Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

भाजपचा कोल्हापुरात पहिल्यांदाच महापौर. महाडिकांनी शड्डू ठोकत केला जल्लोष

75,010 görüntüleme • 6 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

स्वातंत्र्यदिनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचा अनोखा पुढाकार महापौर बंगल्याचे आवार स्थानिक नागरिकांच्या प्रभातफेरी (मॉर्निंग वॉक) साठी खुले 🔷मुंबईच्या महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेला, भायखळा स्थित महापौर बंगल्याचा निसर्गरम्य परिसर आता स्थानिक नागरिकांच्या प्रभातफेरीसाठी अर्थात ‘मॉर्निंग वॉक’ साठी खुला करण्यात आला आहे. 🔷भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १५ ऑगस्ट २०२६) सकाळी महापौर निवासस्थानी ध्वजारोहण केल्यानंतर स्वतः या निवासस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार खुले करून परिसरातील रहिवासी नागरिकांना ही विशेष आणि अनोखी भेट दिली. 🔷मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, शांत, मोकळ्या आणि निसर्गरम्य वातावरणात प्रभातफेरीसाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने महापौर श्रीमती रितू तावडे यांनी हा निर्णय घेतला आहे. 🔷स्थानिक नागरिकांना बंगल्यालगतच्या पदपथावरून आणि तेथून थेट निवासस्थानाच्या विस्तीर्ण आवारात दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत नियमित मॉर्निंग वॉक करता येईल. 🔷मुंबईच्या महापौरांचे सध्याचे निवासस्थान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात स्थित आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, जून २०२६ च्या अखेरीस महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास प्रारंभ केला. 🔷महापौर बंगल्याच्या परिसरातील स्थानिक नागरिकांशी महापौर नियमित संवाद साधत असतात. पुरातन वारसा अर्थात हेरिटेज श्रेणीत असलेल्या या बंगल्याचा परिसर वृक्षांनी वेढलेला आहे. भल्या सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात फिरणे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असते. हे लक्षात घेऊन आणि स्वातंत्र्यदिनी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः घेतलेल्या या जनहिताच्या निर्णयामुळे स्थानिक रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, महापौरांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

53,791 görüntüleme • 12 gün önce

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा अंतर्गत कलह आणि जातीय मानसिकता महाराष्ट्रासमोर उघडी पडली! यूपीएससी-एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चर्चा होण्याऐवजी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद झाला. त्यानंतर "हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे" असा आरोप-प्रत्यारोप झाल्याने कार्यक्रमाचे गांभीर्यच संपले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडत असताना त्यांनी यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. हा भाजपचा "सबका साथ, सबका विकास" आहे की "खुर्चीसाठी भांडा आणि जातीत समाजाला विभागा" हा नवा मंत्र? यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्याऐवजी भाजपच्या नेत्यांनी स्वतःच्या अहंकाराचा आणि अंतर्गत गटबाजीचा देखावा केला. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला हे शोभणारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर मौन सोडून महाराष्ट्राला उत्तर द्यावे. भाजपमध्ये खुर्ची मोठी की संविधान आणि समानतेची मूल्ये?

Harshwardhan Sapkal

28,317 görüntüleme • 2 ay önce

भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणतात, "महाराष्ट्रातील लोकशाही, पोलिस, अधिकारी, सर्व समावेशक आणि सामावून घेणारे यांचे मी कौतुक करतो. न्यायालयीन पायाभूत सुविधा उत्कृष्ट आहेत. तथापि, महाराष्ट्रातील कार्यकारी अधिकारी प्रोटोकॉलचे पालन करत नाहीत याबद्दल मी निराश आहे. न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यकारी हे लोकशाहीचे समान आधारस्तंभ आहेत; सर्वांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. जर भारताचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच महाराष्ट्राला भेट देत असतील तर मुख्य सचिव, डीजीपी आणि मुंबई पोलिस आयुक्त उपस्थित राहणे अपेक्षित आहे. असे न करणे हे चिंतनाची गरज आहे. प्रोटोकॉल नवीन नाही, ते संवैधानिक संस्थांमधील आदराचे प्रतीक आहे. जेव्हा एखाद्या संवैधानिक संस्थेचे प्रमुख भेट देतात तेव्हा स्वागताला खूप महत्त्व असते..."

