Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महापौर निवासस्थानी श्रीगणेशाचे घेतले दर्शन 🔷श्रीगणेशोत्सवाच्या पावन प्रसंगी, महापौर निवासस्थानी विराजमान विघ्नहर्त्या श्रीगणरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज (दिनांक १४ सप्टेंबर २०२६) सायंकाळी उपस्थिती लावली. 🔷यावेळी त्यांनी श्रीगणेश मूर्तीचे पूजन - आरती करून संपूर्ण मुंबई व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, समृद्धीसाठी...

35,156 просмотров • 3 дней назад •via X (Twitter)

Комментарии: 1

Фото профиля TheCaravan
TheCaravan3 дней назад

Guess all this at #mumbai taxpayer's cost

Похожие видео

🔹मुंबई महानगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला आज (दिनांक ४ जुलै २०२६) भेट दिली आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. 🔹महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. शरद उघडे, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) श्रीमती रश्मी लोखंडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

32,647 просмотров • 2 месяцев назад

स्वातंत्र्यदिनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचा अनोखा पुढाकार महापौर बंगल्याचे आवार स्थानिक नागरिकांच्या प्रभातफेरी (मॉर्निंग वॉक) साठी खुले 🔷मुंबईच्या महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेला, भायखळा स्थित महापौर बंगल्याचा निसर्गरम्य परिसर आता स्थानिक नागरिकांच्या प्रभातफेरीसाठी अर्थात ‘मॉर्निंग वॉक’ साठी खुला करण्यात आला आहे. 🔷भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १५ ऑगस्ट २०२६) सकाळी महापौर निवासस्थानी ध्वजारोहण केल्यानंतर स्वतः या निवासस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार खुले करून परिसरातील रहिवासी नागरिकांना ही विशेष आणि अनोखी भेट दिली. 🔷मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, शांत, मोकळ्या आणि निसर्गरम्य वातावरणात प्रभातफेरीसाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने महापौर श्रीमती रितू तावडे यांनी हा निर्णय घेतला आहे. 🔷स्थानिक नागरिकांना बंगल्यालगतच्या पदपथावरून आणि तेथून थेट निवासस्थानाच्या विस्तीर्ण आवारात दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत नियमित मॉर्निंग वॉक करता येईल. 🔷मुंबईच्या महापौरांचे सध्याचे निवासस्थान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरात स्थित आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, जून २०२६ च्या अखेरीस महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास प्रारंभ केला. 🔷महापौर बंगल्याच्या परिसरातील स्थानिक नागरिकांशी महापौर नियमित संवाद साधत असतात. पुरातन वारसा अर्थात हेरिटेज श्रेणीत असलेल्या या बंगल्याचा परिसर वृक्षांनी वेढलेला आहे. भल्या सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात फिरणे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असते. हे लक्षात घेऊन आणि स्वातंत्र्यदिनी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः घेतलेल्या या जनहिताच्या निर्णयामुळे स्थानिक रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, महापौरांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

54,259 просмотров • 1 месяц назад

मुंबईच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात, मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा 🚩 मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजप नगरसेविका सौ. रितुताई तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेना नगरसेवक श्री संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आज मुंबई महानगरपालिका सभागृहात सौ. रितुताई तावडे यांनी महापौरपदाचा तर श्री. संजय घाडी यांनी उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी तसेच मुंबई भाजप अध्यक्ष श्री अमित साटम जी यांच्यासमवेत उपस्थित राहून नूतन महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित महापौर मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनासाठी तसेच नागरिकांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करतील, असा मला दृढ विश्वास आहे Devendra Fadnavis CMO Maharashtra @devendra_fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ameet Satam Ritu Tawde @ritu_tawde_bjp_official sanjay ghadi-संजय घाडी #BMCMayor #BJPMumbai #मुंबई_महापौर_२०२६

Manoj Kotak

102,615 просмотров • 7 месяцев назад

🔹मुंबईच्या महापौरपदी श्रीमती रितू राजेश तावडे तर उपमहापौरपदी श्री. संजय शंकर घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ऐतिहासिक महानगरपालिका सभागृहात आज (दिनांक ११ फेब्रुवारी २०२६) पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. 🔹निवडीनंतर, महापौर श्रीमती रितू तावडे व उप महापौर श्री. संजय घाडी यांनी सभागृहातील महापुरुषांच्या पुतळ्यांना तसेच महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशहा मेहता यांचा पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर, हुतात्मा स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक येथे पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातही दर्शन घेतले. #MyBMCUpdates #bmcmayor #bmcmayor2026 #Mumbai #RituTawde #sanjayghadi CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Rahul Narwekar Dr Neelam Latika Diwakar Gorhe Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

