
Prafulla Wankhede 🇮🇳
@wankhedeprafull • 73,323 subscribers
Founder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
Shorts
Videos

जर्मनीतील वीजनिर्मिती- अणुऊर्जा आणि जगाची भविष्यातील वाटचाल. जर्मनीत १९६२ ते २०२४ पर्यंत तीन अणुऊर्जा प्रकल्प जवळपास ६.३ % इतकी प्रचंड मोठी वीजनिर्मिती करायचे. ते सर्व अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यांनी बंद केलेत. त्यातलाच हा एक कुलिंग टॅावर नियंत्रित स्फोटात आता पाडला गेलाय. हा जो व्हिडीओ आहे त्याकडे आपण प्रतिकात्मक दृष्टीने पहायला हवे. एका बाजूला न्यूक्लियर एनर्जी चांगली तर दुसऱ्या बाजूला प्रचंड विनाशकारी दिसते. जगभरात यावर सतत चर्चा होत असते. भारतात यावर आपल्या राज्याइतकी चर्चा इतर कुठेच झाली नसेल. महाराष्ट्र गेली दीड- दोन दशके याने ढवळून निघालेला. जगभरात आता न्यूक्लियर एनर्जी आधारित प्लांट कमीच होत आहेत. तरीही येणाऱ्या काळात हा निर्णय योग्य कि अयोग्य हे कळेल. जर्मनीत गेल्या वर्षभरापासूनच अणुऊर्जा आधारित उर्जा निर्मिती शून्यावरच होती. त्यांनी ही ६.३ % टक्क्यांची तूट नवे सोलार प्लांट टाकून सहज भरून काढलीये. त्याशिवाय त्यांनी बॅटरीज आणि उर्जा साठवणूक करण्याच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक केलीये. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया आणि नव्या पॅावर ग्रीड साठी खास तंत्रज्ञांची नेमणूक केलीये. सरकार आणि खाजगी कंपन्या यात चांगला सहभाग नोंदवितात. याकामात जर्मनीने जगात आघाडी घेतलीये हे मात्र नक्की. जर्मनी हा एक असा देश आहे जो अपारंपारिक उर्जा क्षेत्रात फार प्रचंड वेगाने पुढे गेलाय. सोलार आणि विंड एनर्जी सारख्या अपारंपारिक उर्जेतून देशाला लागणारी जवळपास ५७% उर्जा हे लोक तयार करतात. (जगाची सरासरी ४१ % आहे.) आणि उरलेली ४३% उर्जा ते कोळसा, नॅचरल गॅस, बायोमास व इतर जीवाश्म इंधनांपासून तयार करतात. २०३० म्हणजे पुढील फक्त ४ वर्षात ७५ % उर्जानिर्मिती ही सोलार आणि विंड आधारित घेऊन जायचे मोठे टार्गेट त्यांनी सेट केलेय आणि सरकार तसेच खाजगी क्षेत्रातील त्यांची एकंदर घोडदौड पाहता हे सहज शक्यही वाटतेय. ग्रीन हायड्रोजन/अमोनिया संदर्भात गेली तीन वर्षे मी जर्मनीत जात आहे आणि त्यांचे इलेक्ट्रोलायझर्स, इंडस्ट्रीयल बर्नर्स, ग्रीन हायड्रोजन इंधन म्हणून वापरण्यासाठीचे प्रयत्न, त्यावरील प्रयोग हे नक्कीच वाखाणण्याजोगे, जगाला दिशादर्शक आहेत. एका तर घरात त्यांच्या रूम हिटिंग /स्पेस हिंटिंग साठी सोलार आधारित ग्रीन हायड्रोजन सिस्टिम तीन वर्षांपूर्वी बसवली आहे. रूफ टॅाप सोलार हे त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मोठ्या प्रमाणावर विंड एनर्जी हे ही त्यांचे वैशिष्ट्य आहे. अपारंपारिक उर्जा हे फक्त जर्मनीतच नाही तर संपुर्ण जगासाठीच भविष्य आहे हे मान्य केले तरी यात काही गंमतीजमतीही आहेत. सोलार आणि विंड एनर्जी ही खूप स्वस्त आहे, स्वच्छ आहे वगैरे वगैरे आपण नेहमीच म्हणतो परंतू सोलार पॅनल्स बनविणासाठी आणि विंड मिल तयार करून बसविण्यासाठी जेवढं जीवाश्म इंधनं लागतं आणि मोठ्या प्रमाणावर रेअर अर्थ मिनरल्स लागतात त्याचे गुणोत्तर काही आजही फारसा मेळ खात नाही. दुसरं ज्या जर्मनीत आज ही मोठ्या प्रमाणावर, स्वच्छ, पर्यावरणपुरक, अक्षय उर्जा तयार होतीये ते पाहता तिथे विजेचे दर जगात सर्वात स्वस्त असायला हवेत. परंतू वास्तव मात्र अगदी उलटे आहे. जर्मनी, असो की युरोप, अमेरिका किंवा इतर अनेक देश जिथे जिथे सोलार आणि विंड पॅावर आहे तिथे विजेचे दर प्रचंड महाग आहेत. उदाहरणार्थ भारतात विजेचा दर प्रती किलोवॅट $ ०.०८ आहे तर जर्मनीत तोच $०.३७ आहे. नेदरलॅंड, सिंगापूर, बेल्जियम, स्वीडन, जपान यातही तो तुलनेने $०.२२ ते ०.३२ पर्यंतच आहे. येणाऱ्या दशकभरात सोलार आणि विंड प्लांटच्या किंमती कमी होणार आणि हे रेट कमी होणार असं म्हणणं म्हणजे सोन्याचे दर पुन्हा “दहा - वीस हजार तोळ्यावर” किंवा “डिझेल, पेट्रोल खरचं ५० - ६० रूपये लिटरने मिळेल” अशी अपेक्षा बाळगणं…. असो. सहसा एवढे मोठे करेक्शन्स होत नाहीत हे इथे सुचवायचेय, इतकेच. आपल्यालाही या उर्जेशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपण नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करायलाच हवी पण त्यापूर्वी - आपल्या जुन्या ग्रीड सिस्टिम मधून जे ट्रांन्समिशन आणि डिस्ट्रिब्युशनचे जे १८ ते २० % लॅासेस होताहेत ते कमी करावे लागतील. घरातही आपण किमान २० ते ३० % उगीचच उर्जेचा वापर, चूकीच्या विजेच्या वस्तू, चूकीच्या पद्धतीचे इंस्टॅालेशन्स करतो, ते कमी करावं लागेल. नवे, इफिशियंट पॅावर प्लांट नव्याने लावावे लागतील आणि सर्वात महत्वाचे - आपल्या इथल्या सरकारला, तंत्रज्ञांना, खाजगी कंपन्यांनाही रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी पैसे ओतावे लागतील. पॅरासाईट राहून फक्त दलाली आणि कमिशन खाऊन परदेशी वस्तू इकडे चिकटवायची पद्धत बंद व्हायला हवी. मोठमोठ्या कॅार्पोरेट्स वर जशी CSR फंड वापराची बंधने आहेत तशीच R&D निधी योग्य ठिकाणी वापरला जावा अशी नवी नियमावली यायला हवी. #उर्जासाक्षरता
Prafulla Wankhede 🇮🇳35,015 görüntüleme • 10 ay önce

