正在加载视频...

视频加载失败

२जी च्या काळात धुमाकूळ घातलेलं गाणं.. आठवतंय का?? #आठवणीतील_गाणी #मराठी

41,603 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

Kaustubh Katdare 的头像
Kaustubh Katdare1 年前

I think the guy is Sidharth Pithani, the one from Sushant Singh Rajput case.

Sensibo 的头像
Sensibo1 年前

📷 A tough day in the jungle—how does this sloth overcome it? The twist you didn’t see coming

Bhausaheb 的头像
Bhausaheb1 年前

त्या वेंळी मेकॅनिकल वाल्यांची राव क्रेज होती 😎

Aatmaram Tukaram Bhide 的头像
Aatmaram Tukaram Bhide1 年前

मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा खूप वायरल झाले होते

अभिजात मराठी 的头像
अभिजात मराठी1 年前

कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या

hum hai baan...🏹 的头像
hum hai baan...🏹1 年前

@grok original video konta movie cha part ahe?

मराठी माती 的头像
मराठी माती1 年前

❤️❤️

वैभव - Vaibhav 的头像
वैभव - Vaibhav1 年前

माजलगाव चा स्टेटसवाला 🤣✌️

SAM S 的头像
SAM S1 年前

🎶🎶💫👌❤️

~ohm 🐺 的头像
~ohm 🐺1 年前

😂😂 i still don't know...Why that chiselling dude was even there in this song! So creepy!!

相关视频

अब्दालीपासून देश वाचवला त्यासाठी मराठ्यांचे कुणी आभार मानले का? - Deepak Pawar वैयक्तिक: मराठी माणसाला मांसाहार च्या नावाखाली घरं नाकारणं हे फक्त द्यायचं कारण आहे खरंतर त्यांना मुंबईतुन आपल्याला हद्दपार करायचं आहे, त्यांना मुंबई हवी आहे त्याही पुढे मुंबईला वीज पाणीपुरवठा होतो अश्या भूभागावर सुद्धा ताबा हवा आहे मग तो रायगड रत्नागिरी किंवा संपूर्ण कोंकण पट्टा का असेना, कोंकणात काही हरामखोर स्वतंत्र कोंकण राज्य च्या नावाखाली गुजरात्यांची भांडी घासत आहेत त्यांना पहिले सरळ करण्याची गरज आहे. गमतीची गोष्ट म्हणजे हे सर्व लोकशाही मार्गाने सुरु आहे, आपल्याला भारतीय आहोत एक आहोत भांडणं नको असल्या गुळगुळीत गोळ्या देऊन हे सुमडीत आपला गेम करत आहेत. मराठी माणूस फक्त लाचार सारखा जाऊदे त्यांना नाही चालत वास येतो खात नाहीत ते असं म्हणून विषय सोडून पळ काढतात ते आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरले आहेत. त्यांनी थोडा डोक्याला ताण देण्याची गरज आहे गुजर मारवाडी जैन भल्या मोठ्या संख्येने अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा युरोप अश्या गोऱ्यांच्या रोज मास खाणाऱ्या लोकांच्या देशात राहत आहेत, तिथले स्थानिक गोरे ह्यांची शाकाहार कबुतर कुत्रे मांजरी असली नाटकं खपवून घेतील का? मग त्यांचा हा माज आपणच का सहन करतोय? शाकाहार च्या नावाखाली लॉबिंग करता येणार नाही हे सरकार ला खडसावून सांगण्याची ताकद आपल्यात नाही आहे का? Source: Saam TV

स्वराज्य । Self Rule

22,325 次观看 • 1 年前

आज मीराभाईंदर पोलीस आयुक्तालयात छठ पूजा कार्यक्रम मार्गदर्शन बैठक झाली. मी नम्रपणे विनंती केली की सर्व उपस्थितांना मराठी समजते, कृपया मार्गदर्शन मराठीत द्यावे. MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE यांचे DCP श्री.राहुल चव्हाण Rahul Chavan IPS महोदयांनी माझ्याशी अरे तुरे च्या भाषेत जोरात ओरडून मला शिकवू नको खाली बस, आणि पुन्हा हिंदीत बोलत राहिले व मराठी भाषेचा व माझा अपमान केला महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे. मातृभाषेचा सन्मान करणे हे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. तसे नियम आहेत राहुल चव्हाण यांचा निषेध करतो आणि या घटनेची अधिकृत तक्रार पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग, पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाकडे केली आहे मराठी भाषा विभाग आणि पोलीस महासंचालक कारवाई करतील का? ज्या अधिकाऱ्याला राज्य भाषा नको तो अधिकारी महाराष्ट्रात नको. Uday Samant महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra #मराठीसन्मान #Maharashtra #OfficialLanguage #RespectMarathi - प्रमोद पार्टे #मराठीएकीकरणसमिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

