Loading video...
Video Failed to Load
स्पर्धा परीक्षा हा प्रत्येकच तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय. काही यशस्वी होतात आणि काही अपयशी होतात. पण, अपयशींना पुन्हा नव्याने यशाचे शिखर चढण्यासाठी प्रोत्साहन देणारे कमी असतात. असाच एक प्रयत्न ‘मुसंडी’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात येतोय, याचा मला अतिशय आनंद आहे. या सर्व टीमला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो! सोनाई फिल्म क्रिएशनचे... show more
59,682 views • 3 years ago •via X (Twitter)
28 Comments

साहेब गेले २-३ महिने निवेदने विनवण्या करुन थकलेत आता विदयार्थी. अभ्यासासाठी करत असलेल्या संघर्षाने नाही, तर विनाकारण आरक्षण आणि कोर्टाच्या वारंवार होणाऱ्या सुनावण्यांनी वैतागलेत. खरंच PSI2020 चा निकाल लवकरात लवकर लावावा नाहीतर पुन्हा एखादा स्वप्नील लोणकर हाकनाक बळी जाईल 🙏

परीक्षा घेऊन भरती पूर्ण करत नाहीत...2017 ची शिक्षक भरती प्रक्रिया आणखी अपूर्ण आहे... परीक्षा फी 1000 रुपये घेता... लाखो रुपये खाजगी कंपन्या च्या घशात घालत... आई - बाप अशे पोटी फी भरतात.., इथे आमच्या जिंदगी चा सिनेमा झालाय.... तो बगा...?

शासकीय खर्च कमी करण्याच्या नादात, साहेब तुम्ही फार वाटोळे केले तुम्ही आमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांच्या. महापरिक्षा पोर्टल काढून तुम्ही गोम काढली. 72000 पदभरती नंतर 75000 पदभरती.... देव जाणो काय होईल या घोषणेचा.

तुमच्या सरकारने सरळसेवा भरती परीक्षा शुल्क 200 ते 300 रु..वरून तब्बल 900 ते 1000 रु शुल्क बेरोजगार तरुणाकडून वसुली सुरू केली आहे..

देवेंद्र साहेब... तुम्हीं आमचं गुलाब पुष्प सारखं आयुष्य .... उध्वस्त करून टाकले.....🤞😰🙏 हो हो... देवेंद्र साहेब तुम्हीच..... तुम्हीं स्पर्धा परीक्षा ची संपूर्ण वाट लावली😰 साहेब... वेळ आहे चुका सुधार करा..🙏 नंतर , वेळ माफी देणार नाही. आणि 🤞 परतफेड करावीच लागेल.🤞

#सरळसेवाभरती साठी परीक्षा शुल्क 1000 रू.केले आहे. यामुळे मुलांची आर्थिक पिळवणूक होत आहे पहिले परीक्षा शुल्क 350 रू होते आमची विनंती आहे की आपण fees कमी करण्याची मागणी करावी...🙏🏻 मा.देवेंद्र जी आपण fees मद्ये सवलत देण्याचा निर्णय घ्यावा ही विनंती @Dev_Fadnavis @Devendra_Office

सर हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय नक्कीच आहे.वय ,पैसा ,तिरस्कार याचा विचार न करता आम्ही तयारी करतो .पण सरकारने सुध्धा आमचं मनोबल वाढलं अस वागायला हवं . add वेळेवर काढणे,result लवकर लावणे .ही सगळी process एका वर्षा मध्ये व्हायला हवी. सध्याचं धोरण भगता खूप मुळे depression madhe ahet

2019 चं मेंगा भरती च गाजर दाखून लाखो गोर गरीबाच्या मुलांनी 15 हजार रुपये भरून फॉर्म भरले होते... त्याच काय केल ना भरती झाली ना काही.. कर्तूव शून्य मुख्यमंत्री नुसती खोटी आश्वासन देणार... फोडा फोडीच राजकारण करणार 👆🏻

15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75,000 पदांची भरती करणार होता. जिल्हा परिषद, नगर परिषद, तलाठी भरती ह्या बहुप्रतिक्षित जाहिरातींपैकी अजून एकही जाहिरात आली नाही. फक्त घोषणा आणि आश्वासने सुरू आहेत.

साहेब मुल महावितरणमधे सहाय्यक अभियंता (AE )या पदासाठी ५ वर्षांपासून वाट पाहत आहेत मात्र भरती बद्दल हालचाल दिसून येत नाही.भरण्यात येणाऱ्या ७५,००० रिक्त पदभरती मधील MSEDCL च्या आश्र्वासित वाट्यातील AE/JE जाहिरात प्रसिध्द करावी ही विनंती. #Mahadiscom_AE_JE_Vacancy

बेरोजगारांना नोकरी हवी चित्रपट नाही. १०० टक्के नोकरभरती करा.