महाराष्ट्राला रत्नांची खाण म्हणतात ते अशा महापुरूषांमुळे! जगण्याची खरी प्रेरणा मिळते ती खऱ्याखुऱ्या कर्मवीरांमुळे! आयुष्यात “नक्की काय करायचं?” असा प्रश्न पडतो तेंव्हा रयतचं सह्याद्रीएवढं काम नेमकं दिशा देतं. प्रचंड अभिमान आहे या मातीचा! नक्की पहा!🙏
Prafulla Wankhede 🇮🇳59,648 görüntüleme • 2 yıl önce

आजीने घेतलेला हा वाचन वसा स्वप्नवत आहे ❤️✊📚 #वाचनचळवळ
Prafulla Wankhede 🇮🇳70,526 görüntüleme • 3 yıl önce

इंडरनेट आजही सर्वांना समान संधी देतं. ‘सो कॉल्ड’ जेम, वरदान, अमुकातला पिता, तमुकाची साम्राज्ञी, फलान्याचा पाया, ढमक्याचा गॉड असलेल्या प्रस्थापितांचं चिरेबंदी कवच तोडून कितीतरी अशी ‘ओरिजनल’ माणसं या जगाला कळाली. BBC News Marathi Shahid Shaikh धन्यवाद 🙏
Prafulla Wankhede 🇮🇳30,797 görüntüleme • 1 yıl önce

एक शिक्षक काय करू शकतो? अंगावर काटा तर आलाच पण कुडे सरांसारखे शिक्षक आपल्यात आहेत हा विश्वास गडद काळोखातून, निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्याची उर्जा देऊन गेला. त्यांना मनापासून धन्यवाद 🙏 नक्की पहा! Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे आणि BBC News Marathi आपले खूप आभार!
Prafulla Wankhede 🇮🇳36,584 görüntüleme • 3 yıl önce