27,442 次观看 • 11 个月前

पर्युषण काळात मास मासे विक्री बंदी हा तुघलकी निर्णय मागे घ्या - मराठी एकीकरण समिती आयुक्तांच्या भेटीला.. शहरात संघर्ष वाढवू नका, दंगे वाढवू नका, तेढ वाढवू नका समितीने कायदे घटना याबद्दल अनेक दाखले देऊन तुघलकी निर्णय स्थानिकावर लादू नये, धर्म स्वतः जपावा इतरांवर लादू नये, खान पान स्वातंत्र्य आहे इथे त्यामुळे कोणावर बंधन घालू नका अशी मागणी केली. आपण इंग्रज नाही आहोत लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सेवेकरी आणि लोकप्रतिनिधी आहात याचे भान ठेवा.. भाजपने मास मासे विक्रीवर घातली बंदी , जैन पर्युषण मुळे स्थानिक आगरी कोळी मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचे काय? पालिका ठराव करते म्हणजे काय ? उद्या पालिका ठराव करेल शहर मेहताला विकले या शहराचे नाव मेहता अँड मेहता आहे मग? बहू मतात आहात म्हणून असे ठराव मांडता? (मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी घालावी हे चालेल का? मान्य आहे का? - गोवर्धन देशमुख) मी शाकाहारी आहे म्हणून सर्वानी विक्री बंद करावी हा तुघलकी निर्णय आहे व पालिकेचे पत्रक मागे घ्या ही 2 दिवसीय बंदी आम्हाला मान्य नाही. नागरिकांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वागावे. - मराठी एकीकरण समिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

363,136 次观看 • 20 天前

आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती. तेंव्हा श्री. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती. माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार. मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत... • भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा. • या भाषेत प्राचीन साहित्य हवं. • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. •'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. २०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी श्री. रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो... तर, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील... •मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल. •भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल. •प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल. •महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील. •मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल. * प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल. * अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल. या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता. जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे. पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन... राज ठाकरे ।

Raj Thackeray

147,809 次观看 • 2 年前

मुंबई महानगरपालिकेवर भाजपा- महायुतीचा भगवा झेंडा! एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे आज भव्य मुंबई भाजपा 'विजय संकल्प मेळाव्या'ला संबोधित केले. मुंबईमध्ये विजय संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जोश पाहिल्यानंतर, आपला विजय कोणीही थांबवू शकत नाही, हा विश्वास माझ्या मनात दृढ झाला आहे. गेल्यावेळी मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बनत असताना उद्धवजींसाठी एक पाऊल मागे येऊन महापौर पद सोडून दिले. परंतु त्याबदल्यात 2019 च्या विधानसभेला त्यांनी आम्हाला दगा दिला. 2019 ला आमच्याकडून सत्ता हिरावून घेतली गेली, 2022 मध्ये आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024 मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे सरकार आणून दाखवले. यावेळी मुंबई महानगरपालिकेवरही महायुतीचा भगवा झेंडा फडकवणार महायुतीचा; महापौर बसवल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. खरंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे 'ब्रँड' होते; हे ब्रँड नाहीत! भारतीय जनता पक्षामध्ये एक सामान्य कार्यकर्ता हा देखील मुंबई भाजपाचा अध्यक्ष होऊ शकतो, हीच या पक्षाची परंपरा आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातील सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे आणि त्यांचे नाव आहे मा. नरेंद्र दामोदरदास मोदी. मुंबई कोणाची, याचे उत्तर 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभेच्या निकालांनी दिले आहे. मुंबई ही भाजपाची, मुंबई ही भाजप–शिवसेना–महायुतीची! मुंबई महापालिकेला भ्रष्टाचारातून मुक्त करणारा सामान्य कार्यकर्ताच महापौर होणार हे नक्की! बीडीडी चाळीचा प्रकल्प हा संपूर्ण आशियातील सर्वात मोठा अर्बन रिन्युअल प्रकल्प आहे. अभ्युदय नगरमधील मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मेट्रो प्रकल्प बाधित गिरगावकरांना गिरगावातच पुनर्वसनाच्या इमारती आम्ही बांधून दिल्या. विरोधकांनी मुंबईकरांसाठी काय केले? याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावे लागेल. कोविड काळात मुंबईकरांच्या टाळूवरचे लोणी खाणारे, बॉडी बॅगमध्येही घोटाळा करणारे 'कफनचोर' कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर येतील, हा माझा प्रश्न आहे. धारावीतील 10 लाख लोकांना आम्ही धारावीतच घर देणार आहोत. लवकरच मुंबईकरांसाठी एसी लोकल गाड्या आणणार आहोत. मुंबईकरांसाठी असे अनेक विकास प्रकल्प राबवत आहोत. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मा. केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Ravindra Chavan Ameet Satam Piyush Goyal भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai #Maharashtra #Mumbai #BJP