Shekhar

25,469 görüntüleme • 1 yıl önce

📍नागपूर नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर विजय जल्लोष केला! मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी, नागपूरचे पालकमंत्री श्री Chandrashekhar Bawankule जी, नागपूर भाजपचे शहराध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी जी, आमदार श्री Krishna Khopde जी, श्री Mohan Mate जी, श्री Pravin Datke जी, ज्येष्ठ नेते श्री चैनसुख संचेती जी, श्री Dr. Parinay Fuke जी उपस्थित होते. विजयाचे शिल्पकार सर्वजण व समस्त कार्यकर्त्यांचे तसेच सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. नागपूरच्या जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी जनतेचे आभार मानले. सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा विजय शक्य झाला आहे. जनतेचा विश्वास आणि जनतेचे प्रेम हेच आमचे सर्वांत मोठे भांडवल आहे. विजयाच्या या आनंदाबरोबरच आमची जबाबदारीही वाढली आहे. जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे आणि तो आम्ही निश्चितपणे करू. #Maharashtra #Nagpur #MunicipalCorporationElection #महानगरपालिका #नागपूरमहानगरपालिका

Nitin Gadkari

20,201 görüntüleme • 7 ay önce

भर पावसात घाटकोपर पूर्व परिसरात ठिकठिकाणी महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी, स्थानिक यंत्रणेला दिल्या सूचना 🔹मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक ३ जुलै २०२६) त्या प्रतिनिधित्व करीत असलेल्या निवडणूक प्रभाग क्रमांक १३२ (घाटकोपर पूर्व) मधील विविध भागांचा भर पावसात प्रत्यक्ष दौरा केला. मुसळधार पावसाचा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि योग्य त्या उपाययोजना तातडीने व्हाव्यात, यासाठी महापौरांनी प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन विविध ठिकाणी पाहणी केली आणि आवश्यक निर्देश दिले. 🔹या पाहणी दौऱ्यात स्थानिक आमदार श्री. पराग शाह, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी यांच्यासह महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी व अभियंता उपस्थित होते. 🔹घाटकोपर पूर्व परिसरातील सखल आणि अतिसखल भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी विशेष लक्ष दिले आहे. आजच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुढीलप्रमाणे महत्त्वाच्या सूचना व निर्देश दिले. 🔹संपूर्ण मतदारसंघात पुनर्विकास (Redevelopment) होत असलेल्या सर्व इमारतींच्या बाहेर पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन गटारे बांधण्याचे तसेच मॅनहोल्सवर मजबूत झाकणे लावण्याचे आदेश देण्यात आले. संकल्प सेवा जवळील रुपारेल इमारतीच्या बाहेर संपूर्ण गटार नव्याने बांधण्याचे काम तातडीने हाती घेण्यास सांगितले. 🔹सत्कार आणि सुखदा इमारतीबाहेर साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नवीन नलिका बांधण्यात येतील. तसेच विद्याभवन रस्ता, भजन समाज मार्ग (गारोडिया पॅलेस समोर) पदपथावर ढापा झाकण लावण्याच्या सूचना महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिल्या. 🔹डॉ. हेडगेवार उद्यानाजवळ नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकावी, जेणेकरून भर रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी थांबून ते थेट पर्जन्य जल वाहिनीद्वारे वाहून जाईल, असे महापौरांनी सांगितले. पुष्प विहार मार्गावर ठिकठिकाणी पदपथालगत नलिकांवर जाळ्या व झाकणे लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. 🔹प्रगती चाळीच्या प्रवेशद्वारावरील मॅनहोलवर नवीन बांधकाम करून सुरक्षित झाकण लावावे. तसेच, प्रगती चाळीच्या पाठीमागे असलेल्या नाल्याला दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे (Railing) उभारावे. याशिवाय, नागरिकांना नाला ओलांडून शौचालयात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग आणि त्यावर संरक्षक कठडे तयार करण्याचे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले. 🔹दरम्यान, नाथ पै रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या पार्किंगमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी येथे 'नो पार्किंग' अंमलबजावणी करण्याच्या आणि मेट्रो उड्डाणपुलाखाली पादचाऱ्यांसाठी सुरक्षित 'क्रॉसिंग' देण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक पोलिस विभागाला दिल्या. 🔹गारोडिया नगर फेडरेशनच्या जागेवर कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून खासगी जागेमध्ये सुंदर उद्यान (Garden) विकसित करण्याचे नियोजन करावे, असे महापौरांनी उद्यान विभागाला सूचित केले. तसेच, रस्त्यांच्या कामांमुळे झाडांना इजा पोहोचू नये म्हणून झाडांची मुळे मोकळी राखण्याचे निर्देशही दिले. यासोबतच, श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्वान लसीकरण आणि निर्बीजीकरण मोहीम वेगाने राबवण्याच्या सूचना संबंधित विभागाला महापौरांनी दिल्या. 🔹पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षा आणि सोयी-सुविधांना महानगरपालिकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभागात अनेक सखल परिसर आहेत. तेथील पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने व्हावा आणि पायाभूत कामे दर्जेदार व्हावीत यासाठी स्थानिक प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे, असे महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या. 🔹भर पावसात महापौर श्रीमती रितू तावडे, आमदार श्री. पराग शाह, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी आणि इतर लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून पाहणी करीत असल्याने स्थानिक नागरिकांनी या पाहणीचे स्वागत केले. निर्देश दिलेली सर्व कामे वेगाने पूर्ण होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

36,883 görüntüleme • 1 ay önce