Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

आमचा पत्रकार मित्र मुस्तान मिर्झाच याचा हा व्हिडिओ बघाच! #लयभारी

19,429 просмотров • 2 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

तरुणांचा आवाज आणि ताकद आज थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे! विद्यार्थ्यांचा हा ऐतिहासिक लढा बघून आम्ही सगळे त्यांचे फॉलोअर्स झालो आहोत. या हुकूमशाही सरकारला बॅकफूटवर ढकलण्याची ताकद फक्त आपल्या देशातील तरुणाईमध्ये आहे, आणि याचा मला सार्थ अभिमान आहे! आम्ही इथे फक्त विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहायला आलो आहोत. या आंदोलनात विद्यार्थ्यांना कोणी हात लावणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. हा लढा तुमचा आहे आणि ही ताकदही तुमचीच आहे! या संपूर्ण आंदोलनात मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तम सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार! येणाऱ्या २६ जुलैच्या 'तिरंगा मार्च'मध्ये असाच अभूतपूर्व प्रतिसाद द्या... २६ जुलैला भेटूया! विद्यार्थ्यांच्या हक्कांचा हा लढा असाच सुरू राहील!

Amit Thackeray

10,933 просмотров • 1 месяц назад

21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा. इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा. त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते. आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.

Pratik S Patil

529,232 просмотров • 28 дней назад

अजितदादांसारख्या राज्यातील एका प्रमुख नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्यांच्या या अपघातावर विधिमंडळात चर्चाही करु दिली जात नाही. याबाबत विस्तृत चर्चेची मागणी कालच विधानसभा अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडं केली होती. आज हा स्थगन प्रस्ताव स्वीकारून अजितदादांच्या अपघातावर विस्तृत चर्चा होईल अशी अपेक्षा असताना अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव नाकारला आणि विधानसभेत इतर विषयांवर बोलण्याची अनुमती दिली पण या ज्वलंत विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला असता बोलूही दिलं गेलं नाही, याचा अर्थ काय? यावरुन या अपघातामागे नक्कीच कोणती तरी एखादी मोठी शक्ती असल्याचा आमचा संशय असून या निर्णयामुळं आमच्या संशयाला एकप्रकारे पुष्टीच मिळत आहे. सरकारने अजितदादांच्या अपघाताच्या विषयाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र हा विषय सोडणार नाही… अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करतच राहू..! #justice_for_AJIT_DADA

Rohit Pawar

12,097 просмотров • 5 месяцев назад

आजच्या दिवसात कितीदा तरी पाहिला असेल हा व्हिडिओ.. वर्षा देशपांडे जेव्हा इंग्रजीत बोलतात - " मला इंग्रजी येतं पण मी माझ्या मातृभाषेत बोलू इच्छिते..तेव्हा मागच्या महिलेच्या चेहऱ्यावर हसू उमटतं..तो क्षण निव्वळ सुंदर आहे..❤️‍🔥 " शेवटी मातृभाषा..आईची भाषा आहे हो..मग ती कोणतीही असो..जगात सर्वांना तिचा अभिमान ठेवणे भारी वाटतेच..❤️‍🔥 पण..दुःख याचे आहे , महाराष्ट्र हा जगाच्या पाठीवर असा कदाचित एकुलता एक भाग असेल जिथे राजकारण आणि धर्मापायी लोक आपल्या आईच्या भाषेची अवहेलना करून दुसऱ्याच्या आईच्या भाषेचा उदो उदो करतात..😑 अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांना पुन्हा सांगतो..आमचा कोणत्या भाषेला विरोध नाही..पण त्यासोबत होणाऱ्या वसाहतवादाला..आमच्या भाषेच्या अपमानाला विरोध आहे..आमची भाषा मारून परकी भाषा मोठं करण्याच्या कारस्थानाला तर कडाडून विरोध आहे..😑 #महाराष्ट्रात_मराठीच

