正在加载视频...

视频加载失败

दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरातर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते. पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत होतं? हे राजकारणी त्यांना संरक्षण...

114,431 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

8 条评论

American Stories Network 的头像
American Stories Network2 年前

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

Ram.🇮🇱 的头像
Ram.🇮🇱1 年前

अहो समाजसेविका बालबुद्धी खंडणी प्रकरणांमध्ये ते बेलेबल गोष्टीमध्ये मोडतात त्यांना फक्त पोलिसांना चौकशीला समोर जायचे असत आता तू म्हणशील ते होणार का? अटक का करतील पोलीस जर तो चौकशी ला तो स्वतः येत असेल??

Samarjeet 的头像
Samarjeet1 年前

आता मुंडेंचा राजीनामा @AjitPawarSpeaks घेण्याची हिम्मत दाखवणार का की नांगी टाकणार

Ashu 的头像
Ashu1 年前

अंजली ताई याचे सगळ्या समर्थक लोकांना याने कालच सांगितले होते, उदया cid office ल शरण होतो. ते सगळे समर्थक कालच पुणे मधी आले तरि पोलीस ल काहीच माहिती नव्हती. सगळ ठरवून केलं आहे. त्या मुंबई मधील अका ने सांगीतल हजर हो, की लगेच हजर झालं.

Prashant.0011 的头像
Prashant.00111 年前

आधी क्लीन चीट चा रोड मॅप तयार केला सगळी तयारी झाल्यावर मग हा देखावा उभारला.तुमच्या अनुभवा नुसार ही आयडिया कोणाच्या सुपीक डोक्यातून आली आहे हे सांगायची गरज नाही. विश्वास ठेवण्याची चूक पुन्हा करू नका या आधीही तुम्ही त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवलेला होता.आज बघताना मित्रप्रेम..

Sanjay Ghewade 的头像
Sanjay Ghewade1 年前

वाल्मिक कराड २० दिवस सापडत नव्हता वाल्मिक कराडचा फोन १५ दिवसांपूर्वी पुण्यात ट्रेस झाला होता, आज तो पुण्यातच सरेंडर झाला नक्की पोलिस‌ वाल्मिक कराडला शोधत होते का वाल्मिक कराड पंधरा दिवस पुण्यात सरेंडर व्हायला पोलिस स्टेशन शोधत होता

भक्ताड(💀) 的头像
भक्ताड(💀)1 年前

शेम्बडे पोरगा पण सांगेल ह्याला कोणाच संरक्षण आहे ,तयारीनिशी हजर झालं सरकारचे तपासाचे ढोंग ह्यानेच उघडे केले 🙏🙏

निरंजन कुलकर्णी (भारतीय सनातनी हिंदू)🇮🇳🚩 的头像
निरंजन कुलकर्णी (भारतीय सनातनी हिंदू)🇮🇳🚩1 年前

अगदी बरोबर. हेच राजकारणी संरक्षण देत असावेत...

相关视频

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस सरांनी वयाच्या शंभरीत पदार्पण केलं. याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने आज पुण्यात एक कार्यक्रम झाला तिकडे अनेक ज्येष्ठ व्यंगचित्रकार, चित्रकार हजर होते. मला देखील या सोहळ्याचं निमंत्रण होतं. फडणीस सर आणि मी, आम्ही दोघेही एकाच कला महाविद्यालयाचे, जे.जे. स्कुल ऑफ आर्टचे विद्यार्थी, याचा मला विशेष आनंद. अर्थातच आमच्या दोघांच्यातलं वयाचं अंतर लक्षात घेता ते काही दशकं मला सिनियर. या कार्यक्रमात बोलताना अनेकांनी सरांच्या कलेबद्दल लोकांनी त्यांचा दृष्टिकोन किती निखळ आहे आणि त्यांचं चित्र बघताना किती सोपं वाटतं याबद्दल सांगितलं. पण मी स्वतः एक कलाकार आहे, मी तुम्हाला खात्रीने सांगतो सरांचं चित्र जितकं सोपं वाटतं ते तितकंच कठीण आहे. सरांच चित्रच कशाला कुठलीही गोष्ट जी सोपी वाटते ती सोपी करून समोर आणणं ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. आणि एक शतक पाहिलेल्या माणसाने आयुष्यात काय काय पाहिलं असेल, स्वातंत्र्याच्या भारावलेल्या काळापासून ते सगळं विस्कटत चाललं आहे हे एका आयुष्यात बघितलेल्या माणसाला निखळ दृष्टिकोन ठेवणं खरंच अवघड आहे. पण तो सरांनी ठेवला आणि तो त्यांच्या कलेत दिसत राहिला हे सरांचं मोठेपण... यावेळी बोलताना कलांविषयीची सरकारी व्यवस्थांची अनास्था, आपल्या कला जाणिवा याबद्दल मी माझं मनोगत व्यक्त केलं. त्या मनोगताची चित्रफीत इथे जोडत आहे.