Devendra Fadnavis

17,745 次观看 • 1 年前

बेलापूर विधानसभेचे उमेदवार श्री. गजानन काळे आणि ऐरोली मतदारसंघाचे उमेदवार श्री. निलेश बाणखेले यांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) या भागाला नवी मुंबई म्हणतात कारण त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा विचार व्यापक होता. मुंबई आणि त्याला लागून नवी मुंबई उभी करावी हा विचार वसंतराव नाईकांच्या डोक्यात आला. कारण त्यांच्या लक्षात आलं की १९५० ते १९७० या २० वर्षात मुंबईची लोकसंख्या दुपटीने वाढली. आणि आता यापुढे मुंबई माणसं घेऊ शकणार नाही म्हणून नवी मुंबईला आकार देण्यात आला. पुढे मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स उभं राहिलं. हे सगळं उभं करताना शहर कसं उभं करायचं याचा विचार केला गेलाच नाही. ब्रिटिशांनी मुंबई उभी करताना खूप विचार केला. आपल्याकडे शहराचा विकास आराखडा बनवला जातो पण इथे शहर नियोजन आराखडा बनवला जात नाही. २) ब्रिटिशांनी मुंबई उभारताना अनेक मैदानं उभी केली. पण त्यानंतर जी शहरं उभी राहिली त्यात कुठे मैदानं दिसत नाहीत. आज नवी मुंबईत खाजगी क्रीडासंकुल आहे पण सरकारी क्रीडासंकुल का नाही ? नवी मुंबईत फक्त एक नाट्यगृह का आहे ? हेच मुंबईत बघा तर किती नाट्यगृहं आहेत. नवी मुंबईत शिवाजी पार्कसारखं किंवा आझाद मैदानासारखं मैदान आहे? नाहीये... ३) ब्रिटिशांनी अनेक हॉस्पिटल्स एकत्र करणारा एक भाग बनवला. थोडक्यात लोकसंख्येला काय काय लागेल याचा केवढा विचार ब्रिटिशांनी केला ? पण नवी मुंबईत समजा एखाद्या कुटुंबाला कुठे जायचं असेल तर कुठे जायचं ? मॉलमध्ये ? थोडक्यात काय शहराच्या कुठल्याच गरजांचा विचार केला जात नाही. ४) गेली ६०-७० वर्ष निवडणुका होत आहे, पण तेच प्रश्न, तीच आश्वासनं हेच सुरु आहे आणि जगणं तसंच सुरु आहे. याला काय अर्थ आहे ? आपल्याकडे प्रगती म्हणजे विविध उपकरणं येणं, गाड्या येणं इतकं नसतं. मला विकासाचा विचार इतका तोकड्या पद्धतीने करता येत नाही. महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता. बरं तो जाहीरनामा होता, तर प्रत्येक प्रश्नावरच उत्तर आम्ही त्यात दिलं. ५) आज नवी मुंबईत एकाच घरातील २,२ जणं वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत, दिवसभर वेगवेगळ्या पक्षातून फिरतात रात्री घरी पुन्हा एकत्र येतात. काय चाललं आहे नवी मुंबईत ? ६) नाशिकमध्ये ५ वर्ष आमची सत्ता होती, त्या ५ वर्षाच्या काळात आम्ही मुकणे धरणांतून थेट पाईपलाईन टाकून नाशिकमध्ये पाणी आणलं, आणि नाशिक शहराचा ५० वर्षांचा प्रश्न सोडवला. असा विचार इतर कोणी करतं का हो तुमच्यासाठी ? ७) रतन टाटा गेल्यावर संपूर्ण भारत हळहळला. एक सज्जन आणि सरळ उद्योगपती गेला म्हणून लोकं दुखी झाले. का दुःखी झाले ? कारण लोकांना सरळ, सज्जन माणसं आवडतात जर सरळ, सज्जन माणसं लोकांना आवडतात, तर मग लोकांना सरळ विचार करणारे राजकारणी का नाही आवडत ? तिथेच नेमकी वेडावाकडा विचार करणारी आणि कृती करणारी माणसं का निवडता तुम्ही ? ८) महाराष्ट्रात दुकानांवर मराठी मध्ये पाट्या लागत नव्हत्या, मी साधंसोपं पत्र लिहिलं आणि त्यात त्यांना लिहिलं की तुम्ही ठरवाव की दुकानाची पाटी महाग आहे का दुकान महाग आहे ? आणि पुढे त्या पत्रात लिहीलं की जर तुम्ही पाट्या नाही केलात तर माझे महाराष्ट् सैनिक तुम्हाला भेटीला येतील. आणि पाट्या झाल्या. आम्ही सत्तेत नसताना कामं करून दाखवत असू तर सत्तेत आल्यावर किती कामं करू याचा विचार करा. ९) माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रातील माझ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