आज जी विद्यार्थी ची स्थिती आहे ते फ़क्त @Dev_Fadnavis तुमच्यामुळे गेल्या 8 वर्षा पासून तुम्ही राज्यातील सर्व भरती बंद करून युवकांना फक्त भरती चे गाजर देत आहात आता #2024 मध्ये तेच गाजर आम्ही तुम्हाला देऊ #BJP हटाव सरकारी नौकरी बचाव

अहो साहेब इथ पेपर झाला, यश मिळवले तीन महिने उलटले, तरी पवित्र पोर्टल सुरू झाले नाही.आधार आधार चा खेळ आणि संचमान्यता झाली नाही जागा किती आहेत ते माहित नाही, प्रत्येक जिल्ह्यात निवेदने दिली तरी पण शिक्षक भरतीचा काय थांगपत्ता नाही बघा. किती दिवस मानसिक तणाव देणार आहेत #शिक्षक_भरती

स्पर्धा परीक्षा पेपर फोडणारी टोळी पोलिसांना मारहाण करते.... गृह मंत्रालय झोपले तर नाही न?? परीक्षा, पोलीस सुरक्षित नाहीत.... भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाय योजना नाही... काय चालू आहे.. राज्यात...?

बोलण्यात आणि करण्यात जास्त अंतर असू नये #75000मेगाभर्ती #55000शिक्षकभरती z.p. भरती कधी जाहीर होणार आरोग्य विभाग पशू संवर्धन विभाग पद भरती कधी होणार या वर निर्णय नाही #2017शिक्षकभरती #2022शिक्षकभरती कधी पूर्ण होणार @AshwiniKadu18 @raheman_pathan1 @kamblesandeep12 @dvkesarkar

@Dev_Fadnavis मुंबई चां पेपर परत घ्यावा .तुमचे सचिव परदेशी साहेबाना सुधा याविषयी बोलणं झालेलं आहे. तुम्ही 150000 पदे भरत आहेत चांगली गोष्ट आहे . आमचं तर मत आहे 80000 भरा पण पारदर्शी करा सर्व . तुम्ही सर्व जाहीर करून मोकळं होताय परत लक्ष घालत नाही ...साहेब आम्हाला न्याय द्या .

साहेब सरळसेवा भरती च पण पहा जरा... कंत्राटी होत आहे सर्व जे विध्यार्थीना न आवडणारे आहे... जनतेला सुद्धा नको आहे... बेरोजगारी किती वाढली आहे हे ग्राउंड लेव्हल ला येऊन पहा थोडं...

चित्रपटाचं प्रमोशन केलं पण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला का?? यश आणि अपयश एवढ्यापुरती नाही ही प्रक्रिया. राजकीय निष्क्रियता ही अपयशापेक्षा फार भयानक वाटते आम्हाला. PSI 2020 साठी अर्ज विनंत्या करून थकलो आम्ही.🙏

उपकेंद्र सहाय्यक प्रतीक्षा यादी 05/2019 राहिलेले 757 बेरोजगार गोरगरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आझाद मैदान येथे आंदोलनाला बसले आहेत आज 9 दिवस आहे .. आपण हिवाळी अधिवेशन मध्ये माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आश्वासन दिले होते.ते पूर्ण करा.!

एकदा परीक्षा द्यावी तुमची स्पर्धा तरी दिसेल. नको तेथे सल्ले देऊ नका. सरकारी कार्यालये रिक्त जागा भरा.

@Dev_Fadnavis @Dev_Fadnavis व्वा साहेब पोलीस भरतीची जाहिरात निघाली 18000 हजाराची बर वाटलं ...पण इतकं भ्रष्टचार कोणीच केला नाही .आज तुम्हाला आम्हा पोलिस वाल्यांची दखल घ्यायला वेळ नाही. आमची आंदोलन होऊ देत नाही पोलीस.आज पोलिसच सुरक्षित नाहीत...तुम्हाला याच उत्तर द्यावे लागेल 💯

सर्व नोकर भरती MPSC मार्फत वन रैंक वन एन्ट्री करा! राज्याला मजबूत व गतिमान प्रशासन द्या!

Combine 8 oct pre निकाल लावा, 10 महिने झाले. शेतकरयां च्या मुलांची जाण ठेवा. अपेक्षा भंग करू नका.

आपल्याला विनंत्या, कळकळीची विनंती हे शब्द वापरण्या पेक्षा आता तरूणाईने नक्षलवादाकडे वळायला काहीच हरकत नाही असं आता आम्हाला वाटायला लागलं आहे. कारण पूरे झाले आश्वासन,घोषणा आमचे कान बधीर व्हायची वेळ आली आहे तूम्ही खरच आता कोणत्याच घोषणा करूच नका.आम्ही 2014 पासून हेच ऐकत आहोत

👍

कर्तव्यदक्ष

Talathi vacancies nighlya aahet saheb....ekach vinanti k ratra divas abhyas karnarya students la lagu dya...kontahi ghol nka hou dya...nahitar lok 25-30 lakh gheun tayarch astat....tyasathi koni setting chya prayatnamade sapadlyas karyavahi Kara...

Nice