Raj Thackeray

31,619 次观看 • 2 年前

आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा २० वा वर्धापनदिन. त्यानिमित्त आयोजित मेळाव्यात माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील सहकाऱ्यांना संबोधित केलं. १) माझ्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी सेनेतून झाली. तिथे काम करत इथपर्यंत आलो. अमित आणि त्याचे सहकारी उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. २) NEET परीक्षेतील गोंधळाच्या नंतर देशभर विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्यानंतरचा विद्यार्थ्यांचा हा पहिला मेळावा. मी जेंव्हा कामाला सुरुवात केली तेंव्हा काळ वेगळा होता, तेंव्हाचे विद्यार्थ्यांच्या समोरचे प्रश्न वेगळे होते, आजचे प्रश्न वेगळे आहेत. सगळं स्वरूपच बदललं आहे. मी टेलिग्राम ते इंस्टाग्राम काळ पाहिला आहे. ३) आज 'जेन झी' आंदोलनानंतर 'जेन झी' बद्दल खूप बोललं जात आहे. पण जेन झी म्हणजे फक्त शहरातील जेन झी असा समज करून घेऊ नका. जसे त्यांचे प्रश्न आहेत ते समजून घेतले पाहिजेत तसे ग्रामीण महाराष्ट्रातील पण याच वयोगटातील जे तरुण-तरुणी आहेत. त्यांचे प्रश्न काय आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सहकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ४) सगळ्याच कल्पना आता बदलल्या आहेत. आमच्या लहानपणी सांगायचे की रोज डोक्याला तेल लावा मग बुद्धी तल्लख होते. पण सध्या राज्याचे जे उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत ते त्यांच्या डोक्यावरच्या प्रत्येक केसाला तेल लावतात तरीही त्यांच्या बुद्धीत फारसा फरक पडला नाही. ते म्हणाले दिल्लीत आंदोलनाच्या दरम्यान जी दगडफेक झाली त्या दगडांवरचे फूटप्रिंट घेऊन ते आधार कार्डशी लिंक करून दगडफेक करणाऱ्याना शोधणार. काय बोलताय ? फूटप्रिंट आणि फिंगरप्रिंटमधला फरक नाही कळत ? अशा माणसांबद्दलचा 'जेन झी' च्या मनात राग असणारच ना. कोल्हापूरकरांनी पुण्याला यांना पाठवलं की विद्येच्या माहेरघरात जाऊन काही फरक पडेल पण काहीही फरक पडला नाही यांच्यात. ५) आज सकाळीच पंतप्रधानांचं निवेदन पाहिलं. त्यात त्यांनी म्हणलं आहे ते मान्य आहे. त्यांच्याबद्दल जी भाषा वापरली गेली ती अयोग्यच होती. अशी भाषा कोणी कोणाच्या बाबत वापरूच नये. हे चूकच आहे. पण हे तुमच्या लोकांना पण सांगा. २०१२ पासून ज्या ट्रोलच्या सेना तुमच्या पक्षाने पोसल्यात त्या महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी ते आमच्यासकट सगळ्यांना घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करतात. आज महाराष्ट्रात कलाकारांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर ट्रोल केलं जातं. या सगळ्याबद्दल तुमच्या लोकांना पण कधीतरी सांगा. जे पेराल तेच उगवतं. पंतप्रधान म्हणाले की माझ्या आईबद्दल चुकीचं बोललं गेलं. ते चूकच आहे. असं होता कामा नये. पण दुसऱ्यांना सुद्धा आई असते हे तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुमच्या पक्षाने जे ट्रोल पोसलेत त्यांना सांगा. तुम्ही म्हणालात की 'मुलांना माफ केलं आहे'. पण तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार ? ज्यांनी विद्यार्थ्यांवर लाठ्या मारल्या, ज्यांनी विद्यार्थ्यांची डोकी फोडली आणि हे सगळं करा असं ज्यांनी सांगितलं ते कधी माफी मागणार ? ६) जे आंदोलन झालं ते फक्त NEET परीक्षांतील गोंधळामुळे झालं आहे असं नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन मुलांच्या, तरुण-तरुणींच्या मनात काय खदखदतंय याचा विचार करा. आज रस्ते धड नाहीत, सगळीकडे पाणी तुंबतं, मैदानं नाहीत, बागा नाहीत, धड शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत, सर्वत्र खाजगीकरण सुरु आहे. सगळ एकाच उद्योगपतीच्या घशात टाकणं सुरु आहे. आज आमदार, खासदार ५०, १०० कोटी देऊन फोडले जात आहेत. डिजिटल इंडियाची घोषणा करणारं सरकार आमदार खासदार फोडताना कार्ड कुठे स्वाईप करता ? या सगळ्या परिस्थितीचा राग आज विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या, तरुण-तरुणींच्या मनात आहे, आणि त्याचा हा उद्रेक होता. आणि अजून सुद्धा उद्रेक बाहेर येणार आहे. कोणाला सत्तेवरून खेचणं आणि कोणालातरी सत्तेत आणणं हा विषय नाहीये. देशातील तरुणांच्या भविष्याचा विषय आहे. ७) ग्रामीण भागातील तरुण-तरुणींच्या मनात काय सुरु असेल ? ते काय विचार करत असतील ? आज त्यांच्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जे आत्महत्या करत आहेत ते तरुण-तरुणींच्या नात्यातील, ओळखीतील लोकं असतील. त्यांच्या अंत्यविधीला जाताना या मुलांच्या मनात काय विचार येत असेल ? आपल्या घरच्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून ही मुलं गाव सोडून शहरांत येतात. नोकरीसाठी वणवण करतात. आणि इथे येऊन सुद्धा काय तर शहरं बकाल झालेली आहेत हे पाहतात. ८) या सरकारने 'स्मार्ट सिटी'चा गाजावाजा केला. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटी ? इथलं एकही शहर धड नाही. आज मुलं परदेशात जात आहेत. का तर इथे त्यांना राहावंसं वाटत नाही. शहरं बकाल आहेत, मुलाबाळांना कुठे बाहेर नेण्याची सोय नाही. परदेशात उत्तम रस्ते, मैदानं, बागा, स्वच्छता, खेळांची संकुल सगळं काही आहे. या सगळ्यामुळे या मुलांना परदेशात जाऊन स्थायिक व्हावंसं वाटतं. आणि आपल्याला याचं काहीच वाटत नाही ? ९) सरकारने लोकसभेत मान्य केलं आहे की या देशातील उद्योजक हा देश सोडून जात आहेत. मोदींच्या आयुष्यावरच्या सिनेमात मोदींची भूमिका करणारा विवेक ओबेरॉय हा दुबईत राहतो. मोदींच्या काळात कसं सगळं छान झालं, कसा देश बदलला असल्या गप्पा मारणारा आर माधवन कुटुंबासकट दुबईत जाऊन राहतो. जर मोदींनी सगळं कसं छान केलं आहे असं वाटतंय ना मग तुम्ही का परदेशात स्थायिक होत आहात ? हे लोक इथे येणार सरकार स्पॉन्सर्ड फिल्ममधे काम करणार आणि पुन्हा दुबईला जाणार. उद्योगपती परदेशात जात आहेत १०) पंतप्रधान म्हणतात विद्यार्थी चुकीच्या रस्त्यावर भरकटलेत. ते भरकटले नाहीयेत तर त्यांना तिकडे ढकललं जात आहे. ओशोंच एक सुंदर वाक्य मध्ये ऐकलं, ते म्हणाले, "कौन कहता है देश का युवक गलत रास्ते पर भटक रहा है। अगर रास्ता बननेवालेने गलत रास्ता बनाया है तो युवकों का क्या उसमें दोष ?" या मुलांच्या अपेक्षा मारल्या जात आहेत. त्यांना आसपास आपल्यासाठी काहीच चाललं नाहीये हे दिसल्यावर त्यांनी काय करायचं ? ११) आज देशातील तरुण-तरुणी माझं सगळं चांगलं होऊ दे, मला नोकरी मिळू दे, माझं लग्न होऊ दे म्हणून देवळात जाऊन देवाकडे प्रार्थना करतात. त्या देवाच्या देवळातच चोरी होत आहे. राम मंदिर या देशातील करोडो लोकांच्या भावनेचा विषय. पण त्याच देवळातून पैशाचा अपहार होणार असेल तर या मुलांनी कुणाकडे बघायचं ? मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला स्वतः एकटे आत होते आणि स्वतः एकट्याने पूजा केली. मग मोदी राम मंदिरातील अपहाराबद्दल का बोलत नाहीत ? का अयोध्येत खासदार निवडून नाही आला म्हणून यांचा संबंध संपला ? १२) या देशातील तरुण-तरुणी श्रद्धाळू आहेत जे योग्य आहे पण त्यांना धर्मांध बनवू नका. त्यांना शिक्षणाच्या वाटेवर न्या. त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नका. फक्त जय श्रीराम म्हणून काय होणार ? देशात गोरक्षक गाड्या पकडतात आणि नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात अभिमानाने सांगतात की जगात बीफ एक्स्पोर्टमध्ये भारताचा नंबर पहिला आहे. गायी मारल्याशिवाय बीफ एक्स्पोर्ट होईल का ? मग गोरकाक्षांनी काय करायचं ? १३) देशातील एक लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत... १५,००० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही... १० लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत.२००४ मध्ये शिक्षणावर ३.२% खर्च होत होता, आज २०२६ मध्ये २.८%. खर्च होत आहे. १४) सिद्धिविनायक मंदिरात अपहार झाल्याचं या मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहून कळवलं आहे. दानपेटीतुन १८ कोटी रुपये लुटले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना सरकारवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणून ते देवळात जाणार तर त्या देवळातच चोरी सुरु आहे, या मुलांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर ? १५) माझ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील सहकाऱ्यांना सांगणं आहे की सदस्य नोंदणी कराच पण या विद्यार्थ्यांच्या मनात नक्की काय सुरु आहे हे पण समजून घ्या. राज ठाकरे

Raj Thackeray

50,124 次观看 • 1 个月前

गणेशोत्सवात डीजे नको म्हणून जे तावातावाने बोलत आहेत, त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ काल पुण्यात रेकॉर्ड करण्यात आलाय. ‘ईद ए मिलाद उन नबी’निमित्त बुधवारी कोंढवा, खडकी, नाना पेठ, नरपतगिरी चौक, संत कबीर चौक या ठिकाणी सर्व नियम पायदळी तुडवून मोठ्या आवाजात स्पीकर लावण्यात आले. यावेळी जे गाणे वाजवण्यात आले, ते सोबतच्या व्हिडिओमध्ये दिले आहे. ते नीट ऐका. भारत का बच्चा… बच्चा… मेरे ख्वाजा के तुकडों पें पलता है… असे शब्द या गाण्यात आहेत. गणेशोत्सवात डीजे लावण्यावरून जे तावातावाने बोलत आहेत. त्यांना आता या विषयावर काय बोलायचे आहे? डीजे लावण्यावरून गणेश मंडळांना टार्गेट करणारे काही बोलघेवडे लोक या विषयावर आळीमिळी गुपचिळी घेऊन का बसले आहेत? या बोलघेवड्या लोकांना या गाण्यात जे म्हटले आहे की, भारत का बच्चा… बच्चा… मेरे ख्वाजा के तुकडों पे पलता है… हे शब्द आणि त्याचा अर्थ मान्य आहे का? ही पोस्ट बघून शांत बसू नका. बोला… बोला… तुम्ही बोलले पाहिजे. नाहीतर या मिरवणुका तुमच्या घरांपर्यंत येतील, हे लक्षात ठेवा. तुम्ही सोयीस्करपणे काही बोलले नाहीतरी आम्ही शांत बसणार नाही. या गाण्याविरोधात मी आजच रीतसर पोलिस तक्रार दाखल करतो आहे. धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष, भाजपा, पुणे शहर

Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)

41,616 次观看 • 27 天前

६ आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिकच्या दौऱ्यात पदाधिकारी आणि नाशिकमधील माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठका घेतल्या. आणि आज ७ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. १) राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडू काल मला नाशिकमध्ये भेटायला आले, माझी आणि त्यांची भेट झाली नाही अशा बातम्या मी पाहिल्या. मुळात श्री. गावित हे मला भेटायला आलेत हेच मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे भेट झाली नाही. बाकी ते जर भेटायला आलेत असं कळलं असतं तर भेट नक्की झाली असती. मी का भेटणार नाही ? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्या ते दिल्लीला गेलेत असं कळलं, ते तिकडून आले की मी निश्चितपणे त्यांची भेट घेईन. २) मी २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे पाहिले. २०१५ च्या कुंभमेळ्याबद्दल बोलूया. २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून जी कामं झाली, त्याचं जे नियोजन झालं ते इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने झालं, उत्तम कामं झाली, उत्तम रस्ते झाले, सगळं नियोजन झालं. हे का झालं ? तर यातून काही अर्थकारण व्हावं असला उद्देश नव्हता. उत्तम काम व्हावं ही इच्छा होती म्हणून ते शक्य झालं. पण आत्ता जे दिसतंय, जे ऐकायला येतंय त्यातून सध्याच्या या सत्ताधाऱ्यांना यातून फक्त कमिशन कमवायचं आहे. यातले बरेचसे काँट्रॅक्टर्स गुजरातमधले आहेत. थोडक्यात वरून जसे आदेश येईल तसं वागायचं इतकंच ठरलं आहे. बाकी रस्त्यांची चाळण झाली आहे, खड्ड्यात पडून अपघात होत आहेत, माणसं मरत आहेत याचं या सरकारला काही घेणंदेणं नाही. ३) मला वाईट वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात आम्ही नाशिक शहर इतकं सुंदर केलं, इतके चांगले रस्ते बांधले, त्या सगळ्याची पार वाट लागली आहे. बोटॅनिकल गार्डन असेल की माननीय बाळासाहेबांच्या नावाने उभारलेलं स्मारक असेल सगळ्याची पार वाट लावून टाकली आहे. दुसऱ्यांनी केलं मग ते का टिकवायचं, ही कुठली वृत्ती ? नाशिकमध्ये झाडं तोडली गेली, लोकांनी आंदोलनं केली, प्रशासन ढिम्म राहिलं, तरीही नाशिककर जर त्याच लोकांना निवडून देणार असतील तर काय बोलायचं ? ४) दिल्लीत जंतरमंतरला जे आंदोलन झालं, तिथे विद्यार्थी, तरुण-तरुणी जमले ते काही फक्त NEET परीक्षेतील घोटाळ्यांमुळे त्रस्त झालेले विद्यार्थी नव्हते. ते आसपासच्या एकूणच परिस्थितीने त्रस्त झालेले विद्यार्थी होते. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे. हे आंदोलन घराघरात शिरलं. जेंव्हा आंदोलकांना मारलं तेंव्हा प्रत्येकाला वाटलं की माझ्या मुलाला मारलं. ५) सध्या एक विचित्र ट्रेंड सुरु आहे. दहावीची परीक्षा झाली की मुलं आधी क्लास लावणार आणि मग क्लास मुलांना सांगणार कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्या ते. ही मुलं ८,८ तास क्लासला जाऊन बसणार असतील, तर मग कॉलेज काय करत आहे ? कोचिंग क्लासेसकडूनच NEET चा पेपर फुटला. आता नंदन निलेकणीना आणलं आहे, त्यांनी क्लासेसवर पहिलं लक्ष आणावं. कॉलेजची फी २० हजार आणि क्लासेसची फी १ लाख ४० हजार रुपये, हे काय आहे ? क्लासला ८ तास बसल्यावर कॉलेजला अटेंडंन्स कशी लागते ? म्हणजे क्लास आणि कॉलेजमध्ये काही अर्थकारण आहे का ? आणि या सगळ्याने त्रस्त झाल्यावर विद्यार्थी चिडले, त्यांनी आंदोलन केलं तर त्यांचं चुकलं काय ? ६) काल नाशिकमध्ये विद्यार्थी भेटले ते म्हणाले, सर परत पेपर नाही ना फुटणार ? मला ऐकूनच वाईट वाटलं. काल नाशिकमध्ये मला NEET परीक्षेतील गोंधळाने नैराश्य येऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे (यश गोसावी ) आई वडील भेटले. ज्या २१ मुलांनी आत्महत्या केली त्यात त्याचं नाव नाहीये. आपल्या जिल्ह्यातील मुलगा व्यथित होऊन आत्महत्या करतो, याबद्दल पालकमंत्र्यांना सहानुभूती नाही वाटत ? ७) सध्या भाजपमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष सुरु आहे. तुम्ही जेंव्हा बाहेरचे शत्रू संपवता तेंव्हा तुमच्या आत शत्रू तयार होतात हा इतिहास आहे आणि हेच भाजपमध्ये सुरु आहे. ८) क्लासेसचा जो काही धंदेवाईक अप्रोच आहे आणि कॉलेजेसची काही भूमिकाच नाहीये या सगळ्यावर सरकारने आता स्पष्ट भूमिका घ्यावी. वर्तमानपत्रांत पानपानभर क्लासेसच्या जाहिराती येतात की हा पहिला आणि तो पहिला आला. कसा आला ? जेंव्हा पहिल्यांदा NEET चा पेपर फुटला तेंव्हा त्याचा रेट २५ लाख होता असं ऐकायला आलं आणि आता तो दीड कोटी होता असं ऐकायला आलं. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आता. ९) आज देशातील तरुण-तरुणी त्यांच्या मोबाईलवर बाहेरचे जग बघतात आणि जेंव्हा आसपासची परिस्थिती बघतात तेंव्हा त्यांना नैराश्य नाही का येणार ? त्यांना का रहावसं वाटेल इथे ? या सरकारमधल्या मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात, ज्यांचा राजीनामा झाला त्या धर्मेंद्र प्रधानांची मुलगी परदेशात शिकत आहे. जर तिचाच या देशातील शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलो आहोत आपण ?