किड्यामुंग्याच जगणं - विज्ञान आणि व्हिडीओचं तंत्रज्ञान. कीटकांबद्दल विकीपिडीयावर फार चांगली माहिती दिलेली आहे. कीटकांना साधारणपणे डोके, वक्ष, उदर आणि पायांच्या तीन जोड्या असतात. यात कीटकांचे विविध प्रकारचे वर्गीकरणही दिलेले आहे. माणसाने यात कीटकांचे वर्गीकरण आपल्या सोईने करून ठेवलेय. जसं की - पिकांचे नुकसान करणारे कीटक, मानवी रोगराई पसरवणारे किटक, परागकण वाहून नेणारे हवेतून उडणारे वनस्पतींसाठी उपयोगी कीटक. निवळी सारखे किटक तर पाण्यावरही चालू शकता. तसेच जगातील ८० % देशांमध्ये तर किटकांचा अन्न म्हणूनही मानव उपयोग करतो. असो. परंतू यातले बहुतांश किटक हे एकांडे किंवा एकएकटे राहणारे असतात. आता खरी गंमत अशी आहे की त्याच विकीपिडीयामधे एक फार इंटरेस्टिंग ओळ आहे. ती म्हणजे - मधमाशा, मुंग्या आणि वाळवी हे मात्र समुदायाने राहणारे कीटक आहेत. हे कीटक काहीही झाले तरी एकत्रच राहतात. उत्क्रांतीचा इतिहास जर आपण अभ्यासला तर असे लक्षात येते की माणूसही पहिला असाच एकांडा असावा. नंतर तो समुहाने राहू लागला. शेती करायला लागला. नंतर तो सामाजिक, अतिसामाजिक बनला. याच मुंग्या, मधमाश्या किंवा वाळवी सारखा एकत्र जगू लागला. हे तिन्ही किटक एकटे जगूच शकत नाहीत. ते अतिप्रचंड सामाजिक आहेत. ते एखाद्या ठिकाणी फार जास्त प्रमाणात झाले की “बायोडायव्हर्सिटी” वगैरेवर पोट भरणाऱ्या विद्वानांही ते सहन होत नसावे. आपल्या कपड्यांच्या कपाटाला वाळवी लागू नये. आपल्या किचनमधे मुंग्या होऊ नयेत किंवा आपल्या घरच्या बाल्कनीत आग्या मोहोळ बसू नये असंच त्याला वाटत असावं. परंतू माणसाला मात्र या उत्क्रांतीच्या प्रेसेसमधेच एक भारी विद्या अवगत झाली तिचे नाव विज्ञान. विज्ञानाचीही विकिपीडियावर भारी व्याख्या आहे - विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय. माणसाने आज जी काही प्रगती केलेली आहे त्याचे मुळ या विज्ञान, त्याचे आकलन आणि पुढे केलेल्या उपयोगात आहे. आता ही विज्ञानाची व्याख्या आणि वरचे किटक ही संकल्पना आपण जोडूया. या सर्व माणसांना जे इथे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमलेत त्यांना कीटकांसारखे हवेत उडतां येत असावे का? निवळी सारखं पाण्यावर चालता येत असावं का? वाळवी सारखं काहीतरी पोखरून आत जाता येत असावं का? या गर्दीत जर चूकूनही काही नको तो प्रकार झाला तर नक्की काय होईल एवढी बुद्धी, मेंदू, वा विचार करण्याची क्षमता असताना अशा गर्दीत आपली लोकं बिनधास्त फिरताहेत. BTW कीटकांना ‘बग’ पण म्हणतात बरं….. तो व्हिडीओ नीट पाहिला तरी काळजात धस्स होतंय….. आपल्यात खरचं भीती, सुरक्षा, विचार, आपली, कुटूंबांच्या जीवाची काळजी हा प्रकारच उरलेला नाही का? आपणही किड्यामुंग्यासारखेच जगायचे का?
Prafulla Wankhede 🇮🇳16,464 görüntüleme • 1 yıl önce

हा देश घडायचा असेल तर आधी चांगले शिक्षक घडवले जायला हवेत. जे शिक्षक चांगले आहेत त्यांना असं समोर आणायला हवं. ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे आणि BBC News Marathi आपले खूप धन्यवाद 🙏 शेवट अजिबात चूकवू नका. सर लय म्हंजे लयच भारी बोललेत ❤️
Prafulla Wankhede 🇮🇳26,944 görüntüleme • 2 yıl önce

“मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टर” मधला एक नवा जॅाब सर्व्हिस सेक्टरमधे जवळपास तीन ते चार जॅाब्स तयार करतो. आपल्याकडे नवे उद्योग, शिक्षण, सरकारी धोरणं अन इंफ्रास्टक्चर या दृष्टीने पोषक व्हायला हवे. त्याविषयी जागृती व्हायला हवी. भेटूया उद्या सकाळी, बंगलुरू येथे!
Prafulla Wankhede 🇮🇳13,225 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.