Ajay

15,908 просмотров • 1 год назад

यंदाच्या फुटबॉलच्या महाकुंभात अर्थात ‘फिफा वर्ल्ड कप- २०२६’मध्ये आमचा मित्र व ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण याच्या रूपात मराठी पत्रकारितेचा सन्मान झालाय... मेक्सिको, कॅनडा व अमेरिका या तीन देशांमध्ये पार पडणाऱ्या फिफा विश्वचषकाचे तिथूनच एकमेव अधिकृत मराठी भाषिक क्रीडा समीक्षक म्हणून संदीप चव्हाण कव्हरेज करतोय.. थेट मेक्सिकोहून संदीपने हा ब्लॅाग लिहिलाय… त्यात तो लिहितोय, फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून हे शब्द मी लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; हा फुटबॉलच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी अजूनही या शहराच्या हवेत तरंगताना जाणवतात. आज, त्याच मेक्सिको सिटीत, त्या इतिहासाच्या सावलीत उभा राहून, दै. मुंबई तरुण भारतचा क्रीडा प्रतिनिधी म्हणून अधिकृत मान्यता घेऊन विश्वचषकाच्या प्रेस बॉक्समधून वार्तांकन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. हा केवळ माझा वैयक्तिक प्रवास नाही; हा मराठी पत्रकारितेच्या स्वप्नांचा, जिद्दीचा आणि अस्मितेचा प्रवास आहे. जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. अब्जावधी चाहत्यांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, अशा या महाकुंभासाठी अधिकृत मान्यता मिळवणे हे कोणत्याही माध्यमासाठी अभिमानाचे असते. पण यावेळी अभिमानाची गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच दै. मुंबई तरुण भारतला विश्वचषकाचे अधिकृत अ‍ॅक्रिडिटेशन मिळाले आहे. आणि त्या इतिहासाचा पहिला साक्षीदार, पहिला प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे. हा क्षण केवळ एका पत्रकाराचा नाही. हा प्रत्येक मराठी वाचकाचा आहे. हा त्या मातृभाषेचा आहे, जिच्या शब्दांमध्ये आपण जग पाहतो, स्वप्ने रंगवतो आणि भावना व्यक्त करतो. अनेक दशकांपासून इंग्रजी आणि इतर भाषांच्या माध्यमांनी गाजवलेल्या या जागतिक व्यासपीठावर आज मराठीचा आवाजही तितक्याच अभिमानाने घुमत आहे. मेक्सिको सिटीच्या रंगीबेरंगी रस्त्यांवर, स्टेडियममधील गगनभेदी जल्लोषात, चाहत्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये आणि विजयानंतरच्या आनंदोत्सवात मला जगभरातील भावनांचा महासागर दिसतो आहे. पुढील महिनाभर संपूर्ण जग हसू आणि आसू यांच्या हिंदोळ्यावर झुलणार आहे. कुणाचे स्वप्न साकार होईल, कुणाचे तुटेल; कुणी इतिहास घडवेल, तर कुणी इतिहासाचा भाग बनेल. त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक थराराचा, प्रत्येक भावनेचा साक्षीदार म्हणून मी येथे आहे. आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या माझ्या मराठी वाचकांपर्यंत त्या प्रत्येक क्षणाची धडधड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, या फुटबॉलच्या महाकुंभात आपण सर्वजण सहभागी होऊया. मेक्सिकोच्या या ऐतिहासिक भूमीवरून, मराठी मनांपर्यंत पोहोचणाऱ्या या प्रवासाचे सहप्रवासी होऊया. कारण हा केवळ विश्वचषक नाही; हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. [email protected]

