस्ती आहे. आम्ही ही मस्ती उतरवणार. संत्रे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.या कुटुंबाला काही झालं तर रावसाहेब दानवे आणि त्यांचे कुटुंब याला जबाबदार ठरेल. संत्रे कुटुंबाने दानवे यांचे नाव घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दखल करून चौकशी झाली पाहिजे.
Vijay Wadettiwar59,235 views • 2 years ago

शासन नेमकं कोणाच्या दारी ? शेळी कबुतरे चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलीत आणि एक मराठा मुलांना अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध करतो. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे, गृहमंत्री सुद्धा भाजपचे आहे. ते स्वतः दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील की हे प्रकरण सुद्धा इतर प्रकरणांप्रमाने दाबण्यात येईल ? दलित, ओबीसी, आदिवासी भाजपमध्ये वापरासाठी आहेत. त्यांना वापरा आणि फेका अशी भाजपची भूमिका आहे. उपमुख्यमंत्री,गृहमंत्री आपल्या राज्यातील अश्या घटनांकडे डोळेझाक करून जपानमध्ये मोठं मोठे वल्गना करतात. इकडे त्यांच्याच राज्यात समाज मन संतप्त करणाऱ्या अश्या दुःखद घटना घडत आहे. या घटना राज्यातील कायदा व सुव्यस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहे. या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत आणि कठोर कारवाई करण्यात यावी.अशा घटनांचा केवळ निषेध करणे पुरेसे नाही; गरज आहे ती गुन्हेगारांना शिक्षा देण्याची.
Vijay Wadettiwar63,308 views • 3 years ago

जनरल मोटर्समधील 3578 कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा.
Vijay Wadettiwar50,359 views • 2 years ago

सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि मनाचा थरकाप उडवणारा प्रसंग. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या मनब्दा या गावी एका अवैध सावकाराच्या गुंडाणे शेतकऱ्यावर प्राणघात हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच हे गुंड थांबले नसून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेताचा ताबा घेण्याचासुद्धा प्रयत्न केला. शेतकरी आणि त्याच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न या गावगुंडातर्फे करण्यात आला. संबंधित शेतकऱ्याच्या म्हाताऱ्या वडीलाला व पत्नीलासुद्धा मारहाण करण्यात आली. महायुती सरकारच्या काळात अवैध सावकारीने पुन्हा डोके वर काढले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अवैध सावकारांकडून होत आहे. शेतकऱ्यांचा सूड घेणाऱ्या अवैध सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी. अपघात -ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, गुंड, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारांसोबत तरी "सेटलमेंट" करू नये!
Vijay Wadettiwar38,406 views • 2 years ago

पितळ उघडे पडेल म्हणून मारकडवाडीतील 'मॉक पोल'ला भाजपचा विरोध.
Vijay Wadettiwar23,356 views • 1 year ago

WCD चा अमरावती येथील DREAMSLAND सेंटर वर आज पुन्हा पेपर फुटला. जलसंधारण अधिकाऱ्यांनीच पेपर फोडून परिक्षार्थ्यांना उत्तरे पुरवल्याची माहिती आहे. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. परीक्षा नवी पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच. या सरकार ला अजून काय पुरावे हवेत?
Vijay Wadettiwar22,266 views • 2 years ago

शिक्षण भरती बाबत प्रश्न विचारणाऱ्या तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी किती उद्धटपणे आणि धमकवनाऱ्या भाषेत उत्तर दिले होते ते महाराष्ट्राने बघितले. ती घटना महाराष्ट्र आजही विसरलेला नाही. तरुणीला जे उत्तर मंत्री महोदयांनी दिले होते त्याची पडताळणी केल्यानंतर आज सभागृहात शिक्षण मंत्र्यांची पोलखोल केली. त्यावर शिक्षण मंत्र्यांनी एका वाक्यात कसे गोलमोल उत्तर दिले ते बघा.
Vijay Wadettiwar22,890 views • 2 years ago

नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा परीक्षा) 2024 व IBPS CLERK परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे दोन्ही फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. विद्यार्थी २ आठवड्यापासून ही मागणी लावून सरकारकडे पाठपुरावा करत आहे. आम्ही सुद्धा याबाबत सरकारकडे मागणी केली होती. याबाबत वारंवार मागणी करून देखील एमपीएससी कडून प्रतिसाद तर नाहीच उलट परीक्षांच्या तारखा तश्याच राहतील हे सांगण्यात येत आहे. काल रात्रभर विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवावे लागले. ४ दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षेच्या पूर्वी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यात वेळ जात आहे. आयोगाची हट्टी भूमिका विद्यार्थ्यांना मारक आहे.
Vijay Wadettiwar13,351 views • 2 years ago

सुप्रीम कोर्टाने SC - ST समाजाच्या वर्गीकरणाबाबत दिलेल्या निकालानंतर आदिवासी आणि दलित समाजामध्ये असंतोष निर्माण झाले आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे, या विरोधात आंदोलन झाल्यास त्याला आमचे समर्थन राहील. राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करू नये ही आमची मागणी आहे.
Vijay Wadettiwar12,137 views • 2 years ago