正在加载视频...

视频加载失败

पूर्वी टीव्ही आणि चित्रपट हे समाजाचा खरा आरसा होते. लोकांच्या समस्या, वास्तव, संघर्ष हे सगळं स्पष्टपणे दाखवलं जायचं. आता मात्र चित्र बदललंय… आजच्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये ना समाज दिसतो, ना प्रश्न! सगळं काही “एंटरटेनमेंट”च्या नावाखाली वरवरचं झालंय. खऱ्या समस्या आता फक्त सोशल मीडियावरच जिवंत आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा...

22,524 次观看 • 3 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

भोंदू बाबा खरातच प्रकरण सुरूच असून आता एक नवीन प्रकरण आलेलं आहे. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आणि यांच्याशी संबंधित लोकांनी अनैतिकतेचा आणि अश्लीलतेचा इतका कळस गाठला आहे की आता मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये तृतीयपंथीयांसोबत सुद्धा अश्लील चाळे केले गेलेले आहेत. आता हे ‘ओष्णोजल’चे सगळे कस्टमर आहेत का? अशी पण आता शंका यायला लागलेली आहे कारण मोठ्या लोकांच्याच गाड्या ते जल घ्यायला जात होत्या. माफी तर मागणं सोडा, कव्हरअप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिकडे मनोहर कुलकर्णी म्हणतो की खरातला मारून टाका. खरातला मारून टाकून कोणाकोणाच्या पापावर पांघरूण घालायचं आहे? १०० पेक्षा जास्त व्हिडिओ आलेले आहेत. हे सगळं कव्हरअप करणे, झाकणे, लोकांना वाचवणे आणि अनैतिकतेचा कळस महाराष्ट्राच्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या याच्यात होऊ देणे हे किती मोठं पाप हे मंत्रिमंडळ करत आहे. हे काय ओष्णोजल मंत्रिमंडळ आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे? अशी शंका जी आहे ती निर्माण व्हायला लागलेली आहे आणि या मंत्रिमंडळातल्या लोकांपासून महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित आहेत अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.

Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳

12,946 次观看 • 5 个月前

सत्ता आता भाजपाच्या डोक्यात जाऊ लागली आहे. मुंबई महानगर पालिकेत सत्तेत आलेला भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंचा आता मर्यादा सोडून वागत आहे. BMC सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना गँग म्हटल्यावर आक्रमक झालेल्या नगरसेवकांवर सभागृह चालविण्याची जबाबदारी असणारा सभागृह नेता गणेश खणकर एखाद्या मवाली सारखा धावून जातो. हे विचित्र आहे , ह्यांना ना सत्ता राबविता येत ना सभागृह चालविता येत. आपल्या रिलबाज बाई ह्यांना त्या खुर्चीचा मान ठेवता येत नाही हे काही सांगायला नको. नेहमीप्रमाणे मनसे गटनेते यशवंत किल्लेदार हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी ह्यांच्या मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम करत होते. किल्लेदार हे पहिल्यांदाच सभागृहात नगरसेवक म्हणून गेलेले असले तरी ते सर्वात मॅच्युअर नगरसेवक म्हणून सध्या मुंबई महानगर पालिकेत वावरत असतात. Yashwant Killedar

मनसे रिपोर्ट | MNS Report

15,546 次观看 • 9 天前

आज मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये. मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही. आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये. आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत — हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. माध्यमं हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहेत का? कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे. आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का? मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – तिथून काही शिकून येतात का? परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही. #मुंबईलोकल #MumbaiLocal

Raj Thackeray

105,280 次观看 • 1 年前