ashish jadhao

11,702 просмотров • 2 месяцев назад

सोशल मिडियात व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप अत्यंत धक्कादायक असून त्यांच्या सत्यतेबाबत शहानिशा झाली पाहिजे. या क्लिपमधील चर्चेनुसार आपल्याच पक्षाच्या एका माजी खासदार राहिलेल्या महिलेबाबत भाजपचे लोक किती ‘सुसंस्कृत’ भाषा वापरतात हे स्पष्ट दिसतं. पुरोगामी महाराष्ट्रात लाडकी बहिण असलेल्या आपल्याच पक्षाच्या एका महिलेबाबतची ही भाषा भाजपाची लाज वेशीवर टांगणारी आहे. आपल्याच मित्र पक्षांच्या बाबतीत कटकारस्थान रचून त्यांना गिळंकृत करण्यात भाजप माहीर आहे, पण स्वपक्षाच्या महिला नेत्याबाबतही कसं कटकारस्थान रचलं जातं, याचाही हा एक उत्तम नमुना आहे. याशिवाय संबंधित महिला मा. खासदाराच्या घरात पैसे ठेवायलाही जागा नाही आणि अगदी पिंपातही पैसे भरून ठेवल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकायला मिळतं. एका माजी खासदाराच्या घरात इतके पैसे असतील तर मंत्र्यांच्या घरात किती घबाड असेल, याचा विचारही करु शकत नाही. आता ED च्या अधिकाऱ्यांनी भाजप विरोधकांवरील कारवायांतून थोडा वेळ काढून इकडंही लक्ष द्यायला हरकत नाही. (सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्याकडं आलेल्या या ऑडिओ क्लिप जशाच्या तशा शेअर करत असून केवळ यावरील नावे ब्लर करत आहे. यामध्ये एक नाव हे खान्देशातील भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याचं तर दुसरं नाव हे भाजप संघटनेच्या महामंत्र्याचं आहे.)

Rohit Pawar

29,553 просмотров • 25 дней назад

'शारीरिकदृष्ट्या आकर्षक असणं' हा लक्ष वेधण्याचा एक उत्तम मार्ग आहे. 'मानसिकदृष्ट्या आकर्षक असणं' हा स्वतःला टिकवून ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. स्वतःला शिक्षित करा, तुमच्या मनात वारंवार येणाऱ्या विषारी विचारांकडे लक्ष द्या, तुमच्या असुरक्षिततेचा सामना करा आणि इतर कोणाशिवाय ही आनंदी राहायला शिका. १५ ते ३० वयोगट हा तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ असतो. तुम्ही मित्र बनवता-गमावता. तुम्ही चुका करता, त्या सुधारताही. तुम्ही पडता, अपयशी ठरता, शिकता, जाणीव होते, वास्तवाला सामोरे जाता, प्रेमात पडता आणि तुम्हाला प्रेमभंग देखील होतो. तुम्ही स्वतःला गमावता आणि शेवटी तुम्ही अधिक मजबूत बनता. लक्षात ठेवा... ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे आहेत. तुम्हाला एन्जॉय करणं आणि वाया घालवणं यातला फरक समजून घेतला पाहिजे. तुम्हाला जर एखादी गोष्ट अयोग्य वाटत असेल तर, इतरांना जास्त स्पष्टीकरण न देता "नाही" म्हणायला शिका..जर कोणी तुमच्या मर्यादांमुळे नाराज असेल तर ती त्यांची समस्या आहे, तुमची नाही. तुम्ही कधीही कमी करू शकता असं वजन म्हणजे इतरांच्या तुमच्याबद्दलच्या मतांचं वजन. इतरांचं तुमच्या बद्दल काय मत आहे ह्याचं वजन बाळगू नका. इतरांना वाटणारी मज्जा, ही तुमचीही मज्जा असावी, असं काहीही नाहीय. मजा याचा अर्थ : • मद्यपान करणं • पार्टी करणं • एवढाच नाहीय. मजा म्हणजे रात्रभर एकटं राहणं, पुस्तकात हरवून जाणं, खोल संभाषण करणं, फिरणं, कलाकृती तयार करणं, वाद्य वाजवणं किंवा आपलं काम उत्कृष्टपणे करणं हे देखील आहेच की. तुमची मज्जा, तुमचं तुम्ही परिभाषित केलं पाहिजे. लग्न करण्यापूर्वी बिल्स, होम लोन, पालकत्व, बालपणीचे आघात, लैंगिक अपेक्षा, आर्थिक अपेक्षा, कौटुंबिक आरोग्य, करिअर आणि शिक्षण यावर चर्चा करा. आयुष्यात फक्त प्रेमच पुरेसं नाहीय. तुमच्या मनावर असलेले आघात, कौटुंबिक वाद वगैरे वगैरे, मुलं होण्यापूर्वीच बरं करा-मिटवा. जेणेकरून तुमच्या मुलांना 'तुम्ही पालक म्हणून असण्याचे' भोग भोगावे लागणार नाहीत...!!!