14,307 просмотров • 7 месяцев назад

🔷मुंबईतील मॅनहोल्सवर कामे करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या संकल्पनेतून 'मॅनहोल रेलगार्ड' (Manhole Rail Guard) ही चौकोनी आकारातील प्रतिकृती विकसित करण्यात आली आहे. 🔷ही प्रतिकृती प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) मुंबईतील एल प्रशासकीय विभागामध्ये वापरात आणण्यात येत आहे. 🔷तेथील अनुभव लक्षात घेऊन तसेच तांत्रिक गरजा आणि महानगरपालिका कर्मचारी व नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे, या प्रतिकृतीचा वापर करावा किंवा कसे, याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

48,258 просмотров • 2 месяцев назад

🔹ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती आश्विनी भिडे यांनी श्री. भूषण गगराणी यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज स्वीकारला. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

14,101 просмотров • 5 месяцев назад

🙏 आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता! मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे मुंबईकरांना विनम्र आवाहन.. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि ‘रेड अलर्ट’ आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. 👉 कृपया अनावश्यक बाहेर पडू नका 👉 झाडांपासून दूर राहा 👉 वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करा 👉 अफवांवर विश्वास ठेवू नका 📞 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क: 1916 प्रशासनाच्या सूचनांचे कृपया पालन करावे. #MumbaiRains CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

152,717 просмотров • 2 месяцев назад

कुर्ला येथील भूस्खलन दुर्घटना: मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून बचावकार्याची पाहणी दगावलेल्या व्यक्तींच्या वारसाला ४ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर 🔷कुर्ला (पश्चिम) येथील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे आज (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत डोंगरउतारावरील माती आणि ढिगाऱ्याचा काही भाग २ ते ३ घरांवर कोसळल्याने जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे. 🔷या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, पीडित कुटुंबांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व यंत्रणांना मदत कार्य अधिक वेगाने व योग्य समन्वय राखून पार पाडण्याचे निर्देश दिले. 🔷याप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. विजयेंद्र शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, एल विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) श्री. अनिल जाधव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 🔷या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला ४ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत तर जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्याची घोषणा महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली आहे. 🔷दुर्घटना घडली ती जागा आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग हा फक्त एक व्यक्ती जावू शकेल, इतका अरुंद आहे. घटनास्थळी उपस्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF), मुंबई पोलिस, १०८ रुग्णवाहिका आणि इतर सर्व यंत्रणा ह्या घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत दोन शव काढण्यात आले आहेत. तर दोन जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य आणि संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

38,120 просмотров • 1 месяц назад

महापौर निवासस्थानी गणपती बाप्पाचे भक्तिभावाने स्वागत शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणपूरक आरास आणि महानगरपालिका शाळेतील चिमुरड्या रितिकच्या कलेचा विशेष सन्मान 🔷श्रीगणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात महापौर बंगल्यावर विघ्नहर्त्या श्रीगणरायाची अत्यंत भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात आज (दिनांक १४ सप्टेंबर २०२६) सकाळी प्रतिष्ठापना करण्यात आली. दीड दिवसांच्या या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ​🔷महापौर निवासस्थानावरील श्रीगणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरकतेला दिलेले प्राधान्य होय. महापौर निवासस्थानी विराजमान झालेली मूर्ती ही पर्यावरणपूरक शाडू मातीची आहे. आरास देखील विविध फुले व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारण्यात आली आहे. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित प्रभादेवी महानगरपालिका शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी रितिक पासवान याने स्वतःच्या हाताने बनवलेली, शाडू मातीची छोटी गणेशमूर्ती मागील आठवड्यात महापौरांना भेट दिली होती. त्या बालसुलभ कलेचा आणि भावनेचा सन्मान राखत, महापौरांनी या मूर्तीचीही निवासस्थानी प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी रितिक व त्याची आई उपस्थित होते. आपल्या हाताने साकारलेला बाप्पा थेट महापौरांच्या घरी पुजला जात असल्याचे पाहून रितिक व त्याच्या मातेचा आनंद गगनात मावत नव्हता. 🔷यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, ​"महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेल्या श्रीगणेशोत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा प्रदान करते. लाडका बाप्पा आपल्या मुंबई नगरीवर कृपादृष्टी ठेवो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्रदान करो, हीच प्रार्थना," अशा शब्दांत महापौर श्रीमती रितू तावडे यांनी भावना व्यक्त केल्या. #ganpatifestival #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #MyBMCUpdates #गणेशोत्सव #राज्यउत्सव

