Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

मराठी माणूस मुंबईत येणार नाहीतर काय सुरत आणि गुवाहाटीला जाईल?

27,252 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

मराठे हसले, कोणाच्या पोटात दुखले? जरांगेची भूमिका आपल्याला पटते/ नाही पटत हा भाग वेगळा पण गावखेड्यातून मराठ्यांची पोरं आबाळ होत असताना मुंबईत आली. वर्षभर शेतकरी म्हणून हाल अपेष्टा आहेतच. जरांगेनसोबत आल्यानंतर थोडं मुंबईत फिरले, बघितलं, आनंद घेतला तर इतरांच्या पोटात का दुखतंय? ते काय इराण/ पाकिस्तानातून आलेले नाहीत. आपलेच भाऊबंद आहेत. मुंबई त्यांची पण आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आले म्हणून काय त्यांनी सतत रडवेला चेहरा करून माहेरची साडी मधली अल्का कुबल व्हावं का? आव्हानं, संकट, अनिश्चितता पाचवीलाच पूजलीये. त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाहीच.. पण आरक्षणाच्या मागणीसाठी चूल बंद करत पोटाला चिमटा काढत मराठे मुंबईत आलेयत. 2 ठिकाणं फिरले, ठेका धरला, आनंद घेतला आणि शांतपणे आरक्षण मागितलं तर यात चुकीचं काय? बाया बापड्या म्हाताऱ्यानी नुसते मुंबईचे स्वप्न बघितले आहेत.. कधी यायची हिम्मत झाली नाही. जरांगेच्या एका हाकेवर आहे नाही तेव्हड बळ एकवटून हे गोर गरीब मुंबईत अलेयत... आज कुठं थांबणार, कुठं खाणार याचीही खात्री नाही. आयुष्यात डोंगराएव्हढ्या समस्या असताना आंदोलनासारख्या गोष्टीत थोडं समाधान आनंद शोधत असतील तर शोधू द्या की. कोणीतरी आपल्या त्रासावर फुंकर घालतय , कोणीतरी आपल्यासाठी उभं राहत्य, कोणीतरी आपल्याला न्याय देतंय आणि हे निर्णायक टप्यावर आलं याचा हा आनंद आहे. त्यांना बघून नाक मुरडण्यासारखा निचपणा दुसरा नाही. - सौरभ कोरटकर #jarangepatil #MarathaReservation

Saurabh Koratkar

46,947 görüntüleme • 1 yıl önce