Raj Thackeray

65,871 次观看 • 1 个月前

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार श्री. राजू पाटील यांच्या प्रचारार्थ मी आज शुभारंभाची सभा घेतली. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे- १) आज आमचे आमदार श्री. राजू पाटील यांच्या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. आज व्यासपीठावर आमचे उल्हास भोईर, भगवान भालेराव आणि संगीताताई चेंदवणकर उपस्थित आहेत. संगीताताईनी बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यामुळे ती भयानक घटना महाराष्ट्राच्या समोर आली, आख्ख प्रशासन हललं. त्यांनी जे काम केलं त्याची शाबासकी म्हणून त्यांना मी विधानसभेची उमेदवारी दिली. २) मी तुमच्याकडून हमी घ्यायला आलोय की जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही विजयी कराल. हे सगळं कशासाठी तर महाराष्ट्राची आज जी अवस्था आहे ती बदलण्यासाठी. २०१९ ला युतीत कोण होतं, आघडीत कोण होतं आता युतीत कोण आहे आघाडीत कोण आहे काहीच कळत नाहीये. गेल्या ५ वर्षात जे घडलं त्याची मतदारांनी उजळणी केली पाहिजे. कोणी कुठेही गेलं, पण आमचा राजू विधानसभेत एकटा होता, आणि मला राजुचा अभिमान आहे की माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. ३) २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजप यांच्यासमोर कोण तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मग निकाल लागले, मग सकाळी एक शपथविधी झाला, ते लग्न १५ मिनिटांत तुटलं, कारण काकांनी डोळे वटारले मग हे आले घरी काका मला माफ करा म्हणत. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोरबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. कारण काय तर अमित शाह यांनी मला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. तुमच्यासमोर जर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मग तेंव्हाच का नाही आक्षेप घेतलात ? २०१९ चा निकाल लागेपर्यंत गप्प बसले आणि जेंव्हा लक्षात आलं की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही तेंव्हा यांनी अडीच वर्षांचा मुद्दा बाहेर काढला. ४) उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यावर त्यांनी सन्माननीय बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट करणं बंद केलं. होर्डिंगवर पण हिंदुहृदय सम्राट असा उल्लेख करणं बंद केलं. काही ठिकाणी होर्डिंगवर तर उर्दूत त्यांनी चक्क जनाब बाळासाहेब ठाकरे पण लिहिलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतके खाली गेलात तुम्ही ? ५) मग हे गेले काँग्रेसबरोबर, यांची अडीच वर्ष संपली आणि यांना यांचे चाळीस कुठे गेले हे कळलंच नाही. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. त्यांच्याकडे गुप्तचर विभाग रोज काय चाललं आहे हे सांगत असतात तरी मुख्यमंत्र्यांना कळलं नाही. या चाळीस जणांना घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणि त्यातल्या त्यात अजित पवारांबरोबर बसताना आमचा श्वास कोंडतो. मग पुढे अचानक अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून बाहेर पडले आणि इथे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. काय राजकारण सुरु आहे ? महाराष्ट्रात इतके ज्वलंत प्रश्न सुरु असताना हे सगळे हवं तसं वागतात कारण तुम्ही चिडत नाही, शांत लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असतात. महाराष्ट्रातील जनता आम्ही कसेही वागलो तरी आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची खात्री आहे त्यांना. ६) पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता काही वाटत नाही या लोकांना. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तरीही तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला... ७) फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती सन्माननीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही ? माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीये. महाराष्ट्राची किती वैचारिक घसरण झाली आहे ? देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा ? ८) आत्ता मी एक क्लिप पाहिली... मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावरती एक बाई भोजपुरी गाण्यावर लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून नाचत आहे... ही लाडकी बहीण योजना ? व्यासपीठावर बायका आणून नाचवणं हे उत्तरप्रदेश, बिहारमध्ये व्हायचं, हे आपल्याकडे कधीपासून सुरु झालं ? ९) महाराष्ट्रातले प्रश्न प्रलंबित असताना आपल्याकडे चेष्टा सुरु आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रासाठी जागा रहा. आपल्याकडे त्या ओळी आहेत ना महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले।अनेकांचा डोळा आहे हे राज्य मारण्यासाठी. महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी सुरु आहेत त्या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत. मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून माझ्या हाती सत्ता द्या. १०) राजू पाटील यांनी कोव्हीड काळात खूप काम केलं. तुमच्या सगळ्यांसाठी झगडणारा राजू आहे, त्याला भरघोस मतांनी निवडून द्या. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

51,754 次观看 • 1 年前

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 次观看 • 1 年前

काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे. आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !

Raj Thackeray

42,002 次观看 • 6 个月前

भाटाललेला बहुजन समाज नीट शेवटपर्यंत वाचा…! गणपती बप्पा बुध्दी व ज्ञानाची देवता मानली जाते पन भक्तांना दोन्ही गोष्टी द्यायला बप्पा कमी पडतोय आसं एकंदरीत दिसंतय…! तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांचे विचार समजत नाही तुम्हाला संत गाडगेबाबा, महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे यांनी काय लिहून ठेवलंय ते खरं वाटत नाही पन आत्ताच्या बाबा पुरंदरे यांनी सोईनुसार लिहिलेला इतिहास खरा वाटतो हे दुर्दैव आहे…! खालच्या पोस्टमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी गणेशोत्सव कसा व कोणी कशासाठी चालू केला हे त्यांनी सांगितले आहे व छत्रपतींच्या काळात गणेशोत्सव होत नव्हता असे सांगितले आहे ना की गणपतीच नव्हता ते….! 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ पण आपले महान ज्ञानी भक्त आले पुरातन गणपती मुर्ती व शिवकालीन शिलालेख घेवून व लागले कोकलायला…! गणपतीचा पहिला उल्लेख हा ऋग्वेद ह्या प्राचीन संस्कृत ग्रंथात आहे हे पन 99.99 टक्के भक्तांना माहित नसेल तर 'अग्निमीळे पुरोहितम्' हा पहिला मंत्र त्याचा आहे तुम्हाला अलिकडच्या काळातील गाडगेबाबा व प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाचा अर्थ समजत नसेल तर प्राचीन वेद पुराण, गाथा, ज्ञानेश्वरी वगैरे काय घंटा समजणार…! ह्या पोस्टमुळे माझ्यावर सगळा बहुजन समाज टिकास्र घेवुन तुडून पडला होता पन एक पन सुशिक्षित बामन त्या पोस्टखाली आला नाही कारण त्यांना सत्य इतिहास माहित आहे त्यामुळे ही पोस्ट कोणीच खोडुन काढु शकले नाही कारण मी काय माझ्या मनाने लिहिले नाही माझ्या प्रत्येक लिखानाला आधार असतो हे समजुन घ्या..! मी सांगितले होते की पुण्यात गणपतीची पहिली मिरवणूक ही बामनांनी काढली होती व त्यात एका चांभाराच्या मुलाने गणपतीला हात लावला तेंव्हा टिळकांनी त्याचे विसर्जन केले तेव्हा ही प्रथा पडली..! तुम्हाला जर गाडगेबाबा व प्रबोधनकारांनी नेमकं काय सांगितलं आहे हेच कळाले नसेल तुम्ही किमान ज्यांचा इतिहासात अभ्यास आहे त्यांचे तरी ऐकावे नाहीतर गणेशोत्सवात काळात दहा दिवस इतिहास व साहित्यिक भाषेचा अभ्यास करावा …! 🤣🤣 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 #येड्याचा_बाजार #BoycottINDvPAK #INDvsPAK #आंधश्रध्दा

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

11,615 次观看 • 1 年前

आज २५ जुलै २०२४ रोजी, मुंबईतील रंगशारदा सभागृहात, मी आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यातील काही महत्वाचे मुद्दे... १) मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला. एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं. २) अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. ३) पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं. ४) पण सध्या कोणाचं लक्ष नाहीये. सगळे व्यस्त आहेत 'लाडकी बहीण', 'लाडक्या भावात'. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मुळात अशा योजना राबवायला राज्यसरकारकडे पैसे आहेत का? सरकारकडे रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनांना कुठून पैसे येणार ? ५) माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे जा, त्यांना मदत करा, त्यांना काय हवं नको ते पहा. ६) महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हेच तुमचं प्रचाराचं कॅम्पेन पाहिजे. ७) आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे. ८) निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही.

Raj Thackeray

43,359 次观看 • 2 年前

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभेचे उमेदवार श्री. अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) गेली अनेक वर्ष विदर्भात फिरतोय. १९८९ ला मी प्रत्यक्ष राजकारणात आलो. १९९३ साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढला होता. १९९२ ला बाबरी मस्जिद पडली, मुंबई आणि इतर ठिकाणी दंगली झाल्या, पुढे १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यावेळेस १९९३ च्या डिसेंबरमध्ये माझा मोर्चा झाला. १९९१ ते १९९३ माझा सगळ्यात जास्त वेळ माझा मराठवाड्यात आणि विदर्भात गेला. यवतमाळला यायचो, अमरावती तर माझं घर आहे. हा प्रदेश मला नवीन नाही, इथली माणसं मला नवीन नाही. २) १९९० ते २०२४ मी इथे येतोय, फक्त वाईट एकच वाटतं की प्रश्न तेच आहेत. प्रश्न बदलले नाहीत. हा जिल्हा पांढऱ्या सोन्याचा म्हणजे कापसाचा जिल्हा. खरंतर हा श्रीमंत जिल्हा हवा होता, पण राज्यकर्त्यांनी इथे योजनाच आणल्या नाहीत. हा जिल्हा ओळखला जातो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा. इतकी सरकारं आली गेली पण तरीही आत्महत्या थांबल्या नाहीत. तीच तीच लोकं निवडून येत आहेत आणि ती माणसं तुमच्यासाठी काहीही करत नाही. याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का ? ३) गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात जे झालं त्यात तुम्ही मतदार म्हणून कुठे आहात ? याचा विचार करताय कधी? आत्महत्या करणाऱ्यांच्या घरी परिस्थिती काय होत असेल याचा विचार करवत नाही. पण ही परिस्थिती ज्यांच्यामुळे येते अशा लोकांना शिक्षा देणार आहात का नाही ? ४) यवतमाळमधून वसंतराव नाईक ११ वर्ष मुख्यमंत्री होते तर सुधाकरराव नाईक अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तरीही हा जिल्हा आत्महत्यांचा जिल्हा ठरत असेल तर काय बोलायचं ? जोपर्यंत तुम्ही भाकरी पलटवत नाही, जोपर्यंत या लोकांना तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. ५) २०१४ ला महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा माझा पक्ष या देशातील एकमेव पक्ष आहे. यातून आमची महाराष्ट्राबद्दलची आस्था दिसून येते. आज महाराष्ट्राला जातीपातीत गुंतवून टाकलं जात आहे. जाती याआधी होत्या, जातीबद्दलच प्रेम या आधी होतं पण आता दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण झाला. आणि हा द्वेष शरदचंद्र पवारांनी पेरला. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या जातीपातीत पडू नका. माझ्या तरुण तरुणींना सक्षम करणं हे माझं स्वप्न आहे, त्याला तुम्ही बळ द्या. ६) पाच वर्षांनी पुन्हा एकदा मतदानाची संधी येत आहे, पाच पाच वर्ष तुमच्या आयुष्यातील जात आहेत आणि म्हणून तुम्हाला मतदानाकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. अशोक मेश्राम यांच्यासारखी व्यक्ती मी तुमच्यासमोर आणलं आहे, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं हे माझं आवाहन आहे. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