माझी Mumbai, आपली BMC

21,837 просмотров • 3 дней назад

🛣️धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावरील संगीत रस्त्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले. 🔹हंगेरीचे वाणिज्य दूत श्री. फॅरेन जारी, माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 🎶मुंबई किनारी रस्त्यावर साकारलेला संगीत रस्ता हा भारतातील पहिलाच संगीत रस्ता (मेलोडी रोड) ठरला आहे. यापुढेही संगीत रस्ता ही संकल्पना राबविण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. 🔹नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर बसविलेल्या विशेष संगीत पट्ट्यांमुळे वाहनचालकांना ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ‘जय हो’ची धून ऐकू येणार आहे. #MyBMCUpdates #MumbaiCoastalRoad CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha

माझी Mumbai, आपली BMC

24,124 просмотров • 7 месяцев назад

🔷महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडथळामुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' (Pedestrian First) अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. 🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पूर्व’ विभागाकडून वाकोला परिसरातील राजेंद्र कांबळे मार्गालगतच्या पदपथावर अडथळा निर्माण करणाऱ्या ३७ अनधिकृत दुकानांवर काल आणि सांताक्रूझ (पूर्व) येथील ०६ अनधिकृत दुकानांवर आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली. #PedestrianFirst #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

37,480 просмотров • 1 месяц назад

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या मुंबईतील विविध दहीहंडी उत्सवांना भेटी; गोविंदा पथकांचा वाढवला उत्साह केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांची केली विचारपूस; दर्जेदार उपचारांचे प्रशासनाला निर्देश 🔷मुंबईत मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काल (दिनांक ५ सप्टेंबर २०२५) दिवसभरात शहर व उपनगरांतील विविध भागांत आयोजित दहीहंडी उत्सवांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. विविध मंडळांच्या ठिकाणी उपस्थित राहून मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा पथकांचे मनोबल वाढवले. तसेच, रात्री उशिरा परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाला भेट देऊन उपचारासाठी दाखल जखमी गोविंदांची आस्थेने विचारपूस केली. तसेच, त्यांच्यावर योग्य व तत्पर उपचार करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. मुंबईतील विविध दहीहंडी मंडळांना महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या भेटी 🔷मुंबईतील दहीहंडी उत्सवात गोविंदांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी शहर आणि उपनगरांतील विविध प्रमुख दहीहंडी मंडळांना भेटी दिल्या. त्यामध्ये वरळीतील जांबोरी मैदान येथे 'परिवर्तन इंडिया फाउंडेशन' आयोजित परिवर्तन दहीहंडी, भोईवाडा येथे 'स्प्रिंग मिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' पुरस्कृत व 'भारतीय जनता पार्टी वडाळा विधानसभा' आयोजित दहीहंडी उत्सव, घाटकोपर (पश्चिम) येथे श्रेयस सिग्नल परिसरात आमदार श्री. राम कदम आयोजित मानाची दहीहंडी, 'लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट' पुरस्कृत कै. सुहास चौधरी मित्र मंडळ आयोजित 'भटवाडीचा लाडका' दहीहंडी उत्सव, 'भारतीय जनता पक्ष' व 'सत्कार्य सेवा संघ' आयोजित भटवाडी नाक्याची मानाची दहीहंडी, असल्फा व्हिलेज येथे 'शिवसेना' पुरस्कृत, नगरसेवक श्री. किरण लांडगे व मित्र परिवार आयोजित 'सन्मान दहीहंडी', घाटकोपर (पश्चिम) येथील सॅनेटोरियम मार्ग येथे 'भारतीय जनता पक्ष' आणि 'महात्मा गांधी मार्ग व्यापारी मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी उत्सव, 'भारतीय जनता पक्ष घाटकोपर पूर्व विधानसभा' मतदारसंघ आयोजित 'विक्रांत सर्कल' दहीहंडी उत्सव, घाटकोपर (पूर्व) मधील नारकर मार्ग येथे 'युवा मित्र मंडळ' आयोजित दहीहंडी उत्सव, भांडुप (पश्चिम) येथे कोकण नगर नाका येथील 'भारतीय जनता पक्ष भांडुप' आयोजित दहीहंडी उत्सव, दहिसर (पूर्व) येथे 'शिवसेना शाखा क्रमांक ५' आणि 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' आयोजित दहीहंडी उत्सव, तसेच दहिसर (पूर्व) मध्ये अशोकवन परिसरातील 'भारतीय जनता पक्ष मागाठाणे विधानसभा' आणि 'शिवराज प्रतिष्ठान' आयोजित दहीहंडी उत्सव यांचा समावेश होता. 🔷या भेटींदरम्यान केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे उपसभापती श्री. सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार, आमदार श्री. कालिदास कोळंबकर, आमदार श्री. अमित साटम, आमदार श्री. प्रवीण दरेकर, आमदार श्री. पराग शाह, आमदार श्री. राम कदम, उपमहापौर श्री. संजय घाडी आणि इतर लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका व मान्यवर उपस्थित होते. 🔷गोविंदा पथकांनी शिस्त, संघभावना आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करावा, अशा शुभेच्छा महापौरांनी यावेळी दिल्या. केईएम रुग्णालयात जावून महापौरांनी जखमी गोविंदांची आस्थेने केली विचारपूस 🔷दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना शासकीय व महानगरपालिका रुग्णालयांमध्ये रात्री उशिरारापर्यंत झालेल्या नोंदीनुसार एकूण १६८ गोविंदा जखमी झाले. 🔷या पार्श्वभूमीवर, महापौर श्रीमती रितू तावडे यांनी रात्री महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाला भेट दिली. 🔷रुग्णालयात अस्थिव्यंग शल्यक्रिया विभागात उपचाराधीन असलेल्या सात गोविंदांच्या प्रकृतीची आणि वैद्यकीय स्थितीची महापौर श्रीमती तावडे यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच जखमी गोविंदांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 🔷केईएम रुग्णालयात दिवसभरात ४२ गोविंदा वैद्यकीय उपचारासाठी दाखल झाले. पैकी ३५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर, सात जण अस्थिव्यंग शल्यक्रिया विभागात उपचार घेत आहेत, सुदैवाने कोणालाही गंभीर इजा नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 🔷रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व गोविंदांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार प्राधान्याने, वेळेत आणि दर्जेदारपणे देण्याचे निर्देश महापौर श्रीमती रितू तावडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. 🔷यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, अस्थिव्यंग शल्यक्रिया विभाग प्रमुख डॉ. मोहन देसाई आणि संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