42,727 次观看 • 1 年前

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत. २) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. ३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो. ४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही. ५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. ६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे... ७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ? ८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ? ९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू. १०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे. ११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत... १२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ १३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल... १४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे... १५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?

Raj Thackeray

33,719 次观看 • 1 年前

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 次观看 • 1 年前

या व्हिडिओ मध्ये जे वर्णन आहे त्यात केवळ एक किंवा दोन नाही तर विविध वयोगटातील अनेक स्त्रिया या वर्णनात फिट बसतात. महागडे कपडे व भडक मेकअप (शक्यतो लग्न, सणवार यावेळी करतात तसा), श्रीमंती थाट, आकर्षक लोकेशन (अनेकवेळा परदेशात), थोडक्यात तुम्हाला यांची समृद्धी बघून जळजळ होईल असाच तोरा ठेवत ही पात्र आपल्या नजरेसमोर सोशल मीडिया च्या माध्यमातून नाचत असतात. महत्वाच्या पदावर असलेल्या विवाहित स्त्रीला मूल, नवरा व घरच्या इतर जबाबदार्‍या सांभाळत रोज मॉडेल प्रमाणे वावरण कस जमत? कारण कौटुंबिक जबाबदारी शिवाय ज्या पदावर या महिला काम करतात त्यांचे वर्क लोड प्रचंड असत, त्यामुळे नक्कीच ताण येतो. महिला म्हणून वावरताना जी आव्हान असतात ती आणखी वेगळी. हे सर्व करत असताना सतत आनंदी आणि फ्रेश राहणे कसे शक्य आहे? फेमस रीलस्टार सरपंच आठवतात का ज्या सरपंच कमी मॉडेल जास्त वाटायच्या. रीलस्टार होणे हे सरपंच किंवा कोणत्याही संवैधानिक पदाची गरज असावी इतके ही लोक इंस्टाग्रामवर आपली प्रतिमा जपतात. यांच्या नावावर कोणतेही ठोस काम नसत व भ्रष्टाचार करण्यात नंबर पुढे.. माझा मेकअप आणि ड्रेसिंगवर अजिबात आक्षेप नाही, रोजच्या कामाला अनुकूल राहायला हव. गबाळ राहणं योग्य नाही पण स्त्रीचे मूल्य हे केवळ कॉस्मेटिक आहे का? सोशल मीडियाच्या जगात जिथे कॅमेरा तुमच्यावर रोखलेला असतो तिथे दिसण्यात थोड सावध राहावे लागत पण काहीही काम न करता केवळ दिसण्यावर भर दिल्या जात आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. सातत्याने आकर्षक दिसत, अनेक फिल्टर वापरुन पुरूषांना आकर्षित करेल अशीच प्रतिमा तयार करणे यावर भर दिसतो. स्त्रियांनी प्रश्न विचारू नये व स्वत:ची बुद्धी चालवू नये या