32,795 次观看 • 1 年前

कसबा विधानसभेचे उमेदवार श्री. गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ पुण्यात कसबा पेठेत सभा घेतली. त्यात मांडलेले मुद्दे १) माझ्यासाठी कसब्याचं वेगळं महत्व आहे. मी जेंव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो आणि महाराष्ट्राचा दौरा केला आणि पक्षाची स्थापना केली, त्यावेळी कसबा गणपतीची पूजा करून पक्षाची स्थापना केली होती. याचं कारण या जागेचं महात्म्य. या जागेचं महत्व काय आहे समजून घ्यायला हवं. शहाजी राजांनी जेंव्हा बंड केलं ते बंड मोडण्यासाठी संपूर्ण पुणे उध्वस्त केलं. मग शहाजीराजे आदिलशाहीकडे गेले आणि नंतर कित्येक वर्ष शाहजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब बंगलोरला राहिले. पुढे जेंव्हा महाराज आणि जिजाऊ महाराज इकडे परत आले. इथे लाल महाल बांधला गेला. तेंव्हा इकडे आपलं देऊळ नव्हतं. जिजाऊ महाराजा २) या भागाने अख्ख्या हिंदवी प्रांतावर जवळपास एक शतक राज्य केलं. पण आपण आपला इतका दैदिप्यमान इतिहास विसरलो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त त्यांच्या जयंतीलाच आठवतात. परदेशात बघा लहान लहान मुलांना कसा त्यांचा इतिहास शिकवला जातो. ३) ज्या कस्ब्याचा इतिहास इतका दैदिप्यमान आहे आज त्या कसब्याची परिस्थिती किती भीषण आहे. इतक्या छोट्या गल्ल्या, कशीही पसरलेली वस्ती. पण तुम्हाला काहीच वाटत नाही. ४) आज मी उमरखेडला गेलो, तिकडे मी बोललो की या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या उमरखेडला झाली त्यावर लोकांनी टाळया वाजवल्या. काय झालंय लोकांना ? आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाबद्दल पण आपल्याला सहानभूती नाही वाटत. काय झालं आहे या महाराष्ट्राला? ५) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची कारकीर्द संपायच्या आधी १० दिवस असताना एक कायदा केला, की युद्धावरती जे कुत्रे बॉम्बचा शोध घेण्यासाठी पाठवले जातात त्या कुत्र्यांना युद्धाच्या ठिकाणी जखमा झाल्या किंवा तो अपंग झाला तरी त्याला अमेरिकन भूमीत परत आणलं पाहिजे, कारण काय तर तो कुत्रा पण अमेरिकन नागरिक आहे. कुत्र्यांचा पण जगभरात सन्मान होतो आणि भारतात नागरिकांना पण किंमत दिली जात नाही. काय अवस्था झाली आहे आपली ? ६) आज पुण्यात मेट्रो, फ्लायओव्हर बनत आहेत, पण ही प्रगती नाही. पुणे शहर आतून पोखरले जातंय. आज पुण्यात हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, बागा नाहीत, चालायला धड रस्ता नाही, मला सांगा तरीही तुम्ही कसं म्हणू शकाल की पुण्याची प्रगती झाली म्हणून ? ७) २०१९ ला आधी अजित पवारांचा शपथविधी झाला, पण ते लग्न पंधरा मिनिटं नाही टिकलं, काकांनी डोळे वटारले आणि अजित पवार परत आले. पुढे उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसले. मग शिंदेंना म्हणे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना घुसमट होते म्हणून शिंदे ४० आमदार घेऊन गेले, बरं हे जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला नकोसं वाटत होतं तेच अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यायच्या आधी १० दिवस नरेंद्र मोदी म्हणाले होते की ७०,००० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकू, पण पुढे १० दिवसांत जेलमध्ये टाकायच्या ऐवजी त्यांना उपमुख्यमंत्री केलं. ८) माझ्या पक्षाने जितकी आंदोलनं केली तितकी आंदोलनं कोणी केली ते सांगा? मोबाईलवर जे मराठी ऐकू येतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कानफटीमुळे सुरु झालं. मी मोबाईल कंपन्यांना सांगितलं की ४८ तासाच्या आत मोबाईलवरमराठी ऐकू यायला पाहिजे आणि ते करून घेतलं. हे का नाही इतर कुठल्या पक्षांना सुचलं ? ९) मी मराठीपण सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. मी जितका कडवट हिंदुत्ववादी आहे तितका कडवट मराठी आहे. इतर भाषिक लोकं किती कडवट असतात. मी सिंगापूरला गेलो होतो तेंव्हा एका दुकानात एक तामिळ बाई तमिळ रेडिओ ऐकत होती. आपण असं करू कधी ? महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो देशात कुठल्याही प्रांताला नाही. आपण भाषेबद्दल कडवट नाही, इतिहासाबद्दल आपल्याला प्रेम नाही. १०) काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत मी फोटो पाहिले की रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेश, बिहार मधून आलेली मुलं झोपली आहेत. मग जरा चौकशी केली तेंव्हा कळलं की ती रेल्वेभरतीसाठी आली आहेत. बरं रेल्वेभरती महाराष्ट्रातील पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्राच्या बाहेर. मग असं का म्हणून आम्ही संघर्ष केला, त्या संघर्षानंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या परीक्षा मराठीत घ्यायला सुरुवात झाली आणि हजारो मराठी मुलांना रेल्वेत नोकरी मिळाल्या. ११) मराठी पाट्या होत नव्हत्या, आमच्या आंदोलनामुळे त्या झाल्या. मी त्या आंदोलनाच्या वेळेस त्यांना एक पत्र लिहिलं, त्यात लिहिलं की दुकान महाग आहे का पाटी महाग आहे का हे ठरवावे आणि शेवटची ओळ लिहिली की तरी पण तुम्ही पाट्या मराठीत नाही केल्या तर माझे महाराष्ट्र सैनिक त्यांना भेटायला येतील. पाट्या झाल्या मराठीत. १२) मशिदींवरचे भोंगे उतरवले पाहिजेत म्हणून मी आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मी सरकारला समज दिली की मशिदींवरचे भोंगे नाही उतरवलेत तर माझे महाराष्ट्र सैनिक मशिदीसमोर जाऊन हनुमान चालीसा लावतील. त्यावर उद्धव ठाकरेंनी भोंगे उतरवायच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मशिदींवरचे भोंगे उतरवायचा ऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर केसेस टाकतो ? १३) राहुल गांधींना एका सभेत खासदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत होत्या तर राहुल गांधी सरळ दुर्लक्ष करून निघून गेले. आपल्या महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही निवडून देणार ? १४) महाराष्ट्राच्या राजकारणाची पार रया घालवली ती संत शरद पवारांनी. इतर संतांनी जातीभेद विसरा म्हणून सांगितलं तर शरद पवार नावाच्या संताने मात्र जाती जातीत भांडण लावणे, एकमेकांना शिव्या द्यायची शिकवण देत आहेत. १५) या महाराष्ट्राला आकार देण्याचं माझं स्वप्न आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं माझं स्वप्न आहे, इथल्या प्रत्येक तरुण-तरुणीला नोकरी मिळायला हवी, इथल्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, शेतकरी सुखी व्हायला हवेत ही माझी इच्छा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, इतरांना संधी दिलीत मला एकदा संधी देऊन बघा. #विधानसभ_२०२४