29,697 просмотров • 12 дней назад

लाजू नका, घाबरू नका! वेळेत तपासणी, वेळेत निदान आणि योग्य उपचार! 🎀🩺 🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे 'महिलांसाठी कर्करोग तपासणी महाअभियान' अंतर्गत २२७ प्रभागांमध्ये ३० वर्षांवरील महिलांसाठी स्तन कर्करोगाची प्राथमिक तपासणी मोफत केली गेली. तसेच वजन, रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणीदेखील करण्यात आली आहे. 🔹माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त,'बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!’ या ध्येयाने आयोजित महाअभियानाअंतर्गत विविध प्रभागांमध्ये आयोजित शिबिरांमध्ये महिलांनी सक्रियपणे सहभाग नोंदवला. #MyBMCUpdates #cancer #womenshealth #breastcancerawareness #mumbai #लाडकीबहीण #cancerprevention #health #cancercare #cancertreatment #publichealth #cancerfreemaharashtra #cancerinwomen CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

27,346 просмотров • 1 месяц назад

🔷 पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत. नागरिकांना या दोन्ही बाबी शुद्ध व गुणवत्तापूर्ण पद्धतीने मिळत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विश्लेषक प्रयोगशाळा कार्यरत आहे. 🔷 दादर येथील ‘जी उत्तर’ कार्यालयातील महानगरपालिका विश्लेषक प्रयोगशाळेत दरवर्षी सुमारे ७० हजारांहून अधिक पाणी आणि अन्नाचे नमुने तपासण्यात येतात. प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले आहेत. 🔷अत्यंत अल्प दरात तसेच अवघ्या २४ तासांत पाणी तपासणी अहवाल वापरकर्त्याच्या मोबाईल आणि ईमेलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा प्रयोगशाळेच्या माध्यमातून देण्यात येते. 🔷नागरिक तसेच व्यावसायिक आस्थापनांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

25,262 просмотров • 2 месяцев назад

जलवाहिनी गळती दुरुस्ती कामामुळे शहर व पूर्व उपनगरातील पाणीपुरवठा होणार प्रभावित 🔷ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम काल रात्री पासून सुरू आहे. तथापि, तांत्रिक कारणांमुळे या दुरुस्ती कार्यवाहीत अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, शहर व पूर्व उपनगरास शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणारा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. 🔷महानगरपालिका जल कार्य विभागाचे (नगरबाह्य) अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. 🔷क्षतिग्रस्त दाबयुक्त जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे शहर व पूर्व उपनगरास शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणारा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. 🔷याची नागरिकांना नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे नम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात येत आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

