Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

हिंदी राष्ट्रभाषा नसल्याचं दीपक पवारांनी ठणकावून सांगितलं

16,364 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

काही वर्षांपूर्वी मुंबईत उत्तर भारतीयांच्या एका संमेलनात त्यांच्या व्यासपीठावर जाऊन राजसाहेबांनी त्या उत्तर भारतीयांना त्यांना समजणाऱ्या अस्सखलित हिंदी भाषेत पक्षाची भूमिका समजवून सांगितली. या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला कोणतंही स्पष्टीकरण द्यायला आलेलो नाही. मी इथे आलोय ती माझ्या पक्षाची भूमिका मांडायला. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखीच एक भाषा आहे. ती भाषा ज्या राज्यात बोलली जाते तिथे तिचा सन्मान केला पाहिजे पण महाराष्ट्रात मराठीचाच सन्मान व्हायला पाहिजे. तुम्ही जो तुमचा प्रांत, तुमचं घर सोडून इथे येता, त्यावेळेस तुमच्यावर ही वेळ कोण आणत याचा विचार करा, ती वेळ तुमच्यावर तुमच्या प्रदेशातील राजकारणी आणतात. तुमच्या भागातून इतके पंतप्रधान निवडून आले तरी पण जर तुमच्या भागाचा विकास होत नसेल तर दोष कुणाचा ? आणि मग तुम्ही दुसऱ्या राज्यात जाणार आणि तिथे दादागिरी करणार हे का खपवून घ्यायचं? हे भाषण ऐकण्यासारखं आहे. जरूर ऐका... #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

27,739 Aufrufe • vor 1 Jahr