Raj Thackeray

62,399 次观看 • 1 年前

आज २४ ऑगस्ट २०२४ रोजी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे... १) दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतील असं वाटतंय. अर्थात आचारसंहिता लागली की निवडणुका लागल्या असं म्हणता येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मी इथे आलो आहे. २) महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी कधी पाहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडीत तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहे. आणि त्यांच्या आपापसातील माऱ्यामाऱ्या खूप होणार आहेत. पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं आहे तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक आहे. ३) लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होतं. त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं. ४) लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका. विधानसभेला मतदार त्यांच्याशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोकं विधानसभेत या सगळ्या पक्षांना योग्य उत्तर देणार हे नक्की. ५) महाराष्ट्रात जातीचं राजकरण हे शरद पवारांनी सुरु केलं. शरद पवारांनी अगदी पुलोदपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं ते आजपर्यंत सुरु आहे आणि पुढे महाराष्ट्रात जातीजातीत विष कालवलं. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने ,ते विष आज खूप खोलवर रुजलं आहे. ६) जातीचं राजकारण चालतंय हे पाहून सगळे पक्षच आता ते करू पाहत आहेत. पण हा विषय फक्त विधानसभा निवडणुकांपर्यंत मर्यादित विषय नाही. एकूणच समाज विस्कटला आहे. लहान मुलांच्या मनात जर जातीची जाणीव निर्माण होत असेल तर हे गंभीर आहे. ७) मी वरळीत मागच्या वेळेस उमेदवार दिला नव्हता पण जे झालं ते झालं. या वेळेस फक्त वरळीतच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहे, मग तो मतदारसंघ कोणाचाही असो. ८) लाडकी बहीण असो की कोणतीही योजना असो लोकांना पैसे मिळणार असतील तर लोकं पैसे घेतील पण म्हणून मतदान करतीलच असं नाही. लोकं हुशार असतात. त्यांना हेतू कळतात. ९) बदलापूरमध्ये जे घडलं ते भीषण आणि दुर्दैवी आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरला. पण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बलात्कार ते हुंडाबळी ते छेडछाड या घटना वर्षागणिक वाढत आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ७००० हुन अधिक बलात्काराच्या घटना घडल्या ज्यांची पोलिसांकडे नोंद झाली. ज्याची नोंद नाही झाली अशी प्रकरणं त्याहून अधिक आहेत. बीड,सांगली येथे ऊसतोड कामगार महिलांची गर्भाशयं काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आणि इतक्या घटना घडून पण कठोर कायदे नाहीत. दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं. त्या निर्घृण प्रकारातील दोषींना फाशी झाली तब्बल १२ वर्षांनी. इतका वेळ लागतोच कसा ? बरं, असं नाहीये महायुती सरकारच्या काळात महिलांवरचे अत्याचार वाढलेत, तर हे अत्याचार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पण घडले होते. पण आज दोघेही एकमेकांवर फक्त दोषारोप करत आहेत, पण या घटनांबद्दल कोणीच गंभीर नाही हे दुर्दैव आहे. १०) जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस लाठीचार्ज झाला. त्यावेळेस कारवाई कोणावर झाली पोलिसांवर? पण पोलिसांना आदेश कोणी दिला ? त्यांची काही जबाबदारी नाही का? ११) मागे एकदा मी लंडनला गेलेलो असताना तिकडे बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळेस पोलिसांनी कारवाई सुरु केली, त्या कारवाईत एक निरपराध माणूस मारला गेला. त्यावेळेस पोलिसांनी माफी मागितली पण त्याचं राजकारण नाही झालं. आपल्याकडे पण पोलिसाना सगळं माहीत असतं, फक्त त्यांना फ्रीहँड देणार आहात का ? मी नेहमी म्हणतो की सत्तेत आलो तर सगळ्यांना सुतासारखं सरळ करेन, म्हणजे कायकरेन? तर, मी सत्तेत आलो तर पोलिसाना कारवाई करण्यास फ्रीहँड देईन. आणि मग बघा कसा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल ते. अहो पोलिसांचे हात बांधायचे आणि त्यांना सांगायचं की कारवाई करा, कसं शक्य आहे? १२) लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका. लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. लोकांना हाताला काम हवं आहे, नुसते पैसे नको आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज नको असते, त्यांना स्वस्त आणि २४ तास वीज हवी असते. आणि अशा योजना राज्याला घातक आहेत. बरं हे सगळं कोणाच्या जीवावर लोकांच्या पैशातूनच करता ना? मला असं वाटतं एक, दोन महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे देतील, पुढे देऊ शकतील असं वाटत नाही कारण राज्याकडे पैसेच नाहीत. १३) आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही २००,२२५ सीट्स नक्की लढवणार आहोत . १४) माझे सहकारी मला अनेकवेळा म्हणतात की जरा खरं बोलणं कमी करा. पण मला वाटत नाही मला जमेल असं, कारण सुधरण्याचं आणि बिघडण्याचं पण एक वय असतं ते निघून गेलं. त्यामुळे मी आयुष्यभर जे खरं आहे तेच बोलणार...