32,495 просмотров • 1 месяц назад

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा समुद्र किनारा पर्यटकांचे आकर्षण, तो स्वच्छ राखायला सहकार्य करा: महापौरांचे नागरिकांना आवाहन 🔷उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जुहू समुद्र किनाऱ्यास आज (दिनांक १९ ऑगस्ट २०२६) सायंकाळी प्रत्यक्ष भेट दिली. जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेचा आणि सुरू असलेल्या उपाययोजनांचा महापौर श्रीमती तावडे यांनी सविस्तर आढावा घेतला. 🔷या पाहणीप्रसंगी के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष श्री. रोहन राठोड, स्थानिक नगरसेविका श्रीमती सुधा सिंग, सहआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त श्री. कुंदन वळवी यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 🔷यावेळी माहिती देताना अधिकाऱ्यांनी नमूद केले की, जुहू समुद्र किनारा सुमारे सात किमी लांब आहे. यापूर्वी पावसाळ्यात उंच लाटांमुळे जुहू किनाऱ्यावर दररोज सुमारे १२० मेट्रिक टन कचरा वाहून येत होता. दररोज किनारा स्वच्छ तो कचरा पूर्णपणे वाहून नेला जायचा. यंदाच्या पावसाळ्यात जुहू किनाऱ्यावर कचरा वाहून येण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज सुमारे २०० ते २५० मेट्रिक टन कचरा किनाऱ्यावर येतो. पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते रात्री १० या दोन सत्रात प्रत्येकी ७५ असे एकूण १५० मनुष्यबळ स्वच्छता करतात. किमान १८० टन कचरा दररोज उचलला जातो. वाढत्या कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर २ बीच क्लिनिंग मशिन्स, ४ बॉबकॅट्स, २ पोकलेन, २५ डंपर्स, ४ ट्रॅक्टर ट्रॉली, २ जेसीबी, १ बुलडोझर अशी यंत्रणा तैनात करून स्वच्छतेची कार्यवाही अथकपणे केली जाते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 🔷संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर आणि किनाऱ्यावर पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता अखंडपणे सुरू ठेवून काम अधिक गतिमान करण्याचे निर्देश आज पुन्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. यापूर्वी देखील प्रशासनाला पत्र पाठवून अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात करण्याच्या सूचना मी केल्या होत्या. तसेच, या किनाऱ्यावर कचरा टाकू नये, या आशयाचे नागरिकांना आवाहन करणारे जनजागृतीपर फलक तत्काळ लावावेत, अशी सूचना देखील केली आहे. मुंबईचे समुद्र किनारे हे स्थानिक नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहेत. हे किनारे सदैव स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी अथवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा न फेकता योग्य पद्धतीने, कचरा पेटी आणि कचरा डब्यांमध्ये टाकावा, योग्य विल्हेवाट लावावी. मुंबईचे समुद्र किनारे स्वच्छ राखण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले. 🔷या पाहणीनंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी त्यांना प्रोत्साहित केले. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

33,992 просмотров • 29 дней назад

🌉राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान स्‍वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्‍यात आला आहे. या विस्‍तारीत कामाचे लोकार्पण महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्‍या शुभहस्‍ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्‍यात आले. 🔹हा विस्तारित पूल आज सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 🔹या विस्‍तारित पुलाची एकूण लांबी ७५० मीटर असून रुंदी १५.५० मीटर (२+२ मार्गिका) अशी आहे. . 🔹उड्डाणपुलाच्या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (गोरेगाव पूर्व) ते रिलीफ रोड तसेच अंधेरी (पश्चिम) कडे जाणाऱ्या जोड रस्‍त्‍याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. 🔹या प्रकल्पामुळे ३० मिनिटांचा प्रवास कालावधी कमी होऊन अंदाजे ५ मिनिटांपर्यत येणार आहे. तसेच, स्‍वामी विवेकानंद मार्ग व परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

89,195 просмотров • 3 месяцев назад

🔹बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी एच पश्चिम विभागातील वांद्रे (पश्चिम) येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या धर्मशाळा चौकी, शासकीय तंत्रनिकेतन वांद्रे पश्चिम समोरील खेरवाडी येथे आज पहाटे आकस्मित भेट दिली व कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधला. तसेच, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरीपटाची तपासणी केली. 🔹एच पश्चिम विभागातील रस्ते स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, बस थांबे आदी ठिकाणच्या स्वच्छतेकडे व्यापक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागाने (वॉर्ड ) मुंबई अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी परस्परांमधील समन्वय अधिक वाढवावा, अशा सूचनादेखील आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिल्या. 🔹उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (परिमंडळ ३ ) श्री. विश्वास मोटे, सहायक आयुक्त श्री. दिनेश पल्लेवाड आदी उपस्थित होते. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

20,802 просмотров • 4 месяцев назад