मताच्या पुरूषांनी तयार केलेली ही व्यवस्था सध्या चलनात आहे. अश्या सतत आनंदी राहणार्‍या स्त्रिया त्यांची भावनिक आंदोलन कशी हाताळतात हे मोठे गूढ आहे. मध्यंतरी एका पॉडकास्ट पुरुष सूत्रसंचालकाने मला विचारले की आजकाल सगळ्याच स्त्रिया कायम नटून थटून असतात, कसे काय शक्य आहे? अश्या नटलेल्या स्त्रियांना बघून साधारण राहणार्‍या स्त्रियांना नक्कीच कमीपणाची भावना येते, अनेक महिला-तरुणी तसे बोलून दाखवितात. या ट्रेंड मुळे कॉस्मेटिक प्रसाधने व ब्युटिपार्लर चा धंदा तेजीत आहेच पण "सुंदर" दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करून घेणे हे सर्रास चालत. यात मानसिक व शारीरिक आरोग्याला कुठेही स्थान नाही. इंस्टाग्राम व व्हाट्स अप वर स्वत:च्या शरीराचे प्रदर्शन मांडणार्‍या फिज़िक्स मध्ये नोबल मिळावे यासाठी हे नक्कीच करत नाहीत. या सर्व लिपस्टिक गॅंगच्या चुकीच्या प्रभावामुळे विविध क्षेत्रात करियर करू पाहणार्‍या तरुणींची संख्या कमी होत आहे. OnlyFan सारख्या साइट्स तर तरुणींना प्रॉडक्ट म्हणून पेश करतात व यावरील तरुणी त्याच्यातून पैसे कमवितात. इंटरनेटवर नग्नता सगळ्यात जास्त विकल्या जाते. अर्थात हे सर्व नट्टा पट्टा करणे यांची आवड नसते तर एक तो एक डावपेचाचा भाग असतो. पुरूषांना आकर्षित करून हव काम करवून घेणे व फिमेल कार्ड व्यवस्थित वापरत आपली पावर वाढविणे, चैन व मौज मजा करत आयुष्य घालविणे हे यांचे ध्येय असते. इतर लोकांची पर्वा कशाला करायची ? काम झाली काय किंवा नाही, कोणाला काय फरक पडतोय? यातील अनेक स्त्रिया अतिशय क्रूर आणि कपटी असतात ( ऐपस्टीन कांडातील घिसलेन मॅक्सवेल आठवा, अतिशय आकर्षक रित्या स्वत:ला प्रेझेंट करायची) थोडक्यात विषकन्या, ज्यांना लहानपणापासून "स्त्री हे पुरुषाचे मनोरंजन करणारे खेळणे आहे" छान पद्धतीने शिकविले असते. ही मोहिनीविद्या वापरुन पुरूषांना वश करायचे व आयुष्य आरामात काढायचे. यांचा एकंदरीत वावर हा मोहीत करणारा असतो. अश्या स्त्रिया भावनिक नसून अतिशय कॅलकुलटेड व आत्ममुग्ध असतात. या स्त्रियांना हे कळत नाही की त्यांची किंमत ही त्यांच्या शरीरपूर्ती केली जाते. एकदा शरीर थकल की बाजूला फेकल्या जाऊन नवीन मनोरंजनाचे खेळणे आणले जाते. अश्या स्त्रियांना अनेक मानसिक आरोग्याचे प्रश्न असतात. शारीरिक आरोग्याचे हाल तर विचारू नका. पण एवढा विचार करण्याइतपत यांची बुद्धी असती तर त्यांनी हा मार्ग पत्करला नसता किंवा लज्जा,अपराधीपणा जाणविल्यानंतर वेगळी वाट धरली असती. पूर्वी सती जाणे, केशवपन, स्त्रियांना अशिक्षित ठेवणे या स्त्रीविरोधी परंपरेचे मॉडर्न रूप स्त्रिचे अस्तित्व तिच्या शरीरापुरते मर्यादित ठेवणे हा ट्रेंड आहे. दुर्दैवाने स्त्रियांना हे शोषण आहे हेच उमजत नाही. #मराठी #महाराष्ट्र #मानसिक #खरात_फाईल्स #अशोकखरात #Marathi #Maharashtara

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत

16,428 次观看 • 6 个月前