Raj Thackeray

49,024 次观看 • 2 年前

आज मुंबईतील "शिवतीर्थ" या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं या भाषणातील महत्वाचे मुद्दे - १) गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया.. २) गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यांच्याबद्दल मला बोललंच पाहिजे. पहिला विषय कुंभमेळा. बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं मी पिणार नाही सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशातील नद्यांची जी अवस्था आहे जिला आपण माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं काय लक्ष आहे त्यावर मी बोललो. स्व. राजीव गांधींनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं, पुढे २०१४ ला मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी पण गंगा साफ करण्याचा प्रकल्प हाती घेतला. कुंभमेळ्यानंतर ज्यांनी तिकडे जाऊन स्नान केलं त्यातले लाखो लोक आजारी पडले. प्रश्न कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये तर गंगा स्वच्छतेचा आहे. ज्यागंगेला आपण माता म्हणतो तिची आजची परिस्थिती काय आहे हे दाखवणारी एक चित्रफीत मी आणली आहे... गंगा शुद्धीकरणावर ३३ हजार कोटी खर्च झालेत. तिकडे घाटावर मृत व्यक्तीला अग्नी दिल्यासारखं करतात आणि नंतर पाण्यात ढकलतात. हा कोणता धर्म ? आपल्या नैसर्गिक गोष्टींच्या आड जर धर्म येणार असेल तर काय उपयोग ? हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता तीच परिस्थिती कशी चालेल ? आपण निसर्गासाठी काही सुधारणा करणार आहोत की नाही ? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करतोय. प्रत्येकाला धर्म प्रिय असतो पण त्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजेत. ३) महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे. सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे प्रदूषित आहेत. ४) प्रदूषणाच्या मानकांनुसार (स्टँडर्ड्स नुसार ) उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडा, घोड, तितुर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर आणि ढोरणा या नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अति वाईट आहे. भातसा, पेढी, मोर, बुराई, वेल,पांझरा, सिना, काळू, वेण्णा, कोयना, मांजरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी व कान या नद्यांच्या पात्रांचे पाणी वाईट या कॅटेगरीत म्हणजे तुलनेने कमी वाईट आहे. ५) मुंबईत ५ नद्या होत्या. त्यातल्या चार मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या यांनी मारल्या. मिठी नदी पण मरायला टेकली आहे. मुंबईतील एकमेव राहिलेली नदी मिठी तिची काय अवस्था आहे ते बघा... दरवर्षी मुंबई महापालिका मिठी नदी साफ करणार असं म्हणते, जोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला असलेली घरं हटवत नाही, तोपर्यंत मिठी नदी स्वच्छ होणार नाही. निसर्गाच्या हानीबद्दल कोणी बोललं की आपण म्हणणार धर्माच्या आड येतो. धर्माचं मला सांगूच नका. आपण भिंतीवर झाडं जगवा झाडं लावा असे संदेश लावतो. आणि देशातील हिंदूंचे अंतिम संस्कार लाकडांवर होतात. लाकडं कुठून येतात, जंगलं तोडूनच ना ? विद्युतदाहिन्या आल्या आहेत पण तरीही अनेक लोकं विद्युतदाहिनी नाकारतात. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. आत्ता ते मध्ये अंबानींच्या वंताराला गेले. म्हणजे त्यांना प्राण्यांची आवड आहे. मग जंगलं त्यांनी वाचवली पाहिजेत. ६) भारताचा जन्म-मृत्यूचा आकडा हा दररोज ८१ हजार ७४६ जन्म होतात दररोज २९ हजार ६७९ मृत्यू होतात. दररोज पन्नास हजाराने लोकसंख्या वाढत आहे ७) महिन्याला २४ लाख ५२ हजार ३८० जन्म होतात महिन्याला ८ लाख नव्वद हजार ३७० मृत्यू होतात महिन्याला १५ लाख लोकांची वाढ होते. ८) वर्षाला २ कोटी ९४ लाख २८ हजार ५६० जन्म होतात, वर्षाला १ कोटी ६ लाख ८४ हजार ४४० मृत्यू होतात म्हणून दर वर्षी १ कोटी ८० लाखाने लोकसंख्या वाढते. एका बाजूला आपण दुष्काळाने त्रस्त आहोत म्हणून बोंबलत बसायचं आणि दुसरीकडे जंगलं तोडायची. ९) आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे. १०) छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती ? शहाजी राजे पण आधी आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता ? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती ? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय ? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं. मिर्जाराजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला तेही हिंदू होते ना ? औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही. ११) औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. १२) मरहट्ट्यानी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते... शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला... माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात. १३) महाराष्ट्रात एअरपोर्ट असेल की बंदर असेल सगळं अदानीला देणं सुरु आहे. अदानी हुशार आहे आणि आपण अडाणी निघालो. १४) लाडकी बहीण योजनेचं काय चाललं आहे? विधानसभेत चर्चा सुरू आहे कशावर तर औरंजेबावर... तुमच्या प्रश्नावर नाही. १५) आपण ज्यांना मुघल म्हणतो ते तुर्की -मंगोल आहेत. धर्माच्या आधारावर देश नाही उभं करता येत. हे समजलं टर्कीला. केमाल पाशा तिकडे आला. तिकडे इस्लाम आता मवाळ आहे. तिकडे मशिदी आहेत पण रस्त्यावर धर्म दिसत नाही. केमाल पाशानी ओट्टोमन खलिफाचे पद संपुष्टात आणले, जे इस्लामिक जगताचे धार्मिक नेतृत्व मानले जात होते. १६) तुर्कीच्या राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. इस्लामला राज्य धर्माचा असलेला दर्जा काढून टाकला. सध्याच्या टर्कीच्या अध्यक्षांनी पण मवाळ धर्म स्वीकारला. आज टर्कीला पर्यटनासाठी ५ कोटी लोक भेट देतात. विचार करा किती सुंदर देश बनवला असेल. १७) आम्ही मशिदींवरचे लाऊडस्पिकर बंद करा म्हणून आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की रात्री १० ते सकाळी ६ लाऊड स्पीकर लावता येणार नाही. अहो प्रश्न सकाळी ६ ते १० चा नाहीच, दिवसभर भोंगे वाजतात त्याचं काय ? योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये मात्र मशिदींवरचे भोंगे उखडून टाकले. त्यांना जमतं मग आम्हाला का नाही जमत ? १८) बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. संतोष देशमुखांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी खंडणी आणि पैशाच्या विषयातून मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते ? १९) आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं, का नाही झाली कर्जमाफी ? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही ३० तारखेच्या आत पैसे भरून टाका. २०) लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी ६० हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाहीत. २१) आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे. २२) टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा. २३) ( आज मी माझ्या आजोबांच्या उठ मराठ्या उठ या १९६६ सालातील पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे. तो काळजीपूर्वक ऐका... "आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री अशा मोहमयी अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये, या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनविण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे - गलबला बुद्धी नासते । नाना निश्चय सांगती । ऐकावे कोणकोणाचे । बोलताहे बहुचकी । करंटे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो ।। असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील, तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदानालिस्ती आणि जाहीर सभांतून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मऱ्हाठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्याइतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला, तर सत्ता स्पर्धेच्या, शर्यतीच्या रिंगणात आपापल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्याचे रिकिबीतले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत." प्रबोधनकार ठाकरे । ) २४) तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते... आजच्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या.. २५) आपला एक अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक प्रमोद अरणे हा कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन आजच्या मेळाव्याला चालत आला आहे. अशा सैनिकांमुळे मला ऊर्जा मिळते. #गुढीपाडवामेळावा२०२५

Raj Thackeray

140,202 次观看 • 1 年前

स्वर्गीय अभिषेक घोसाळकरांना भावपुर्ण श्रद्धांजली….🙏 स्वर्गीय अभिषेक घोसाळकरांच्या धक्कादायक मृत्यूचे उबाठा गटाकडून होणारे राजकारण दुर्दैवी आहे. कारण, सकृतदर्शनी या भयंकर घटनेत राजकारणाचा दुरान्वयानेही संबंध नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात दिसून येतंय. मॅारिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे चांगले संबंध होते. 2024 ला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दोघेजण एकत्र होते. ते दोघेही सोबत काम करत होते. मग घोसाळकरांसोबत स्वतःचाही जीव घेणाऱ्या मॉरिस नरोन्हाकडून कुठल्या गोष्टीवरून इतकं टोकाचं पाऊल उचलण्यात आलं, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र पिस्तुल कुठून आलं, लायसन्स मिळालं आहे का? या सर्व गोष्टी तपासून कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी दिलंय…Devendra Fadnavis पण, सर्वज्ञानी संजय राऊत Sanjay Raut आणि उबाठा गटाचे नेते हीन राजकारण करून आणि पराकोटीची गलिच्छ भाषा वापरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत..Uddhav Thackeray तत्कालीन उबाठा सरकारची लक्तरेही आम्हाला वेशीवर मांडता येतील. त्यांच्या वसुलीबहाद्दर गृहमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करता येईल. पण, ही ती वेळ नाही. राज्याची कायदा-सुव्यवस्था देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पोलीस चोखपणे सांभाळताहेत, म्हणून तर मोहोळ प्रकरणातील आरोपी ताबडतोब गजाआड झाले. परवाच पुण्यात सर्व गुंडांची झाडाझडती घेऊन त्यांना कठोर समज देण्यात आलीय. कायदा हातात घेणाऱ्या स्वपक्षाच्या आमदारालाही त्यांनी तुरूंगाचे दरवाजे दाखवलेत. त्याच निःपक्षपाती भूमिकेतून घोसाळकर प्रकरणाचाही तपास होईल आणि सत्य जनतेसमोर येईल. परंतु, स्वतःच्याच पक्षाच्या एका होतकरू तरूणाच्या मृत्यूचे स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या राऊत आणि उबाठा गँगला काय म्हणावे, हा खरा प्रश्न आहे… Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai #श्रद्धांजली #अभिषेकघोसाळकर #मुंबई

Chitra Kishor Wagh

18,282 次观看 • 2 年前

आज पुन्हा हलून निघाले. डोकं पुन्हा सुन्न झालं. ३२ वर्षीय रत्नाशील निंबाळकर, राहणार अद्रकी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा, या युवकाचा १२ मार्चला क्रूर पद्धतीने खून केला गेला. आईवडील, विधवा बहीण, तिची २ मुलं, तो व त्याची पत्नी व २ मुलं या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा मिलिटरी मधे होता, तिथून त्याला काढून टाकण्यात आले होते असे त्या गावाची लोकं सांगतात. ह्या माणसाचे लग्न झाले नव्हते व त्याचा एक स्त्री बरोबर संबंध होते. ह्या माणसाला पूर्ण गाव “काका” म्हणायचं. रत्नाशील नी माझी गावात बदनामी केली या मुळे त्याने मनात राग घेऊन दत्तात्रय नी त्याच्याच आडनावाच्या व्यक्तीचा निर्दयी पणे खून केला. १२ मार्चला बहिणीचा मुलाची १० वी ची परीक्षेला त्याला रत्नशील सोडायला गेला, तिथून घरी येताना, दत्तात्रय नी त्याला गाडीने उडवला आणि खाली पडल्यावर कोयत्याने त्याला अनेकदा मारले. हा अजून फरार आहे. तिथल्या पत्रकारांनी बातमी देखील केली नाही कारण त्याच्यावर “दबाव” आहे. कसला दबाव ? काय हे ? ह्या आरोपी दत्तात्रयचा सख्खा भाऊ हा भाजप चा फलटण चा सरचिटणीस आहे. त्यांना हात जोडून विनंती, कृपया ह्या कुटुंबाला मदत करा आणि न्याय होऊ द्या . मी SP समीर शेख अतिशय चांगले अधिकारी आहेत. मी यांच्याशी बोलले. ते स्वतः लक्ष घालून या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर नक्कीच मिळवून देतील. फोटो इतके भयाण आहेत की ते मी नाही पाठवू शकत. पण त्या आरोपी दत्तात्रय निंबाळकर चा फोटो मी ट्वीट करत आहे. गृह मंत्री Devendra Fadnavis ह्यात न्याय होईल ह्यासाठी आपण निर्देश द्यावेत.