महाकाळ

16,253 просмотров • 1 год назад

आज ९ ऑगस्ट २०२६ रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. •⁠ ⁠राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. मागे नितीन गडकरींनी मला सांगितलं होतं कंत्राटदार कंटाळून निघून गेले म्हणून हे काम रखडलं आहे. पण ते कंत्राटदार का कंटाळले याचा विचार केला पाहिजे. •⁠ ⁠आपल्याकडे कामापेक्षा टक्केवारीचा विचार जास्त होतो त्यामुळे आपल्याकडचे कंत्राटदार कंटाळलेत. •⁠ ⁠आमच्या जमिनी, आमचं पाणी, आमची वीज यावर बाहेरचे पोसले जाणार असतील या विकासाचा काय उपयोग ? •⁠ ⁠काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्ग सुरू होईल हे आपण गेली १५ वर्ष ऐकतो आहोत. पुन्हा काही दिवसांनी महामार्गावर चाकरमानी अडकल्याच्या बातम्या येणार आहेत. •⁠ ⁠कोणत्याही विकासकामांना विरोध करण्याचा आमचा हेतू नाही पण कोकणातील परिस्थिती पाहिली तर असं वाटतं असा विकास नको. •⁠ ⁠सरकार नावाची जी गोष्ट असते त्या सरकारने आपल्या लोकांचं हित पहायचं असतं, ती जबाबदारी सरकारची असते. लोकांच्या हितापुढे पालकमंत्रीपदाचा वाद हा क्षुल्लक आहे. •⁠ ⁠कोकणात तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प येतोय त्याबाबत स्थानिकांना कल्पना नाही. इथले तरुण-तरुणी या गोष्टीसाठी तयार आहेत का? बाहेरच्या तरुणांना कळतं महाराष्ट्रात काय होणार आहे त्यासाठी तयारी करून ते इथे येतात आणि आपले तरुण अंधारात राहतात. •⁠ ⁠मी अनेकदा सांगितलं आहे तुमचं अस्तित्व म्हणजे तुमच्या पायाखालची जमिन आहे. जेव्हा तुम्ही ती जमिन विकता तेव्हा तुमचं अस्तित्व संपतं.

Raj Thackeray

65,181 просмотров • 14 дней назад

काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे. आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !

Raj Thackeray

41,986 просмотров • 5 месяцев назад

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्ष काही विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी सातत्याने राजकारण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा स्वतःचे राजकीय करिअर घडविण्याची धडपड अधिक दिसून येते. मात्र आजचा विद्यार्थी अत्यंत जागरूक आहे. कोण मनापासून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आले आहे आणि कोण केवळ प्रसिद्धीसाठी धडपड करते, हे त्यांना चांगलेच कळते. महाविकास आघाडीच्या काळात MPSC परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले, अनेक निर्णयांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. महायुती सरकारने ती घडी पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अचानक लागू करण्यात आलेल्या Descriptive Pattern ला देखील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. माझी कार्यपद्धती पहिल्यापासून स्पष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकार परिषद, सोशल मीडियावरील दिखाऊ भूमिका, केवळ tweet करणे किंवा आंदोलनांना खतपाणी घालण्यापेक्षा मुख्यमंत्री, MPSC अध्यक्ष, सचिव आणि संबंधित विभागांशी प्रत्यक्ष पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यावर माझा विश्वास आहे. काही जणांना प्रत्येक प्रश्नात कॅमेरे, ट्वीट आणि आंदोलन दिसते पण मला मात्र त्या प्रश्नामागे विद्यार्थ्यांचे भविष्य दिसते. म्हणूनच मी आजपर्यंत या विषयाचे राजकारण केले नाही आणि पुढेही करणार नाही. विद्यार्थी अनेकदा पुण्यात येण्याचा आग्रह करतात. पण केवळ फोटो, व्हिडिओ किंवा टाळ्यांसाठी विद्यार्थ्यांमध्ये जाणे माझ्या स्वभावात नाही. प्रश्न सुटणे महत्त्वाचे की प्रसिद्धी मिळणे, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा विषय आहे. काहींना महाराष्ट्राच्या तरुणाईचा स्वयंघोषित मसीहा बनण्याची घाई आहे. त्यांना त्यांच्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा. माझा मार्ग मात्र एकच राहील; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर थेट पाठपुरावा. #mpsc

Abhimanyu Pawar

20,440 просмотров • 1 месяц назад