Mrs Anjali Damania

30,784 次观看 • 1 年前

आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स्टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही चूक नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच. १) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या काही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. २) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत. ३) राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्याला राजकारण म्हणलं असतं तर कोणी ? ४) २००५ ला मुंबईत प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ? ५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.

Raj Thackeray

75,335 次观看 • 2 个月前

आज ६ सप्टेंबर २०२६ रोजी ठाणे येथील श्री. गडकरी रंगायतन येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरं कोणी नाही बसू शकत. आपण धर्माभिमानी असलं पाहिजे धर्मांध होता कामा नये. तुम्हाला धर्मांध केलं जात आहे, जेणेकरून इतर गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून व्हिडीओ करून भारतीयांना सांगितलं परदेशात जाऊ नका. पण एकीकडे मोदी सांगतात परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका आणि दुसरीकडे आपल्याला सांगितलं जातंय आपला जीडीपी वाढला. हे कसं शक्य आहे? देशाची अर्थव्यवस्था डगमगली याचा परिणाम म्हणून ज्याप्रकारे सध्या पेपर फुटी व शिक्षणाच्या प्रश्नांवर विद्यार्थी रस्त्यावर आले त्याप्रकारे उद्या आख्खा देश रस्त्यावर येईल. आपल्या देशातील ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतातलं कामकाज बंद केलं. यातून किती जणांचे रोजगार गेले असतील याचा विचार करा! पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात लावला पाहिजे पण दुसऱ्या भिंतीवर. छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत नाही. २०१८-१९ पासून आजपर्यंत भारतात २००-२५० कोटींची गुंतवणूक करू शकणारे साधारण १३००० उद्योगपती देश सोडून गेले. जर देशाता जीडीपी ७.८ टक्के आहे तर हे उद्योगपती देश सोडून का जातात? डीजेच्या विषयावर मुख्यमंत्री पुण्यात काय म्हणाले ते मला अजून पर्यंत कळलं नाही. नागपूरात डीजे बंदी करण्यात आली आहे मग, संपूर्ण महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? बेरोजगारी, महागाई, ढासळलेली शिक्षण व्यवस्था हे असे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावरून दुर्लक्ष व्हावं म्हणून तुम्हाला धर्माची गुंगी दिली जातेय. २०२४ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघात जे नवीन मतदार टाकले होते त्यातले ९५ टक्के मतदार सध्या एसआयआरच्या माध्यमातून काढून टाकले. म्हणजे २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष खोट्या मतदारांवर निवडून आला असाच त्याचा अर्थ झाला ना? मला सर्वाधिक भिती आहे ती म्हणजे येत्या गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील. जेणेकरून तुम्ही त्याच्यात गुंतून राहिलं पाहिजे. माझं सुजाण हिंदू आणि सजाण मुस्लिम नागरिकांना आवाहन आहे की सतर्क राहा! डीजे, डॉल्बी वापरला जाऊ नये आपले सण-उत्सव हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जावेत ही भूमिका मी यापूर्वीही जाहीर केली आहे. राज ठाकरे ।

Raj Thackeray

106,342 次观看 • 17 天前

वणी विधानसभेचे उमेदवार श्री. राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ आज वणी येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सगळे पक्ष त्या त्या मतदारसंघात कोणत्या जातीच प्राबल्य आहे हे बघून उमेदवाऱ्या देत आहेत. मला जातीतलं काही समजत नाही. आजारी झाल्यावर डॉक्टरची जात पाहून जाता का ? का तो आजार बरा करू शकेल का हे बघता ? मग आमदार निवडून देताना जात बघून का देता ? म्हणून म्हणतो राजू उंबरकरसारखे चांगले उमेदवार निवडून द्या जो तुमच्यासाठी झटेल. २) विदर्भ, मराठवाड्यातले आमदार निवडून इथून येतात आणि त्यांची मुलंबाळं, कुटुंब मुंबई पुण्याकडे असतात. आपला प्रदेश तसाच भकास ठेवायचा आणि यांनी स्वतः ऐषआरामात रहायचं. इथले आमदार म्हणाले की मी परत निवडून आलो तर माझी हॅट्रिक होईल. तुझ्या हॅट्रीकने काय फरक पडतो. ३) यवतमाळ जिल्ह्याची ओळख कापूस म्हणजेच पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून नाही ओळखला जात तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय;. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा कुटुंबाचं पुढे काय होतं याचं कोणाला काही पडलं नाहीये. निवडणुका येतात तेच खासदार, आमदार निवडून येतात, मात्र परिस्थिती जैसे थे. ४) यवतमाळ जिल्हा पुरेसा सिंचनाखाली का नाही? एकदा तरी आमदारांना/खासदारांना प्रश्न विचारा की तुम्ही नक्की काय केलंत आमच्यासाठी ? ५) सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणी ठरवतात आणि तुम्ही इतक्या महत्वाच्या राजकारणाकडे दुर्लक्ष कस करू शकता? तुमच्या आयुष्यातील ५, ५ वर्ष निघून जातात. आपल्यासमोर आपली मुलं मोठी होतात, आपण म्हणतो की अरे बघता बघता मोठा झाला. तसंच तुमचं पण वय वाढत जातं. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, हाच जन्म खरा आणि या जन्मात तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणली जाते. काय चाललंय ? ६) २०१९ ला तुम्ही ज्यांना मत दिलं ते नक्की कुठे आहे याचा विचार केलात का ? दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष ज्यांच्यातून विस्तव जात नसे ते पक्ष एकत्र आले आणि सत्तेत बसले. लोकांनी मतदान शिवसेना-भाजपला, काँग्रेस-राष्ट्रवादीला केल आणि इकडचा गट तिकडे गेला, तिकडचा गट इकडे आला. वाट्टेल तशा युत्या, आघाड्या झाल्या. आणि यांत काय घडलं तर बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली. वैचारिक व्यभिचार किती करायचा? अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले, पुढे वर्षभरात अजित पवारच शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले. यातून तुमच्या मताची लायकी काय आहे ते कळलं का ? ७) महाराष्ट्र जातीपातीत विभागला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत ? स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि इतकं असताना पण हे राजकीय पक्ष येतील, तोंडावर पैसे फेकून मारतील, आणि त्यांना खात्री आहे की तुम्हाला कसंही वागवलं तरी तुम्ही त्यांना परत निवडून देणार . हा त्या लोकांचा समज तुम्ही मोडून काढणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही. ८) रेल्वे भरती महाराष्ट्रात पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्रात यायच्या नाहीत, शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झटका दिला आणि महाराष्ट्रात जाहिराती यायला लागल्या. ९) मशिदींवरचे भोंगे आम्ही बंद केले, सरकारने जर थोडं सहकार्य केलं असतं तर कायमचे भोंगे बंद केले असते. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं म्हणून माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला खुश करायला उद्धव ठाकरेंनी केसेस टाकल्या. १०) जी कामं सरकारने करायची ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहेत. त्यामुळे एकदा माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता एकदा देऊन तर बघा. ११) गेली ५ वर्ष जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुमचा अपमान केला आहे. येणारी निवडणूक हा तुमच्या अपमानाचा बदला घेण्याची निवडणूक आहे. मी तुम्हाला हमी देतो की राजू उंबरकर हा वणीत राहील, इथल्या लोकांच्यासोबत कायम राहील. माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

34,724 次观看 • 1 年前